फक्त तूझ्यासाठी

प्रभो's picture
प्रभो in जे न देखे रवी...
24 Sep 2009 - 6:04 pm

ह्या काही चारोळ्या मी तिच्यासाठी लिहिल्या होत्या...पण तिला सांगण्याची वेळच आली नाही .....
जाउद्या मंडळी..ते पुन्हा कधीतरी...

१. पारिजातक

सकाळ सकाळ अंगणात
पडतो पारिजातकाचा सडा जसा|
रांगोळी काढताना तुला पाहिलं
जीव झाला माझा वेडा तसा ||

२. तिळ

तू जवळ असलीस
की पडतं चंद्राचं चांदणं |
चंद्राचा डागच मला जास्त आवडतो
म्हणून तर तुझ्या गालावरच्या तिळाला न्याहाळणं ||

३. असणे-नसणे

तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस |
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस ||

४.वाट

वाट बघत माझी
होतीस उभी तू स्टॉपवर |
मुद्दामच उशीर केला
जीव जडलाय तुझ्या लटक्या रागावर ||

५. शॉपिंग

तुझ्यासोबत शॉपिंगचा
येतो कधी कधी कंटाळा |
शॉपिंग तर बहाणा आहे
तुच माझा विरंगुळा ||

६. सिनेमा

सिनेमाची तिकिटं काढलीयत दोन
तू येशील ना??? |
कोपर्‍यातील सीट आहे
एक गोड गोड पापा देशील ना??? ||

- (फक्त तिचाच) प्रभो...

(आवडलं नाही तर जोड्याने हाणा..पण चप्पल नको...)

शृंगारहास्यचारोळ्याप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

दशानन's picture

24 Sep 2009 - 6:15 pm | दशानन

>>> जोड्याने हाणा..

या इकडं ... इच्छा पुर्ण करु =))

*

बाय द वे,

लै भारी रे...

तू समोर असतेस
तेंव्हा बोलू देत नाहीस |
तू समोर नसतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस ||

क्लास !

***
राज दरबार.....

प्रभो's picture

24 Sep 2009 - 6:42 pm | प्रभो

इथे जोड्याने चा अर्थ तू आणी तुझी ती अश्या जोड्याने हाणा असा आहे ....(ह. घे.)

--प्रभो

दशानन's picture

24 Sep 2009 - 7:34 pm | दशानन

हो बालका... तुझी ही इच्छापण मी पुर्ण करेन हो लवकरच ;)

***
राज दरबार.....

विशाल कुलकर्णी's picture

25 Sep 2009 - 9:38 am | विशाल कुलकर्णी

प्रभोभौ..... रागावु नका, अतिक्रमण करतोय :-)

१. जगण्यासाठी जगणार्‍यांना
कसकसले आधार मिळतात
माझ्या मात्र प्राजक्ताची फुलेही
दुसर्‍याच्या अंगणात पडतात ?

२. तु जवळ असलीस की
चांदणं नकोसं होतं
फुलांचं काय घेवुन बसतेस
डागांचंही ओझं होतं !

३. तु असताना
बोलणेच खुंटते
तु नसताना
झोपही जागते !

४. तुझं वाट बघणं
माझं उशीरा येणं
वेड लावुन जातं गं
तुझं लटकं रागावणं !

सद्ध्या एवढेच बास्स बॉस ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आमची वख्खई...ती पण २ लाडूंची

१. आधाराने जगणार्‍यांची
पडतात फुले दुसर्‍या अंगणी
ईच्छा असते चंद्राची
पण हाती लागते चांदणी

२.फुला-चांदणीचं काय घेउन बसलायस
असता अप्सरा समोर
पण साला ईश्क कमिना म्हणतोय
ये दिल मांगे मोअर (आम्ही ही&ही च हो....)

-----------------------------------------------------------------------
अवांतरः ११ ची सिध्धेश्वर पकडायचीय....निघतोय हापिसातून....बाकिचे गुलामचोर-मुंगूस नंतर... :)

परिकथेतील राजकुमार's picture

24 Sep 2009 - 7:44 pm | परिकथेतील राजकुमार

सिनेमाची तिकिटं काढलीयत दोन
तू येशील ना??? |
कोपर्‍यातील सीट आहे
एक गोड गोड पापा देशील ना??? ||
---------------------------------------------
वाह ! आपली चरण कमळे कुठे आहेत ? इतक्या हिन आणी हिणकस + अश्लील दर्जाच्या चार ओळी फक्त तुलाच सुचु शकतात कारण शेवटी तु टार्‍याचा मित्र.

बाकी प्रामाणीक मत म्हणजे वरच्या ओळी वाचुन 'कुबेरानी दर्शन दिल्यावर त्याला शंभर सुट्टे आहेत का?' असे विचारल्या सारखे वाटले.

=)) =))

©º°¨¨°º© पराभो ©º°¨¨°º©
आमचे राज्य

टारझन's picture

24 Sep 2009 - 9:40 pm | टारझन

तू समोर नसतेस (फोनवर)
तेंव्हा बोलू देत नाहीस |
तू समोर असतेस
तेंव्हा झोपू देत नाहीस ||

हे असं हवं बे ...चोच्या .... काय शिकलास कॉलेजात ?
आणि हो ... चारोळ्या मनुका झकास

-(प्रभोश्रीचा मित्र) टार्‍या भयंकर

प्रभो's picture

25 Sep 2009 - 1:10 am | प्रभो

टारू,

लिखनेके आणी करनेके चारोळे (का चाळे???) अलग हाय ना अपनके...!!!

(टार्‍याचे सल्ले मानणारा) प्रभो

अवलिया's picture

24 Sep 2009 - 7:45 pm | अवलिया

सिनेमाची तिकिटं काढलीयत दोन
तू येशील ना??? |
कोपर्‍यातील सीट आहे
एक गोड गोड पापा देशील ना??? ||

येवढ्या लहान पोरीला नेवु नाही पिच्चरला... पिच्चर पहातांना रडतात.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Sep 2009 - 7:56 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत आहे.

नाना दोन वेळा 'चाईल्ड अ‍ॅब्युजच्या' गुन्ह्याखाली आत जाउन आला असल्याने त्याचा हा अनुभव नक्कीच लक्षात घेण्या योग्य आहे.

इंस्पेक्टर कपांउंडर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

दशानन's picture

24 Sep 2009 - 7:58 pm | दशानन

=))

च्यामायला सगळे हलकट आहात महा =))

***
राज दरबार.....

प्रभो's picture

24 Sep 2009 - 8:00 pm | प्रभो

+१
--(नाना जॅक्सन चा ऐ सी (अमेरिकन फ्यान))प्रभो

अवलिया's picture

24 Sep 2009 - 8:03 pm | अवलिया

च्यामारी ... हलकट... तुझ्या "मागे" आता शोधपत्रकारच पाठवतो.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक's picture

24 Sep 2009 - 8:17 pm | श्रावण मोडक

ते वयंच तसं असतं हे दाखवणाऱ्या चारोळ्या. ;)

मिसळभोक्ता's picture

25 Sep 2009 - 4:40 am | मिसळभोक्ता

ह्या काही चारोळ्या मी तिच्यासाठी लिहिल्या होत्या...पण तिला सांगण्याची वेळच आली नाही .....

जे काही झालं, ते तुझ्या भल्यासाठीच झालं आहे, असं समज.

-- मिसळभोक्ता

दशानन's picture

25 Sep 2009 - 8:30 am | दशानन

>जे काही झालं, ते तुझ्या भल्यासाठीच झालं आहे, असं समज.

बिचारी वाचली ह्या जाचातून :P

***
राज दरबार.....

विलास आंबेकर's picture

25 Sep 2009 - 8:16 pm | विलास आंबेकर

प्रभुजी,
तुम्ही महान आहात हे काय सांगायला पाहिजे काय?
पण मला एक सांगा राव, अश्या चारोळ्यां सारख्या आठोळ्या,बारोळ्या वगैरे पण असतात का?
त्या पण एकदा ऐकवा की राव!

>>आठोळ्या,बारोळ्या वगैरे पण असतात का?

असतात ना....ऐकवू त्याही कधीतरी....त्या फक्त महिना - पंधरवड्यात एकदाच प्रसवतात.... सो त्याची फ्रिक्वेंसी कमी ... :)

बाकी तुम्हाला एकोळ्या हव्या असतील तर टार्‍या आणी धम्या(परवाच खव मधे एकोळ्या झाल्यात..आता साफ असतील) ला भेटा.....
-----------------------------------------------------------------------------------
अवांतरः धम्याचा नवीन लेख येतोय २ ऑक्टो. साठी ....नाव आहे "असहकार आंदोलन २००९"....अधिक माहितीसाठी धम्याला अथवा मला व्यनी करा...