हे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान
एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान
दिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया
बालपणी गेलासी तू शाखेसी धराया
हादरली ती जननी, थरथरले घरचे जन
भाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन
अडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम
मंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण
मेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका
कुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका
सेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन
कोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला ?
मश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला?
खिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान
आले किती गेले किती संपले भरारा
नेहरू गांधी सोडून काही उच्चारी चकारा
गुलाबी आणल्या नोटा आम्ही झालो रे हैराण
धन्य तुझे रामराज्य , धन्य संघसेवा
पंधरा लक्ष बघता सारे उपाशी का देवा
राहुल प्रियंका आले, आता काँग्रेसला मतदान
************************
-------------------------------------------
ओरिजिनल :
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान
लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण
सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
आले किती गेले किती संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण
धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण
--------------------------------------
**********************
प्रतिक्रिया
9 Feb 2019 - 7:59 pm | प्रचेतस
खतरनाक लिहिलंय राव काळ्या मांजरा. मजा आली.
9 Feb 2019 - 10:14 pm | नावातकायआहे
एकदम भारी!
9 Feb 2019 - 10:54 pm | डँबिस००७
फडतुस !! कॉपी करायची लिमीट आहे !!
9 Feb 2019 - 11:01 pm | स्पार्टाकस
धन्य तुझे रामराज्य , धन्य संघसेवा
पंधरा लक्ष बघता सारे उपाशी का देवा
राहुल प्रियंका आले, आता काँग्रेसला मतदान
>>>>>
अजून पंधरा लाखातच अडकला आहात का?
त्याबद्दल इतके वेळा इतकं सारं स्पष्टं होवूनही पुन्हा तिथेच?
साहेबांच्या लाडक्या 'सकाळ'मध्येही त्यावर खुलासा आला परवा.
राहुल २०१४ मध्येही होताच ना?
9 Feb 2019 - 11:03 pm | व्ही. डी. सी.
जबरदस्त! सॉलिड!!!
10 Feb 2019 - 12:12 am | बाप्पू
अरे.. व्ही सी डी..?? इकडे कुठे??
आणि तुम्ही तर मोदीनां आणि रागा ला दोघांना पण सपोर्ट नाही करत ना?? मग इथे एवढे खूष का होताय???
10 Feb 2019 - 9:46 am | नाखु
बाप्पूराव पाग्याचा येळकोट जाईना! कपडा बदलला म्हणून आतला माणुस त्योच राह्यिल ना पावणं!!
वाचकांची पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला
10 Feb 2019 - 11:27 am | व्ही. डी. सी.
आश्चर्य वाटायला काय झाले? राहुल गांधी वर असेच लिहिले तर त्याला सुद्धा माझी प्रतिक्रिया हि अशीच असणार, हे लक्षात ठेवा!!!
11 Feb 2019 - 12:15 am | सुबोध खरे
महसूस करिए दर्द उस महिला का जिसका
बेटा नालायक हो,
दामाद चोर हो
और
बेटी सास जैसी दिखती हो
11 Feb 2019 - 11:08 am | रमेश आठवले
बहुत खुब
11 Feb 2019 - 1:02 pm | Blackcat (not verified)
11 Feb 2019 - 1:03 pm | Blackcat (not verified)
https://youtu.be/XxiEqDRZdTU
राहुल गांधीवर सिनेमा येणार आहे
9 Feb 2019 - 11:05 pm | बाप्पू
वाह....
या कलियुगात इतकी स्वामीभक्ती... डोळे पाणावले...
खाल्या हाडकाला जागलीस ग काळी मांजर... !!!
9 Feb 2019 - 11:34 pm | दीपक११७७
जल्ला काली मांजराणू, ओरिजनलचं चांगल असा
10 Feb 2019 - 5:06 am | रमेश आठवले
राहुलच्या रक्षणासाठी कमांडो ब्लॅककॅट अवतरले देवा
10 Feb 2019 - 11:05 am | Blackcat (not verified)
http://www.misalpav.com/node/44075
ह्यांनी प्रेरणा दिली.
हार तुला नवरत्नांचा ...... ह्याचे- कोट तुला नऊ लाखांचा झाले, आणि लगेच बाकीचेही तयार झाले.
धन्यवाद.
11 Feb 2019 - 1:52 pm | ज्ञानोबाचे पैजार
हे व्हर्जनही आवडले
रागा झाले नमो झाले ... आता पुढचा कोण?
पैजारबुवा,
11 Feb 2019 - 4:51 pm | खिलजि
सहमत पै बु काकांशी .. पुढे कोण ?
11 Feb 2019 - 9:41 pm | स्पार्टाकस
पवारसाहेब ?
12 Dec 2020 - 10:13 am | NAKSHATRA
खुप छान