सिंधूताई सपकाळ
अनाथांची एक माय
आता राहिली नाय
जाता सिंधू सपकाळ
गहिवरला खूप काळ
असंख्य अन्याय साहिले
अपमानांचे धग दाहिले
मग मागे नाही पाहिले
उपेक्षितांना आयुष्य वाहिले
जग वंदू वा नि नींदू
होते निराधार जे हिंडू
झाली करुणा-सिंधू
अनाथाची मान बिंदू
एके दिसी दारावर कोण?
ना चिट्ठी नाही फोन
लिन -दीन ते डोळे दोन
पती पापाचे फिटे ना लोन
ज्याने केले निराधार
उन्मत्त होता जो भ्रतार
त्याचाही केला उद्धार
विकलांगा दिला आधार