प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..)
मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला.
सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रमेशच्या घरी आई, विधवा बहिण नोकरीवाली, आणि बायको अशा तीन बायका आहेत. बायको दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामेपण बायकोच करते आणि आई सदैव कोणत्या ना कोणत्या भिशीला अगर भजनी मंडळात गेलेली असते. बहिण रविवार म्हणून टीव्ही पहात आरामात सोफ्यावर बसलेली. .
घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी त्याला विचारले वैदेही (त्याची बायको) कुठे आहे? तो म्हणाला ती ऋतुलला ( त्याच्या मुलाला ) गिटारच्या क्लाससाठी घेऊन गेली आहे.
वैदेही ही एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे.
मी रमेशला विचारले मग तू का सोडायला जात नाही? त्यावर तो म्हणाला कि पाच दिवस मी नोकरी करतो, घरासाठी राबतो. मग शनिवार रविवार तिने सगळं बघायला नको का? ती तिची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तू काय काय करतो? तो म्हणाला, मला सुटीच असते. मग मी नऊला उठतो. वैदेहीने बनवलेला चहा व ब्रेकफास्ट खातो. मग पेपर वाचून सावकाश अंघोळ करतो. मी म्हटले तेव्हा वैदेही काय करते ? तर म्हणाला, ती मुलांना उठवते, ब्रश करवून दुध देते, सर्वांचा चहा बनवते. ब्रेकफास्ट बनवते, मग देवपूजा करते. मग आई आणि बहिण यांच्या मदतीने जेवण बनवते.दोन दिवस तिला सुट्टी असते, सो तिने बरंच काम करून रमेशला आराम कसा मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे. शनिवार रविवार मला पूर्ण फ्री.
माझ्या तोंडावर आले होते कि अरे मग तातःवडा भर तीही राबतेच ना ? शनिवार रविवार इला नको का थोडी विश्रांती ?.. पण मी थांबले.
बाहेर पडल्यावर नवरा म्हणाला हा बघ आठवड्याचा आराम कसा वसूल करतो ?बिचारी बायको आठवडाभर बाहेर राबते आणि शनिवार रविवार घरी गृहिणी म्हणून ?. बिचारी सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करते भरपूर पैसे मिळवते. आणि हा इथे राजासारखा राहतो. मग हा कसला हिशेब?
पाच दिवस तो बाहेर जातो तर दोन दिवस तिनं एन्जॉय का करू नये ?
घरात तीन बायका आहेत पण राबणारी एकच. चांगले तीस हजार रुपये मिळवते तर स्वैपाकाला बाई ठेवायला काय झालं ? नाहीतर बायकांवर खर्च करण्यापेक्षा याने तिला स्वैपाकात आणि इतर कामात मदत केली तर काय बिघडले ?.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगा चार तास शाळेत जातो. सगळ्या कामाला शनिवार रविवारी तरी हात लावूदेत ना त्याला. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस संपूर्ण आराम करायचा आपण आणि राबायचे बायकोने हा कसला हिशेबीपणा.
..मी अजून विचार करते आहे. आपलाच पुतण्या आहे तो बरोबर का नवरा म्हणतो ते बरोबर?
(मिथ्यकथा नावे बदलून)
प्रतिक्रिया
2 Sep 2016 - 12:57 pm | पैसा
अगागा!
2 Sep 2016 - 1:00 pm | झपाटलेला फिलॉसॉफर
पॉपकॉर्न
2 Sep 2016 - 1:02 pm | सुबोध खरे
हॅ हॅ हॅ
मला रमेशचा हेवा वाटतो आहे.
2 Sep 2016 - 2:32 pm | टवाळ कार्टा
अगदी अगदी
2 Sep 2016 - 1:03 pm | नीलमोहर
पेढे मिळतील ना इथेतरी ??
फार आशेने आले हो, युगं लोटली पेढे खाऊन..
बस तारीख पे तारीख मिली,
पेढा नहीं मिला मिलॉर्ड, पेढा नहीं मिला..
2 Sep 2016 - 1:05 pm | त्रिवेणी
पि जी म्हणून राहू शकतील का ते म्हणजे कुणालाच जास्त काम नको.
2 Sep 2016 - 1:08 pm | संन्यस्त खड्ग
कसलं काय?
आजकालच्या पोरी म्हणजे .................................................
2 Sep 2016 - 1:11 pm | मृत्युन्जय
युद्धस्य कथा रम्यः साठी हा धागा आणि बहिष्कारासाठी तो धागा काय?
बाकी हे बरे केलेत की तुमच्या कथेतले दोघेही नौकरी करतात. एक जण आठवडाभर घरी तंगड्या पसरुन बसत नाही.
2 Sep 2016 - 1:14 pm | बोका-ए-आझम
या धाग्यावर बर्फी द्यावी काय?
2 Sep 2016 - 1:16 pm | मृत्युन्जय
काजू कतली द्या हो.
2 Sep 2016 - 1:53 pm | नाखु
एक नक्की द्या..
काय द्यायचं याच्यावरून काथ्याकुट करून "रमेश"च्या वांग्याचे भरीत करू नका इतकीच विनंती.
अखिल मिपा "जमेल तिथे हिशेब ठेवा मुखी पडो माकडमेवा" संघटनेकडून खुलाश्यासाठी सर्व काकु-पुतण्या व मामा-भाच्यांच्या हितार्थ प्रसारीत.
2 Sep 2016 - 1:16 pm | कैलासवासी सोन्याबापु
खल्लास!!!
2 Sep 2016 - 1:17 pm | यशोधरा
छिद्रान्वेषी विडंबने पाडणे ही तुमची ड्यूटी आहे का?
.
.
.
पळाऽऽऽ!!
2 Sep 2016 - 1:28 pm | एस
ह्या धाग्याने मला अंतर्मुख केलं, विचारप्रवृत्त केलं, मनात घनकल्लोळ माजवला, हृदयात कालवाकालव झाली... असो. मला बहुतेक भूक लागलेली दिसते. :-|
2 Sep 2016 - 1:57 pm | अजया
खी खी खी
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
2 Sep 2016 - 2:06 pm | माम्लेदारचा पन्खा
मालकांना णम्र इणंटी की गद्य इडंबन विभाग पण उघडा....!
2 Sep 2016 - 2:09 pm | कंजूस
झाला का हिशोबाचा ताळा?
2 Sep 2016 - 2:25 pm | सूड
क ह र !!
2 Sep 2016 - 2:31 pm | टवाळ कार्टा
नई जम्या, इतका काही खास वाटला नाही लेख
2 Sep 2016 - 8:35 pm | जेपी
+2016
2 Sep 2016 - 2:43 pm | पगला गजोधर
मिथ्यकथा कसली ? स्रीजन्मा ही तुझी कहाणी (सत्य)
2 Sep 2016 - 2:56 pm | प्रीत-मोहर
लोलवा!!
2 Sep 2016 - 7:33 pm | रेवती
हिशेब लागला नाही. डॉ. खरे यांच्या लेखातील महिला राणीसारखी राहतिये, नोक्री करत नाही. विडंबनात रमेश नोकरी करू शकत नाही. आधी घरी बसवा त्याला, मगच प्रतिसाद देता येतिल.
2 Sep 2016 - 8:27 pm | संदीप डांगे
सहमत! ;))
2 Sep 2016 - 8:33 pm | सही रे सई
किंवा बायको घरी काम काय काय करते नोकरी न करता ते तरी लिहायचं.
2 Sep 2016 - 10:06 pm | स्रुजा
कुणाला तरी घरी बसवाच. निदान शेजार पाजारच्यांना तरी. कारण मुलाला सांभाळायला बाकी कोण दिसत नाही. त्यांच्या मदतीसाठी पाठवा ९ हजार.
3 Sep 2016 - 12:18 am | पिलीयन रायडर
आणि पेढ्याचं आधीच सांगा..
ह्या वेळेस कुणी संकल्प सोडलाय?
2 Sep 2016 - 9:04 pm | खटपट्या
हही हही हही हही हही !!!
2 Sep 2016 - 9:40 pm | आजानुकर्ण
मस्त इडंबन
हे आवडले. तुम्हाला सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली आहे. ;) ;)
3 Sep 2016 - 12:09 am | रुपी
सुखी संसाराची गुरुकिल्ली सापडली नाहीये अजून, कारण ही शेवटची ओळ.. इथेही आणि 'तिकडेही'
.. मी अजून विचार करते आहे. आपलाच पुतण्या आहे तो बरोबर का नवरा म्हणतो ते बरोबर? >>
नवरा-बायकोच्या संसारात बायको नेहमीच बरोबर आणि नवरा नेहमीच चूक असतो. शिवाय इकडे आपलाच भाचा v/s नवरा आहे, त्यामुळे भाचा बरोबर. आणि तिकडे बायको v/s आपलीच भाची काय, बहीण, भाऊ, आई कुणीही असलं तरी बायकोच बरोबर..
ही सुखी संसाराची गुरुकिली :) हा.का.ना.का. ;)
3 Sep 2016 - 12:40 pm | पूर्वाविवेक
भारीच....