कविता माझी

बोबडी कविता!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
5 Apr 2016 - 1:01 pm

बाबाच्या पोटावर
झोपतय एक वेडं पिल्लू
तोंडामध्ये अंगठा धरून
हसतंय हळू खुदूखुदू!

इवल्याशा बोटांच्या
इवल्या इवल्या मुठीने
ढुशी देत सारख्या सारख्या
करतयं बाबाला गुदूगुदू!

बा - बा - का - का
मध्येच हसू खळखळून
बोबड्या बोलांच गाणं एक
फिरतंय घरभर दुडूदुडू!

- संदीप चांदणे

कविता माझीबालसाहित्यकलासंगीतवाङ्मयकविताबालगीतसाहित्यिकमौजमजा

मी अजून जिंकलो नाही

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
2 Apr 2016 - 7:19 pm

म्हणतात ना ,
अंत भला तो सब भला ,
हेच खरे .
सुरुवातीलाच एखाद्या गोष्टीला
वाईट न म्हणनेच बरे

वाईट शेवट असेल , तर तो शेवट नाही
सुरुवात असेल नवी , एक वाईट अंत नाही

शेवट हा नेहमी गोड असतो , वाईट नसते काही
सुरुवातीलाच शेवट पाहण्याची , आपण करत असतो घाई

हरलास तू , असं कुणी बोलत असेल
अपयशाच्या तराजुत , तुला तोलत असेल
त्याला जिंकलास तू , असं प्रेमाने सांगावं
अभिनंदन करुन , थोडंसं समजावावं

म्हणावं ,
जिंकला आहेस तू , मी हरलो नाही
शर्यत संपली नाही , कारण मी अजुन जिंकलो नाही

कविता माझीकविता

आम्ही मनमौजी

सुधीरन's picture
सुधीरन in जे न देखे रवी...
2 Apr 2016 - 6:18 pm

आला आला वसंत ऋतु आला
नाचुया खेळूया झूला झुलूया
आम्ही सारे आहो मनमौजी
मजेत आपण सारे फिरुया ।।१।।

कशास बाळगू तमा जगाची
कशास काळजी आज उद्याची
दिवस हा आजचा मजेचा
रात्र ही धुंद नशेची ।।२।।

तरुण आम्ही नव्या युगाचे
भोक्ते सा-या सुखांचे
नका पाडू बंधनात आम्हा
आम्ही चाहते स्वातंत्र्याचे ।।३।।

कमी पडेल धरती ही
थिटे पडेल आकाश ही
मनात आणता आम्ही
रूप पालटू या जगाचे ।।४।।

कविता माझीमुक्त कविताकविता

गरिबाला विचार

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
1 Apr 2016 - 11:02 pm

प्रत्येकाला वाटतं , संघर्ष म्हणजे माझंच जीवन
मान-अपमानाने जळतं , ते फक्त माझंच मन

कष्टाची भाकर काय ती फक्त मीच कमावतो
आणि कमावलेला पैसाही मीच फक्त गमावतो

निदान दोन वेळचं जेवण तुला मिळतं
गरिबाला विचार , भुकेविन पोट कसं जळतं ?

दुःखाचा डोंगर सतत माझ्याच पाठीवर असतो
तरी सुद्धा दोन क्षण मी कसा हसतो

देव नेहमी संकटे माझ्याच पदरात टाकतो
काही न देता , नुसतं माझ्याकडूनच मागतो

हे असं वाटत असेल , तर गरिबाला विचार सुखाचं घर कसं मोडतं ?

नुसते डोळेच नाही , तर त्यासोबत मन कसं रडतं ?

कविता माझीकविता

बीज

gsjendra's picture
gsjendra in जे न देखे रवी...
31 Mar 2016 - 11:15 pm

ज्या बीजाला
अंकूरायचे असते
प्रसवायचे असते
ते पाहत नाही
तापमान किती डिग्री
हवेत आर्द्रता किती
पावसाची काही शक्यता
वा मातीचा ओलसरपणा
ते मातीत ढेकळात
खडकाच्या फटीत
इवल्या पालवीने उभारते
अस्तित्वाची दखल आपल्या
जगाला घ्यायला लावते

कविता माझीकविता

इवल्या त्या डोळ्यांमध्ये

अभिषेक पांचाळ's picture
अभिषेक पांचाळ in जे न देखे रवी...
30 Mar 2016 - 7:24 pm

इवल्या इवल्या डोळ्यांना , आस किती मोठी आहे
निडर होऊन लढते वेडे , काळ त्याच्या पाठी आहे

वादळाची फिकीर मनी , थोडीसुद्धा उरली नाही
स्वप्न अधुरे राही , अशी रात कधी सरली नाही

जिद्द तरी येते कशी , विचार करी दाही दिशा
शंका करती फितूर सारे , केली याने दारू नशा

पहाडही ते धस्की घेऊन , जागेवरती टिकून राहते
अंगावरती बागडताना , लाटही त्याला दुरून पहाते

दिली जरी हि कठोर शिक्षा , जमीन कशी याचा पायाखाली
त्रास देऊन तऱ्हेतऱ्हेचा , नियातीही मग बेजार झाली

कविता माझीकविता

असा कसा काळ आला

gsjendra's picture
gsjendra in जे न देखे रवी...
24 Mar 2016 - 1:22 pm

असा कसा काळ आला
बापाआधी बाळ गेला

असा कसा काळ आला
पोहर्‍यात नुसता गाळ आला

असा कसा काळ आला
हिरवा मळा माळ झाला

असा कसा काळ आला
धर्माच्या नावाखाली घोळ साला

असा कसा काळ आला
खरंबोलणारा वाळ झाला

असा कसा काळ आला
काळा कावळा शहाळं प्याला

असा कसा काळ आला
गाढवाच्या गळ्यात माळ घाला

असा कसा काळ आला
पैसा जगण्याचं मूळ झाला

असा कसा काळ आला
पोराने बापाचा छळ केला

असा कसा काळ आला
माणूसंच कूठे गहाळ झाला

गजेंद्र भोसले
आत्मशोध (काव्यसंग्रह)

कविता माझीकविता

कन्या मानव्याची

gsjendra's picture
gsjendra in जे न देखे रवी...
21 Mar 2016 - 4:01 pm

मी अधीर
मी बधीर
मी रूधिर
सबंध विश्वाचे

मी स्तन्य
मी चैतन्य
चिवचिवाट अनन्य
घरट्यातल्या चिमण्यांचा

मी नागीन
मी जोगीण
मी वाघीण
जगातल्या क्रांतीयूद्धाची

मी स्वच्छंद
मी अनिर्बंध
मी मुक्तगंध
अपत्य निसर्गाचे

मी मोहिनी
मी रोहिणी
वंश वाहिनी
प्रचंड जगपसार्‍याची

मी सौदर्य
मी माधूर्य
मी चातूर्य
घराचे घरपण

मी जगत
मी अप्रगत
मी स्वगत
आतापर्यंतच्या आकांताचे

मी पूष्पवेली
मी मूरगळली
मी रडवेली
कन्या मानव्याची

कविता माझीकविता

(कूणास ठाऊक ?)

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
18 Mar 2016 - 10:39 am

पेर्ना

कूणास ठाऊक ?
काय घेण्यासाठी
काय वेचण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही

कूणास ठाऊक ?
काय चापण्यासाठी
काय गिळण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही

कूणास ठाऊक ?
काय टापण्यासाठी
काय हुंगण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही

कूणास ठाऊक ?
काय करण्यासाठी
का नूसतेच खर्चण्यासाठी
या मॉलमध्ये आलोय आम्ही

पाकिटशोध (दिव्यसंग्रह)

kelkarvidambanअनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचनागद्वारफ्री स्टाइलभूछत्रीहास्यकविताविडंबनविनोदमौजमजा

मोदीभक्त आम्ही...

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture
डॉ. एस. पी. दोरुगडे in जे न देखे रवी...
16 Mar 2016 - 7:34 am

मोदीभक्त आम्ही
रात्रंदिन जपतो
नमो नमः ।।धृ।।

तुमचे दौरे तुमच्या भेटी
तुम्ही जोडलेली जगभरची नाती
शिंझो अबे तुमचा मित्र
बराक तुमचा जणू शाळूसोबती
फेसबुक अन गूगलवाले
जीव भारी त्यांचा तुमच्यावरती
मिडियाच कशाला इथला
जग सारे गुणगान गाते पहा ।।१।।

परदेशी गुंतवणुकीस
आला आहे नुसता आता पूर
कारखान्यांमधून पुन्हा
निघू लागला सोन्याच्या धूर
साऱ्या देशाचा आता
बदलत चालला पुरता नूर
झाली सुखाची परमावधी
अच्छे दिन आले आम्हास अहा! ।।२।।

कविता माझीधोरणकविता