श्रावणसरांचं 'व्याकरण' एकदमच जबरी निघालं आणि मग त्याचं शिकरण करायची जबाबदारी जर माहिती असून घेतली नसती तर ती विडंबनपंथाशी प्रतारणा झाली असती, म्हणून मग....
तू सांगितलंस म्हणून
नात्यांचं शिकरण समजून घेताना
संबंधांचा कुस्करा शोधू लागले तेव्हा...
तेव्हा म्हणालास,
‘’सासू, नणंद, दीर आणि जावेच्या
या खेळात पडतेसच कशाला?
नातं दोघांसाठी असतं,
अन् शिकरण नातेवाईकांसाठी.
"नवर्याची जात एकच - कामचुकार हीच"
लग्न ठरवण्याची वेळ आली
तेव्हाचे हे शब्द ऐकून गपगार झाले
कारण त्या लग्नात नातं दोघांचं होतं
पण माझा आधारच काढून घेणारं!
***
गेल्या अवकाळी स्वयंपाकघरात
मी बावरलो होतो
पुन्हा अवकाळी पाहुणे आलेत...
आता सावरून घ्यायचं आहे
सुरु केलेला स्वयंपाक आवरण्याचा
खटाटोप तरी करावाच लागेल, कारण
पावभाजी न शिजण्याचं एक दु:स्वप्न त्यातलंच!
तू हादडून आली असशील! मनसोक्त, नेहमीसारखीच
मीही घेतलीये!! मित्रांच्या सहवासात, मनसोक्त;
बिनसलेल्या स्वयंपाकाची धडधड छातीत साठवून घेत!
जवळची 'मॅक' मात्र
आता मला शोधायची आहे
नात्यांच्या जातीच्या तुझ्या व्याख्येत
ती कुठं बसेल?
विरेचनकाल कोलंबस डे २००९
चतुरंग
प्रतिक्रिया
13 Oct 2009 - 1:31 am | श्रावण मोडक
दोन दिवस वाटलं, सुटलो!,पण नाही. ताटात शिकरण यायचीच होती. :)
13 Oct 2009 - 1:36 am | बेसनलाडू
अपेक्षित पण छान!
(वाचक)बेसनलाडू
13 Oct 2009 - 2:32 am | सुवर्णमयी
कोलंबस डे सार्थकी लागलेला दिसतो आहे:)
व्याकरणातून शिकरण म्हणजे भारीच. एक दोन दिवस थांबून आले की लगेच याहून आले हेच महत्त्वाचे.
वा , आजच्या बायका शहाण्या आहेत, वेळेवर खातात पितातः)विडंबनात तरी असे दिसते म्हणजे..
13 Oct 2009 - 6:49 am | अवलिया
हम्मऽऽऽऽऽऽऽ
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
13 Oct 2009 - 1:30 pm | प्रकाश घाटपांडे
आम्ही ते शिक्रण म्हण्तो. पण बायको ती शिक्रण म्हण्ते. यातुन देशस्थ व कोकणस्थ हा वाद उकरुन काढतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
13 Oct 2009 - 1:33 pm | विसोबा खेचर
मस्त रे! :)
13 Oct 2009 - 7:56 pm | स्वाती२
धन्य आहात!