शोध

Primary tabs

Prajakta Sarwade's picture
Prajakta Sarwade in जे न देखे रवी...
11 Sep 2020 - 12:21 pm

माहीत नाही कोणत्या देशी येऊन मी थांबले,
ना ओळख या पाऊल वाटांशी, ना इथल्या संकेतस्थळाशी

पण पाऊसात माञ ओळखीचा गंध परिमळे
ना सोबती कुणी माझ्या, ना मी कोणाची सोबती

पुसत सारया दिशांना, कापत अंतरातले अंतर
स्वतः च्या दिशेने स्वतः ला दिशा देत चालले

गाफिल राहिली माझ्यातली कविता माझ्यामध्येच,
अन माझेच शब्द आता मला ओळखेनासे झाले

डोहातल्या चांदण्यापर्यत मौन माझे पोहचले
सारे शब्द अलगद तुझ्या ओंजळीत येऊन ओसरले
-प्राजक्ता

( मी इथे नवीन आहे, आणि ही पाहिलीच पोस्ट आहे , काही चुकलं तर माफ करा)

आयुष्यकविता माझीकविता

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

11 Sep 2020 - 5:40 pm | चौथा कोनाडा

माहीत नाही कोणत्या देशी येऊन मी थांबले,
ना ओळख या पाऊल वाटांशी, ना इथल्या संकेतस्थळाशी

मिपावर हार्दिक स्वागत. लिहित रहाल तर गाढ ओळख होईल मिपाशी.
रचना आवडली.
पुढील रचनेच्या प्रतिक्षेत.

Prajakta Sarwade's picture

11 Sep 2020 - 10:45 pm | Prajakta Sarwade

आभारी आहे. लवकरच पुढील रचना पोस्ट करेन.

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2020 - 5:37 pm | चौथा कोनाडा

व्वा, छनच ! +१
तुम्हाला आवडलेल्या / न आवडलेल्या धाग्यावर देखील आवर्जून प्रतिसाद देत चला !