वलय (कादंबरी) - प्रकरण २९ ते ३३
प्रकरण २४ ते २८ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42176
प्रकरण 29
इकडे रागिणी सूरजच्या ब्राझीलहून परत येण्याची वाट बघत होती. संध्याकाळ झाली होती. स्वतःसाठी स्वयंपाक बनवून ती जेवली. मग सूरजला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तो कॉल उचलत नव्हता. मग झोपतांना सहज बातम्या बघाव्या म्हणून तिने टीव्ही लावला.
‘फ्रेश न्यूज- आप तक, आपके घर तक!” हे चॅनेल सुरु होते. "फिल्मी खुलासा" या कार्यक्रमात निवेदक ओरडून ओरडून सांगत होते: