आनंदी आनंद गडे

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
27 Oct 2009 - 12:47 pm

बाबा, तुझे आनंदाचे सर्वोकृष्ट क्षण कुठले? चिरंजिवानी विचारले.
हा प्रश्न कट्टा झाल्यावर त्याने विचारला होता म्हणुन लगेच उत्तर दिले नाही.
कधी पटात घुसेल त्याचा नेम नाही.
कट्ट्याला तात्या,सर्वसाक्षी,जोशीबुवा आणि रामदास होते.
खाना खजाना साठी सौ .दिमतीला होती.
कट्टा होत असताना चिरंजिव कट्ट्याला पाठ करुन गुगलत बसले होते.
तु सांग बघु? मी प्रतिप्रश्न केला.
तेवढाच विचार करायला वेळ.
तुम्ही सर्वजण सगळेजण बागडत होतात बाबा. अगदी कॉलेज कुमारांसारखे. मला मजा आली. तुम्ही तर सर्व नॉटी मोड मधे होता.. त्यात साक्षी काका पण सामील हे बघुन धमाल आली.चिरंजिव म्हणाले.
(कट्ट्याचे क्रिप्टीक बरोबर पोचले होते.)
अरे आमच्या आनंदात तुला आनंद झाला हा एक आनंदाचा सर्वोत्कृष्ट क्षणच की.-मी
इतर काही सांग ना. -चिरंजिव
कुठल्या पिरीयडचे? माँटेसरी चे पण आहेत्.(तरुणपणातले कसे काय सांगायचे बॉ? पार्टीबदल झाला तर?)- मी
लग्नानंतरचे सांग. क्रमवार टॉप टेन सांग.
तशी वर्गवारी करता येणार नाही. पण तरी सुद्दा बघतो.
१. आईला बघायला गेलो होतो.
२. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी. (इथे चिरंजिव- हीहीही)
३. तुझ्या आगमनाची चाहुल लागली तेंव्हा.
टेस्ट पॉझिटीव?- चिरंजिव
नाही रे बाबा. आईच्या आधी मला कळले. - मी
ते कसे काय बॉ?-चिरंजिव
त्याचे असे झाले. मोठ्या काकाचे आदल्या दिवशी 'ट्रॅफिक जॅम' झाले होते. टॉयलेट चा दरवाजा उघडल्यावर त्याची वर्दी स्वयंपाकघरापर्यंत पोचली. नाश्त्याला बसलेल्या आईने एक उचकी दिली. तेवढा सिग्नल मला पुरेसा होता.
४. तु जेंव्हा पहीला शब्द बोललास तेंव्हा.. शब्द काय पुर्ण वाक्यच बोललास .
५.१० वी ची गरुड झेप घेतलीस तेंव्हा.
६. तुला यु.डी.सी.टी त अ‍ॅडमिशन मिळाली तेंव्हा माटुंगा स्टेशन वर ११.३० वाजता.
७. तुझ्या हातात गाडी देताना.
८. ग्रॅज्युएशन झाल्यावर एन्वायरमेंट साठी काहीतरी करणार हे तु सांगितल्यावर
९.माझी 'मास्तरकी' तु पण थोडी बहुत तु करणार हे तु म्हटलेस असे आई म्हणाली तेंव्हा.
१०.परवा 'इंडीयाना जोन्स' बघताना एका जोकला आपण टाळी देउन खदाखदा हसलो तेंव्हा.
११. कट्ट्यानंतर तात्याच्या गाण्याला तु दिलखुलास दाद दिलीस तेंव्हा.
१२.तुझ्याकडे अशा प्रकारच्या गप्पा मारताना तर नेहेमीच.
आणि तुला एक सांगु आनंदाबद्दल. naughty होउन आनंदी राहाणे चांगले की knotty राहुन जिंदगी बरबाद करणे चांगले हे तुच ठरव.
चिरंजिव हसले.
जाता जाता: इंडीयाना जोन्स चा बाप त्याला म्हणतो " तु त्या बाई वर विश्वास ठेउ नकोस. ती नाझी आहे"
आदल्या दिवशी इंडीयाना जोन्सची तिच्याबरोबर मॅच झालेली असते.
ती बाई खरोखर नाझी निघते.
इंडीयाना बापाला विचारतो,"तुला कसे कळले"?
बाप म्हणतो, "अरे ती झोपेत बोलते"
छोटे मियां तो छोटे मियां बडे मियां सुभानल्ला -चिरंजिव.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

27 Oct 2009 - 1:04 pm | पर्नल नेने मराठे

:D सुरेख ...
चुचु

sneharani's picture

27 Oct 2009 - 1:09 pm | sneharani

वडिल आणि चिंरजीवातील प्रेम वाढते ते बहुतेक अश्याच हलक्या फुलक्या प्रेमळ प्रसंगानी...
छान
:)

सहज's picture

27 Oct 2009 - 1:36 pm | सहज

>naughty होउन आनंदी राहाणे चांगले की knotty राहुन जिंदगी बरबाद करणे चांगले हे तुच ठरव.

वाह वाह! टाळीचे वाक्य!!!

हॅ हॅ हॅ शॉन कॉनेरी बापच, प्रभुसर देखील बापमाणूस!!!

परिकथेतील राजकुमार's picture

27 Oct 2009 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार

गुर्जी मस्त लेखन हो.

अवांतर :- गुर्जीला माहित असलेली झोपेत बोलणार्‍या लोकांची संख्या किती ??

©º°¨¨°º© परायक प्रभु ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

27 Oct 2009 - 1:50 pm | टारझन

सहमत !

©º°¨¨°º© टारायक महप्रभु ©º°¨¨°º©

प्रभो's picture

27 Oct 2009 - 2:59 pm | प्रभो

सहमत !

©º°¨¨°º© नालायक प्रभो©º°¨¨°º©
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विनायक प्रभू's picture

27 Oct 2009 - 6:31 pm | विनायक प्रभू

व्य्.प्र.

विसुनाना's picture

27 Oct 2009 - 1:43 pm | विसुनाना

ज्युनियरला तुमच्या चपला पायात व्यवस्थित बसू लागल्या तर...

अवलिया's picture

27 Oct 2009 - 1:46 pm | अवलिया

हेच बोलतो.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

27 Oct 2009 - 5:14 pm | दशानन

असेच म्हणतो.

लै भारी प्रभु सेठ.

विसोबा खेचर's picture

27 Oct 2009 - 1:46 pm | विसोबा खेचर

आणि तुला एक सांगु आनंदाबद्दल. naughty होउन आनंदी राहाणे चांगले की knotty राहुन जिंदगी बरबाद करणे चांगले हे तुच ठरव.
चिरंजिव हसले.

क्या बात है! :)

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Oct 2009 - 2:19 pm | llपुण्याचे पेशवेll

वाहवा मास्तर आपले क्रिप्टीक तर क्या केहेने. जिथे सारी क्रिप्टीक संपतात तिथून परबूभाय चालू होतात. जियो.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

मुक्तसुनीत's picture

27 Oct 2009 - 7:24 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो ! :-)

नंदन's picture

28 Oct 2009 - 2:55 pm | नंदन
स्वाती२'s picture

27 Oct 2009 - 5:17 pm | स्वाती२

आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Oct 2009 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदाचे क्षण स्मरणात असतात पण लिहूनही ठेवायला पाहिजे.
कधी तरी अस्वस्थक्षणी वह्याची पानं उघडायची, पुन्हा आनंद देणार्‍या क्षणाचा आस्वाद गालातल्या गालात हसत घ्यायचा....!

-दिलीप बिरुटे

छोटा डॉन's picture

27 Oct 2009 - 10:59 pm | छोटा डॉन

>>आनंदाचे क्षण स्मरणात असतात पण लिहूनही ठेवायला पाहिजे.
???
लिहुन ठेवायचे ?
अहो जिवनातल्या कसल्याही प्रसंगात ज्यांचे विस्मरण होणार नाही ते आनंदाचे क्षण, मग ते विसरु नये म्हणुन लिहुन ठेवताल तर आनंदाचे क्षण कसले.
अर्थात आपण स्मरणात असतात हे लिहले आहे हे मान्य पण लिहुन ठेवायचे हे वाचुन अंमळ गंमत वाटली ...

बाकी परभुभाईचा लेख उत्तम , नेहमीसारखाच...

आमची आनंदाच्या क्षणाची व्याख्या :
" जिवनातले असे काही क्षण की ज्यांची आठवण कुठेही म्हणजे अगदी कुठेही; मग ते हापीसातल्या गंभीर डिस्कशनमध्ये, बसमध्ये, रस्त्यावर, रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली अगदी कुठे कुठेही आली ही स्वतःशीच खुदकन हसता आले पाहिजे, हे आनंदाचे क्षण.
मग त्यावर आश्चर्यचकिच होऊन पाहणार्‍या आसपासच्या नादान आणि अजाण जन्तेकडे पाहुन बेफिकीर हसणे हा ही आनंदाच क्षण की ... "

आठवा बरं तुम्हाला असे अस्थायी खुदकन हसु कधी फुटले आहे, तुम्हाला नक्कीच तुमचा आनंदाचा क्षण त्यावेळी आठवला असेल.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Oct 2009 - 11:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>स्मरणात असतात हे लिहले आहे हे मान्य पण लिहुन ठेवायचे हे वाचुन अंमळ गंमत वाटली ...

चालायचेच, पसंद अपनी खयाल अपना अपना. स्मरणात असतात ते क्षण आनंद देतातच. पण, काही प्रसंग ज्या नोंदी आपण केल्या आहेत आणि त्या वाचतांना ती वह्यांची पाने खूप आनंद देतात असे माझे वयक्तीक मत आहे.

-दिलीप बिरुटे
(कधीमधी वह्यांची पाने उचकून गालातल्या गालात हसणारा)

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Oct 2009 - 11:35 pm | अक्षय पुर्णपात्रे

डॉ बिरूटे सांभाळून.

पण, काही प्रसंग ज्या नोंदी आपण केल्या आहेत आणि त्या वाचतांना ती वह्यांची पाने खूप आनंद देतात असे माझे वयक्तीक मत आहे.

वयक्तिक नाही वैयक्तिक. विटावाल्यांचे पुनरागमन झाले आहे.

निमीत्त मात्र's picture

27 Oct 2009 - 11:41 pm | निमीत्त मात्र

रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली अगदी कुठे कुठेही आली ही स्वतःशीच खुदकन हसता आले पाहिजे, हे आनंदाचे क्षण.
मग त्यावर आश्चर्यचकिच होऊन पाहणार्‍या आसपासच्या नादान आणि अजाण जन्तेकडे पाहुन बेफिकीर हसणे हा ही आनंदाच क्षण की ... "

रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली पाहणारी नादान आणि अजाण जनता?

[(

छोटा डॉन's picture

27 Oct 2009 - 11:45 pm | छोटा डॉन

>>रात्री झोपताना अंधार्‍या बेडवर , आंघोळीच्या शॉवरखाली पाहणारी नादान आणि अजाण जनता?

:)
असो, काही गोष्टी ह्या केवळ शब्दात पकडायच्या नसतात एवढेच सांगतो, भावना समजुन घ्या, न घेतल्यासही काही हरकत नाही.
बाकी ह्या निमीत्ताने उगाच काथ्याकुट करण्याची आमची अजिबातच इच्छा नाही हे मात्र जरुर नमुद करतो ;)

------
( स्पष्टिकरण मात्र ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

लवंगी's picture

27 Oct 2009 - 7:38 pm | लवंगी

:)

धमाल मुलगा's picture

27 Oct 2009 - 7:46 pm | धमाल मुलगा

च्यायला, बोले तो बाप्पू ऐसा होना मंगताय :) बाप्पू हय के दोस्त मालुम नै पडना मंगताय :)

आमच्याकडं कोणे एके काळी माझ्या खोलीच्या दारावर मी नाझी स्वस्तिक लावलं होतं आणि तिर्थरुपांना 'Herr Dad' असं लिहिलेलं होतं ;) त्या काळाची आठवण आली! :|

चतुरंग's picture

27 Oct 2009 - 8:29 pm | चतुरंग

मस्तच हो परबूभाय!
तुमचा लेक आणि तुम्ही दोघेही भाग्यवान आणि असे बापलेक असतील तर ती माउलीसुद्धा भाग्यवानच! :)

मिसळभोक्ता's picture

27 Oct 2009 - 9:57 pm | मिसळभोक्ता

अच्छा लिखेला है !

बाकी नुकतेच पौगंडावस्था प्राप्त झालेले चिरंजीव, आणि गेली अनेक वर्षे पौगंडावस्थेत असलेले मास्तर ! इंपीडन्स म्याच होणारच ! कसे ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चतुरंग's picture

27 Oct 2009 - 9:59 pm | चतुरंग

जबर्‍या!! ;)

(इंडक्टन्स)चतुरंग

संजय अभ्यंकर's picture

27 Oct 2009 - 10:22 pm | संजय अभ्यंकर

=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मनिष's picture

27 Oct 2009 - 10:49 pm | मनिष

सहमत!

(रेसोनेटींग) मनिष =))

निमीत्त मात्र's picture

27 Oct 2009 - 11:29 pm | निमीत्त मात्र

हे विरजण झक्कास...

वेताळ's picture

27 Oct 2009 - 11:33 pm | वेताळ

मस्त लेखन मास्तर्......मास्तरार्नी काहीही लिहले तरी आपल्याला जाम आवडते.एकदम मनाला जावुन भिडते.मास्तर तुमच्या चिरंजीवाचा हेवा वाटतो......अजुन येवु दे लिखाण .
वेताळ

विशाल कुलकर्णी's picture

28 Oct 2009 - 5:11 pm | विशाल कुलकर्णी

परबुभाय, मस्तच !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"