मी जरा बाहेर जातोय
माझे शब्द जपून ठेव.
काही तुला आवडलेले
काही मुद्दाम न वाचलेले.
रात्रीचे, पहाटेच्या स्वप्नांतले
बोललेले आणि अबोल राहिलेले.
अर्थाच्या शोधात पडू नको
तो मलाही लागत नाही.
आता शब्दही तुझेच आहेत
माझा कोरा कागद पतंग व्हायचं म्हणतोय.
अलगद हाताळ या शब्दांना
मुलायम असले तरी घावही घालतात.
दिसत नाहीत नेहमीच पण असतात जरूर
अश्वत्थाम्याप्रमाणे शब्दांनाही शाप आहे अमरत्वाचा.
तुझ्याशी नीटच वागतील हे शब्द
हृदयातली खळबळ त्यांनी जवळून पाहिलीये.
परतीचा प्रवास नाहीच शक्य झाला,
तर शब्दांसोबत माझी एक आठवण सुद्धा ठेव.
स्वतःला जपून ठेव!
प्रतिक्रिया
1 May 2021 - 7:29 pm | आगाऊ म्हादया......
chhan
2 May 2021 - 9:00 pm | माहितगार
छान