हि सत्य घटना आहे आणि ज्या बद्दल लिहित आहे तो माझा चांगल्या ओळखीचा आहे . काही नावे बदलली आहेत )
"हुशारी असली आय आय टी म्हणजे फार लक लागते. आणि आणि अति कडक मेहनत पण." सतीश बोलला,
"खूप हुशारी लागते रे आणि मुले मेहनत पण करतात " मी काहीही तयारी न देता केलेला एक अटेम्प्ट आठवून बोललो .
" आणि आता तर क्लासेस आहेत - आणि ऐकले कि हमखास तयारी करून घेतात , ते कोटा त्यासाठीच फेमस आहे ना ? " अजून एक मित्र .
सतीश माझा गेल्या ३-४ वर्षात झालेला मित्र. खरे तर मित्राच्या गाळ्या जवळ गाळा असल्याने त्यांची ओळख झाली आणि मग माझी पण. सतीश आमच्या पेक्षा बराच मोठा होता आणि बराच चांगला छोटा इंजिनिअरिंग संबंधित धंदा चालवत होता . बराच चांगला म्हणजे एस यु व्ही सकट दोन तीन गाड्या असलेला. त्याच्याच फार्महाउस वर दारू पित ४-५ लोकांच्या गप्पा चालू होत्या आणि अचानक त्या आय आय टी वर आल्या .
"एक आता आय आय टी कोचिंग ची गंमत सांगतो ." - सतीश बोलला.
"माझी मोठी मुलगी बर्यापैकी हुशार होती . दहावी ला ९५ टक्के आल्यावर जवळच्या चांगल्या कोलेज मध्ये प्रवेश घेतला . पोरीला आय आय टी ची पण क्रेझ होती . क्लास ची पण खूप चैकशी केली होती . त्यामुळे खूप नाव असलेल्या एका क्लास ला लाख सव्वा लाख घालून नाव दाखल केले . मुलगी तर भलत्याच उत्साहात होती ." सतीश सांगू लागला.
" आणि कोलेज आणि क्लास एकदम सुरु झाले.मुलगी अभ्यासू असल्याने सुरुवातीपासून अभ्यास करू लागली . मी पण मुलीचा समजूतदार पणा बघून खुश होतो. "
आणि काही दिवस गेले आणि सतीश ला जाणवले कि मुलगी कोठल्या तरी दडपणाखाली आहे . बावरलेली दिसतेय , ठीक बोलत नाही .. बायकोला विचारल्यावर तिला हि हीच काळजी होती.
मग एकदा शांतपणे सतीश आणि बायको ने मुलीला जवळ बसवून विचारले ,आधी तर विचारले कि कोणी काही कोलेज मध्ये त्रास देतोय का , कोणी मागे आहे का ,तिला कोणी आवडले का ? काही गोष्टी अवघड असतात . पण सतीश तसा प्रेमळ बाप असणार , या सर्व गोष्टीना नकार आल्यावर मात्र तो पण गोंधळला . पण त्याने आणि बायको ने प्रेमाने विचारणे चालू ठेवले
आणि मग पोरगी बोलली " बाबा मला - मला हे आय आय टी ला काय शिकवत आहेत ते समजत नाही"
"म्हणजे काय?" आई ने विचारले
पोरगी रडायला लागली आणि मग बोलली " हि फार हार्ड गणिते असतात . किती हि प्रयत्न केला तरी सम सुटत नाही . मी एव्हडी ढ आहे का? " म्हणून खूप रडायला लागली
सतीश ने आधी मुलीला शांत केले . आता त्याला हे माहित होते कि अकरावी / सी इ टी चा अभ्यास हिला सहज येतोय . शांतपणे त्याने समजावून दिले , कि त्याची काठीण्य पातळी फार वेगळी आहे , तू बारवी वर लक्ष दे सरळ
"आणि क्लास चे काय करायचे?" मुलीने विचारले
"सोडून द्यायचा , आताच. त्याने फ्रस्ट्रेशन येऊन तुला आपल्यात काही कमी आहे असे वाटून बारावी बरबाद करायची नाही. " सतीश
"बाबा" मुलगी रडत बोलली " क्लास पैसे परत करत नाही . मागे एकाने सोडले त्याने भांडण केले पण दिले नाहीत "
"मला माहीत आहे." सतीश थन्डपणे बोलला. " तू बारावी चा अभ्यास कर , पैशाची काळजी नको."
तरी एकदा तो क्लास मध्ये गेला व पैसे त्याला काही नियमाप्रमाणे दिले नाही .
तो बोलला कि मुलीला उगाच काही दिवस अपराधी वाटत होते , पण सतीश ने आणि बायको ने प्रेमाने तिची समजूत घातली.
आता धक्का बसायची आमची पाळी होळी. हि घटना ७ एक वर्षा पूर्वीची असेल . सव्वा लाख म्हणजे ठीक ठाक रक्कम कि . याने थंड पणे सोडली ? त्याला छेडले तेंव्हा बोलला - अरे या आय आय टी च्या नादाने आयुष्य बरबाद झालेली पहिली आहेत . पालकांना किती कठीण आहे कळत नाही , प्रेशर टाकतात आणि मुले अटेम्प्ट वर अटेम्प्ट देतात पण काहीच करू शकत नाही .
आणि - त्याने शेवटची सिक्सर मारली
"मी दोन वर्षे मेडिकल ला बरबाद केली आहेत . "
आता हा फार चांगला इंजिनिअर होता आणि पूर्वी बी ए आर सी कि टी आय एफ आर अशा संस्थेत - जिकडे चांगले इंजिनिअर घेतात काम करायचा . मग हे मेडिकल चे ? दोन पेग लगेच उतरले.
" अरे बारावी त PCB ( Physics, Chemistry, Biology) आणि PCM ( Physics, Chemistry, Maths) दोन्ही ग्रुप मध्ये चांगले मार्क आले. मग काय डॉकटर बनण्याचे ठरले - मुंबई बाहेर ( फार पूर्वीची गोष्ट आहे ) एका छोट्या मेडिकल ला प्रवेश घेतला. "
"आणि बरेच दिवस मला वाटले कि सर्वानाच कळत नाही . मग कळले कि मलाच कळत नाही . कळत नाही याची पण लाज . त्यात मराठी मिडीयम . अशातच दीड वर्षाची एक टर्म - त्यात नापास झालो ."
"बाप रे , मग?" कोणीतरी विचारले.
" घरी आलो , खूप रडलो . घरचे आधी वैतागले. पण त्यांना कळले कि याला मेडिकल जमणार नाही . त्यात पीसीएम ग्रुप चे मार्क होते .म्हणून मुंबईबाहेर चांगल्या कॉलेज ला मिळाली - आणि ते मात्र झटून मन लावून अगदी डिस्टिंक्शन मध्ये काढले!" सतीश
" अरे म्हणून सांगतो कि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमलीच पाहिजे असे नाही . आणि दोनच पोरी आहेत मला . त्यांना जमले तर ठीक पण नसेल तर त्रासात का पाडायचे ? "
हा अनुभवातून बोलत होता तर - तरी त्याला मुली काय करतात ते विचारले .
"तुला सरदार पटेल कॉलेज माहित आहे ?" त्याने विचारले
" मुंबईतील दुसऱ्या नम्बर चे ? " मी
" माझ्या दोन्ही मुली त्यात पाठोपाठच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम ला आहेत . " सतीश
जबरी - पोरींनी सार्थक केले तर .
तेंव्हा एकच शिकलो कि प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमेलच असे नाही
आणि जेंव्हा या स्पर्धा परीक्षे च्या न जमता लागलेल्या मुलं बद्दल ऐकतो , त्यांनी बरबाद केलेल्या वेळ आणि आयुष्या बद्दल त्यात काही नि केलेल्या आत्महत्या बद्दल वाचतो तेंव्हा मला हे आठवते .
आणि उपसंहार - सतीश च्या दोन्ही मुली नि इंजिनिअरिंग पूर्ण करून दोघीही अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेल्या . मोठी एम एस पूर्ण करून आता एका चांगल्या कम्पनी त नुकतीच नोकरीला लागली.
प्रतिक्रिया
27 Dec 2018 - 6:40 pm | मुक्त विहारि
धन्यवाद...
27 Dec 2018 - 6:48 pm | Nitin Palkar
सतीश सारखा पिता सर्वांनाच मिळत नाही, किंबहुना खूप कमी जणांना मिळतो. माझ्या परिचयातल्या एका मुलाला एसएस्सीला जेमतेम साठ टक्के गुण होते. मुलाला इंजिनियर व्हायची इच्छा होती. एका खाजगी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पहिल्या वर्षाच्या केट्या तीन वर्षे क्लिअर झाल्या नाहीत. अखेर मुलाने स्वतः वडलांना, ' मला इंजिनिअरिंग जमणार नाही' असे सांगितले. पण वडिलांनी अजिबात ऐकले नाही. कुठचा वाटेल तो क्लास लाव पण इंजिनियरच झालं पाहिजे अशी भूमिका घेतली. अखेर सहा वर्षांनी त्याने सर्व शिक्षण सोडले आणि, 'यापुढे काहीही शिकणार नाही' असे घरी सांगून टाकले. अठ्ठावीस वर्षांचा हा मुलगा सध्या अक्षरशः काही करत नाही.
वाईट गोष्ट ही आहे की वडलांना आपला मुलगा नालायक आहे असे वाटते...
27 Dec 2018 - 7:18 pm | रानरेडा
हे खरे आहे सर - या परीक्षा च्या स्ट्रेस चे वाईट परिणाम पाहिले आहेत . त्यात अगदी आत्महत्ये पर्यंत प्रकार ऐकले आहेत . त्यात खरे तर झेपत नसताना प्रवेश मिळाला कि अजूनच वाईट अवस्था होते . इजिनिअरिन्ग ला एक अतिशय वाईट ताणातून मी गेलो आहे . पण पालकांचा सपोर्ट होता , नापास होवून गेलेल्या वर्षाचा फार बाऊ केला नाही म्हणून तगून गेलो .
यापलीकडे पालकांच्या अति प्रेशर खाली कोर्स ला जावून - आणि तो व्यवस्थित पूर्ण करून चांगली नोकरी / व्यवसाय करणारे - आणि पालकांशी अत्यंत कोरडे किंवा तुटलेले संबंध असलेले एक दोन जण पहाण्यात आहेत . आणि एक जण जे या नंतर च्या यशाने बेफाम झालेला - आई बापा ला फाट्यावर मारून - अगदी व्यसने बाई बाजी करणारा !
27 Dec 2018 - 7:52 pm | उपयोजक
रानरेडा यांना पुलेशु!!!
27 Dec 2018 - 10:17 pm | दुर्गविहारी
उत्तम धागा काढलात त्याबद्दल धन्यवाद. अजून उत्तमोत्तम धागे काढता येतील ईतकी माहिती तुमच्याकडे आहेच. तेव्हा थांबु नका. करिअर विषयक आणखी धागे काढण्यासाठी शुभेच्छा.
28 Dec 2018 - 12:30 am | वरुण मोहिते
दुर्गविहारी यांच्याशी सहमत. करीयर विषयी अजून लिहिते व्हा रानरेडा साहेब. इतरांनी पण आपले अनुभव सांगावेत.आयआयटी आणि यूपीएससी मुळे अनेकांची काही वर्षे गेलेली पहिली आहेत.
28 Dec 2018 - 12:25 pm | नाखु
दाखवणारं लिखाण.
वरीलपैकी सर्वांच्या विनंतीस मान देऊन एक तपशीलवार मार्गदर्शन लेखमाला सुरू केली तर नक्कीच आवडेल.
कल, आवड,स्वारस्य,ध्यास आणि क्षमता यांची सरमिसळ करणं पालक आणि मुलं या दोघांनी टाळलं पाहिजे.
जात्यातला पालक वाचकांची पत्रेवाला नाखु
28 Dec 2018 - 5:23 pm | nanaba
सुजाण पालक! लकी मुली!
29 Dec 2018 - 8:44 am | भीडस्त
आम्हीही याच अवस्थेत सध्या.
छान लिहिलेत रानरेडा साहेब.