दिल्लीची रखुमाई......सोनिया.....माझी माऊली.....

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
19 Oct 2009 - 12:17 am

कच्चा माल

एक स्पष्टीकरण....
प्रथम माझ्या मिपाच्या वाचकांना, लेखकांना, प्रशासकांना, (आणि अवांतर मिपाकरांना) दिवाळीच्या शुभेच्छा!
आणि काकांच्या लाडक्या तात्याला तर खास दिवाळीनिमित्त गोड गोड पापा!!!!
:)
आम्ही हे लिहित आहो हे याचं कारण आमचा सटकलेला मेंदू आणि दिवाळीच्या सुट्टी यामुळे हाताशी असलेला वेळ....

सोनिया विषयी आम्हाला खास पुळका आहे अशातला भाग नाही. आम्ही कॉन्ग्रेस किंवा भाजप पार्टीचे नाही, किंबहुना अंमळ भांडवलशाहीच आहोत!!!!
उद्या सोनियाचं आमच्या दृष्टीने चुकलं तर तसंच लिहिणार. कुणाच्याही अंगातले चांगले गुण आम्हाला भावले तर सहाजिक आम्ही आमचं उघडं करतो (मन हो, मन!!!). ह्यात कुणीही परसात नळ नेऊ नये हे बरं....

खरं तर हे मिपावर लिहिण्याची काही आवश्यकता नव्हती पण काही वाचकांच्या (आणि काही प्रशासकांच्या!!) अतिचौकस स्वभावाची कल्पना असल्याने लिहायची गरज पडली.....
आता वय झालं म्हणून आम्ही सर्किट (ईश्वर त्या आयडीला सद्गती देवो!!! पण इथे तो शब्द विशेषनाम नसून विशेषण म्हणून वापरला आहे!!) झालो. वय झाल्यानंतर सर्किटपणा कुणालाही चुकत नाही. अणि किती सर्किट असावं हे काही कुणाच्या हातात नाही......
तेंव्हा कृपा करून लेख वाचून चिंतन करावं हीच वाचकाना विनंती आहे......
:)

शरू पहिलवानाला काळजी लागली होती की मी पंतप्रधान कसा होईन? त्याच्या पार्टीत जवळ जवळ कुणीच त्याला सिरियसली घेत नव्हतं!!! सगळे आपले राव आणि केसरींच्या मागे धावत होते....
शरूजवळ खर्च करायला शुगर लॉबीचा पैसा बख्खळ होता पण त्याच्याकडे किर्तीचं आणि देखणेपणाचं वलय नव्हतं. शेवटी केसरीला लाथांचा आहेर मिळाल्यानंतर शरू पहिलवानाच्या आशा पल्लवित झल्या.....

पण तितक्यात दुधात मिठाचा खडा पडला......

एकाएकी एक दिवशी सोनियानं, माझ्या माऊलीनं, पार्टीचं नेतेपद स्वीकारायला मान्यता दिली. ही देवता आणि तिच्या सर्व कुटूंबियांनी पार्टीवर चांगलीच भुरळ टाकली होती. जिथे शरूच्या सभेला जेमतेम चारपाचशे लोक (तेही, साखरकारखान्याचे खातेदार!!!) जमायचे तिथे तिच्या सभेला आता चाळीस-पन्नास हजार लोक ट्र्कमधून जमायला लागले.

शर्‍याची अशी जळजळ झाली की यंव रे यंव!!!! कितीही ईनो खाल्लं तरी पुरे पडेना!!!!
मग त्याने आपल्या बगलबच्च्यांना म्हणजेच पत्रकारांना हाताशी धरून सोनियावर राळ उडवण्याचा प्रयत्न केला. तिच्या भाषणावर, तिच्या दिसण्यावर आणि मुख्य म्हणजे तिच्या असण्यावर भयंकर असभ्य हल्ला चढवला...

तिला देशाची भाषाच येत नाही! ती रोमन लिपीत हिंदी भाषणं दुसर्‍या लोकांकडून लिहून घेते. ती भाडोत्री भाषणंही तिला सभेत नीट वाचूनही दाखवता येत नाहीत, सत्रांदा अडखळते वगैरे वगैरे!!! जसा काही स्वतः शरू भाषणं करण्याच्या बाबतीत अटलबिहारीच होता. शरूला तर स्वतःच्या मातृभाषेतूनही व्यवस्थित भाषण करता येत नसे! आणि पहिलवानी शरीराचा हा माणूस पैशाच्या जोरावर क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होऊन बसला होता!!!!

हे सर्व सांगण्याचं कारण असं की सुरवातीला शरूच्या टीकेला माना डोलावणारी लोकं हळू हळू ओसरू लागली. मग शरूने तिच्या जन्मस्थळाचा मुद्दा उकरून काढला....
ही परक्या देशात जन्मलेली, हिला इथली भाषाही येत नाही. लग्न होऊन या देशात आली काय, सरळ आमच्यावर राज्य करायला बघते. आम्हाला ही पुन्हा गुलाम करून ठेवणार, असा तो विखारी प्रचार करायचा. माऊली त्याच्याकडे लक्षच देत नव्हती. ती या टीकेला मुळीच उत्तर देत नसे. शरूच्या अंगात निवडणूकीचं वारं भरलं होतं. आपणच पंतप्रधान म्हणून निवडून येणार याची त्याला खात्री वाटत होती. पण तो तसं कधीच बोलून दाखवत नव्हता. प्रथमच मराठी पंतप्रधान निवडून येणं तितकं सोपं नव्हतं.

आणि हो, इथे मराठी माणासाला मराठी असंच म्हणतात. "निवासी, अनिवासी, निर्वासित"असली आंतरजालीय विशेषणं लावत नाहीत. उलट देशप्रेमी किंवा देशद्रोही असं सरळ सरळ संबोधलं जातं!!!!

शालेय शिक्षण आटोपून माझी माऊली, सोनिया, आपला विठ्ठली देश सोडून कॉलेजच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. यातून तिची उच्च शिक्षणाविषयीची आस्थाच दिसून येते. मूळची गरीब असल्याने तिथे ती चरिथार्थ चालवण्यासाठी हॉटेलांमध्ये टेबलांवर फडका मारायची कामे करायची. यावरून ती कोणतेही काम हलके मानत नसे हेच नजरेला पडतं. इंग्लंडला कॉलेजचं शिक्षण घेत असतांना तिची एका भारतीय राजबिंड्या मुलाशी गट्टी जमली आणि तिने त्याच्यावरही फडका मारला. आता तो राजबिंडा मुलगा हा भारताच्या पंतप्रधानांचा मुलगा होता हा केवळ योगायोग!!! विठ्ठ्लीमध्ये आजीआजोबाकडे लाडात वाढल्यानंतर इंग्लंडमधल्या हलाखीच्या जीवनाचाही अनुभव घेऊन ती आपलं जीवन परिपक्व करीत होती....

तितक्यात एके दिवशी त्या राजबिंड्या मुलाने तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. तिला दूर पूर्वेकडल्या देशातली उच्च भारतीय संस्कृती खुणावू लागली. भगवद्गीगीता आणि एकूणच हिदू-बुद्ध धर्माबद्दल तिला विलक्षण आकर्षण होतं. तिने लग्नाला होकार दिला. पण तिच्या सासूची खूप कडक शिस्त असायची. म्हणून सासूला प्रसन्न करण्यासाठी ती फर्रऽऽकन झगा काढून टाकून झर्रऽऽकन साडी नेसायला शिकली. तिचं चापूनचोपून साडी नेसणं इतकं परफेक्ट होतं की खुद्द अनेक मूळच्या भारतात जन्मलेल्या स्त्रियांनाही ते जमत नाही. खोटं वाटत असेल तर तिचा आणि तिच्या जावेच फोटो शेजारीशेजारी ठेऊन बघा....

तिची सासू भारतातल्या गरीब लोकांच्या हाल-अपेष्टा पाहून खूप दुख्खी व्हायची, आणि रडायची देखील! आणि ते बघून सोनियाही खूप खूप दुःखी व्हायची.....
हिंदू,बुद्ध धर्माबद्दल तिने खूप पुस्तकं जमवली होती. ती अजून तिच्या लायब्ररीत आहेत. भगवत गीतेतले काही श्लोक तिने पंडित कामाला लावून कडून त्यांच्याकडून म्हणवून घेतले होते. महात्मा गांधीबद्दल (आणि एकूणच गांधी या शब्दाबद्दल) तिला खूप आदर आहे. कुराणा मधून पण तिला खूप गोष्टी ऐकून कळल्या आहेत.

ह्या नंतरची माहिती दुसर्‍या भागात.....
आणि तो भाग लिहिण्याचं आवाहन आम्ही श्री. मिसळभोक्त्यांना करीत आहोत!!!!:)

माऊलीचा चरणरज,
पिवळा डांबिस
:)

संस्कृतीविनोदविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

19 Oct 2009 - 12:31 am | श्रावण मोडक

जागरण सार्थकी लागलं...
मिभो, सुपारी घेताय ना?

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Oct 2009 - 12:42 am | बिपिन कार्यकर्ते

काय पीडा आहे हो... आय मीन ही सोनिया हो... एवढा छान आमचा शरू पैलवान. घेतला बरोबर घोळात त्याला... फार वाईट्ट बाई ती आणि आमचे पिडांकाका चक्क तीचे चरणराज... अरेरे... देवा (हाही शब्द सर्वनाम म्हणून आलेला आहे, आयडी म्हणून नव्हे.) परमेश्वरा अजून काय काय बघावं लागणारे रे, तुलाच माहित.

आणि हो, मिभोकाका सुपारी घेतीलच बहुधा. रूमाल टाकून पुढची सीट रिझर्व्ह करतोय आत्ताच.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

19 Oct 2009 - 12:43 am | विसोबा खेचर

आणि काकांच्या लाडक्या तात्याला तर खास दिवाळीनिमित्त गोड गोड पापा!!!!

थँक्यू! :)

सोनिया-कथा आवडली! :)

(सोनियाच्या जावेचा चाहता) तात्या.

श्रावण मोडक's picture

19 Oct 2009 - 12:48 am | श्रावण मोडक

(सोनियाच्या जावेचा चाहता) तात्या.
ऐवजी - (सोनियाच्या जावेचा चाहता) विश्वामित्र. - असे हवे होते का? ;)

Nile's picture

19 Oct 2009 - 12:57 am | Nile

(सोनियाच्या जावेचा चाहता) तात्या.

ती People for ethnic treatment of 'animals' वाली जाउ होय! बरं बरं! ;)

शैलेन्द्र's picture

20 Oct 2009 - 9:18 am | शैलेन्द्र

म्हणजे मासे आणि कोंबड्या बंद...

उमराणी सरकार's picture

19 Oct 2009 - 1:24 am | उमराणी सरकार

उमराणी सरकार
हा शरू पैलवान म्हणायचा,
"शिवसेना-भाजप च्या नेत्यांना शेतीतले काय कळते? आम्ही हाडाचे शेतकरी आहोत. शेतकर्‍यांचे हीत आम्हीच साधणार."
या वक्तव्यावर भुलून बाईंनी सलग २ र्‍यांदा शेती़खाते सांभाळायला दिले, तर याने काय वाट लावून ठेवलीये बघा. साखर, गहू, डाळी यांचे भाव ज्या पद्धतीने भडकले आहेत ते बघता असे वाटते की साठेबाज आणि धनदांडग्या ऊस उत्पाद्क शेतकर्‍यांच्या हीताचे राजकारण हा शरू करतो आहे.
असो. २२ ता. ला कुणाची जागा कुठे हे कळेलच.

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

टारझन's picture

19 Oct 2009 - 2:39 am | टारझन

विठ्ठली =)) =)) =)) =))
डांबिसकाका ...... झिंदाबाद =))
बेक्कार ...

-- टी.

नंदन's picture

19 Oct 2009 - 2:40 am | नंदन

क्या बात है! अभ्यंगस्नान, फराळ, देवदर्शन इ. नेमेप्रमाणे दिवाळीचे कार्यक्रम झाले होते; मात्र फटाक्यांची उणीव होती. ती या आतषबाजीने भरून निघाली :)

आणि हो, इथे मराठी माणासाला मराठी असंच म्हणतात. "निवासी, अनिवासी, निर्वासित"असली आंतरजालीय विशेषणं लावत नाहीत. उलट देशप्रेमी किंवा देशद्रोही असं सरळ सरळ संबोधलं जातं!!!!

- जियो! ही आंतरजालीय विशेषणं जिथे संपतात तिथे पिडांकाका सुरू होतात (आणि एकदा सुरू झाले की कोणालाही ऐकत नाहीत ;))

काकांनी पूजा सांगितली आहेच, आता उत्तरपूजा सांगण्याचे काम उत्तर कॅलिफोर्नियातले काका कधी करताहेत, त्याची वाट पाहतो आहे :D

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बेसनलाडू's picture

19 Oct 2009 - 9:40 am | बेसनलाडू

वरील प्रतिसादाशी पूर्ण सहमत!
पिडाकाकांनी घातलेल्या जेवणावर वरील प्रतिसाद म्हणजे स्वीट डिश आहे.
(आस्वादक)बेसनलाडू

प्रशान्त पुरकर's picture

19 Oct 2009 - 5:15 am | प्रशान्त पुरकर

:))

shweta's picture

19 Oct 2009 - 5:42 am | shweta

किती छान लिहिल आहे. परफेक्ट.
चांगली खिल्ली उडवली आहे पि डा नी.
नाहितर इथे लोकं काहिच्या काहि लिहितात. काहि ओबामा चे चमचे, काहि अजुन कोणाचे.
तोत्याचे पापे घेण्यासाठि रांग लागली आहे आणि तो मात्र पळतो आहे सुन्दरयांच्या मागे बाटली घेवुन.
:)

नाटक्या's picture

20 Oct 2009 - 4:14 am | नाटक्या

तोत्याचे पापे घेण्यासाठि रांग लागली आहे आणि तो मात्र पळतो आहे सुन्दरयांच्या मागे बाटली घेवुन.

तोत्याचे (पोपटाचे) पापे कधी पासून घ्यायला लागलात पिडांकाका तुम्ही??? :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O

आणि तात्या तुमचा पोपट केला कि हो!!!
~X( ~X( ~X( ~X( ~X(

कमाल केलीत ब्वॉ!!!

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

सहज's picture

19 Oct 2009 - 6:29 am | सहज

वय झालेले अजुन एक मिभोकाका तुमच्या अंगात देखील येउन जाउ दे!!!!

तुमच्या घागरीतून काय निघतेय बघू!

दिवाली धमाका एक पर एक बोनस!!!

अवलिया's picture

19 Oct 2009 - 9:08 am | अवलिया

हा हा हा
चालु द्या... आम्ही आपले टाळ कुटतो.. :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

निखिल देशपांडे's picture

19 Oct 2009 - 9:39 am | निखिल देशपांडे

लै भारी पिडाकाका.....
जोरात फटाके!!!!

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

दशानन's picture

19 Oct 2009 - 9:41 am | दशानन

:)

असेच म्हणतो.

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Oct 2009 - 12:14 pm | ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ.....ते डांबिससिंग तुम्हीच काय?

विनायक प्रभू's picture

19 Oct 2009 - 12:54 pm | विनायक प्रभू

वेरी गुड.
आम्ही सध्या 'टाळ' कुटण्यात गुंग आहोत.

पि. डां. काका, लई भारी करमनुक !
पन् त्ये कांग्रेजी लोक काय तिच्या रुपाला नाय भुलले! तिच्या जवल जो पैका हाय त्यो शरु पैलवानाच्या कितीतरी पटीनी हाय! अन् कांग्रेजी बगल्यांना पैक्याचा वास मैलावरुन येतोय बगा! उद्या त्या मावलीनं न जाणो, त्यो पैका देशाला अर्पन क्येलाच, तर दिसर्‍या दिशी सगले शेपट्या हलवत या पैलवानाच्या मागं येतील का नाही बगाच!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

हे पीतठका!
आपला लेख म्हणजे उपरोधिक लिखाणाचा सुंदर नमुना आहे! जीते रहो!!
गुळाला मुंगळा जसा चिटकून बसतो तसे पैशाला काँग्रेजी नेते आणि शरू पैलवान (एक्स-काँग्रेजी)! "चेंडू-फळी"च्या दुनियेमध्ये "पैकाच पैका" दिसल्यावर शरू शड्डू ठोकत गेला व चिटकला! 'हिंदकेसरी' होऊन चरतोय आता मनसोक्त!
सुधीर
------------------------
हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

तेन्नालीराम's picture

19 Oct 2009 - 3:24 pm | तेन्नालीराम

लई ब्येस!
ते.रा.

धनंजय's picture

19 Oct 2009 - 4:40 pm | धनंजय

तसा शालजोडीतला आहे.

पिवळा डांबिस
छान डांबिस
छान लेख
आवडला सुदंर
भाग दुसरा किधी लिहणार?
Go H......
संजीव

स्वाती२'s picture

19 Oct 2009 - 6:21 pm | स्वाती२

सॉलिड! =))

पर्नल नेने मराठे's picture

19 Oct 2009 - 7:28 pm | पर्नल नेने मराठे

मस्तच ;)

चुचु
(सोनियाच्या मुलीची चाहती )

संजय अभ्यंकर's picture

19 Oct 2009 - 7:46 pm | संजय अभ्यंकर

"पितठका" - सुकांच्या पोतडीतुन निघालेला नवा शब्द!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

संजय अभ्यंकर's picture

19 Oct 2009 - 7:47 pm | संजय अभ्यंकर

"पितठका" - सुकांच्या पोतडीतुन निघालेला नवा शब्द!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मिसळभोक्ता's picture

19 Oct 2009 - 9:35 pm | मिसळभोक्ता

काय लिवलंय डांबीसा ! वा !

सुपारीने हल्ली (वयोमानानुसार) आम्हाला ठसका लागतो. त्यामुळे सुपारी पास.

(बडीशेप चालेल, त्याची तयारी करतो आहोत.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

देवदत्त's picture

19 Oct 2009 - 9:53 pm | देवदत्त

:)
मध्येच दिवाळी अंकातील गोष्ट वाचत आहे असे वाटले :D

विकास's picture

20 Oct 2009 - 5:21 am | विकास

भगवत गीतेतले काही श्लोक तिने पंडित कामाला लावून कडून त्यांच्याकडून म्हणवून घेतले होते. महात्मा गांधीबद्दल (आणि एकूणच गांधी या शब्दाबद्दल) तिला खूप आदर आहे. कुराणा मधून पण तिला खूप गोष्टी ऐकून कळल्या आहेत.

म्हणजे? त्यांच्या ग्रंथालयात शंकराचार्यांची पुस्तके नाहीत? त्यांचे नक्की कोण सल्लागार कोण असावेत बरे? :? अर्थात तसे सल्लागार असले तर त्यांच्या लायब्ररीत पुलंची नक्कीच पुस्तके असणार आणि (संघाचे, त्यातही कारसेवक म्हणून) बाबूजींची नसली तरी पंडीत भिमसेनांची गाणी त्यांच्या (कॉं. आय मधील) आयपॉड वर नक्कीच असतील... :)

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Oct 2009 - 8:19 am | llपुण्याचे पेशवेll

हॅ हॅ हॅ. हाण च्या मारी. डांबिसरावांचा लेख लई भारी. आणि त्यावर वरकडी हा प्रतिसाद. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

पाषाणभेद's picture

20 Oct 2009 - 9:39 am | पाषाणभेद

पिड्डोब्बा रखूमाई, सोनीयाज खाउली सुखराम
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

प्रभो's picture

20 Oct 2009 - 5:45 pm | प्रभो

जबहरा जबहरा जबहरा

डांबीस काकांना _/\_
--प्रभो

चेतन's picture

20 Oct 2009 - 6:07 pm | चेतन

_/\_

चेतन