वाकडा कंपु
तिकडी चाल
सगळे भरती माल
रिते आमची झोळी
शब्दांवाचूनी यार
प्रतिसादांच्या लढाईमध्ये
एकाची वरताण तर
दुसरा घासे वहाण
ह्या दारातून
त्या दारावर
प्रतिसाद बद्दल प्रतिसाद
शब्दांना विके
कोणी शब्दांसाठी
लिहतो एकच
बाकी +१ सगळे
मागोमाग भार
लिहतोय कोण
भांडतोय कोण
शब्दांना वेठिस
धरतोय कोण
एक खवाट
बाकी सुसाट
डुप्लिकेट आयडीचा
नेहमीच सुळसुळाट
एक नारी
नाव धरे भारी
हवा दिसे
तीज विषारी
शब्दांत तीच्या
जळजळाट फार
तळपते सोडून
विषय पार !
प्रतिक्रिया
26 Apr 2009 - 5:24 pm | अवलिया
अर्रर्रर्र्
तु कवी बनायचे फारच मनावर घेतलेस... :|
अरे तु चांगल्या कविता करतोस असे गंमतीने म्हणालो होतो, तु सिरीयसलीच घेतलेस :(
असो
जरा रसग्रहण पण केलेस तर बरे... म्हणजे सगळ्यांना कळेल :)
--अवलिया
26 Apr 2009 - 5:27 pm | दशानन
=))
रसग्रहण :?
राहू दे काही
तास वर हा धागा
डिलीट दाबले तर
राहिल विचार अधुरा ;)
थोडेसं नवीन !
26 Apr 2009 - 5:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>तु कवी बनायचे फारच मनावर घेतलेस...
असेच म्हणतो ! :)
(प्रकाटाआ)
26 Apr 2009 - 10:46 pm | दशानन
कोणी तरी सरांच्या प्रतिसादातील तो शब्द इडिट करावा ही विनंती,
चुकीचा शब्द, चुकीच्या जागी लिहल्या बद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो,
क्षमा असावी.
थोडेसं नवीन !
27 Apr 2009 - 9:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद काढला ! मला आवडलाच नव्हता आपल्या कवितेमधील तो शब्द...
असो,...विषय संपला. :)
26 Apr 2009 - 9:43 pm | प्राजु
:|
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Apr 2009 - 9:54 pm | टारझन
आर्रे पापड्या ... काय रे ते "पांचाली" चं कडवं जपून पहा बे .. च्यायला .. नाय तर तुझाच दुर्योधन व्हायचा !!!