राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य, वीज, पाणी, महागाई, बेरोजगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शक्ती व युक्ती मिळावी असे श्री विठ्ठल चरणी साकडे घातले आहे, असे राज्याचे (काळजीवाहू) उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री श्री.भुजबळ व त्यांच्या पत्नी सौ.मीनाताई यांच्या हस्ते गुरुवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली. वनमंत्री बबनराव पाचपुते, राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, नाशिकचे खासदार समीर भुजबळ, नांदगावचे आमदार पंकज भुजबळ, आमदार एकनाथ खडसे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
तब्बल दहा वर्षे सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांना आता निवडणुकांनंतर पुन्हा समस्यांची जाणीव झाली आहे. पांडुरंगाच्या चरणी तरी त्यांनी याची अप्रत्यक्ष कबुली दिली, हे चांगले. महाराष्ट्राच्या वैभवसंपन्नतेची जाहिरात करत सत्तेवर आलेल्या आघाडीने निवडणुकीनंतर पुन्हा समस्या सोडविण्यासाठी शक्ती आणि युक्ती द्यावी, असे देवालाच साकडे घातले आहे.
मुळात प्रश्न आहे, तो समस्या सोडविण्याच्या इच्छाशक्तीचा. देवाने त्यांना तशी बुध्दी द्यावी, अशी प्रार्थना आपण पांडुरंगाकडे करूया...
...आता तो पांडुरंग कधी आघाडीच्या मदतीला धावून येईल, आणि या समस्या सोडविण्यासाठी शक्ती आणि बुध्दी देईल, त्याकडे डोळे लावून आपण बसू या!
(http://zulelal.blogspot.com)
प्रतिक्रिया
31 Oct 2009 - 3:02 am | पाषाणभेद
एकुणच सगळे भुजबळ कुटूंबीय हजर होते हे समजले.
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
31 Oct 2009 - 9:30 am | प्रकाश घाटपांडे
धर्मनिरपेक्ष शासन व्यवस्थेत शासकीय महापु़जा अजून किती दिवस चालणार आहे?
चाणक्यनीती ची आठवण येते राजाने कसे वागावे याबद्दल केलेले वर्णन अचुक लागू पडते.
आमच्या मते राज्याचा / जनतेचा विकास हा परमार्थापेक्षा स्वार्थाच्या लढाईतुनच होणार आहे. म्हणजेच विकास हे या लढाईचे बायप्रॉडक्ट आहे.
अवांतर- कालच निवडुकीवर पैशाचा वाढता प्रभाव या परिसंवादाला गेलो होतो. राजकीय उमेदवार बरेच खरे बोलले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
31 Oct 2009 - 10:13 am | अडाणि
आम्हालाही समजुद्या की काय काय बोलले ते....
-
अफाट जगातील एक अडाणि.
31 Oct 2009 - 11:37 am | प्रदीप
हेच मीही लिहीणार होतो:
31 Oct 2009 - 9:36 am | अमोल केळकर
शक्ती दे! युक्ती दे! (बुद्धीही दे!!)
आणि लवकरात लवकर सत्ता दे ! ( म्हणजे खुर्ची दे ! )
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा