'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
20 Oct 2009 - 5:20 am

आंतरजालावर दिवाळी फराळ चालू असताना ही खमंग भाजणी हाती लागली लगोलग थालीपीठ लावून टाकले! ;)

'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो
आडून गॉगलाच्या थोडा लवेन म्हणतो

मुद्दा वयाबियाचा मी काढणार नाही
जी जी दिसेल ती ती आता टिपेन म्हणतो

क्रेडीट आज सारे संपून गोचि होई
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो

दिसता सुबक जराशी वळते लगेच मुंडी
आता नवीन मापे गोळा करेन म्हणतो

डोळेच वाट चुकती, ना दोष पावलांचा
बारात चांदणीच्या थोडा बसेन म्हणतो

ती आमिषे मुलींची असती कमाल खोटी
"मामा" बनून भाचे मी खेळवेन म्हणतो!!

अपुल्याच इज्जतीचा "रंग्या" लिलाव आहे
घरचा अहेर कसला मिळतो बघेन म्हणतो!

चतुरंग

हास्यकवितागझलविडंबन

प्रतिक्रिया

शेखर's picture

20 Oct 2009 - 6:31 am | शेखर

अप्रतिम.... राहिलेले फटाके एकदमच फोडले ....

>> घरचा अहेर कसला मिळतो बघेन म्हणतो!
तो मिळाल्यावर नक्की सांगा / दाखवा .... :) (काकु माहेरी भारतात गेल्या वाटतं)

शेखर...

टारझन's picture

20 Oct 2009 - 4:43 pm | टारझन

आगायायाया !! बेक्कार सुटेश चुतुरंग ...
=)) =)) =)) =))
विडंबण लै भारी .. पण खालची एक प्रतिक्रिया त्याहून भारी =))

प्रभो's picture

20 Oct 2009 - 4:55 pm | प्रभो

मस्त
--प्रभो

दशानन's picture

20 Oct 2009 - 6:23 pm | दशानन

सुसाट सुटले आहेत.... ;)

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

गणपा's picture

21 Oct 2009 - 2:49 pm | गणपा

जबरा रंगाशेठ.
हहपुवा.

रेवती's picture

20 Oct 2009 - 6:50 pm | रेवती

असली विडंबनं टाकत जाऊ नका असं सत्रांदा सांगितलं होतं!:(

(काकु माहेरी भारतात गेल्या वाटतं)

आहे, इथेच आहे!
हे विडंबन वाचल्यावर आता कुठेही जाण्याची शक्यता नाही.

रेवती

दशानन's picture

20 Oct 2009 - 6:54 pm | दशानन

>>>असली विडंबनं टाकत जाऊ नका असं सत्रांदा सांगितलं होतं!

=))

=))

=))

घरचा आहेर मिळणे म्हणजे हेच का :?

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

श्रावण मोडक's picture

20 Oct 2009 - 7:00 pm | श्रावण मोडक

हाहाहाहाहा...

चित्रा's picture

21 Oct 2009 - 4:37 am | चित्रा

हे विडंबन वाचल्यावर आता कुठेही जाण्याची शक्यता नाही.

:)

विडंबन छान!

सहज's picture

21 Oct 2009 - 7:28 am | सहज

>हे विडंबन वाचल्यावर आता कुठेही जाण्याची शक्यता नाही.

अहो तोच तर रंगारावांचा खरा हेतु होता. हो किनई रंगाकाका? :-)

मिशन अक्मप्लिश्ड

अमृतांजन's picture

20 Oct 2009 - 7:41 am | अमृतांजन

क्रेडीट आज सारे संपून गोचि होई
आहेत कनवटीला ते वापरेन म्हणतो

दिसता सुबक जराशी वळते लगेच मुंडी
आता नवीन मापे गोळा करेन म्हणतो

व्वा! मझा आला!!!

बेसनलाडू's picture

20 Oct 2009 - 8:57 am | बेसनलाडू

ज ह ब ह र्‍या हा
(लोटपोट)बेसनलाडू

सुबक ठेंगणी's picture

20 Oct 2009 - 10:50 am | सुबक ठेंगणी

आतापर्यंत वाचलेल्या इडंबनांमधले अत्युच्च !!!
=))

स्वाती२'s picture

20 Oct 2009 - 6:29 pm | स्वाती२

+२

श्रावण मोडक's picture

20 Oct 2009 - 10:44 am | श्रावण मोडक

जबरा!!

अवलिया's picture

20 Oct 2009 - 10:47 am | अवलिया

जबरा !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Oct 2009 - 11:15 am | llपुण्याचे पेशवेll

जबर्‍या.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

सहज's picture

20 Oct 2009 - 12:36 pm | सहज

जबर्‍या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2009 - 4:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जबर्‍या.

अनिल हटेला's picture

20 Oct 2009 - 4:59 pm | अनिल हटेला

ज ह ब र्‍या!!
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

टुकुल's picture

21 Oct 2009 - 8:33 am | टुकुल

___/\___

--टुकुल

लवंगी's picture

22 Oct 2009 - 4:06 am | लवंगी

___/\___

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Oct 2009 - 10:48 am | ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ

>>"मामा" बनून भाचे मी खेळवेन म्हणतो!!

=))

चतुरंग-जी,
हा पाचवा रंग आजच पाहिला. अगदी मनोहर आहे! सुंदर कविता. विडंबन वाटतच नाहीं. 'वृत्ता'तही एकदम फिट्ट! माझ्याकडून खास पुष्पगुच्छ आपल्याला.
<<"मामा" बनून भाचे मी खेळवेन म्हणतो!!>> takes the cake! (हे मराठीत कसं म्हणायचं? विकल्प जरूर सुचवा!)
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

नंदन's picture

20 Oct 2009 - 11:20 am | नंदन

झक्कास विडंबन!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

20 Oct 2009 - 11:23 am | मदनबाण

सॉलिट्ट्ट्ट... :D
ही खमंग भाजणी हाती लागली लगोलग थालीपीठ लावून टाकले!
खी.खी.खी.... भाजणी आणि त्याचे थालीपीठ दोन्ही मस्तच... :)

दिसता सुबक जराशी वळते लगेच मुंडी
आता नवीन मापे गोळा करेन म्हणतो

व्वा... ;)
डोळेच वाट चुकती, ना दोष पावलांचा
बारात चांदणीच्या थोडा बसेन म्हणतो
लयं भारी !!!

(कडबोळी प्रेमी) ;)
मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

विनायक प्रभू's picture

20 Oct 2009 - 11:51 am | विनायक प्रभू

विडंबन.
मम्मा,
मामाच्या गावाला जाउया.

प्रमोद देव's picture

20 Oct 2009 - 11:51 am | प्रमोद देव

क्या बात है,रंगाशेठ!

सुनील's picture

20 Oct 2009 - 12:36 pm | सुनील

खमंग विडंबन!

सुनील काका

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

केशवसुमार's picture

20 Oct 2009 - 6:19 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
थालिपीठ एकदम खमंग झाले आहे..
बाकी घरचा आहेर अत्तापर्यंत मिळाला असेलच..
केसुकाका B)

संदीप चित्रे's picture

20 Oct 2009 - 7:14 pm | संदीप चित्रे

>> मुद्दा वयाबियाचा मी काढणार नाही
जी जी दिसेल ती ती आता टिपेन म्हणतो

तुला 'घरचा आहेर' जोरदार मिळाला असेल ह्याबद्दल वादच नाही :)

मिसळभोक्ता's picture

20 Oct 2009 - 10:00 pm | मिसळभोक्ता

१०/१० !!

लगे रहो !

(रंगा के साथ बातां: हे भाचे खेळवण्याचे आमचे टेक्निक कुठून कळले रे तुला ?)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चतुरंग's picture

20 Oct 2009 - 10:30 pm | चतुरंग

"काकांचा" कधीना कधी "मामा" झालेलाच असतो ना? त्यामुळे आपण सारे एकाच नावेचे प्रवासी! ;)

(काका-मामा)चतुरंग

पार्टनर's picture

20 Oct 2009 - 10:26 pm | पार्टनर

मस्तच ..!

परत परत वाचली !!

- पार्टनर

चतुरंग's picture

20 Oct 2009 - 10:27 pm | चतुरंग

आणि बाहेरचा अहेर देणार्‍या सर्व वाचकांचे आभार! ;)

(घरचा अहेर मिळाल्यावर बराचवेळ सुन्न होतो त्यामुळे आभाराचा प्रतिसाद हा फिकट रंगात आणि खूप वेळाने देतोय! :SS )

(फिकुटलेला)चतुरंग

Nile's picture

21 Oct 2009 - 4:41 am | Nile

हा हा हा! सुरेख विडंबन काका! ;)

(घरचा अहेर मिळाल्यावर बराचवेळ सुन्न होतो त्यामुळे आभाराचा प्रतिसाद हा फिकट रंगात आणि खूप वेळाने देतोय!

पुढल्या वेळेला थालपीठात थोडी घरची भाजणी पण घालावी लागणारे असे दिसते. ;)

काकुंना सप्रेम नमस्कार कळवा! :)

छप्पर उडून गेले, गंमत बघेन म्हणते
झडून पंख गेले, उडतो कसा पहाते!

मुद्दा वयाबियाचा मी काढणार नाही
मीही दिसेल 'तो तो' आता पुन्हा पहाते

क्रेडीट तुझे सगळे डेबिट आज होई
माझेच एकटीचे मी जोखुनी पहाते

ही नजर तुझी गळते कचर्‍याची जणू कुंडी
आता करून गोळा मी पेटवीन म्हणते

डोळ्यांस दोष दे तू, तारे पुढे चमकती,
पदरात तोंड झाकून थोडी हसेन म्हणते

ती आमिषे तुझी मेल्या तद्दन सर्व खोटी
"मामा" करून तुजला मी खेळवेन म्हणते!!

माहेरी कसली जाते, तुज सोडूनी एकट्याला
माहेर इथे आणते, बघ मजा मग तू म्हणते

अपुल्याच इज्जतीचा करतो लिलाव कसला
घरचा अहेर सोडा, तू उपवास काढ म्हणते!

Nile's picture

21 Oct 2009 - 7:55 am | Nile

हा हा हा! ब्येस! =)) =))

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Oct 2009 - 8:02 am | बिपिन कार्यकर्ते

रंगाशेठनी केलेले विडंबन आणि बहुगुणीशेठने केलेले विडंबन^२ ... दोन्ही मस्त !!! मजा आली वाचायला.

बिपिन कार्यकर्ते

सहज's picture

21 Oct 2009 - 8:16 am | सहज

बहुगुणीशेठने केलेले विडंबन जबरदस्त!!

ऋषिकेश's picture

21 Oct 2009 - 10:24 am | ऋषिकेश

सवाल जवाब लै भारी

-ऋषिकेश

मदनबाण's picture

21 Oct 2009 - 12:34 pm | मदनबाण

बहुगुणीशेठने केलेले विडंबन जबरदस्त !!!
असेच म्हणतो...

अवांतर :--- शेठ बर्‍याच दिवसांनी दिसले. :)

मदनबाण.....

रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

श्रावण मोडक's picture

21 Oct 2009 - 12:39 pm | श्रावण मोडक

+३

चतुरंग's picture

21 Oct 2009 - 3:55 pm | चतुरंग

छान आहे. आवडला! :)
(अहेर थोडा वृत्तात वगैरे व्यवस्थित पॅक करुन दिला असता तर आणखीन आनंद झाला असता! ;) )

चतुरंग

जेपी's picture

3 May 2015 - 6:34 pm | जेपी

अच्छा हे पण आहे का =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 May 2015 - 6:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ चतुरंग आणि बहुगुणी : लय भारी !

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2015 - 9:02 pm | अत्रुप्त आत्मा

@ती आमिषे मुलींची असती कमाल खोटी
"मामा" बनून भाचे मी खेळवेन म्हणतो!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif अट्यंट मार् मिक! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

रेवती's picture

3 May 2015 - 9:11 pm | रेवती

ओ जेपी, का असं करताय?