हृषीने शांतपणे आपलं निरीक्षण सुरूच ठेवलं आणि हळूच म्हणाला, "सध्या सुरूवातीला हाच खेळ कंप्यूटरसाठी लिहिला तर?"
"म्हणजे रे?" श्रीराम, निलेश, आई सगळ्यांच्याच चेहेर्यांवर एक मोठं प्रश्नचिह्न होतं.
"म्हणजे असं की एक गेम लिहू या. त्यात माशा मारण्याचं टार्गेट ठेवायचं. छ्या, एवढी शिंपल गोष्ट समजत नाही तुम्हाला दोघांना! या निल्याचंतर हल्ली लक्ष कुठे असतं कोण जाणे!" तिघंहीजण यावर समजून-उमजून हसले. "हं, आयडीया चांगली वाटते आहे ना, डोक्याला तेवढंच खाद्य." "कोणाला आवडला, नाही आवडला, आपल्याला तर खेळता येईल ना!" तिघांनी हसून मान डोलावली. आपसात कामाची वाटणी करून घेतली. बर्यापैकी मोठा कोड लिहावा लागणार होता तर आधी कोडची रचना नीट करून कामाची विभागणी केलेली बरी. या खेळामागची प्रेरणा म्हणून श्रीरामने त्या कळकट्ट टीपॉयचा फोटोही काढून ठेवला.
नोकरी-धंद्याच्या गडबडीत तब्बल सहा महिने वेळ लावून तिघांनी मिळून एक व्यवस्थित कोड लिहीला. "माशा मारायला द्यायच्या तर त्यासाठी एक 'व्यवस्थित' पार्श्वभूमी नको का?" असं म्हणत आईनी त्यांना त्या फोटोच्या आधारे एक मस्तपैकी कळकट्ट टी-पॉयची चित्रंही बनवून दिलं. तिघांनीही आपपल्या ब्लॉग्जवर या खेळाची जाहिरात केली. आंतरजालावर खेळता येणारा हा खेळ माफक किमतीत संगणकावर उतरवून घेता येईल अशी सोयही करून दिली. हेतू हा की, या गेममधून थोडे पैसे सुटले तर सुटले नाहीतर श्रीराम आणि हृषीच्या धंद्याची जाहिरातही होईल. मंदाबाईचा फेरा अजूनही गेला नव्हताच. ऑफिसातलं पकाऊ काम उरकून हे असले कंप्यूटर गेम्स खेळणार्यांची कमतरता नव्हती. आणि अशा चित्तवेधक गोष्टींना इमेलद्वारे प्रसिद्धी देणार्यांचीतर अजिबातच वानवा नव्हती. गेमच्या वेबसाईटवरून हा खेळ बराच लोकप्रिय होत आहे याची कल्पना या त्रिकूटाला येतच होती, शिवाय काही लोकांनी पैसे भरून गेम विकतही घेतला होता. श्रीराम आणि हृषीकडे इतर काही क्लायंट्स चौकशी करून गेले आणि त्यातल्या काही लोकांकडून यांना कामंही मिळाली. एकूणचवाईट दिवसांतही बस्तान बसायला लागलं होतं हे म्हणायलाही हरकत नव्हती. पण ...
निलेशच्या ऑफिसमधेतर आधीच हा खेळ लोकप्रिय झाला होता. पण एक दिवस दुर्दैवाने कंपनीच्या एच.आर.मधल्या एका असंतुष्ट आत्म्याने एकाच्या डेस्कटॉपवर हा खेळ पाहिला, शिवाय स्नॅक्सबरोबरचं संभाषणही ऐकलं. दोघं तिघंजण निलेशशी गप्पा मारत या खेळात आणखी काय काय करता येईल याच्या सूचनावजा संभाषण सुरू होतं. पुढच्याच आठवड्यात एच.आर.ची मिटींग झाली आणि नंदीनीच्या कानावर बातमी आली. गेम्सच्या 'क्रेडीट्स'मधून निलेशचं नाव लगोलग वगळलं गेलं. एक संकट येण्याआधीच टळलं होतं. पण हे तर हिमनगाचं टोक आहे याची कल्पना कोणालाच नव्हती.
त्याच सुमारास आठवल्यांच्या घरात आईवडील आणि शाळकरी पोरीचा वाद सुरू होता. पोरगी काही केल्या माशा मारणं सोडायला तयार नव्हती आणि आई वडिलांना सहाजिकच पोरीने थोडे मैदानी खेळ खेळावेत असं वाटत होतं. शेवटी दोन्ही बाजूंनी तोडगा निघेना आणि आई वडीलांनी त्यांच्या ओळखीच्या एका मानसोपचार तज्ञाशी, डॉ तिळवे, बोलण्याचा निर्णय घेतला. डॉ. तिळवे बर्याचदा आठवल्यांकडे यायचे. टिनूशी बोलायला सुरूवात कशी करायची हा प्रश्नच नव्हता, पण बोलता बोलता डॉक्टरांच्या लक्षात आलं की हा प्रॉब्लेम फक्त एका आठवल्यांच्या घरचा नाही; घरात संगणक, गेमिंग कन्सोल्स असणार्या अनेक मुला-मुलींची स्थिती अशीच असणार आहे. टिनूचं गेमिंग एकवेळ कमी करता येईल पण आपल्या सामाजिक जबाबदारी आणि जाणीवांचं काय? डॉ. तिळवे, आठवले आणि त्यांचे आणखी एक मित्र लाटकर एका संध्याकाळी याच विषयावर गप्पा मारायला लागले. लाटकरांनीही तो खेळ पाहिला आणि संतापाने लाल लाल व्हायला लागले. लाटकर गेली काही वर्ष प्राण्यांवर अत्याचार रोखणार्या स्वयंसेवी संस्थेत काम करत होते.
"तिळव्या, आठवल्या, तुम्हाला दोघांना येवढीही अक्कल नाही. लहान पोरं इथे हिंसेच्या आहारी जात आहेत आणि तुम्हाला त्याबद्दल काहीही वाटत नाही?"
"शांत हो अशोक, हा गेम उपद्रवी आहे हे आम्हाला मान्य आहे. पण याला हिंसा वगैरे म्हणणं जरा अतिच वाटतंय." शरद आठवले म्हणाले.
"ही हिंसा नाही? शरद, तू आत्ता हे म्हणत आहेस. मुलांच्या डोक्यात हिंसेची बीजं अशीच रोवली जातात. आणि शरद, तुझं एक सोड, पण या राजालातरी काही अक्कल? अरे मानसोपचार करतोस ना तू? ही अशी हिंसा टिनूसारखी लहान पोरं हिंसा मानतच नाहीत. पुढे अशा मुलांचेच रामन राघवन होऊ शकतात. विचार करा अरे जरा!" अशोक लाटकरांचा संताप आवरत नव्हता.
"अशोक, तू टोकाला जात आहेस ..." राजा तिळवेंना त्यांचं वाक्यही पूर्ण करता आलं नाही. लाटकर खूप वेळ या दोघांचं बौद्धीक घेतच राहिले, आणि त्या दोघांचीही मतं बदलली आहेत हे लक्षात आल्यावरच अशोक लाटकरांचा आक्रोश कमी झाला.त्या दिवशी तिळव्यांच्या दवाखान्यातून तिघंही बाहेर पडले तेव्हा एक योजना शिजली होती.
क्रमशः
(पुढचा भाग कधी हे विचारल्यास उत्तर मिळणार नाही.)
प्रतिक्रिया
25 Sep 2009 - 8:06 pm | सूहास (not verified)
हुश्श..
दुसरा भाग आला तर...वेळ मिळाला म्हणायच..
तुर्तास ही पोच समजा...
सविस्तर लिहीणारच..
सू हा स...
25 Sep 2009 - 8:08 pm | श्रावण मोडक
पुढे? म्हणजे पुढची सीएल कधी?
25 Sep 2009 - 8:18 pm | विजुभाऊ
जय क्रमशः
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
26 Sep 2009 - 12:06 am | ऋषिकेश
आधीचा भाग जवळ जवळ विसरलोच होतो
इतके दिवस हाच गेम खेळात होतीस वाट्टं ;)
अवांतरः छोटासा भाग दोन आवडला
ऋषिकेश
------------------
रात्रीचे १२ वाजून ०५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक बालगीत "आज हे बंद उद्या ते बंद...."
26 Sep 2009 - 5:45 am | टुकुल
त्या गेमची एक लिंक द्या पाठवुन, पुढचा भाग येइपर्यंत माशा मारतो :-)
--टुकुल.
26 Sep 2009 - 8:32 am | क्रान्ति
घ्या :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
26 Sep 2009 - 9:26 am | दशानन
ईवलासा भाग दोन आवडला X(
***
राज दरबार.....
26 Sep 2009 - 10:21 am | सूर्य
भाग आवडला.
सीएल मिळालेली दिसते आहे. ;)
पुढची सीएल सुद्धा लवकरच मिळो.
- सूर्य.