ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे

कापूसकोन्ड्या's picture
कापूसकोन्ड्या in जनातलं, मनातलं
1 Mar 2011 - 12:15 am

ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे
प्रख्यात पत्रकार आणि मराठी इ-पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे. त्यांच्या आय बी एन लोकमत या वाहिनी वर प्रत्येक सप्ताहांतराला प्रसारीत होणाया ग्रेट भेट या कार्यक्रमाचा मी फ्यान आहे. हो अगदी अठ्ठेचाळीस इंची.

भारतात असेन तेव्हा मी हा कार्यक्रम जरुर पाहतो, अन्यथा मिळाला तर तू नळी वर (काही भाग मिळतच नाहीयेत.)
या मुलाखतीं मध्ये पाहुण्यांची निवड करताना त्यांचे मराठी असणे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये किर्ती आणि स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असणे हे सुत्र बहुदा असावे.

कारण ही तसे तगडे आहे.एरवी आपली अती डावी आणि आणि प्रसंगी हिंदू द्वेशी अशी प्रतिमा निर्माण करणारा हा पत्रकार आपले विचार आणि संकल्पना यांचे जोडे बाहेर काढून ठेवतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो.अगदी नेहमीचे सुट टाय असा टिपिकल अटायर बाजूला ठेवून साध्या सुध्या वेषामध्ये अवतरतो. नेहमीचे झगमटाचे असलेले वातावरण सोडून कधी साध्या टेबल खुर्चीवर तर कधी चक्क बागेत वगैरे अशी जागा मुलाखती साठी निवडतो. ज्या पाहूण्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांना हा माणूस बोलते करतो आणि स्वत: कमी बोलतो. एकंदरीत सर्व मुलाखती मध्ये त्यांनी पाहूण्यांचा चांगला अभ्यास केलेला असतो. मुलाखत घेताना कोणतेही शोबाजी नसते. दोन माणसे एकत्र बसून गप्पा मारत आहेत असा एकंदरीत प्रकार असतो.

वारंवार येणाऱ्या लोकमतच्या जाहीराती थोडासा रसभंग करतात. पण व्यावसायिक अटळता म्हणून आपण दुर्लक्ष करायला हवे.

मला अत्यंत आवडलेल्या काही मुलाखती त्यांच्या पसंती क्रमानुसार देत आहे.(सर्वाता आवडलेली मुलाखत प्रथम याक्रमाने) पाहूण्यांचे नाव, आवडलेली थोडक्यात माहीती.

1. सिन्धूताई सपकाळ :- पदोपदी चपखल पणे बसणाऱ्या () सुरेश भटांच्या किंवा बहीणाबाइंच्या काव्यापंक्तींची या बाई पखरण करतात. या बाईच्या जीभेवर जणू सरस्वती आहे. सिंधूताईंना आइ म्हणून संबोधलेले आवडते. त्यांची वात्सल्यमूर्ती पाहून मला पण त्यांना आई म्हणून हाक मारावे असे वाटले.

2. गोपाळ बोधे:- विमानातून फिरत मोठ्या मोठ्या इमारतींचे छायाचित्रे काढणारा धाडसी माणूस. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडीयाचे शिखर हे डोम सारखे आहे ही माहीती प्रथम त्यांना मिळाली. तसेच रत्नागिरी आणि वेंगुर्ला इथले लाईट हाउस यांचे फोटो. आणखी खूप इंटरेस्टींग माहीती म्हणजे भारतात असे साहसी फोटो काढणारे दोनच लोक आहेत दोनीही मराठी . दुसरा माणूस उद्धव ठाकरे.
3. रामदास आठवले:- राजकीय पार्श्वभूमी असून ही आपली मते संथ लयीत आणि खर्जातील आवाजात स्प्ष्टपणे मांडणारा असा हा नेता. राजकीय प्रतिमा काही असो, माणूस मनाला भिडला. आठवले पूर्ण निर्व्यसनी आहेत ही नवीन माहिती म्हणजे सुखद धक्काच होय.
4. डॉक्टर अभंय बंग: यांची रूग्णाप्रती असणारी निष्ठा, त्यांनी वेगवेगळी मिळवलेली माहिती त्याचे शास्त्रीय विश्लेषण आणि सरकारी यंत्रणे बरोबर दिलेली झुंज. साधे राहणीमान
5. नाना पाटेकर वा वा खुपच छान मुलाखत अशोकसराफ बरोबरचे नानाचे सम्बध आणि नानाची दोन दैवते- बाळासाहेब आणि बाबा आमटे, त्याचे गणापती प्रेम आणि राजकारणातल्या लोकांबद्दलचे त्याची मते. दोघेही बहुधा एकाच वयाचे असावेत (निखिल आणि नाना) एकमेकांना अरेजारे करत असलेले पाहून ऐकायला मजा आली.
6. सदाशिव साठे : प्रख्यात शिल्पकर्मी ()याच्या मुलाखतीत एक विचार खुप म्हणजे खुपच आवडला. पुतळे आणि त्यांचे राजकारण चालू असताना त्याना वाटते की माणसांचे पुतळे करण्यापेक्षा एखाद्या कवीतेचे शिल्प करावे. माझ्यामनात कल्पना आली विंदाची " घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे" याचे शिल्प कसे करावे?
7. सुरेश खोपडे :-मुंबईचे अॅाडिशनल पोलीस कमिशनर भिवंडी दंगली वर पुस्तक लिहीणारा आणि मोहल्ला कमिटीची संकल्पना प्रत्यक्ष राबवणारा एक साधा माणूस. अमेरीका चिन सारख्या देशात यांना व्याख्यानासाटी आंमत्रण मिळते. विषय असतो सामाजीक स्वास्थ्य आणि दंगली होवू नयेत यासाठी करावे लागणारे प्रतिबंधात्मक उपाय. या मुलाखतीत मिळालेली माहिती त्याना शौर्य पदक झगडून मिळवावे लागले. बावीस वर्षे फरार असलेल्या दरोडेखोरांना यमसदनी पाठवल्याबद्दल पण ते मिळाले घटना घडल्यावर तब्बल अकरा वर्षांनी.
8. पोपटराव पवार आपले क्रिकेट मधील करिय़र सोडून एका हिवरे बाजार साठी कसे झटले. अंतरराष्टीय व्यासपीठावर सर्व जगातले लोक कसे आकृष्ठ होतात. या पोपटरावांची वाणी अगदी छान कोणताही अभिनिवेश न बाळगता पण आग्रही पणे आपली भूमिका मांडण्याची हातोटी अनोखी आहे.
9. विश्वास पाटील :-पानिपत,झाडाझडती,महानायक या पुस्तकांनी या माणसाने आपल्याला अगोदर वेड लावलेले आहेच. काही किस्से त्यांच्याच तोंडी ऐकणे हा एक वेगळा अनुभव आहे.
10. तुषार गांधी : प्रत्यक्ष बापूजींचा नातू त्यामुळे बाय डिफौल्ट आदर आहेच. पण तेवढेच त्यांचे करतुत्व नाही. ते एक मोठे विचारवंत आहेत.हू किल्ड गांधी असे काहीतरी त्यांच्या पुस्तकाचे नाव. सर्वात महत्वाचे म्हणजे ()त्याचे मराठी उच्चार आणि बोलण्याची ढब. काही उच्चारावरून त्यांचे अमराठीपण लपत नाही पण अस्खलीत काय म्हणतात तसे मराठी बोलतात.
मिपाकरांनो, हे दशक अख्यान इथेच संपवतॊ. वानगी दाखल काही फक्त नावे देतो.आणि आरती चे तबक आता खाली ठेवतो.
या हीऱ्याना सॅल्यूट, वंदन, सलाम, हॅटस ऑफ, काय म्हणाल ते.
आणि अशा लोकांच्या विविध गोष्टी आमच्यापर्यंत पोचविल्या बद्दल निखील वागळे यांचे विशेष आभार.
(विठ्ठल कामथ आणि संजय गायकवाड यांच्या मुलखती च्या लिन्का असल्या तर द्याव्या खुप उत्सुकता आहे.)
मिपाकरांची मते जाणण्यास उत्सुक
--कापूसकोंड्या
केवळ स्मरणशक्तिवर आधारीत असल्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी
यादी
1. अशोक सराफ
2. प्रेमांनंद रामाणी
3. शि.द.फडणीस
4. संजय गायकवाड
5. आनंद नाडकर्णी
6. भीमराव गस्ती
7. प्रविण ठिपसे
8. बाबासाहेब पुरंदरे
9. सुरेश वाडकर
10. प्रशांत दामले
11. आरती अंकलीकर टिकेकर
12. सचिन पिळगावकर
13. डॉ.प्रेमानंद रामाणी

धोरणसंस्कृतीसमाजजीवनमानराजकारणछायाचित्रणप्रकटनप्रतिसादमाध्यमवेधअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

नाना बेरके's picture

1 Mar 2011 - 10:34 am | नाना बेरके

तुम्ही वर उल्लेखलेल्या ग्रेट भेटी आम्हालाही आवडल्या.

टारझन's picture

1 Mar 2011 - 10:56 am | टारझन

३) रामदास आठवले:- राजकीय पार्श्वभूमी असून ही आपली मते संथ लयीत आणि खर्जातील आवाजात स्प्ष्टपणे मांडणारा असा हा नेता. राजकीय प्रतिमा काही असो, माणूस मनाला भिडला. आठवले पूर्ण निर्व्यसनी आहेत ही नवीन माहिती म्हणजे सुखद धक्काच होय

आहो माणुस कसा काय मनाला भिडला? उद्या म्हणाल समिर दिघे याची क्रिकेट कारकिर्द काहीही असो , माणुस मनाला भिडला .. (असो , असेलंही भिडणारा मनाला )
रामदास आठवले आठवले की मला हसु येतं. ते त्यांच्या जब्बरदस्त वकृत्वकौषल्यामुळे . हिंदी तर काय बोलतो हा माणुस ? यश चोप्रा फिका पडावा . मागे एकदा ण्युज ला आलं होतं , दिल्लीतली "फुका" ची मिळालेली रुम खाली करा म्हणुन भौसाहेबांना ५ महिन्यांचा अवधी दिला , तरी हे तिथुन हालायचं नाव घेत नव्हते, एवढे तर हे चिकट.. पण तरीही माणुस म्हणुन ते मनाला भिडतील यात शंका नाही :) सत्ता उपभोगायला मिळेल म्हणुन कॉंग्रेस शी हातमिळवणी केली होती , तिकडुन लाथ मारल्यावर आता सेनाभवनात चकरा मारतात , केवढी ही काँप्रोमाईज ? तरीही माणुस म्हणुन मनाला भिडणार ह्यात तिळमात्र शंका नाही :)

बाकी लोकांविषयी जास्त कल्पना नाही , तेंव्हा तुमच्या लेखातुन मिळालेले ज्ञान जशे च्या तशे घेतो ;)
आणि जाता जाता गांधीबाबा च्या नातवाला भेटलात पण आमच्या पुण्यातल्या कसब्यात रहाणार्‍या टिळकांच्या नातवाला भेटला नाहीत (अलिकडेच आमदारकीच्या निवडणुकीत ते आपटले असले तरी) ह्या बद्दल णिषेध व्यक्त करतो आणि एवढे बोलुन माझे आवरते घेतो :) जय हिंद जै महाराष्ट्र !

- हापुसआंब्या

कापूसकोन्ड्या's picture

1 Mar 2011 - 9:17 pm | कापूसकोन्ड्या

???

५) नाना पाटेकर
एकमेकांना अरेजारे करत असलेले पाहून ऐकायला मजा आली.

आणी नानाचे शेती प्रेम पाहुन भरुन आले.
एखादा स्टार कलाकारसुद्धा शेती करु शकतो (नुसत्या जमिनी विकत घेउन ठेवत नाही) हे पाहुन/ऐकुन छान वाटले.
माझे आजोबा पण ड्वळे फाडून फात होते. (जे कद्धी-कद्धी नटांबाबत चांगले बोलल्याचं मला स्मरत नाही.)

९) विश्वास पाटील :-महानायक

वाचुन लै भारावुन का काय म्हंतात तसं झालेलं.
खरंच सुभाषबाबुंबद्दल एवढी माहीती गोळा करुन मराठी जनाला वाचण्यास उपलब्ध करुन दिली.
वाचनात रस फकस्त या एका आणी एकाच माणसामुळे.
बाकी मग नंतर वाचायला घेतले.

पर्नल नेने मराठे's picture

1 Mar 2011 - 2:37 pm | पर्नल नेने मराठे

शिर्शक वाचुन मला वाटले माझ्यावर लेख लिहिला आहे कि काय :ओ

बाकी लेख छानच !!!

परिकथेतील राजकुमार's picture

1 Mar 2011 - 2:50 pm | परिकथेतील राजकुमार

माफ करा लेखक पण स्पष्ट प्रतिक्रीया देत आहे :-

प्रख्यात पत्रकार आणि मराठी पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे.

हि ओळ वाचली आणि गहिवरुन आले.

कारण ही तसे तगडे आहे.एरवी आपली अती डावी आणि आणि प्रसंगी हिंदू द्वेशी अशी प्रतिमा निर्माण करणारा हा पत्रकार आपले विचार आणि संकल्पना यांचे जोडे बाहेर काढून ठेवतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो.अगदी नेहमीचे सुट टाय असा टिपिकल अटायर बाजूला ठेवून साध्या सुध्या वेषामध्ये अवतरतो. नेहमीचे झगमटाचे असलेले वातावरण सोडून कधी साध्या टेबल खुर्चीवर तर कधी चक्क बागेत वगैरे अशी जागा मुलाखती साठी निवडतो. ज्या पाहूण्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांना हा माणूस बोलते करतो आणि स्वत: कमी बोलतो. एकंदरीत सर्व मुलाखती मध्ये त्यांनी पाहूण्यांचा चांगला अभ्यास केलेला असतो. मुलाखत घेताना कोणतेही शोबाजी नसते. दोन माणसे एकत्र बसून गप्पा मारत आहेत असा एकंदरीत प्रकार असतो.

हे वाचुन तर अक्षरशः भडभडून आले हो... पुढचे वाचवले नाही.

अगदी खरे सांगायचे तर ह्या वागळेचे बदलते रंग पाहुन सरडा सुद्धा लाजेल. अतिशय लाचार, हांजी हांजी करणारा हा माणूस आहे.

अवलिया's picture

1 Mar 2011 - 2:54 pm | अवलिया

हाण्ण हाण्ण !!

प्रचेतस's picture

1 Mar 2011 - 3:01 pm | प्रचेतस

कांग्रेजी जनांचे लांगूलचालन करण्यात एक नं. पटाईत माणूस. आयबीएन लोकमतचा संपादक काय उगाचच बनवत नाहीत कोणाला...!
सुमार केतकर आणि वागळे महाशय एकाच माळेचे मणी.

जोशी's picture

1 Mar 2011 - 11:12 pm | जोशी

>>>>कांग्रेजी जनांचे लांगूलचालन करण्यात ए......

इथे मनसे म्हणायचे आहे का ?

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Mar 2011 - 11:09 am | llपुण्याचे पेशवेll

इथे मनसे म्हणायचे आहे का ?

वा छान नवीन माहीती मिळाली.

हाण्ण हाण्ण काय? तु देखील तुझ्या लेट्येष्ट मालिकेत तिडिक्या मिपाकरांबद्दल आज्जिब्बात डायजेस्ट ण होणारं ग्गोग्गोड लिहीलेलंस :) काही काही मजकुर तर त्या लोकांनाही डायजेस्ट झाला नाही बे :)

अवांतर : बाकी लेख तसाही वाचला नव्हता =)) पण वांजळ्या इतरांना बोलतं करुन स्वत: फार कमी बोलतो हे वाचुन बसुन हसावे की लोळुन हसावे तेच कळेना =))

- गोडबोलिया

अवलिया's picture

1 Mar 2011 - 3:11 pm | अवलिया

एय भाऊ ! पण मी हांजी हांजी करणारा लाचार आहे असे ते डायजेस्ट न झालेले पण म्हणू शकत नाहीत ;)

तसं कोण म्हणत नाहीये .. आणि तो भाग पण अलहिदा आहे ;) मेण मुद्द्याकडे लक्ष खेचु इच्छितो ;)

- वकिल पांजळे

कापूसकोन्ड्या's picture

1 Mar 2011 - 9:24 pm | कापूसकोन्ड्या

?????

कापूसकोन्ड्या's picture

1 Mar 2011 - 7:51 pm | कापूसकोन्ड्या

अगदी खरे सांगायचे तर ह्या वागळेचे बदलते रंग पाहुन सरडा सुद्धा लाजेल

मान्य पण ती बाजू सोडून या माणसाने इंटरव्ह्यू चांगला घेतला पक्षी माणसे तरी चांगली निवडली हे मान्य करा.
इतकी असहिष्णुता बरी नव्हे
.

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 8:02 pm | धमाल मुलगा

टिआरपी बोलतो हो!
कोणाची निवड केली की टिआरपी वाढेल ह्याची गणितं असतात राव.

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 7:56 pm | नगरीनिरंजन

कोण निखिल वागळे?

वपाडाव's picture

2 Mar 2011 - 10:05 am | वपाडाव

+१
लै बाहरी..

५० फक्त's picture

1 Mar 2011 - 3:11 pm | ५० फक्त

त्या वागळेचा खरंतर बाजार उठवला असता कधीच शिवसेनेनं पण काय मांडवली झाल्या माहित नाही.

असो, ह्या माणसानं स्वताची एवढी पातळी खालावुन घेतली आहे की त्याबद्दल बोलावसं वाटत नाही.

बाकी, इतर माणसं चांगली आहेत, असतील , असु शकतात यावर माझा तरी अजुन विश्वास आहे.

हर्षद.

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 7:50 pm | धमाल मुलगा

ह्म्म्म....
सदरहु इसमाबद्दल आम्ही मत व्यक्तही करु इच्छित नाही.
धन्यवाद.

वागळे हा माणूस जरा अति करतो हे मान्य पण तरी ग्रेट भेट पेक्षा " आजचा सवाल " मस्त रंगवतो ...............
तिथे कोणताही पक्ष किंवा संघटना झाकत नाही ..............

माझीही शॅम्पेन's picture

1 Mar 2011 - 10:20 pm | माझीही शॅम्पेन

मी किती पूण्यवान आहे कारण मला हा लेख अजिबात दिसत नाहीए ! लेख दिसल्यावर प्रतिक्रिया देतो !!!
(स्व:संपादनाचा परिणाम ? :))

छोटा डॉन's picture

1 Mar 2011 - 10:24 pm | छोटा डॉन

लेख स्वतःहुनच उडवला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वयंसंपादनाचा अधिकार ह्यांचा पुळका असणारे त्याचे खंदे समर्थक कुठे आहेत ?
मी सदर प्रकाराचा निषेध करतो.

'स्वयंसंपादनाची सोय' ही बडी डेंजर चीज आहे, त्याचा वापर कसा होतो त्यावर बरेच अवलंबुन असते.

- छोटा डॉन

माझीही शॅम्पेन's picture

1 Mar 2011 - 10:44 pm | माझीही शॅम्पेन

+१

जाहीर निषेध !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2011 - 10:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख काढल्याबद्दल कापूसकोंड्यां यांचा जाहीर निषेध.

-दिलीप बिरुटे

माझीही शॅम्पेन's picture

2 Mar 2011 - 9:30 am | माझीही शॅम्पेन

प्र.का.टा.आ.

कापूसकोन्ड्या's picture

1 Mar 2011 - 11:20 pm | कापूसकोन्ड्या

लेख काढल्याबद्दल कापूसकोंड्यां यांचा जाहीर निषेध.

-दिलीप बिरुटे
एडिट करताना काही तरी गोची झाली आणि नंतर इंन्टरनेट गंडले. वर्ड मध्ये ब्याक अप होते म्हणून वाचलो. परत जागे वर आणले आहे.
सर्वानाझालेल्या मनस्तापा बद्दल विनाशर्त सपशेल माफी. मिपा कर नाराज हॉणे समजू शकते. पण भविष्यात काळजी घेतली जाईल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2011 - 11:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला सिंधुताईंच्या मुलाखती आवडतात. काय वक्तृत्व आहे.
बहिणाबाई चौधरी म्हणायच्या. मी नाही माझ्या मुखातून सरस्वती बोलते.
तसेच मला सिंधुताईच्या मुलाखतीमधून जाणवत असते.

ग्रेट भेट बद्दल थँक्स.......!

-दिलीप ब्रुटे

कापूसकोन्ड्या's picture

2 Mar 2011 - 1:02 am | कापूसकोन्ड्या

म्हणूनच मी म्हणले की मला त्यांना आई म्हणून हाक मारावी वाटली.

jaydip.kulkarni's picture

2 Mar 2011 - 1:30 am | jaydip.kulkarni

निखील वागळे यांच्या ग्रेट भेट मला देखील आवडतो ...... पण आजचा सवाल जास्त परिणामकारक वाटतो ............... IBN लोकमत च्या वेब साइट वर त्याचे फुटेज लगेच मिळते देखील ..............
पण आज जैतापूर विषयीचा आजचा सवाल थोडासा फसवा वाटला ..........त्यात जाणून बुजून प्रकल्प विरोधी लोकांना टार्गेट केल्या सारखे वाटले ..................
कोकणातला नासलेला नारळ ( प्रहार वाला ) देखील आला होता आणि श्रीयुत वागळे जरा त्याची हुजुरेगिरी केल्यासारखा वाटला .. श्रीयुत माधव भंडारी यांनी फक्त संपर्क मत मांडले ............
ह्या माणसाचे आणि शिवसेनेचे वाकडे आहे हे कबूल , पण म्हणून जाईल तिथे आपल्या सानुनासिक आवाजात हा शिवसेनेबद्दल आग ओकतो ........... मी काही सेना समर्थक नाही पण तरी हा प्रकार योग्य वाटत नाही ............
आजचा " आजचा सवाल " हा फक्त जैतापूर प्रकल्प विरोधकांना वाईट ठरवण्यासाठीच केला होता असे वाटले ..........

कुंदन's picture

2 Mar 2011 - 11:13 am | कुंदन

>>>आठवले पूर्ण निर्व्यसनी आहेत

व्वा ...काय क्वॉलिफिकेशन आहे नै ?

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Mar 2011 - 11:16 am | llपुण्याचे पेशवेll

आयला आमचा कुंद्या पण पूर्ण निर्व्यसनी आहे. अधून मधून स्कॉच पितो इतकेच. ;)
चला कुंद्याला रामदास आठवले करा आता.

टारझन's picture

2 Mar 2011 - 11:49 am | टारझन

=)) =)) =)) =)) =)) कुंद्याला रामदास आठवल्या सारखी गवत पेरलेली दाढी पण वाढवायला सांगु . ..
पण एक अडचण आहे ( नाही नाही तसली अडचन नाही ) .. हा कुंद्या दुबैत राहुन खजुर खाऊन खजुरा सारखा कडक आणि सुरकुतेल झालाय .. त्याला आठवल्यासारखा टमटमीत उडीद वडा बनवायला पाहिजे

-(कॉच्च्युम डिजायनर ) अंबुजा

कापूसकोन्ड्या's picture

4 Mar 2011 - 9:25 pm | कापूसकोन्ड्या

धन्यवाद!
खरं म्हणजे खूप परिश्रम करून मी ही माहीती गोळा केली होती.भारतापासून दूर असल्यामुळे मिसळपाव वर आल्यावर आपल्या माणसाना भेटल्याचा आनंद होतो.
आपले सर्व सन्माननीय सभासदांना बहुधा हा लेख आवडला नाही. भेटलेल्या व्यक्तीपेक्षा निखील वागळे हे कसे आहेत यावर चर्चा झाली. कदाचित मी लिहीण्यात कुठे तरी कमी पडलो असेन. कदाचित मीच निखीलवर जास्त ग्गो~~ड लिहीले असेल असो
पुढे लिहीताना अधिक काळजी घेइन.पण लिहायचे सोडणार नाही. (माझा 'मुक्काम' होउ नये म्हणून प्रतिक्रीया फारशा सिरीयसली घेतलेल्या नाहीत)
सर्व लोकांचे प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद
~~~~कापूसकोन्ड्या

कलंत्री's picture

6 Mar 2011 - 9:02 pm | कलंत्री

मी लेख आणि इतर प्रतिक्रिया वाचल्या. माणसाचे कर्तुत्व पाहावे, अकारणच पूर्वैतिहास जर विसरता आला तर उत्तमच. कदाचित म्हणूनच असे सांगत असतात की, नदीचे मूळ आणि ऋषी चे कूळ पाहू नये, कारण त्या योगे हातात फारसे काही लागत नाही.

महाराष्ट्रातील कर्तुत्ववान माणसे हा जिव्हाळ्याचा विषय बनू शकतो आणि हा विषय ऐरणीवर आणल्याबद्दल आपले आभार मानायला हवे.

कोणतीही नाउमेद ना बाळगता आपण लिहित जा.