दोन साधू ( रूपक)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
5 Oct 2009 - 4:52 pm

खलील जिब्रान वाचताना त्याच्या कथांमध्ये नक्की कायकाय आढळेल हे सांगता येत नाही.
पण एक नक्की तो वाचकाला अंतर्मुख करायला लावतो. मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो. मनाचे काने कंगोरे वेगळ्याच कोनातून दाखवून देतो.
त्याची अशीच एक कथा

एका टेकडीवर दोन साधू रहात होते. आपण त्याना मोठा आणि धाकटा अशी नावे देवू या.
दोघे जण टेकडीवरच्या एका झोपडीत रहात होते. ती झोपडी त्यातली अंथरायची चटई असणारे आणि पाण्याचा एक जुना माठ हीच काय ती त्यांची संपत्ती.
एक दिवस धाकट्याच्या मानात आले तो मोठ्या साधूला म्हणाला " मला माझ्या संपत्तीचा वाटा हवा आपण वाटण्या करुयात"
मोठा म्हणाला " घे ना हे सगळे तुझेच आहे त्यात वाटा आणि वाटण्या कसल्या"
मला माहीत होते की तू असेच बोलणार म्हणून मला दया नको आहे माझा बरोब्बर निम्मा वाटा हवा'
त्याने त्या झोपडीच्या मधोमध एक रेघ आखली चटई अर्धी फाडली आणि म्हणाला ही अर्धी जागा तुझी. ही तुझी चटई.
आता आपण माठाचे सुद्धा वाटे करुयात.
मोठा म्हणाला माठ कसा काय वाटणार तो तुझ्या कडे राहु देत मी त्यातून पाणी पिईन.
धाकट्याला संताप अनावर झाला. रागारागाने त्याने माठ फोडून टाकला.
म्हणाला " हलकट आहेस मला थोडासुद्धा मोठेपणा दाखवण्याचे समाधान मिळू देऊ नकोस"

वावरविचार

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Oct 2009 - 4:54 pm | llपुण्याचे पेशवेll

बरं पुढं?

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

पर्नल नेने मराठे's picture

5 Oct 2009 - 4:57 pm | पर्नल नेने मराठे

पुढे त्यानी फ्री़ज घेतला असेल :-?
चुचु

धमाल मुलगा's picture

5 Oct 2009 - 5:43 pm | धमाल मुलगा

_/\_
धन्य आहेस गं बाई!

असो,
विजुभाऊ, प्रवचन छान रंगलं...आवं पन आता आमास्नी त्येचा आर्थ तरी सांगा की वं! का आमी निस्तं 'हाऽऽऽरी इट्टल' म्हनायचं?

श्रावण मोडक's picture

5 Oct 2009 - 5:46 pm | श्रावण मोडक

रीड बिटविन द लाईन्स.

विकास's picture

5 Oct 2009 - 4:58 pm | विकास

बरं पुढं?

पुढे आता आपण अंतर्मुख होऊन बसायचे :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2009 - 5:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुढे आता आपण अंतर्मुख होऊन बसायचे

हे पण तुम्हीच म्हणा विकास, कधीतरी आम्हा टवाळांना जडजड वाक्यं लिहू द्यात! ;-)

अदिती

चिरोटा's picture

5 Oct 2009 - 5:01 pm | चिरोटा

धाकटा साधू माठ दिसतोय.
चांगली कथा.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

दशानन's picture

5 Oct 2009 - 5:03 pm | दशानन

धाकटा ओळखीचा वाटत आहे.

भडकमकर मास्तर's picture

5 Oct 2009 - 5:16 pm | भडकमकर मास्तर

=)) _____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

श्रावण मोडक's picture

5 Oct 2009 - 5:19 pm | श्रावण मोडक

तुमच्या ओळखी कुठं-कुठं असतील हे एक सांगणंच मुश्कील. ;)

मानसशास्त्र कोळून प्यायलेला अवलीया माणूस असावा तो.

लिहिलय ना यात स्पष्ट !! काय ना तू पण....

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्रावण मोडक's picture

5 Oct 2009 - 5:36 pm | श्रावण मोडक

पण नोबॉल!!!

प्रभो's picture

5 Oct 2009 - 5:41 pm | प्रभो

पक्षपाती पंच का?????

श्रावण मोडक's picture

5 Oct 2009 - 5:44 pm | श्रावण मोडक

पक्षपात नाही.
ते अवलीया वगैरे सगळं खलिल जिब्रानसाठी आहे. धाकट्यासाठी नव्हे. राजेंना धाकटा ओळखीचा वाटतोय. ओळखा पाहू, कोण ते?

दशानन's picture

5 Oct 2009 - 5:47 pm | दशानन

मोडक सेठ राहू दे... प्रभो बालक आहे अजून ;)

छोटा डॉन's picture

5 Oct 2009 - 6:05 pm | छोटा डॉन

खलिल जिब्रान ची रुपककथा आवडली, बरीचशी ओळखीची वाटली ;)
( कोण आहे रे तो "अल बिरुनी" म्हणणारा ? मुर्ती बांधा त्याची दगडात )

मात्र विजुभाऊ, कालाच्या संदर्भात ही कथा अजुन एका पात्राच्या उल्लेखाविना अपुर्ण ठरते. नक्की कोणाच्या ते आम्ही सांगणार नाही, त्याने आमच्या (टवाळ)उच्चभ्रु कुलाला बौलु लागेल ;)
हॅ हॅ हॅ ...!!!

------
छोटा डॉन जब्रान
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2009 - 6:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डान्राव, तुम्हाला समजली असेल कथा असं मानून.... या दोघांना साधू का म्हटलं आहे हो?

अल टारूनी

छोटा डॉन's picture

5 Oct 2009 - 6:13 pm | छोटा डॉन

>>.... या दोघांना साधू का म्हटलं आहे हो?
आता ह्याचे उत्तर एक तर विजुभाऊ किंवा अल बिरुनी .... हे आपलं खलिल जिब्रानच देऊ शकेल, आम्हाला माहित नाही.

बाकी सर्व काही सापेक्ष असते हो.
जो एका ठिकाणी साधु तो दुसर्‍या ठिकाणी दरोडेखोर / वाटमार्‍या असु शकतो, क्काय ?

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

श्रावण मोडक's picture

5 Oct 2009 - 6:23 pm | श्रावण मोडक

जो एका ठिकाणी साधु तो दुसर्‍या ठिकाणी दरोडेखोर / वाटमार्‍या असु शकतो, क्काय ?
अगदी, अगदी. संधीसाधूही असू शकतो डान्राव.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2009 - 6:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हं असं आहे तर ... मोठे लोकं, म्हणजे लोकं ज्यांना मोठे लेखक म्हणतात ते लोकं, उदा: खलील जिब्रान, विजुभाऊ, अशा लोकांना हेतुपुरस्सर साधू म्हणत असतील का?

(विचारशील) अदिती

धमाल मुलगा's picture

5 Oct 2009 - 6:09 pm | धमाल मुलगा

अहो तेच तर विचारुन र्‍हायलो ना भौ आमी! विजुभाऊनी असं काही अर्धवटच का सांगित्लं कळेना.

त्ते कथेचा गाभा असलेलं पात्र, त्याचा पुर्वातिहास, त्याचं कर्तुत्व सगळं सगळं असं वगळुन नुसतंच 'रागारागानं माठ फोडला आणि म्हणाला...मला मोठेपणा दे" असं अधांतरी वाक्य काही उमजेना हो!

दशानन's picture

5 Oct 2009 - 6:11 pm | दशानन

डॉनराव तुमचे खरं मानू आम्ही पण त्या साधूचं लफडं (घाकटा) काय आहे ते सांगा आधी !

श्रावण मोडक's picture

5 Oct 2009 - 6:13 pm | श्रावण मोडक

त्ते कथेचा गाभा असलेलं पात्र, त्याचा पुर्वातिहास, त्याचं कर्तुत्व सगळं सगळं असं वगळुन नुसतंच 'रागारागानं माठ फोडला आणि म्हणाला...मला मोठेपणा दे" असं अधांतरी वाक्य काही उमजेना हो!
लढ बाप्पू, तुला जे प्रश्न पडले ते मला पडलेच नाहीत. तुला कळली रे कथा ही... तुला जेवढी कळली तेवढी मला कळली असती तर... :(

दशानन's picture

5 Oct 2009 - 6:16 pm | दशानन

+१

मला पण थोडी समजली.. घाकटा समजला थोरला समजला नाही अजून !

छोटा डॉन's picture

5 Oct 2009 - 6:23 pm | छोटा डॉन

>>.. घाकटा समजला थोरला समजला नाही अजून !
:(
राजेसाहेब, वाटले तर इकडेयेऊन आमच्या मुस्काटात मारा पण तेवढे "धाकटा" हे "घाकटा" असे नका हो लिहु ...
शुद्धलेखन एवढेही फाट्यावर नका मारु की त्याचा अर्थच बदलुन जाईल ;)

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

दशानन's picture

5 Oct 2009 - 6:25 pm | दशानन

=))

स्वारी बरं... टायपो !

छोटा डॉन's picture

5 Oct 2009 - 6:20 pm | छोटा डॉन

कथेचा गाभा असलेलं पात्र, त्याचा पुर्वातिहास, त्याचं कर्तुत्व सगळं सगळं असं वगळुन नुसतंच 'रागारागानं माठ फोडला आणि म्हणाला...मला मोठेपणा दे" असं अधांतरी वाक्य काही उमजेना हो!

+१, सहमत आहे.
संदर्भाविना ( म्हणजे उठसुठ विकीपेडियाच्या लिंका नव्हे ) दिलेले वाक्य अधांतरीच ठरते.

मात्र कसे आहे, आम्ही ज्या पात्राचा उल्लेख केला होता त्याचीच ही जादुई करामत आहेत. त्याने आपल्या आंतरिक नैपुण्याने व जादुई शक्तीने "पुर्वेतिहास" पुसुन टाकला, अगदी साफ गुडुप्प केला. आता त्याचा कसलाच लवलेश नाही त्यामुळे ही कथा "आधांतरी" वाटते आहे.
कठोर परिश्रमाने तपोबल प्राप्त केल्यास इतिहासातील अनेक गुढ तत्वांचे व आश्चर्यांचे ज्ञान होऊ शकते ...

बाकी मेसनरीची मेंबरशीप मागुन मिळत नाही हे शाश्वत सत्य कसे काय विसरता हो तुम्ही धमालपंत ?

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

श्रावण मोडक's picture

5 Oct 2009 - 6:26 pm | श्रावण मोडक

हे विश्लेषण बाकी सुरस आणि चमत्कारिक!!! शंभर गुण तुम्हाला डान्राव. शंभरापैकी...

छोटा डॉन's picture

5 Oct 2009 - 6:31 pm | छोटा डॉन

>>हे विश्लेषण बाकी सुरस आणि चमत्कारिक!!!
सुरस आणि चमत्कारिक ???
ब्बाब्बौ !!!!
मोडक मोडकं, अगदी साफ तोडलत हो, चेंदामेंदा केलात पार ...

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

श्रावण मोडक's picture

5 Oct 2009 - 6:50 pm | श्रावण मोडक

कठोर परिश्रमाने तपोबल प्राप्त केल्यास इतिहासातील अनेक गुढ तत्वांचे व आश्चर्यांचे ज्ञान होऊ शकते ...
यासाठी म्हटलं सुरस आणि चमत्कारीक!!! इतिहास हा नेहमी तसाच असतो. तपोबलानं साध्य होणारा इतिहास तर हमखास असतोच.

दशानन's picture

5 Oct 2009 - 7:25 pm | दशानन

इतिहास असा नेहमी सुरस आणि चमत्कारीक का असतो :?

नाही हे साधूच पहा ना तुम्ही कसे चिडके आहेत व सुरस आणि चमत्कारीक टाईप पण वाटत आहेत.

धमाल मुलगा's picture

5 Oct 2009 - 6:39 pm | धमाल मुलगा

>>संदर्भाविना ( म्हणजे उठसुठ विकीपेडियाच्या लिंका नव्हे ) दिलेले वाक्य अधांतरीच ठरते.
सहमत आहे. इथे कुठे इतिहास लिहायला बसायचंय?
पण संदर्भ म्हणजे कथेमध्ये येणार्‍या पात्रांबद्दलची ओळख, त्या कथेच्या मागणीप्रमाणे लागु असणारी वातावरण निर्मिती - भले ह्यामध्ये त्रयस्थ पात्राचा निमित्तमात्र असा का होईना पण उल्लेख असणे ज्यायोगे कथेच्या गाभ्याला अधिक मुर्त स्वरुप मिळुन वाचकाला अनुभुतीचा आनंद मिळेल अश्यारितीने मांडणी करणे ह्याला कथेच्या अनुशंगाने विचार करता संदर्भ म्हणतात असे माझे वैयक्तिक मत आहे. (चु भु दे घे)

>>कठोर परिश्रमाने तपोबल प्राप्त केल्यास इतिहासातील अनेक गुढ तत्वांचे व आश्चर्यांचे ज्ञान होऊ शकते ...
आपल्या प्रतिसादातले हे वाक्य काहीसे आध्यात्मवादाकडे झुकणारेसे वाटले. अंमळ अस्थानी वाटते म्हणुन ही सुचवणा इतकेच.

>>बाकी मेसनरीची मेंबरशीप मागुन मिळत नाही हे शाश्वत सत्य कसे काय विसरता हो तुम्ही धमालपंत ?
=)) =))

- (लेव्हल ३३) ध.

श्रावण मोडक's picture

5 Oct 2009 - 6:44 pm | श्रावण मोडक

संदर्भ म्हणजे कथेमध्ये येणार्‍या पात्रांबद्दलची ओळख, त्या कथेच्या मागणीप्रमाणे लागु असणारी वातावरण निर्मिती - भले ह्यामध्ये त्रयस्थ पात्राचा निमित्तमात्र असा का होईना पण उल्लेख असणे ज्यायोगे कथेच्या गाभ्याला अधिक मुर्त स्वरुप मिळुन वाचकाला अनुभुतीचा आनंद मिळेल अश्यारितीने मांडणी करणे ह्याला कथेच्या अनुशंगाने विचार करता संदर्भ म्हणतात असे माझे वैयक्तिक मत आहे.
हे बाकी उच्च!!! मराठी समीक्षेत मोलाची भर तुमची बारामतीकर.
आम्ही फक्त उच्च म्हटलं आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Oct 2009 - 10:22 am | llपुण्याचे पेशवेll

हे बाकी उच्च!!! मराठी समीक्षेत मोलाची भर तुमची बारामतीकर.

बाकी हे जरी खरे असले तरी त्यामुळे माझ्या आस्वादाचे रसपोषण झाले नाही . :(

पुण्याचे पेशवे

प्रभो's picture

5 Oct 2009 - 6:25 pm | प्रभो

आपल्याक काय समजला नाय....

येड पांघरून पेडगावला जाणारा....
(कुकुल्लं) पबो....

धमाल मुलगा's picture

5 Oct 2009 - 6:29 pm | धमाल मुलगा

(सदर ओळ लेखकांस उद्देशुन आहे, अर्थात 'मला गोष्ट समजली असं वाटताना समजली नाही' हे कळवण्याचा क्षीण प्रयत्न आहे.)
खरंच कळालेली नाहीय्ये हो. नाही म्हणजे,

जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीतून
शांततेची कबुतरे उडताना
पाहून गालिब म्हणाला
वल्हव रे नाखवा
वल्हव वल्हव

ह्या शरदिनी ताईंच्या ओळींबाबत कसं होतं तसं वाटतंय...कळतंयसं वाटतंय पण हाती काहीच लागत नाहीये.

असो,
भाऊंच्या क्रिप्टिकामध्ये
जिब्रानस्पर्शाचा कथादर्प
घेताना मंडळी म्हणाली
"च्यायला, ह्याचा काय अर्थ आहे?"

दशानन's picture

5 Oct 2009 - 6:32 pm | दशानन

=))

=))

=))

=))

जय हो धम्या !

सूहास's picture

5 Oct 2009 - 6:38 pm | सूहास (not verified)

असो,
भाऊंच्या क्रिप्टिकामध्ये
जिब्रानस्पर्शाचा कथादर्प
घेताना मंडळी म्हणाली
"च्यायला, ह्याचा काय अर्थ आहे?">>>>>

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

फुटलो..मेलो...वारलो....

बाकी कथा वाचुन प्रभु संराची याद आली...किमान दोन वाचनात निरोप तरी समजतो...ईथे पाच वेळा वाचुन पण समजली नाय रे बाबा....मग शेवटी काय करणार..

मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..

सू हा स...

विनायक प्रभू's picture

5 Oct 2009 - 7:04 pm | विनायक प्रभू

रे सुहास,
तरी मी विजुभौ ना सांगत होतो माझ्याकडे जास्त बोलु नका फोनवर.

विनायक प्रभू's picture

5 Oct 2009 - 7:04 pm | विनायक प्रभू

रे सुहास,
तरी मी विजुभौ ना सांगत होतो माझ्याकडे जास्त बोलु नका फोनवर.

अवलिया's picture

5 Oct 2009 - 7:15 pm | अवलिया

उत्तम कथा. आवडली. :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

5 Oct 2009 - 7:16 pm | दशानन

अर्थ समजला का ?

अवलिया's picture

5 Oct 2009 - 7:17 pm | अवलिया

अर्थातच. अगदी व्यवस्थित.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2009 - 7:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्ही धाकले का थोरले संधीसाधू?

अदिती

अवलिया's picture

5 Oct 2009 - 7:20 pm | अवलिया

मी खलील जिब्रान

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

5 Oct 2009 - 7:19 pm | दशानन

सांगा उलगडून मग !

विजुभाऊ's picture

6 Oct 2009 - 10:14 am | विजुभाऊ

कथे चा अर्थ तसा फार गूढ नाही.
प्रत्येक माणसाला स्वतः इतरांपेक्षा मोठे आहोत हे दाखवायची भूक असते. समजा एखाद्या कडे मोठेपणा दाखवण्यासारखे काहीच नसेल तर तो त्याचे दु:ख इतरांपेक्षा मोठे कसे आहे ते दाखवत सुटतो. तशा लोकाना होते तशी डोकेदुखी कोणालाच होत नाही. ते रस्त्यात पाय घसरून पडले तरी भुकंप झाल्यामुळे पडतात.
प्रस्तुत लथेतले साधू ही अशाच मानवांची प्रतिके आहेत.
धाकट्याला कधितरी आपल्याला थोडासा मोठेपणा मिळावा असे वाटते.
आपण प्रत्येक बाबतीत मोठ्यापेक्षा गौण महत्वाचे का आहोत असे त्याला वाटते. ज्ञानाने वयाने ते त्याला शक्य नाही. निदान मोठ्याने तो माठ फोडायला परवानगी दिली असती आणि धाकट्याने त्यावर तो फोडत नाही तो तुला राहू दे. असे म्हणून मोठ्यावर उपकार करण्याची संधी मिळेल या अपेक्षेत धाकटा होता. ती संधी मिळाली नाही म्हणून धाकटा रागावला.

विनायक प्रभू's picture

6 Oct 2009 - 1:37 pm | विनायक प्रभू

रुपकाबरोबर असेच अर्थ लिहित जा विजुभौ.

विजुभाऊ's picture

6 Oct 2009 - 2:36 pm | विजुभाऊ

प्रत्येक माणसाला स्वतः इतरांपेक्षा मोठे आहोत हे दाखवायची भूक असते
हे वाक्य मोबाईलसंदर्भात एकदम उलट होउन जाते.
जगात फक्त मोबाईल ही अशी एकमेव वस्तु आहे की जी दाखवताना प्रत्येक माणूस आपले इन्स्ट्रुमेन्ट किती छोटे आहे हे अभिमानाने सांगतो

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2009 - 3:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्येक माणसाला स्वतः इतरांपेक्षा मोठे आहोत हे दाखवायची भूक असते
हे वाक्य मोबाईलसंदर्भात एकदम उलट होउन जाते.

ओह्ह, झिरो फिगरची क्रेझ गेली वाट्टं! सांगितलं नाही कोणी मला!!

अदिती

अवलिया's picture

6 Oct 2009 - 11:12 am | अवलिया

५० वा प्रतिसाद.
च्यामारी विजुभाउ खुश ! धागा काढल्याचे सार्थक झाले... ;)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

गणपा's picture

6 Oct 2009 - 1:41 pm | गणपा

णाणा,
टारुपंथ की मिभो विरझण एजंसी घेतली हो ;)

प्रभाकर पेठकर's picture

7 Oct 2009 - 7:54 pm | प्रभाकर पेठकर

'तोची साधू ओळखावा, विजूभाऊ तेथेची जाणावा.'

आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.