मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंदी आनंद गडे

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बाबा, तुझे आनंदाचे सर्वोकृष्ट क्षण कुठले? चिरंजिवानी विचारले. हा प्रश्न कट्टा झाल्यावर त्याने विचारला होता म्हणुन लगेच उत्तर दिले नाही. कधी पटात घुसेल त्याचा नेम नाही. कट्ट्याला तात्या,सर्वसाक्षी,जोशीबुवा आणि रामदास होते. खाना खजाना साठी सौ .दिमतीला होती. कट्टा होत असताना चिरंजिव कट्ट्याला पाठ करुन गुगलत बसले होते. तु सांग बघु? मी प्रतिप्रश्न केला. तेवढाच विचार करायला वेळ. तुम्ही सर्वजण सगळेजण बागडत होतात बाबा. अगदी कॉलेज कुमारांसारखे. मला मजा आली. तुम्ही तर सर्व नॉटी मोड मधे होता.. त्यात साक्षी काका पण सामील हे बघुन धमाल आली.चिरंजिव म्हणाले. (कट्ट्याचे क्रिप्टीक बरोबर पोचले होते.) अरे आमच्या आनंदात तुला आनंद झाला हा एक आनंदाचा सर्वोत्कृष्ट क्षणच की.-मी इतर काही सांग ना. -चिरंजिव कुठल्या पिरीयडचे? माँटेसरी चे पण आहेत्.(तरुणपणातले कसे काय सांगायचे बॉ? पार्टीबदल झाला तर?)- मी लग्नानंतरचे सांग. क्रमवार टॉप टेन सांग. तशी वर्गवारी करता येणार नाही. पण तरी सुद्दा बघतो. १. आईला बघायला गेलो होतो. २. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी. (इथे चिरंजिव- हीहीही) ३. तुझ्या आगमनाची चाहुल लागली तेंव्हा. टेस्ट पॉझिटीव?- चिरंजिव नाही रे बाबा. आईच्या आधी मला कळले. - मी ते कसे काय बॉ?-चिरंजिव त्याचे असे झाले. मोठ्या काकाचे आदल्या दिवशी 'ट्रॅफिक जॅम' झाले होते. टॉयलेट चा दरवाजा उघडल्यावर त्याची वर्दी स्वयंपाकघरापर्यंत पोचली. नाश्त्याला बसलेल्या आईने एक उचकी दिली. तेवढा सिग्नल मला पुरेसा होता. ४. तु जेंव्हा पहीला शब्द बोललास तेंव्हा.. शब्द काय पुर्ण वाक्यच बोललास . ५.१० वी ची गरुड झेप घेतलीस तेंव्हा. ६. तुला यु.डी.सी.टी त अ‍ॅडमिशन मिळाली तेंव्हा माटुंगा स्टेशन वर ११.३० वाजता. ७. तुझ्या हातात गाडी देताना. ८. ग्रॅज्युएशन झाल्यावर एन्वायरमेंट साठी काहीतरी करणार हे तु सांगितल्यावर ९.माझी 'मास्तरकी' तु पण थोडी बहुत तु करणार हे तु म्हटलेस असे आई म्हणाली तेंव्हा. १०.परवा 'इंडीयाना जोन्स' बघताना एका जोकला आपण टाळी देउन खदाखदा हसलो तेंव्हा. ११. कट्ट्यानंतर तात्याच्या गाण्याला तु दिलखुलास दाद दिलीस तेंव्हा. १२.तुझ्याकडे अशा प्रकारच्या गप्पा मारताना तर नेहेमीच. आणि तुला एक सांगु आनंदाबद्दल. naughty होउन आनंदी राहाणे चांगले की knotty राहुन जिंदगी बरबाद करणे चांगले हे तुच ठरव. चिरंजिव हसले. जाता जाता: इंडीयाना जोन्स चा बाप त्याला म्हणतो " तु त्या बाई वर विश्वास ठेउ नकोस. ती नाझी आहे" आदल्या दिवशी इंडीयाना जोन्सची तिच्याबरोबर मॅच झालेली असते. ती बाई खरोखर नाझी निघते. इंडीयाना बापाला विचारतो,"तुला कसे कळले"? बाप म्हणतो, "अरे ती झोपेत बोलते" छोटे मियां तो छोटे मियां बडे मियां सुभानल्ला -चिरंजिव.

वाचन 4904 प्रतिक्रिया 31