✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जननि कर्मभूमिश्च....

स
सुनील यांनी
Tue, 03/17/2009 - 13:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7333 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

मस्त लेख ...

छोटा डॉन
Tue, 03/17/2009 - 13:38 नवीन
सुनीलभौ, नेहमीप्रमाणेच अभ्यासपुर्ण आणि उत्तम भाष्य ... लेख आवडला. खरं आहे, माणसाचे नशिब आणि कर्तुत्व कुठे फळाला येईल हे सांगता येत नाही. कोण कुठचा असतो आणि कुठे आपले ॠण फेडुन जातो ह्याला काय नियम अथवा संकेत नाहीत. थोडक्यात परिचय आवडला ... बाकीच्यांनीसुद्धा असेच काहितरी उत्तम येऊद्यात ... अवांतर : लालकॄष्ण आडवाणी हे जन्माने पाकीस्तानचे ना ? आणि बॅ. जीना हे हिंदुस्तानी ... अजब खेळ आहे नियतीचा ... ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

छान लेख . .

दत्ता काळे
Tue, 03/17/2009 - 13:50 नवीन
'चे गव्हेरा' ह्याने फार वेगळा आदर्श जगापुढे मांडला. क्युबा स्वतंत्र झाल्यावर, राजसत्तेच्या मोहाला बळी न पडता बोलेव्हीयाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी क्युबातून बाहेर पडला. रशियातल्या झारच्या जुलूमी राजवटीला उलथवून लावण्यासाठी बोल्शेव्हीकांमध्ये सहभागी असणार्‍या लेनिनचे आणि चे गव्हेराचे व्यक्तिमत्व सारखेच वाटते, परंतु राजसत्तेचा मोह लेनिनला सुटला नाही.
  • Log in or register to post comments

बाप

विनायक प्रभू
Tue, 03/17/2009 - 13:53 नवीन
एकाहुन एक बाप माणसे सुनिल्भौ
  • Log in or register to post comments

मस्त लेख

सहज
Tue, 03/17/2009 - 14:39 नवीन
बघु काय भर घालता येते.
  • Log in or register to post comments

छान..

स्वाती दिनेश
Tue, 03/17/2009 - 14:42 नवीन
लेख आवडला, सहजराव म्हणतात त्याप्रमाणे काही भर घालता येते का पाहते. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/17/2009 - 14:43 नवीन
मस्त माहितीपुर्ण लेख आवडला. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

आपल्याला तर

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 03/17/2009 - 15:04 नवीन
आपल्याला तर भौ हिटलरचा प्रखर राष्ट्रवाद भावतो नेहमी साला पहिल्या महायुद्यात साधा शिपुर्डा होता पण प्रखर राष्ट्रवादाच्या जोरावर तो जर्मनीचा चान्सलर बनला आणी जर्मनीला जगाच्या नकाशावर एक प्रगत राष्ट्र बनविले ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

मस्त

अवलिया
Tue, 03/17/2009 - 15:05 नवीन
मस्त लेख... --अवलिया
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Tue, 03/17/2009 - 15:32 नवीन
असेच म्हणतो... :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मदर तेरेसा

नरेश_
Tue, 03/17/2009 - 16:50 नवीन
सुनीलभाऊ , मदर तेरेसांना कसे काय विसरलात ? सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

डॉ. खानखोजे

llपुण्याचे पेशवेll
Tue, 03/17/2009 - 16:52 नवीन
डॉ पांडुरंग सदाशिव खानखोजे.. जन्म वर्ध्याचा. कर्मभूमि मेक्सिको.. कर्मः मेक्सिकोचे मक्याचे उत्पन्न अनेक पटींनी वाढविले. मेक्सिकोतिल हरितक्रांतीचे प्रणेते मानले जातात. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

डॉ. द्वारकानाथ कोटणीस

विसुनाना
Tue, 03/17/2009 - 17:07 नवीन
सोलापुरच्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची अमर कहाणी - चीनमध्ये घडली.
  • Log in or register to post comments

छान लेख

स्वाती२
Tue, 03/17/2009 - 18:37 नवीन
छान लेख सुनिल. अजुन एक नाव. नोबेल पारीतोषिक विजेते एस. चंद्रशेखर. ब्रिटीश इंडियात जन्म. कर्मभूमी अमेरीका.
  • Log in or register to post comments

अल्बर्ट

अमेरिकन त्रिशंकू
Tue, 03/17/2009 - 19:31 नवीन
अल्बर्ट आईन्स्टाईन. जर्मन राजवटीला कंटाळून दुसर्‍या देशात पळून गेलेले खूप शास्त्रज्ञ/गणिती या प्रकारात मोडतात.
  • Log in or register to post comments

चांगला लेख

लिखाळ
Tue, 03/17/2009 - 20:04 नवीन
चांगला लेख सुनील. गवारा आणि बायरन या दोघांबाबत प्रथमच काही समजले.
जगात असेही काही लोक नक्कीच होऊन गेले असतील की ज्यांनी आपले तन आणि मन स्वतःच्या जन्मभुमीपेक्षाही वेगळ्या अशा कर्मभुमीसाठी वेचले असेल.
या निकषावर हिटलर बसतो का याची फारशी कल्पना नाही. तसेच त्याची कृष्णकृत्य पाहता, जन्मभूमी वेगळी असताना दुसर्‍या भूमीत जाऊन आपला ठसा उमटवलेले असा निकष असता तर हिटलरचे नाव वाचून जे वाटले ते मला वाटले नसते. आज पन्नास वर्षांनंतरसुद्धा त्याचे नाव घेताच जर्मन नागरिकाचा चेहरा पडतो, हेच हिटलरचे योगदान असावे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

छोटासाच परंतु माहितीपूर्ण लेख आवडला.

चतुरंग
Tue, 03/17/2009 - 20:23 नवीन
चारही रत्नांचे काही पैलू अज्ञात होते! हिटलरचा समावेश पटला नाही. जर्मनीला त्याने चेहरा देण्याचा प्रयत्न नक्कीच केला परंतु त्यासाठी जी किंमत मोजावी लागली ती संपूर्ण मानवजातीने मोजली. अत्यंत कर्तृत्ववान आणि जबर महत्वाकांक्षी माणूस परंतु मानवासाठी कलंक ठरावा हा केवढा दैवदुर्विलास! चतुरंग
  • Log in or register to post comments

छान लेख.

क्रान्ति
Tue, 03/17/2009 - 21:04 नवीन
छानच आहे लेख. माहितीपूर्ण आणि वेगळ्या विषयावरचा! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

चांगला लेख

विकास
Tue, 03/17/2009 - 21:30 नवीन
चांगला लेख आणि विषय. वर पुण्याच्या पेशव्यांनी सांगितलेले "पांडूरंग सदाशीव खानखोजे" हेच नाव एकदम डोक्यात आले. टिळकांच्या प्रेरणेने त्यांनी तरूण भारत सोडला आणि कालांतराने अमेरिकेत जाऊन लाला हरदयाळ यांच्याबरोबर काम केले तसेच आताच्या ओरेगॉन नॅशनल विद्यापिठाची पदवी घेतली आणि नंतर मेक्सिकोत स्थायीक होवून शेती उत्पन्न वाढवण्यासंदर्भात काम केले. त्यांच्या बाबतीतील एक विचित्र क्षण असा की, १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते "मातृभूमीच्या सेवेसाठी" म्हणून भारतात परतणार होते ... पण ब्रिटीशांच्या "वॉन्टेड" लिस्ट मधे असल्याने त्यांना येण्यापासून मज्जाव केला. :-( अर्थात नंतर चूक सुधारली... :-) तसेच इतर अनेक आहेत - हयात नसलेल्यांपैकी - नोबेल पारीतोषिक विजेते सुब्रम्हण्यम चंद्रशेखर आणि हयात असलेले अमर्त्य सेन. अडवाणी, मनमोहनसिंग मुशारफ हे सगळे एकाच देशात जन्माला आले होते. त्यांच्या जन्मानंतर त्याचे विभाजन झाले, हा फरक आहे. बाकी एक महान व्यक्ती (हयात असलेली) विसरलोच की.... सोनीया गांधी! ;) विचार करा त्या नसत्या तर आज काँग्रेसचे काय झाले असते? :-)
  • Log in or register to post comments

ओह.. ऍडा ही

भाग्यश्री
Tue, 03/17/2009 - 23:05 नवीन
ओह.. ऍडा ही बायरनची मुलगी आहे? वाचून मजा वाटली.. या लिस्टमधे चार्ली चॅप्लीन येईल का? मला नक्की त्याचा जन्म कुठला आठवत नाहीए.. पण एका आत्मचरित्रात तो अमेरिकेचा सिटीझन नाहीए म्हणून त्याला हाकललं होतं, आणि मग तो स्वित्झर्लंडला स्थायिक झाला असं वाचलं.. हिटलरबद्दल मीही साशंक.. पण लॉजिकली त्याची कर्मभूमी, जन्मभूमीपेक्षा वेगळी होती हे पटलं..
  • Log in or register to post comments

चार्ली चाप्लिन

प्राजु
Wed, 03/18/2009 - 01:01 नवीन
नक्कीच येईल. तो लंडन चा होता. ब्रिटिश. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

उत्तम

नंदन
Tue, 03/17/2009 - 23:19 नवीन
लेख, अतिशय आवडला. शीर्षकही कल्पक आहे. खानखोजे, कोटणीस, चॅप्लीन ही उदाहरणेही समर्पकच. थोडे निर्बंध सैल केले तर पारशी जमातीच्या (सामूहिक) योगदानाचाही यात समावेश होऊ शकेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लेख

मुक्तसुनीत
Wed, 03/18/2009 - 00:37 नवीन
लेख आवडला ! अवांतर : "कर्मभूमी"बद्दल बोलायचे तर कधी दैवदुर्विलासाने उलटेही होते. मला नक्की संदर्भ आठवत नाहीत ; पण शिरीष कणेकरांच्या पुस्तकात चाळीसच्या दशकातल्या एका नटाचा उल्लेख आहे. चित्रपटांच्या धंद्यात आयुष्यभर अपेशाचा धनी झालेला हा मुसलमान माणूस फाळणीनंतर पाकिस्तानात पळून गेला. आणि इथे त्याने जाण्यापूर्वी काढलेल्या सिनेमाने धो धो पैसा मिळवला. (मला कणेकरांचे शेवटचे वाक्य आठवते : "वाह रे किस्मत !" )
  • Log in or register to post comments

चौकटीबाहेरचा विचार

धनंजय
Wed, 03/18/2009 - 00:45 नवीन
करणारा लेख! फार पूर्वीच्या काळी मराठी मुलुखातून अनेक विद्वान काशी क्षेत्री गेले, तर उत्तरेकडील गागाभट्ट महाराष्ट्रात आला.
  • Log in or register to post comments

चार्ली चॅप्लीन

मयुरा गुप्ते
Wed, 03/18/2009 - 02:36 नवीन
चार्ली चॅप्लीन चा जन्म लंडनचा असला तरी सर्व जगावर हास्य-अधिराज्य केले. त्यांना अमेरीके मधुन केवळ 'कम्युनिस्ट' असल्याच्या (कदाचित खोट्या) आरोपावरुन हाकलुन दिले होते. अजुन एक नाव : अमर्त्य सेन- जन्मस्थान -शांतिनिकेतन
  • Log in or register to post comments

होय तेही

भाग्यश्री
Wed, 03/18/2009 - 03:46 नवीन
होय तेही एक कारण.. कम्युनिस्ट असल्याच्या (बहुतेक खोट्या) आरोपावरून तसेच तो सिटीझन नसल्याने , अमेरिकाद्वेष्टा वाटल्याने हाकलले त्याला.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरा गुप्ते

आभार!

सुनील
Wed, 03/18/2009 - 12:23 नवीन
नेहेमीप्रमाणेच प्रतिसादातूनही नव-नवी माहिती मिळाली. धन्यवाद! यादी बनविताना डॉ कोटणिस आणि मदर तेरेसा ही नावे डोळ्यापुढे होतीच. परंतु, त्यांचे कार्यक्षेत्र हे त्यांच्या कर्मभुमीपुरतेच (अनुक्रमे चीन आणि भारत) मर्यादित नव्हते तर वैचारीकदॄष्ट्या अखिल मानवजात ही त्यांच्या कार्यक्षेत्रात येत होती, हे नजरेआड करता येत नव्हते. साहजिकच पहिल्या निकषाला ते (त्यांच्या कार्याच्या मोठेपणामुळे) उतरत नव्हते. म्हणून कठोरपणे त्यांची नावे मला यादीतून वगळावी लागली. हेच थोड्याफार फरकाने आइनस्टाइन, चंद्रशेखर इ. बाबत म्हणता येईल. मात्र खानखोजे यांचा समावेश कदाचित करता येईल किंवा कसे, याबाबत मी साशंक आहे. चार्ली चॅप्लिनला अमेरिकेतून जावे लागले असले तरी तोवर त्याचे कार्य बर्‍यापैकी संपले होते. आणि मूळात तो इंग्लंडहून अमेरिकेला गेला तोच मुळी नशिब काढायला. त्यामुळेच पहिल्या निकषाच्या आधारे तो बाद होतो. (जे चॅप्लिनबाबत घडले तसेच काहिसे वूडहाउसबद्दल घडले!). हिटलरबद्दल अनेकांचा आक्षेप आहे असे दिसते. ते तसे योग्यच आहे पण कृपया माझे डिस्क्लेमर वाचावे. मी त्याची कुठल्याही अर्थाने भलावण केलेली नाही, करू शकत नाही. निर्धारित केलेल्या निकषांमध्ये मात्र तो बरोबर फिट्ट बसतो, हे मात्र खरे! मुक्तसुनित यांनी वर्णन केलेला निर्माता कोण हा प्रश्न मात्र बरेच काळ सतावत राहणार, हे नक्की! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

असाच एक पारशीबावा

घाटावरचे भट
Wed, 03/18/2009 - 12:37 नवीन
वर नंदनने म्हटल्याप्रमाणे पारशीबावाजींबद्दल बोलायचं झालं तर डोळ्यासमोर येणारं मुख्य नाव म्हणजे जेहांगीर रतनजी दादाभाय टाटा. Image removed. जन्म - २९ जुलै १९०४, पॅरिस (फ्रान्स) येथे. मृत्यू - २९ नोव्हेंबर १९९३, जीनीव्हा (स्वित्झर्लंड) येथे. मातृभाषा - अर्थातच फ्रेंच त्यांनी फ्रेंच सैन्यात काही काळ सेवादेखील केली. पण भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय उद्योग क्षेत्रात जे काही काम करून ठेवलंय त्याला आज तरी तोड नाही.
  • Log in or register to post comments

अजुन एक

यन्ना _रास्कला
Wed, 03/18/2009 - 17:41 नवीन
भगिनी निवेदिता
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा