समस्त मिपापरिवाराला आमच्या दसर्याच्या शुभेच्छा!!!
आपट्याचं पान तर रेखीव असतंच पण फुलंसुद्धा अगदी आकर्षक असतात...
जरा जवळून क्लोज-अप!!
अशा फुलांनी बहरून आला की आपट्याचा वृक्ष अतीमनोहर दिसतो...
(सर्व फोटो काकांच्या बागेतल्या झाडाच्या सौजन्याने!:))
स्वामिन् सर्वेजना: सुखीनौ भवन्तु ||
प्रतिक्रिया
28 Sep 2009 - 2:39 am | दिपाली पाटिल
दसर्याच्या शुभेच्छा... अरे व्वा तुमच्याकडे आपट्याचं झाडही आहे...
दिपाली :)
28 Sep 2009 - 2:47 am | मदनबाण
अरे व्वा तुमच्याकडे आपट्याचं झाडही आहे...
हेच म्हणतो... :)
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
28 Sep 2009 - 2:49 am | टारझन
बागेतल्या झाडाचे हार्दिक आभार !!
आणि हो .. .तुम्हालाही शुभेच्छा !! तुम्हीच मिपाचे भप्पी लहरी (आय मीन गोल्डमॅन)
(काकाश्री चा मित्र) टारझन
28 Sep 2009 - 2:58 am | स्वाती२
दसर्याच्या शुभेच्छा! आपट्याचे फूल पहिल्यांदाच पाहिले. धन्यवाद.
28 Sep 2009 - 3:45 am | सुबक ठेंगणी
माझ्याही सर्वांना शुभेच्छा :) मीसुद्धा आपट्याचे फूल पहिल्यांदाच पाहिले.
28 Sep 2009 - 11:29 am | मस्त कलंदर
माझ्याकडूनही सर्वांना दसर्याच्या शुभेच्छा!!!!
आपट्याचं फूल इतकं सुंदर असतं हे आज प्रथमतःच पाह्यलं.... :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
28 Sep 2009 - 2:34 pm | भाग्यश्री कुलकर्णी
खरच मी ही हे फुल प्रथमच पाहिलं फार छान आहे .माझ्याही सर्वांना दसर्याच्या शुभेच्छा. :)
28 Sep 2009 - 5:42 pm | लवंगी
आपट्याच झाड आणी फूल दोन्ही सुंदर
29 Sep 2009 - 12:36 am | अनिल हटेला
दसर्याच्या हार्दीक शुभेच्छा !!
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
28 Sep 2009 - 3:44 am | गणपा
लोकांकडे पैश्यांची झाडं असतात अस ऐकुन होतो.
पण डँबिसकाकाच ते... २ पावल पुढेच असणार चक्क सोन्याच झाड लावलय.
आवांतर : आपट्याचं झाड, फुलं पहिल्यांदा पाहतोय.
28 Sep 2009 - 3:52 am | चतुरंग
वा वा! सोन्याचं झाड, मजा आहे बुवा!! :) (आपट्याची फुलं प्रथमच बघितली!)
तुम्हाला, काकूंना, चिरंजिवांना आणि आप्तेष्टांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
चतुरंग(आपटे)
28 Sep 2009 - 6:40 am | अवलिया
बागेतल्या झाडाचे हार्दिक आभार !!
आणि हो .. .तुम्हालाही शुभेच्छा !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Sep 2009 - 7:25 am | हर्षद आनंदी
अवांतर : काकांचा पत्ता काय हो?
समस्त मिपाकर आणी मिपाला दसर्याच्या हार्दीक शुभेच्छा !!
चला दसर्याच्या निमित्त्ताने आपण एक संकल्प करु यात :
"आगामी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण योग्य त्या ऊमेदवाराला मतदान करु, आणि मुख्य म्हणजे १००% मतदान होण्यासाठी प्रयत्न करु"
दसर्याच्या मुहुर्तावर स्वमनीच्या रावणप्रवृत्तीला पश्चात्तापाच्या अग्नीत स्वाहा करु आणि आनंदी राहु
दसर्याच्या पुनश्च एकवार हार्दीक शुभेच्छा !!
28 Sep 2009 - 7:27 am | सुनील
समस्त मिपापरिवाराला विजयादशमीच्या शुभेच्छा!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Sep 2009 - 8:03 am | घाटावरचे भट
समस्त मिपाकर मंडळींना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
- भटोबा
28 Sep 2009 - 8:14 am | सहज
मिपापरिवाराला दसर्याच्या शुभेच्छा!
28 Sep 2009 - 8:38 am | वाटाड्या...
ढिंगच्यांग ढिंच्यांग....ग ..ढिंगच्यांग ढिंच्यांग....
शुभेच्चा...
झाडाला पण आणि काकांना पण आणि मिपाला पण....
- वा
28 Sep 2009 - 8:42 am | JAGOMOHANPYARE
आता कळलं नाव पिवळा डॅम्बीस का आहे ते..
सोन्याहून पिवळं !
दसर्याच्या शुभेच्छा :)
28 Sep 2009 - 8:54 am | विसोबा खेचर
28 Sep 2009 - 10:09 am | प्रभाकर पेठकर
कत्रीना कैफचा फोटो बराच 'जबरदस्त' आहे हो.. .
खर पाहता कत्रीनाच्या फोटो खाली 'उत्तर द्या' वाचून बुचकळ्यातच पडलो होतो. काय 'उत्तर' देणार? आम्ही निरुत्तरच झालो. असो.
हा नविन घरोबा कधीपासून तात्या?
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
28 Sep 2009 - 3:48 pm | चतुरंग
हे 'कैफ' आणणारं 'सीमोल्लंघन' भलतंच जबरदस्त! ;)
(कैफी)चतुरंग
28 Sep 2009 - 8:55 am | विकास
दसर्याच्या सर्वांना शुभेच्छा!
28 Sep 2009 - 10:16 am | प्रभाकर पेठकर
किती दिवसांनी सोनं पाहिलं.... धन्यवाद श्री. पिवळा डांबीस.
लहानपणी आम्ही मित्र-मित्र दसर्याला सोनं (आपट्याची पानं)वाटायला गावभर फिरायचो. त्यात गंमत अशी की सोनं (आपट्याची पानं) दिल्यावर ज्येष्ठ मंडळी हातावर पेढा, चॉकलेट, साखर असे काहितरी ठेवायची. अशी घरं तोंडपाठ असायची. त्यामुळे लांब असले तरी पेढे/चॉकलेट देणारी घरं आधी उरकायची (लिमिटेड स्टॉक संपायची भिती असायची) बाकी साखरवाली घरं नंतर आरामात उरकली जायची.
हल्ली ती पद्धतच मोडीत काढलेली दिसते आहे. कोणीच मुले येत नाहीत घरी सोनं (आपट्याची पाने) द्यायला.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
28 Sep 2009 - 10:49 am | मिसळभोक्ता
डांबिसा,
तुझ्याकडे सोन्याचे झाड आहे होय ? म्हणूनच तू रिपब्लिकन आहेस लेका !
उगाच त्या इण्डिपेण्डण्ट म्हातार्याला (सगळे लिबरल डेमॉक्रॅट्स स्वतःला इण्डिपेण्डण्ट का म्हणतात रे ?) पिडत नको जाऊस रे !
रिपब्लिकन पार्टी बुडली बुडली म्हणतोय तो, तर आपणही बुडली म्हणायचे ! वर दसर्याच्या शुभेच्छा म्हणायच्या !
(पोईजनर/कॅम्पबेल/व्हिटमन यापैकी कुणीतरी येणार बघ ! आमचे मत व्हिटमनला. सरकारातून ४०००० लोक कमी करीन म्हणतेय ! जबरा ! तुमचे कुणाला ?)
-- मिसळभोक्ता
28 Sep 2009 - 11:06 am | बाकरवडी
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
28 Sep 2009 - 11:14 am | सोनम
"आमच्या कडून सर्व मिपाकरांना दसर्याच्या शुभेच्छा"
28 Sep 2009 - 11:27 am | यशोधरा
सर्व मिपाकरांना विजयादशमीच्या खूप शुभेच्छा!
28 Sep 2009 - 11:31 am | प्रकाश घाटपांडे
मिपाकरांना आमच्या दसर्यानिमित्त भुभेच्छा
भुभुप्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
28 Sep 2009 - 11:33 am | मराठमोळा
सर्व मिपाकरांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
सर्वाना हा दिवस आनंदाचा व भरभराटीचा जावो :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
28 Sep 2009 - 11:35 am | मराठमोळा
.
28 Sep 2009 - 12:07 pm | अनामिका
"दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा"
समस्त मिपाकरांना विजयादशमीच्या मनःपुर्वक शुभेच्छा!
या दसर्याच्या शुभमुहुर्तावर महाराष्ट्रातील तमाम जनतेने निर्धाराने येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या मताच्या अमुल्य अधिकाराचे शस्त्र वापरुन महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडवुन आणावे .हिच सदिच्छा!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
28 Sep 2009 - 1:27 pm | प्रसन्न केसकर
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!
अवांतरः झाड कांचनचं दिसतंय!
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
28 Sep 2009 - 8:47 pm | प्रमोद देव
अवांतरः झाड कांचनचं दिसतंय!
सहमत आहे.
त्याबद्दल इथे आणि इथेही वाचा.
माझ्यातर्फेही समस्त मिपाकरांना दसर्याच्या शुभेच्छा!
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
28 Sep 2009 - 4:36 pm | चेतन
दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!
अवांतरः मलाही पहिल्या चित्रातलं पान कांचनचं वाटलं पण माझ्या घरच्या कांचनाला पांढरी फुलं येतात :?
चेतन
28 Sep 2009 - 4:55 pm | प्रसन्न केसकर
लहानपणी खडकवासल्यात रहात असताना बरेच पाहिले. त्यात गुलाबी अन पांढरा अश्या दोन जाती होत्या. जेव्हा तिथं कॅम्पसवर ट्री सेन्सस झाले तेव्हा कळले कांचन ची पानं मोठी अन तुकतुकीत असतात तर आपट्याची लहान अन खरखरीत. तोवर मी पण कांचनलाच आपटा समजत होतो.
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
28 Sep 2009 - 8:22 pm | शक्तिमान
सर्वांना शक्तिमानतर्फे दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
28 Sep 2009 - 8:31 pm | वेताळ
माझ्या कडुन सर्व मिपाकराना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.
वेताळ
28 Sep 2009 - 8:39 pm | ऋषिकेश
हे नक्की आपट्याचे झाड आहे का? मला ते कांचनाचे वाटत आहे
दहिसरला आपट्याचे झाड आहे त्याची पाने लहान व काहिशी कडक असतात.
काहिहि असली तरी फुले व छायाचित्रे मस्तच आहेत.
पिंडाकाका, कुटुंबिय तसेच सर्व मिपाकरांना दसर्याचा हार्दिक शुभेच्छा!!
समांतर अवांतर:
गेल्या वर्षी दसर्यालाच उपक्रमी वाचक्नवींशी खरडींतून आपट्यांच्या पानांबद्दल बोललो होतो त्यांच्याकडून पुढील माहिती मिळाली होती ते आठवले म्हणून इथे डकवत आहे:
----------------------------------
शमी म्हणजे Prosopis spicigera आणि आपटा(अश्मंतक) म्हणजे Bauhinia racemosa (किंवा Bauhinia tomentosa). या दोन्ही झाडांत कसलेही साम्य नाही. स्कंदपुराणानुसार, कुबेराने रघुराजासाठी शमीच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. विश्वामित्राचा शिष्य कौत्स्य याने चौदा कोटी मोहरा मोजून घेतल्यावर उरलेल्या रघूने लुटवल्या. (रघुवंशात कौत्स्याच्या गुरूचे नाव वरतंतु दिले आहे, आणि शमीच्या झाडाचा उल्लेख नाही.) यावरून शमीची पाने दसर्याच्या दिवशी सोने म्हणून लुटायची पद्धत महाराष्ट्रात पाळली जाते. पेशवाईत हीच प्रथा होती. शमीची झाडे महाराष्ट्रात दुर्मीळ झाल्यमुळे पुढे केव्हातरी आपट्याच्या पानांचा वापर सुरू झाला असावा. पुलंचे आजोबा ऋग्वेदी यांच्या आर्यांच्या सणांचा इतिहास, तसेच सरोजिनी बाबर संपादित दसरा-दिवाळी या ग्रंथात ठिकठिकाणी शमीची पाने न मिळाल्यास आपट्याची पाने लुटतात असा स्पष्ट उल्लेख आहे. आपट्याचे झाड बौहिनिया म्हणजे कांचन(Bauhinia veriegata) कुटुंबातले. कांचन म्हणजे सोने, म्हणून कदाचित आपट्याचा वापर सोने म्हणून होत असेल. एका पुस्तकात जर आपट्याची पाने मिळाली नाहीत तर लोक कांचनची पाने दसर्याच्या दिवशी लुटतात असाही स्प्ष्ट उल्लेख आहे.--वाचक्नवी
-------------------------
कांचनाची झाडे पुण्याच्या उपनगरात भरपूर आहेत. आपट्याप्रमाणेच हेही झाड बॉहिनिया कुटुंबातले असल्याने त्याचे पान आपट्याच्या पानासारखेच दुभंगलेले(दोन किडन्या जोडल्यासारखे) पण खूप मोठे असते. आपट्याचे पान अगदी छोटे आणि पापडासारखे किंचित कडक असते. मुंबईच्या कांदिवली उपनगरात आम्ही राहात होतो तेव्हा दसर्याच्या दिवशी वसाहतीतली खूप मुले आमच्याकडे सोने द्यायला येत. त्यात कधीकधी आपट्याबरोबर कांचनची पानेही येत. बरणीभर चॉकलेटांच्या मोबदल्यात त्या दिवशी आम्हाला खूप लहान आणि तरुण मुलांमुलींच्या ओळखी होत असत.
कांचनमध्ये जाती (Species)अनेक. टोमेन्टोसा(पिवळे फूल आणि प्रत्येक पाकळीवर तांबडा शिंतोडा), कोविदार(व्हेरियागाटा), पूर्ण पांढरी किंवा निळसर गुलाबी पाकळ्या आणि त्यांतली एक पाकळी गडद रंगाची आणि तीवर शिंतोडा असलेली, एकांचन(मोनान्ड्रा)- गुलाबी पाकळ्यांपैकी एकीवर लाल शिंतोडा. या शिवाय सफेद, लाल, जांभळी कांचन(ऍक्युमिनाटा, कॉरिम्बोसा, गॅलपिनिया, मलबारिका, पर्प्यूरिया, रेटुसा, क्रुगिया, ट्रिआन्ड्रा, वाहलिया वगैरे.)
ऋतुसंहारात आलेल्या विंध्यवनश्रीवर्णनात कालिदासाने कोविदारबद्दल लिहिले आहे:
मंदानिलाकुलितचारु-विशालशाख: । पुष्पोद्गमप्रचुरकोमलपल्लवाग्र: ॥
मत्तद्विरेफपरिपीतमधुप्रसेक: । चित्तं विदारयति कस्य न कोविदार: ॥ ऋतुसंहार ३.६--वाचक्नवी
--------------------------
यावरून वरील झाड एकांचनाचे वाटते. अर्थात हे देखील सोने म्हणून वाटता येतेच फक्त संभाषण आठवले म्हणून दिले आहे. :)
ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ८ वाजून ३३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन बाहु...."
28 Sep 2009 - 11:31 pm | बिपिन कार्यकर्ते
मिष्टर डांबिसराव आपटे, च्यामारी धरून फट्याक फोटो राव!!! आपट्याचं झाड आणि फुलं प्रथमच पाहिली. जबरदस्त. तुम्हाला, काकूंना आणि ज्यु. डांबिसला, दसर्याच्या मनःपुर्वक शुभेच्छा!!!
बिपिन कार्यकर्ते
29 Sep 2009 - 1:54 am | संदीप चित्रे
पिडाकाका,
सोन्याचं झाड अंगणात लावलेले तुम्ही पहिलेच भेटलायत !
भरभरून सोनं येवो ह्या शुभेच्छा.
29 Sep 2009 - 12:08 pm | मसक्कली
आपट्याचं झाड आणि फुलं प्रथमच पाहिली , :O
ती त्याच झडाची फुले आहेत हे नक्कि ना.... :?
सर्व मिपाकरांना दसर्याचा हार्दिक शुभेच्छा!!
:)