डॉ. खान यांचे शास्त्रीय गायन कीं जगाला गुमराह करण्याचा कट?

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
21 Sep 2009 - 3:56 pm

प्रख्यात पाकिस्तानी शास्त्रज्ञ (व पाकिस्तानच्या अणू बॉम्बचे पिताश्री) डॉ. अब्दुल कादीर खान यांचे स्वत:च्या पत्नीला लिहिलेले पत्र प्रसिद्ध झाल्यापासून ते सध्या एकाद्या मैनेप्रमाणे गात आहेत (ज्याला आंग्लभाषेत singing like a canary असे म्हणतात)! कारण ’जब चिडियाही चुग गयी खेत’, गपा बसून काय फायदा?
पण ते जे सांगत आहेत ते खरे आहे का? कीं नव्या "बोलवित्या धन्या"च्या इशार्‍यानुसार जाणून बुजून असत्ये व अर्धसत्ये (पुन्हा एकदा) प्रकाशित करून सार्‍या जगाची व विशेषतः अमेरिकेची (शामकाका-Uncle Sam) मुद्दाम दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे?
एका बाजूने ते सांगतात की पाकिस्तानने चीनला हांझाँग येथे सेंट्रीफ्यूज मशीनरी बसवून दिली व त्याबदली चीनने पाकिस्तानला अणूबॉम्ब बनवायची सर्व माहिती (blueprints), ५० किलो शुद्धीकृत (संपन्नीकृत-enriched) युरेनियम, दहा टन UF6 (नैसर्गिक) व पाच टन ३ टक्के अशुद्धता असलेले UF6 या गोष्टी दिल्या. (UF6 म्हणजे युरेनियम हेक्झाफ्लुओराईड. हा पदार्थ शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतला कच्चा माल आहे.)
जेंव्हा पाकिस्तानने अणूचाचणी केली तेव्हा एक विनोदी किस्सा सांगितला जायचा की चीनने दिलेली सर्व माहिती व आकृत्या/आराखडे मँडॅरिन भाषेत व लिपीत होते व त्याचे आंग्ल लिपीत व आंग्ल भाषेत भाषांतर करायला महिनोंमहिने लागले. नाही तर पाकिस्तानने अणूचाचणी खूप आधीच केली असती!
डॉ. खान यांच्या गौप्यस्फोटानंतर या विनोदात थोडी सत्यता असेल असे वाटू लागले आहे.
पण मला तर ही मुद्दाम सर्व जगाची हेतुपुरस्सर दिशाभूल करण्याची चाल आहे असे वाटते. कारण पाकिस्तानला चीनकडून नव्हे तर अमेरिकेकडून रेगन व बुश-४१ च्या कारकीर्दीत (१९८० ते १९९२ दरम्यान) अणूबाँब बनविण्याचे तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री बेकायदेशीररीत्या दिली गेल्याची माहिती अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. श्री. रिच बार्लो नावाच्या सदद्विवेकबुद्धीची टोचणी असलेल्या ’सीआयए’च्या एका तज्ञांनी याबद्दल गौप्यस्फोट करून "शामकाकां"ची (Uncle Sam) चांगलीच खप्पामर्जी ओढवून घेतली होती व त्यापायी स्वत:चे प्रचंड प्रमाणावर आर्थिक नुकसानही करून घेतले होते हे मी वाचले आहे व या विषयावर लेखनही केले आहे. या त्यांच्या गौप्यस्फोटामुळे श्री बार्लो बुश-४१ व बुश-४३ या दोन्ही पिता-(कु)पुत्रांच्या काळ्या यादीत (Blacklist मध्ये) होते व बुश ४३ यांनी प्रे. क्लिंटनने देऊ केलेली १० लाख डॉलर्सची श्री. बार्लो याना देऊ केलेली नुकसानभरपाईही त्यांना आजवर मिळू दिलेली नाहीं.
"Nuclear Deception: The Dangerous Relationship Between the United States and Pakistan (Oct 14, 2008)" या ऍड्रियन लेव्ही व कॅथी स्कॉट्-क्लार्क लिखित पुस्तकात बार्लोचेच नव्हे तर अख्ख्या अमेरिकेचे व तिच्या भावी पिढ्यांचे रेगन व बुश्-४१ या दोन राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीतील त्यांच्या खास "ससाणे" जातीच्या (hawks) मंत्री-मंडळातल्या सहकार्‍यांनी व वरिष्ठ सल्लागारांनी प्रतिनिधीगृहातील समित्यांसमोर खोट्या साक्षी देऊन कसे नुकसान केले याची माहिती आहे. तसेच ऍड्रियन लेव्ही व कॅथी स्कॉट्-क्लार्क यांच्या गार्डियनमधल्या लेखात व इतरत्रही याबद्दल खूप माहिती आहे.
मग आता अ. का. खान यांच्या गायनाचा हा उद्रेक त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीच्या (?) टोचणीमुळे आहे की नव्या "बोलवित्या धन्यां"च्या नव्या चालीवर नवे गाणे गायला ते "कुछ चंद टुकडोंके लिये" तयार झाले आहेत? कीं त्यांना पुन्हा एकदा ब्लॅकमेल करण्यात येत आहे?
हा गौप्यस्फोट डॉ. खान यांनी डिसेंबर २००३ साली आपल्या डच पत्नीला लिहिलेल्या पत्रांच्या अलीकडील प्रकाशनामुळे झालेला आहे. गंमत अशी की त्यात डॉ. खान यांना इराण, उत्तर कोरिया व लिबियासारख्या बदनाम राष्ट्रांना (rogue nations) अणूतंत्र देण्याबद्दलचे आदेश ज्यांनी दिले असा आरोप केला गेला आहे ते दोघेही (बेनझीर भुत्तो व ज. इम्तियाझ हे तिचे संरक्षणविषयक सल्लागार) आज हयात नाहींत. हा रिपोर्ट श्री सायमन हेंडरसन याना २००७ साली मिळाला पण ते दोन वर्षे का थांबले? बेनझीर यांच्या निधनालाही आता ९-१० महिने झाले आहेत.
हा "शामकाकां"च्या (Uncle Sam) सध्याच्या राष्ट्रपतींची (ओबामा))दिशाभूल करण्याचा डाव तर नाहीं?
अमेरिकेनेच नव्हे तर आपणही याबाबतीत भोळेपणा केला तर तो आपल्यालाच भोवेल हे लक्षात ठेवावे हे बरे.
सुधीर काळे

राजकारणप्रकटनप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

The book referred by me
सध्या जे पुस्तक मी वाचतो आहे ते संपत आले आहे (The Fall of the House of Bush: The Untold Story of How a Band of True Believers Seized the Executive Branch, Started the Iraq War, and Still Imperils America's Future by Craig Unger) व ते संपले की हे वर लिहिलेले 'Nuclear Deception'वरचे पुस्तक वाचायला घेणार. पण त्यातला बार्लोच्या गोष्टीशी संलग्न असलेला भाग मी वाचलेला आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विकास's picture

21 Sep 2009 - 9:02 pm | विकास

अमेरिकेनेच नव्हे तर आपणही याबाबतीत भोळेपणा केला तर तो आपल्यालाच भोवेल हे लक्षात ठेवावे हे बरे.

आपला भोळेपणा आपल्याला भोवणार अमेरिकेचा अमेरिकेस... त्यांची काळजी करायची गरज नाही. तत्कालीन अमेरिकन सरकारने पाकीस्तानकडे कानाडोळा केला असेल पण मदत केली असेल हे विशेषतः पटत नाही. ते असले दुधखुळे नाहीत. भारताचे मधल्या काळात (म्हणजे नेहरूंपेक्षाही अधिक इंदिरा गांधींच्या काळात), कारणे अनेक असू शकतील पण, अलीप्तता हा शब्द वापरत रशियाशी घनिष्ठ संबंध होते. तरी देखील आपण अमेरिकेस अथवा एकंदरीतच भांडवलशाही देशांपासून राजनैतिक दृष्ट्या दूर नव्हतो. त्यामुळेदेखील अमेरिकेस भारताकडून (आणि ते ही विकसशीलतेत अजून पुढे जाण्याच्या तयारीतच असलेल्या तत्कालीन भारताकडून) अण्वस्त्रांचे स्पष्टपणे भय नव्हते. तसेच पाकीस्तानवर इतका विश्वास ठेवला असेल हे देखील पटत नाही. मात्र चीन याबाबत वेगळा होता आणि आहे. त्यामुळे खरी काळजी चीनमूळेच तयार झाली...

एका बाजूने ते सांगतात की पाकिस्तानने चीनला हांझाँग येथे सेंट्रीफ्यूज मशीनरी बसवून दिली व त्याबदली चीनने पाकिस्तानला अणूबॉम्ब बनवायची सर्व माहिती (blueprints), ५० किलो शुद्धीकृत (संपन्नीकृत-enriched) युरेनियम, दहा टन UF6 (नैसर्गिक) व पाच टन ३ टक्के अशुद्धता असलेले UF6 या गोष्टी दिल्या. (UF6 म्हणजे युरेनियम हेक्झाफ्लुओराईड. हा पदार्थ शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतला कच्चा माल आहे.)

बायकोला लिहीलेले पत्र म्हणण्यापेक्षा किराणामालाच्या यादी सारखे वाटले. :-) वास्तवीक असे काही असल्या कारभारात लेखी लिहीले जात नाही हे खान ना माहीत नसेल, यावर विश्वास नाही. अर्थात त्यामुळे कारणे अनेक असू शकतात आणि तर्क देखील. :)

सुधीर काळे's picture

22 Sep 2009 - 8:19 am | सुधीर काळे

या विषयावर मी केवळ अपघातापोटी (accidentally) खूप वाचले आहे.
शीतयुद्धाचा उच्चतम काळ (peak hours) व यूएसएसआरचे विघटन या दोन्ही गोष्टी रेगनच्या काळात झाल्या. Peak hoursच्या काळात रशियन सैन्य अफगाणिस्तानात थयथयाट करीत असतांना पाकिस्तानला अण्वस्त्रक्षम बनवून पाकिस्तानी भूमीवर साइलोज (silos) मध्ये ठेवलेली ही अण्वस्त्रे रशियावर डागण्याच्या कल्पनेने जोर धरला. (Star Wars अस्त्रांची कल्पनाही याच काळची).
अमेरिकेने साठ F-16 लढाऊ विमाने अण्वस्त्र-वाहन-क्षम बनवून पाकिस्तानला दिली होती/विकली होती.
रेगनच्या अनेक उच्च/वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाकिस्तानला अण्वस्त्रक्षम करण्यात सक्रीय भाग घेतला होतायाची माहिती मी चढविलेल्या पुस्तकात भरपूर detailsसकट आहे. म्हणूनच कदाचित खरी असावी. त्यात कागदपत्रांच्या फोटोकॉपीज, अमेरिकेतून पाकिस्तानला जाणारा प्रतिबंधित (prohibited) माल कसा हाँगकाँगमधून re-route व्हायचा, कॅनेडियन पाकिस्तान्यांचा वापर करून prohibited माल कसा ऑर्डर व्हायचा, या पाकिस्तान्याला रिच बार्लोने कसे सापळा रचून पकडून दिले, त्या पाकिस्तान्याला तुरुंगवासही झाला, स्टेट डिपार्टमेंट व पेंटॅगॉनकडून सापळ्याच्या माहितीची tip मिळाल्याने पाकिस्तानी सैन्यातला सेवानिवृत अधिकारी (देवमासा-big fish) कसा निसटला असे अनेक पुरावे दिले आहेत.
रेगन हा hands-off President मानला जातो. धोरणाचा आराखडा सांगून तो बाजूला होत असे. म्हणूनच इराण-काँट्रा भानगडीत त्याने "मला काही माहीत नव्हते" असे जे टॉवर्स कमिशनला सांगितले ते खरे असावे .(नावाबद्दलची चूक-भूल द्यावी-घ्यावी)
नंतर रेगनला अल्झाइमरचा आजार झाला होता हे जाहीर करण्यात आले. त्याची लागण त्याच्या दुसर्‍या टर्ममध्यलेतर झाली नव्हती?
बायकोला लिहिलेले पत्र त्याने जिवाच्या भीतीने लिहिलेले होते. त्याचे काही बरे-वाईट होऊ घातल्यास त्याने एक संरक्षक भिंत निर्माण करायचा प्रयत्न केला होता. म्हणूनच ती वाण्याच्या सामानाची यादी नसावी. स्वतःच्या पाकिस्तान एअर्लाइन्समधील नातेवाइकातर्फे ते पत्र त्याने त्याच्या पत्नीला (हेनीला) लिहिले होते.
जाता-जाता: पाकिस्तानी सरकार आज ना उद्या तालीबानच्या हातात पडेलच. (जसे गाझा पट्टीत हमास निवडून आले आहे तस्सेच). त्यानंतर ही अण्वस्त्रे भारताकडे डागण्याच्या आधी अमेरिकेवर डागली जातील यात मला तरी शंका वाटत नाहीं. भारताचा उपयोग नेमबाजीचा सराव करण्यासाठी (target practice म्हणून) केला गेल्यास भारताचा नंबर आधी लागेल.
तरी होश्शियाsssssssर!
या लिंक्स वाचा:
(१) http://tinyurl.com/lyualc किंवा http://timesofindia.indiatimes.com/news/world/pakistan/AQ-Khan-nails-Pak...
(२) http://tinyurl.com/n9hksu
http://story.northkoreatimes.com/index.php/ct/9/cid/d805653303cbbba8/id/...
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

आणी ती पाकिस्तानने बसवुन दिली म्हणजे काय म्हणायचे? पाकिस्तान चीन पेक्षा विकसित देश आहे का?

वेताळ

सुधीर काळे's picture

22 Sep 2009 - 7:34 am | सुधीर काळे

माझ्या मते डॉ खान यांनी तंत्रज्ञान अनेक राष्ट्रांकडून, मुख्यत: जर्मनी व अमेरिका या पाश्चात्य राष्ट्रांकडून, चोरले/मिळवले. चीनला हे तंत्रज्ञान फक्त रशियाकडून मिळाले. कदाचित पाश्चात्य तंत्रज्ञान अधीक प्रगत असेल व म्हणून चोरीचा ("पायरेटेड") माल चीनने बसवून घेतला असेल! (विकास यांच्या प्रतिक्रियेवरची नूतनतम टिप्पणी पहा)
पण हा केवळ तर्क आहे.
गमतीची गोष्ट अशी कीं डॉ. खान यांच्या या "गायना"च्या बातमीची दखल फक्त भारतीय वृत्तपत्रांनी घेतली आहे. डॉन व डेली टाईम्स या पाकिस्तानी दैनिकांच्या वेबसाईटवर "सर्च" वापरून पाहिले असता डॉ. खान यांच्या गृहकैदेची, म्हणजे कैद झाल्याची व त्यांना हायकोर्टाने मुक्त केल्याची बातमीच नवीनात नवीन आहे. तसेच""सीएनएन"च्या वेबसाईटवरही ती अद्याप नाहीं.
बघू आज-उद्या येते का!
सेंट्रीफ्यूज म्हणजे एकादा द्रवपदार्थ स्वतःभोवतीच वेगाने फिरवू शकणारी यंत्रसामुग्री. (कदाचित वायूमाध्यमालाही वापरता येत असेल?)
द्रवपदार्थ वेगाने स्वतःभोवती फिरविला कीं एक खोल भोवरा निर्माण होतो. जड पदार्थ या भोवर्‍याच्या मध्यात जमा होतात व हलके पदार्थ परीघाजवळ फिरत रहातात. असा भोवरा निर्माण करून त्यात हळू-हळू द्रवपदार्थ घालत गेल्यास परीघाजवळचा द्रवपदार्थ कडेवरून वाहून बाहेर जातो (overflow). तो शुद्ध असतो. याउलट भोवर्‍याच्या मध्यात खोलवर असलेला जड पदार्थ सेंट्रीफ्यूजमधेच रहातो व तळाला जातो. अशा तर्‍हेने द्रवपदार्थाचे पृथःकरण करता येते.
स्टीलप्लांट्स मध्ये असे सेंट्रीफ्यूज तेल-पाणी मिश्रणातून तेल वेगळे करून पुनर्वापरासाठी (recycle) करण्यासाठी सर्रास वापरतात. तसेच पाणी व मिलस्केलच्या (mill scale) मिश्रणातून मिलस्केल वेगळे करून पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठीही सेंट्रीफ्यूजेस खूप वर्षांपासून वापरात आहेत.
अण्वस्त्रांबद्दल सांगायचे तर युरेनियमचे शुद्धीकरण/संपन्नीकरण (enrichment) करण्यासाठी सेंट्रीफ्यूजेस वापरली जातात. माझ्या वाचनात जे आले आहे त्यानुसार ही शुद्धीकरणाची/संपन्नीकरणाची प्रक्रिया अण्वस्त्र बनविण्यातील एक मोठे पाऊल मानले जाते. टॉम क्लॅन्सीच्या एका पुस्तकात अणूबाँब बनविण्याबद्दल 'बक्कळ' माहिती आहे, अगदी "जनता भाषेत" (layman's language). आता नाव आठवत नाही, पण नंतर पाहून सांगतो.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सहज's picture

22 Sep 2009 - 7:46 am | सहज

> डॉ खान यांनी तंत्रज्ञान अनेक राष्ट्रांकडून, मुख्यत: जर्मनी व अमेरिका या पाश्चात्य राष्ट्रांकडून, चोरले/मिळवले.

खान हॉलंड मधे होते व तेथुन चोरले असे वाचले आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Abdul_Qadeer_Khan#Work_in_the_Netherlands

In December 1975, after having stolen the gas centrifuge blueprints, Khan suddenly left the Netherlands; he returned to Pakistan in 1976.
The former Dutch Prime Minister, Ruud Lubbers, said in early August 2005 that the Government of the Netherlands knew of Khan "stealing" the secrets of nuclear technology but let him go on at least two occasions after the CIA expressed their wish to continue monitoring his movements.

सुधीर काळे's picture

22 Sep 2009 - 1:56 pm | सुधीर काळे

हॉलंडहूनही असू शकेल. पण जर्मनीचेही अनेक उल्लेख आहेत पण मुख्यतः प्रतिबंधित सामानाच्या आयातीबाबत.
पण मुख्य मुद्दा हा होता की रशियाकडून मिळालेल्या तंत्रज्ञानापेक्षा युरोपियन /अमेरिकन तंत्रज्ञान जास्त अद्ययावत असेल म्हणून चीनने ते घेतले असेल!
तुम्ही उल्लेखल्याप्रमाणे CIA ने मध्ये पडून जर डॉ. खानला वाचवले असेल तर त्यावरून अमेरिकेला पाकिस्तानला अण्वस्त्रधारी करण्यात बरीच कळकळ, स्वारस्य, गोडी होती हे उघडपणे दिसते!
मी उल्लेखलेले पुस्तक जरूर वाचावे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

आनंद घारे's picture

22 Sep 2009 - 11:07 am | आनंद घारे

सेंट्रीफ्यूज म्हणजे एकादा द्रवपदार्थ स्वतःभोवतीच वेगाने फिरवू शकणारी यंत्रसामुग्री. (कदाचित वायूमाध्यमालाही वापरता येत असेल?)
द्रवपदार्थ वेगाने स्वतःभोवती फिरविला कीं एक खोल भोवरा निर्माण होतो. जड पदार्थ या भोवर्‍याच्या मध्यात जमा होतात व हलके पदार्थ परीघाजवळ फिरत रहातात. असा भोवरा निर्माण करून त्यात हळू-हळू द्रवपदार्थ घालत गेल्यास परीघाजवळचा द्रवपदार्थ कडेवरून वाहून बाहेर जातो (overflow). तो शुद्ध असतो. याउलट भोवर्‍याच्या मध्यात खोलवर असलेला जड पदार्थ सेंट्रीफ्यूजमधेच रहातो व तळाला जातो. अशा तर्‍हेने द्रवपदार्थाचे पृथःकरण करता येते.

अशा प्रकारची यंत्रे साखर कारखान्यात वगैरे असतात.
नैसर्गिक युरेनियममध्ये यू२३५ हा आयसोटोप अत्यल्प प्रमाणात म्हणजे फक्त ०.७ टक्के एवढाच असतो आणि फक्त तोच अणुबाँबच्या उपयोगाचा असतो. सामान्य रासायनिक प्रक्रियेतून तो वेगळा करता येत नाही. त्यासाठी गॅस डिफ्यूजन व सेंट्रिफ्यूज या खास पद्धतींचा उपयोग केला जातो. सार्वजनिक सुरक्षिततेच्या कारणांमुळे या तंत्रज्ञानाबद्दल कमालीची गुप्तता बाळगली जाते.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

हेल्लो आनंद!
तू BARCचा well-decorated scientist आहेस हे विसरलोच होतो मी!
बरे झाले! या विषयावर तुझ्याशी चर्चा करायला आवडेल!
मिपावरील मित्रांसाठी: श्री आनंद घारे माझ्या गावचे (जमखंडीचे) व माझ्या शाळेतले आहेत. आमचे वडीलही खूप जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांना एकेरी नावानेच संबोधावेसे वाटले. अहो-जाहो केल्यास चुकले असते कदाचित.
आनंद, तूही मला एकेरीतच संबोधावेस. अशी माणसे मला हल्ली क्वचितच भेटतात!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

आनंद घारे's picture

23 Sep 2009 - 6:36 pm | आनंद घारे

शाळेत असतांना मी तुला याच नावाने हाक मारत असे. आता आपण दोघेही 'ज्येष्ठ नागरिक' झालो असलो तर काय झाले?
हे ' अवांतर' झाले. चांदणीवाले नजर ठेऊन असतील!
तुझा चर्चाविषय चांगला आहे, पण या विषयावरील ऑथेंटिक माहिती कधीही जाहीर केली जात नाही आणि तर्ककुतर्कांना अंत असत नाही. खानसाहेबांनी इथून माहिती घेतली असेल किंवा तिथून आणि याला दिली असेल किंवा त्याला हे आपल्याला समजले तरी त्याने काय फरक पडणार आहे?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

सुधीर काळे's picture

23 Sep 2009 - 7:30 pm | सुधीर काळे

Absolutely!
Thanks a lot, Anand.
तू म्हणतोस ते खरे आहे. पण जर डॉ. खानने अशी माहिती दिली असेल तर ती पाकिस्तान सरकारच्या परवानगीशिवायच काय पण सरकारच्या सांगण्यावरून /आज्ञेवरूनच दिली असणार. मग या उघडकीला आलेल्या पत्रामुळे पाकिस्तानचे (उरले-सुरले) पितळ बाहेर पडेल. मुख्य म्हणजे "कोल्होबा" मुशर्रफ यांचे बर्‍यापैकी मुंडन होईल!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

पर्नल नेने मराठे's picture

22 Sep 2009 - 2:00 pm | पर्नल नेने मराठे

मी हे असे काहितरी केमेस्त्रित केलय असे वाट्तेय :B
चुचु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2009 - 10:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा लेख, त्याचं शीर्षक नक्की कोणत्या भाषेत आहे? वाचण्यासारखा विषय असला तरी इंग्रजी आणि उर्दू-हिंदीच्या प्रभावाखाली असलेल्या मराठीमुळे झोप आली ... सबब लेख वाचला नाही, त्यामुळे अवांतराचं बीज टाकून जात आहे!
(इंग्लिश वाक्प्रचारांचं सरळसरळ भाषांतर, गुमराह करण्याचा कट वगैरे वाक्यरचना ... ही कोणती भाषा आहे? यापेक्षातर मटाचं मराठी बरंच कंटेंपररी असतं.)

अदिती

सुधीर काळे's picture

24 Sep 2009 - 9:25 pm | सुधीर काळे

समझनेवाले समझ गये हैं! (पुन्हा हिंदी!)
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

"अ‍ॅटम बाँब"वरील मी ज्या पुस्तकाची प्रशंसा करत होतो ते पुस्तक आहे: 'The Sum Of All Fears'. या पुस्तकात इस्रायलचा (माझी स्मरणशक्ती बरोबर असेल तर) "योम किपुर" युद्धात शत्रूवर "टाकलेला पण न फुटलेला" अ‍ॅटम बाँब मध्य-पूर्वेतील कांही दुष्ट लोकांच्या हाती लागतो. काळ्याबाजारामार्गे काम करणार्‍या (डॉ. खानसारख्या म्हणायचा मोह टाळता येत नाही) एका टोळीचा वापर करून या दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती स्वतः अ‍ॅटम बाँब बनवायचा कसा प्रयत्न करतात त्याची ही गोष्ट. अ‍ॅटम बाँब कसा बनविता येतो याचे अतीशय सोप्या भाषेत पण छान वर्णन यात केलेले आहे. त्यांचा मनसुबा हा बाँब अमेरिकन भूमीवर डिटोनेट करावयाचा असतो.
अतीशय वाचनीय पुस्तक.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

ज्या लेखावरून सध्याचा गदारोळ सुरू झाला तो सायमन हेंडरसन यांचा संडे टाइम्स मधील लेख वाचण्यासाठी उघडा: http://tinyurl.com/mm3ll6 ही लिंक
किंवा ही लिंक
http://www.timesonline.co.uk/tol/news/world/asia/article6839044.ece
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.