भाग -३...
“कुठले मशिन आहे ते ?”
“PNQ – 10”
माझ्या पोटात मोठा खड्डा पडला.
आमच्या प्लॅंटमधले त्या प्रकारचे एकुलते एक मशिन होते त! पवारला ते किती खराब झालंय हे विचारुन मी झपाझप पावले उचलली. मला बघायलाच पाहिजे ते आता ! हा जॉब जाऊ देत, पण त्या मशिनवर पुढचे कितीतरी उत्पादन अवलंबून होते.
“पवार दुरुस्त होईल का नाही ते ?”
“माहीत नाही. आत्तातरी त्यांनी ते पुर्ण खोलून ठेवले आहे. आम्ही त्या कंपनीशी फोनवर बोलतोच आहोत. ”
पवार´त्या मशिनिस्टने हे मुद्दाम केले असेल का हो ?”
“काही सांगता येत नाही. पण जोशीसाहेब ओरडल्यावर तो इतका भडकला होता की त्याची मन:स्थिती ठीक नव्हती. त्या मन:स्थितीत काहीही होऊ शकते.”
माझी कानशीलं गरम झाली. ह्या जोशामुळे केवढा गोंधळ झालाय हा. तोंडात शिव्याच आल्या माझ्या. असं वाटलं फोन करुन त्या त्यांना द्याव्यात आणि सांगावे त्यांना
“दाखवणार होतात ना ? मला कसे काम करायचे ते ! चांगलंच दाखवलंत !”
प्रकरण - २
एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही अंतर्बाह्य ढवळून निघत असता आणि तुमच्या जवळचे म्हणावेत असे तसेच ढीम्मं असतात हे मी समजूच शकत नाही.
असे का ? देवाला, आणि त्यांनाच माहीत !
६.३० वाजता मी प्लॅंटमधून, काहीतरी संध्याकाळचे जेवावे म्हणून घरी आलो.
हॉलमधून जाताना माझ्या बायकोने 'स्मिता'ने टीव्हीमधून डोके वर काढले, माझ्याकडे बघून लाघवी हसून ती म्हणाली
“कशी वाटते माझी नवीन हेअर स्टाईल ?” तिच्या नेहमीच्या वेण्यांची जागा आता एकदम विस्कटलेल्या केसांनी घेतली होती. आणि त्यात काही ठिकाणी छटाही आल्या होत्या. पण एकंदरीत अवतार छान दिसत होता.
“मस्तच दिसतंय.”
तिच्या लांबसडक पापण्या फडकवत ती म्हणाली
“ती ब्युटीपार्लरमधली बाई म्हणाली, ह्या हेअरस्टाईलमुळे माझे डोळे जास्तच उठून दिसतील.”
तिच्या सुंदर, काळ्याभोर, मासोळी डोळ्यांना उठून दिसायची काही आवश्यकता आहे असे मला खरंतर वाटत नव्हतं. पण कोण सांगणार ?
“खरंच सुंदर”
“खरंच म्हणतोस, की आपलं असंच ?”
“काय सांगू तुला, आजचा दिवस फारच वाईट गेला.”
“हं SSSSSSSSSS ! पण आपण आता संध्याकाळी जेवायला बाहेर जाणारच आहोत. येईल तुझा मूड परत.”
मी नकारार्थी मान हालवत म्हणालो “ नाही गं जमणार आज ! मला काहीतरी पटकन खाऊन लगेच कारखान्यात जायचे आहे.
“ काय ?” स्मिता ताडकन उभी राहिली. स्वाभाविकपणे तिचे हात कंबरेवर गेले. तेवढ्यात माझ्या लक्षात आले की तिला ती नवीन साडी फारच सुंदर दिसत होती.
“अरे काय म्हणतोस काय ? मी आत्ताच मुलांना आपण जाणार म्हणून आईकडे सोडून आले. चेष्टा करतोयस ना माझी ?”
“नाही गं ! खरंच सांगतोय. आज कारखान्यात सकाळीच एक मशिन नादुरुस्त होऊन पडले आहे आणि त्या मशिनची एक ऑर्डर पुरी करायला फार आवश्यकता आहे. सगळे त्याच कामावर लागले आहेत आणि मी घरी कसा बसू ? आणि माझे जेवणात लक्षतरी लागेल का ?”
“ठीक आहे ! पण आता घरी खायला काहीच नाही. तू कालच मला आज आपण बाहेर जाणार असं सांगितलेस ना ? म्हणून मी काहीच केले नाही घरी.”
आत्ता माझ्या डॊक्यात प्रकाश पडला. मागच्या भांडणाच्यावेळी मी तिला हे वचन दिले होते.
संतापेल नाहीतर काय करेल ती ?
“आपण एक तासभर बाहेर जाऊन यायचं का स्मिता ?”
“कशाला ते तरी ! जाऊदेत. आमचं नशिबच वाईट.”
तिच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास झाला मला. का खरंच होतं ते ?....
जयंत कुलकर्णी.
जर याचा कंटाळा आला तर पुढेमागे ही लेखमाला बंद करायचा हक्क लेखक राखून ठेवत आहे.
मित्रांनो/मैत्रिणींनो, कधी पाने जास्त तर कधी कमी. मला वाटते हे तुम्ही चालवून घ्याल.
प्रतिक्रिया
3 Mar 2011 - 11:52 pm | प्रास
आत्ता इतकेच म्हणतो.....
पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.....
3 Mar 2011 - 11:57 pm | जयंत कुलकर्णी
खरे तर आपल्यासारख्यांच्या प्रतिसादांमुळेच मी हे लिहू शकेन. नाहीतर या विषयावर एवढे काम केल्यावर हे परत लिहायचे हे जरासे कंटाळवाणेच आहे.
पण प्रयत्न करेन.
आपल्याला धन्यवाद !
4 Mar 2011 - 1:00 am | गोगोल
अजून. वाचायला मजा येत आहे.
4 Mar 2011 - 12:21 am | नेत्रेश
पुढिल भाग लवकर येउ द्या...
4 Mar 2011 - 12:58 am | पिंगू
काका पुढच्या भागाची वाट बघतोय. लवकरच पुढचा भाग टाका आणि लेखमाला बंद करायचा विचार सुद्धा मनात आणू नका.
- पिंगू
4 Mar 2011 - 1:07 am | आत्मशून्य
ठीकय....
हे नक्कीच समजू शकतो.
4 Mar 2011 - 9:41 am | अभिज्ञ
तीनहि भाग वाचले.
कथा मालिका उत्तम झालीये.
बंद वगैरे करायच्या भानगडीत पडू नका. :)
अन पुढचा भाग लवकर टाका.
अभिज्ञ.
4 Mar 2011 - 11:47 am | विद्याधर३१
लेखन छान आहे.
मालिका थांबवू नका .
पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत......
4 Mar 2011 - 2:29 pm | अर्धवट
वाचतोय..
पुढचा भाग येउ द्या लवकर
4 Mar 2011 - 3:30 pm | विजुभाऊ
कुल्कर्णी साहेब या पुस्तकाचे मराठी भाषांतराचे हक्क ऑलरेडी दुसर्याकोणाकडे तरी आहेत.
कृपया भाषांतर करण्यापूर्वी याची माहिती करून घ्या
4 Mar 2011 - 3:43 pm | जयंत कुलकर्णी
नमस्कार !
कृपया ते कोणाकडे आहेत ते कळवणे. मी ते मिळवायचे सगळे प्रयत्न केले. ज्याच्या कडे आहेत त्याला भेटून बघतो. शेवटी स्वैर भाषांतर व प्रायव्हेट सर्क्युलेशनसाठी म्हणून करतोय. आपणाला काही मार्ग माहीत असेल तर कळवणे.
4 Mar 2011 - 3:32 pm | विजुभाऊ
कुल्कर्णी साहेब या पुस्तकाचे मराठी भाषांतराचे हक्क ऑलरेडी दुसर्याकोणाकडे तरी आहेत.
कृपया भाषांतर करण्यापूर्वी याची माहिती करून घ्या
4 Mar 2011 - 3:32 pm | विजुभाऊ
कुल्कर्णी साहेब या पुस्तकाचे मराठी भाषांतराचे हक्क ऑलरेडी दुसर्याकोणाकडे तरी आहेत.
कृपया भाषांतर करण्यापूर्वी याची माहिती करून घ्या
4 Mar 2011 - 4:12 pm | जयंत कुलकर्णी
श्री. विजूभाऊ यांच्या प्रतिक्रिये नंतर पुढील लिखाण थांबवत आहे. कोणाला काही उपाय सापडला तर कृपया सांगावे. गोल्डरॅट्च्या सर्व पुस्तकांच्या छपाईचे आधिकार kk Books चेन्नई यांच्याकडे आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितले की त्यांनी गोल्डरॅट्ची जी पुस्तके छापली आहेत त्याचे गुदामात ढीग पडले आहेत त्यामुळे हे भाषांतर छापण्यात त्यांना अजिबात रस नाही. मला तर वाटतंय की ज्या प्रकाराने मी लिहीले आहे त्यामुळे मराठीत त्याचे निश्चितच वाचन होईल व वाचकांना त्याचा फायदाही होईल.
काय करावं बरं !!!!!!!!!!
इथे लिहीता नाही आले तर मी ज्यांना रस आहे त्यांना ई-मेल करत जाईन. पण तो पुढचा भाग......
4 Mar 2011 - 5:29 pm | प्रास
'केके बूक्स' कडून नाहरकत घेणे शक्य आहे का? मुळात त्यांच्याकडे छपाईचेच अधिकार असतील तर मराठी भाषांतराचे अधिकार असण्याची शक्यता फार कमी आहे. गोल्डरॅट्सकडेच विचारणा केली तर...?
तुमच्या या शैलीच्या लिखाणाने सदर भाग वाचनीय होत आहेत हे नक्की.
4 Mar 2011 - 6:58 pm | जयंत कुलकर्णी
मी आजच गोल्डरॅट यांना मेल पाठवला आहे. ते तो वाचतील अशा माणसाकडून. बघू काय होते ते.
आशा आहे माझ्या विनंतीला ते मान देतील. नाहीतर बघू मग, माझ्याच अनुभवांवर अशीच कादंबरी लिहावी लागेल.
4 Mar 2011 - 8:55 pm | अर्धवट
थेट त्यांना विचारलंत हे बरं केलंत.. पुढच्या भागाची उत्सुकता आहेच.. बघुया वाट.. मात्र टांगुन ठेवु नका.. काय ते अपडेट सांगा
5 Mar 2011 - 12:57 am | लॉरी टांगटूंगकर
सुंदर लिहिताय!!!!आवडतंय..............
5 Mar 2011 - 5:48 pm | जयंत कुलकर्णी
विजूभाऊ,
आपण हे हक्क कोणाकडे आहेत हे अजून सांगितले नाहीत. कृपया ताबडतोब कळवले तर बरे होईल.
7 Mar 2011 - 9:31 am | जयंत कुलकर्णी
विजूभाऊ,
आपण ज्या पध्दतीने तो प्रतिसाद दिला होता त्यावरून मला वाटले की आपल्याकडे निश्चित अशा स्वरुपाची काही माहीती दिसत आहे. पण तसे नसावे असे आता वाटत आहे.
आपण हे हक्क कोणाकडे आहेत हे अजून सांगितले नाहीत. कृपया ताबडतोब कळवले तर बरे होईल.