अरे अंगणात बाप अन दारात माय,
घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय,
येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय,
एकली हाय घरला, आता येतो का नाय,
घराकडे आलो तर काय काय देशील
घराकडे आलो तर काय काय देशील
गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील
सोताच्या हातानी भरवणार हाय,
रानात गेला बाप अन बाजारला माय,
एकली हाय घरला, आता येतो का नाय,
पोटभर खाल्यावर लै झोप येते
पोटभर खाल्यावर लै झोप येते
दोघांसाठी खोलीत गोधडी घालते
खोलीच दार आतुन लावनार हाय,
रानात गेला बाप अन बाजारला माय,
एकली हाय घरला, आता येतो का नाय,
काय हुईल बाजारन जर आली आई
काय हुईल बाजारन जर आली आई
सांगेन आई ह्यो तुजा जावई,
मागन मला घालायाला येनार हाय
रानात गेला बाप अन बाजारला माय,
एकली हाय घरला, आता येतो का नाय
हे मराठी शब्द माझेच आहेत.
मूळ हिंदी शब्द कुणाचे आहेत, ते तुम्ही ओळखालच!
वळीख वळीख
चिल्बुली पुष्कर गोळे**
**(आमच्या नावात जर कोणी श्लेश काढायचा प्रयत्न केला तर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)
आगामी भाषांतर :- सरकायल्यो खटीया जाडा लगे.
प्रतिक्रिया
13 May 2012 - 11:32 am | jaypal
संस्कृतात असता तर आधिक भवला असता. ;-)
13 May 2012 - 2:56 pm | चैतन्य दीक्षित
परवाही एका दुसर्या कुठल्यातरी कवितेवर 'संस्कृतानुवाद असता तर मजा आली असती' असा प्रतिसाद होता. ही काय चेष्टा आहे?
यात नक्की काय विनोद आहे ते कळत नाही, पण संस्कृतभाषेची थट्टा करणे योग्य नाही इतकेच नमूद करतो.
13 May 2012 - 9:24 pm | सूड
ही संस्कृत भाषेची थट्टा नाही. त्यामुळे अभ्यास वाढवा.
13 May 2012 - 9:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे
एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा कशी होते ते कृपया समजावून सांगता काय ?
त्यानंतर संस्कृतची थट्टा करणे योग्य का नाही यावर चर्चा करूच.
14 May 2012 - 11:22 am | चैतन्य दीक्षित
एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा होते असे मला म्हणायचे नाही.
पण 'उचलली जीभ, लावली टाळ्याला' असं करत संस्कृत अनुवाद हवा होता असे प्रतिसाद दिसतात, वर डोळे मारणारी स्मायलीही असते, यातून मला तरी थट्टेचा सूर जाणवला. म्हणून हे योग्य नाही इतकेच नमूद केले.
कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नव्हता.
13 May 2012 - 11:35 am | प्रचेतस
खपल्या गेलो आहे.
मस्तच जमले आहे.
13 May 2012 - 11:36 am | JAGOMOHANPYARE
:)
13 May 2012 - 11:46 am | सुहास झेले
हा हा हा हा .... !!!
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
13 May 2012 - 11:47 am | पैसा
13 May 2012 - 3:33 pm | स्मिता.
वाचून अगदी अशीच स्थिती झाली =)) =))
संस्कृतात अनुवाद असता तर बहार आला असता!
हल्ली पैसाताई बर्याचवेळा भटजीबुवांच्या 'रिझर्व्ड टेरेटरीमधे' अतिक्रमण करताना दिसतात ;)
13 May 2012 - 2:19 pm | जोशी 'ले'
:: काय हुईल बाजारन जर आली आई
काय हुईल बाजारन जर आली आई
सांगेन आई ह्यो तुजा जावई,
मागन मला घालायाला येनार हाय :-) :-) :-)
:-) :-) :-) :-)
:-) :-) :-)
:-) :-)
:-)
काय काय श्लेष दडलेत....:-)
13 May 2012 - 2:28 pm | यकु
अगा माय माय माय
13 May 2012 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच भारी जमलं आहे. :)
और भी आने दो.
-दिलीप बिरुटे
13 May 2012 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा
अगं बाबो..बाबो..बाबो.. पार बाजार उठवलाय...
@काय हुईल बाजारन जर आली आई
सांगेन आई ह्यो तुजा जावई,>>>
13 May 2012 - 7:45 pm | शुचि
एकेक नग आहेत मिपावर :) ...... काही प्रतिसादही उच्च कोटींचे आहेत.
14 May 2012 - 8:02 am | ५० फक्त
उत्तम, अशा प्रकारे अनुवाद करण्यासाठी उत्तम गाणे आहे हे.
14 May 2012 - 10:43 am | प्रीत-मोहर
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))
14 May 2012 - 11:09 am | प्यारे१
खिक.
अवांतर : 'माताय,तद माताय' वर बंदी आणावी लागेल चैतन्य दिक्षितांच्या म्हणण्यानुसार!
मग अश्व विराजीत करण्याचं तर लांबच ;)
14 May 2012 - 12:59 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
20 Jun 2012 - 7:33 pm | उपटसुंभ
काय हुईल बाजारन जर आली आई
काय हुईल बाजारन जर आली आई
सांगेन आई ह्यो तुजा जावई,
मागन मला घालायाला येनार हाय
अफलातून..! :)
13 Jan 2016 - 2:02 pm | होबासराव
अंगना मे बाबा द्वारे पे मा =))
13 Jan 2016 - 3:45 pm | आदूबाळ
थर्ड अंपायरकडे रेफर करताना मैदानातला अंपायर जशी खूण करतो तशी खूण गोविंदा करतो. असं का असावं हे कोडं बरेच दिवस उलगडलं नव्हतं. मग लक्षात आलं की "द्वारे" हा संस्कृत शब्द लोकांना कळेल की नाही या भीतीने दरवाजाचा आकार हवेत काढून दाखवण्यात आला आहे!
13 Jan 2016 - 3:10 pm | पद्मावति
:))
14 Jan 2016 - 1:54 pm | बाबा योगिराज
बाब्बो.....
14 Jan 2016 - 3:38 pm | वपाडाव
सुन्दर...
अशाच काही गाण्यान्चे भाषाण्तर केलेले आहे. सवडीने टाकीन.
14 Jan 2016 - 4:17 pm | होबासराव
भाषाण्तर केलेले आहे तर सवड कशाला =)) आण दो