आज काय घडले.... पौष शु. १० चिमाजीअप्पांचे निधन !
आज काय घडले....
पौष शु. १०
चिमाजीअप्पांचे निधन !
शके १६६२ च्या पौष शु. १० रोजी बाळाजी विश्वनाथांचे दुसरे पराक्रमी चिरंजीव चिमाजीअप्पा यांचे निधन झाले.
आज काय घडले....
पौष शु. १०
चिमाजीअप्पांचे निधन !
शके १६६२ च्या पौष शु. १० रोजी बाळाजी विश्वनाथांचे दुसरे पराक्रमी चिरंजीव चिमाजीअप्पा यांचे निधन झाले.
शके १६८२ च्या पौष शु. ९ या दिवशी आदल्याच दिवशी पानिपतच्या भयंकर संहारांत पतन पावलेले यशवंतराव पवार, विश्वासराव, भाऊसाहेब, तुकोजी शिंदे, संताजी वाघ, आदि लोकांच्या शवांना अग्निसंस्कार देण्यात आले.
आज काय घडले ...
शके १७२४ च्या पौष शु. ७ रोजी प्रसिद्ध असा वसईचा तह होऊन त्या दिवशी बाजीराव इंग्रजांना सर्वस्वी गुलाम बनला व मराठी राज्याच्या काळजीची इंग्रजांच्या मध्यस्थीने अनेक शकले झाली.
आज काय घडले....
पौष शु.६
न्या. माधवराव रानडे यांचा जन्म !
शके १७६४ च्या पौष शु. ६ रोजी हिंदुस्थानांतील प्रसिद्ध राजकारणी, समाजसुधारक, दूरदृष्टीचे विवेचक, अर्थशास्त्रज्ञ व स्वतंत्र भारताचे द्रष्टे न्यायमूर्ति माधव गोविंद रानडे यांचा जन्म झाला.
सटाणा- पिंपळनेर ह्या ऊत्तर महाराष्ट्रातील प्रचंड निसर्गरम्य स्थळ मांगी तुंगी सकाळी ५ वाजता उठून जायचे ठरले. बरोबर चुलत भाऊ आणि वडील होते. ५ ऐवजी सकाळी सहा ला निघालो. धुळ्याहून साक्री सक्रीतून मांगीतुंगी असा १०० किमी चा प्रवास होता. साक्री रस्ता (सुरत-नागपूर) 4 लेन बनवण्याचं काम चालू असल्याने बरेच डायव्हर्जन, खड्डे होते. साक्री ला आल्यावर शेवाळी फाट्याने निजामपूर कडे गाडी टाकली इयचे रायपूर गावाच्या पुढे एक डोंगर ओलांडला की 200 पवनचक्क्या आणी सोलर प्लांट चा खूप सुंदर नजारा दिसतो. पण ती फेरी वाया गेली, कारण धुक्यामुळे काहीच दिसलं नाही. अर्धा तास वाया घालवून मग पिंपळनेर रोड ला लागलो.
शके १२७० च्या पौष शु. ५ रोजी मनुष्यजातीचा शत्रु म्हणून प्रसिद्ध असलेला तैमूरलंग याने हिंदुस्थानवर स्वारी करून दिल्ली जिकली !
पौष शु. ४ या दिवशी लंकेचा राजा रावण याचा धाकटा भाऊ विभीषण आणि रामचंद्र यांची भेट झाली.
शके १६८२ च्या पौष शु. ३ रोजी राघोबादादा यांनी निजामशी उरळी येथे अप्रयोजक असा तह केला.