एका लग्नाची गोष्ट..भाग ३

प्रभो's picture
प्रभो in जनातलं, मनातलं
20 Sep 2009 - 3:26 am

मागील भाग
एका लग्नाची गोष्ट
एका लग्नाची गोष्ट..भाग २

रात्री झोपचं लागेना..झोप नाही की नेहमी चा उतारा काढला...दुनियादारी वाचायला घेतली..पण पूर्ण वाचू शकलो नाही...मधेच थांबलो...विचार आला कि आपण करतोय आपल्या दोस्ताला मद्त ...त्यला नोकरीला लागून फक्त ४ महिने झालेत.... त्याचा 'मनिष भालेराव' तर नाही न होणार???
-------------------------------------------------------------------------------------
शेवटी मनाची समजूत घातली ..
कसला मनिष भालेराव अन काय????? तसलं काही होणार नाही...त्या वेडझव्याला तर नोकरी पण नव्हती, शिकतच होता अजून.याला ती (नोकरी आणी छोकरी दोन्हिपण) तरी आहे.

पण इकडे माझी पंचाईत झालेली...सुश्याच्या लग्नाच्या घाई-गडबडी मधे मी हेच विसरलो होतो कि माझ्या घरमालकाने घर खाली करायची नोटीस दिली आहे ती पण चक्क एक महिन्यापूर्वीच.

मग काय...लावला मित्राला फोन. चार बॅगा , कंप्युटर, गादी असं सगळं सामान 'रेफ्युजी कँप' मधे नेऊन टाकलं.

लग्न एक आठवड्यावर आलेलं. सगळी तयारी करायची होती आजून.सगळ्यांचीच फाटलेली , काय होइल कसं होइल ह्याच्या विचारात.

मी शेवटचा एक आठवडा स्टिफन च्या घरी रहायला जायचं ठरवलं.ठरवलं काय तर रहायला पण गेलो.

आतापर्यंतचे हे झोल फक्त मी, स्टिफन, सुशांत, प्रिया आणी स्टिफन आणी माझ्या घरचे ह्यांनाच फक्त माहीती होते. आम्ही आजून मदतीचे हात गोळा करायचं ठरवलं.

धपाधप कॉलेज 'कट्टा गँग'ला (ह्याला आम्ही मंडळ पण म्हणतो) फोन गेले.
आमचा 'कंपू' साधारण दहा-बारा जणांचा होता...एकूण एक कंपू सडाफटिंग..
तीन जणं सोडले तर कोणालाच 'गर्लफ्रेंड' नाही..आणी ग्रूपमधे एकपण मुलगी नाही..असा हा कंपू.

सुशांत आणी प्रिया यांची भेट पहिल्यांदा झालेली C++ च्या शिकवणीत. त्याच शिकवणीत त्यांचा एक मित्र होता, त्याला आणी प्रियाला सोबत कोणीतरी असावं म्हणून एका मैत्रीणीला बोलावणं धाडलं.

दुसर्‍या दिवशी प्रिया युनिव्हर्सिटी मधे फॉर्म भरायच्या नावाखाली तिची सगळी कागदपत्रे घरातून काढून आमच्याकडे देऊन गेली.

आता या सगळ्या खेळाचा रंगतदार भाग सुरू हॉणार होता...
मी आणी स्टिफननी त्याच दिवशी संध्याकाळी जाऊन प्रियाच्याच घरासमोरच्या एका ट्रॅव्हल एजंट कडून लग्नाच्या दिवसभरासाठी गाडी बूक करून घेतली.

आता फक्त अर्धचं काम झालं होतं...लग्नाची तयारी तर केली...पण हे लोकं राहणार कुठे?????

'लग्न पहावं करून, आणी घर पहावं बांधून' या म्हणी प्रमाणे आमचा सुश्यासाठी घराचा शोध चालू झाला.

आठ-दहा ठिकाणी फ्लॅट पाहिल्यावर, एक पसंत पडला...तो होता धायरी ला सिंहगड रस्त्याला..फ्लॅट भाड्याने घेउन झाल्यावर फ्लॅटसाठी लागणार्‍या सामानाची पण खरेदी केली..

एक गोदरेज चे कपाट..गॅस्,भांडीकुंडी , गादी (हम्म्म्म..समजलं ना तुम्हाला ) असं गरजेचं सामान खरेदी करून फ्लॅटवर नेउन सेट केलं. ह्या उपद्यापातच दोन तीन दिवस गेले.ह्यासगळ्यासाठी काही मित्रांनी सढळहस्ते मदत केली...मदत अशी कि जिची सगळ्यात जास्त गरज होती.........मनी मनी मनी..

उरलेल्या दोन तीन दिवसात जे काही उरलं सुरलं सेटिंग्ज करायचे होते ते केले..

आणी असाच एके सकाळी तो दिवस उजाडला...५ ऑक्टोबर २००६
मुहुर्त होता सकाळी ११.४० चा..जायचं होतं आळंदीला.

स्टिफन , सुश्या आणी प्रिया एकाच सोसायटीमधे राहत असल्याने स्टिफन ने पडद्यामागून तर मी पडद्यासमोरून सुत्र हालवायचं ठरवलं.

फोन करून गाडी बोलावली ....आळंदीला जाता जाता सगळ्यांना उचललं.
९-९.३० च्या सुमारास आळंदीला पोचलो आम्ही..

प्रिया-सुशांत यांची आणी गुरूजींनी लग्नाची तयारी करण्यात ११ वाजले..
लग्नाचे सर्व विधी चालू झाले...जे सगळं आतापर्यंत भातुकलीच्या खेळासारखं होतं ते सत्यात उतरयला चाललं होतं....दोन जीव एकत्र येणार होते..त्यांच्या जीवनात नवे युग अवतरणार होते....आमची सर्व मित्रांची एकच ईच्छा होती , ती म्हणजे ह्या दोघांनी पुढे सुखाने आणी समजूतदारीने नांदावे...पुढे जाउन यांच्या घरच्यांनी आम्हाला बोलायला नको...."बघा....एवढी घाई होती ना मित्राचं लग्न लावायची....वर्षभर तरी टिकलं का बघा"...

लग्नामधे कन्यादान सुशांत आणी प्रियाच्या C++ च्या शिकवणीतल्या मित्राने केले...तर कानपिळी मी...... (साल्या सुश्यानी आजून पण कानपिळीचा आहेर दिला नाहिये मला)...

लग्न उत्तम लागलं ...गुरूजींनी त्यांच्या कार्यालयाचं एक लग्नाचं प्रमाणपत्र दिले...तसेच सरकारी नमुन्यासाठी साक्षीदार म्हणून २ मित्र आणी मी सह्या केल्या....

आम्ही आळंदी हून निघालो आणी जेवायला निगडीला एका हॉटेलात थांबलो...
तिथे बसून मी आणी स्टिफनने पोलिसांना द्यायच्या निवेदनाचा मसुदा तयार केला..सद्यस्थितीमधे मुलीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार करण्याआधी आमचे निवेदन जाणे गरजेचे होते...जर तक्रार झाली असती..आणी बांबू लागला असता..तर नोकरी न लगलेल्या सगळयांना नोकरी न लगण्याची सजा मिळाली असती.

आमच्या हाताखाली क्वालीस होती जी आम्ही दिवसभर भाड्याने घेतली होती...त्याच गाडीतून दोघांना आम्ही लोणावळ्याला सोडायचे ठरवले...

उरलेल्या सर्व मित्रांना फोनवरून कळवून, जेवण करून टवाळक्या करत करत आम्ही संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान लोणावळ्याला पोहोचलो...

तिथे एका छानश्या हॉटेलात त्यांची सोय केली....तिथूनच सुशांत आणी प्रियाने घरी फोन करून लग्नाची माहिती दिली आणी...दोघांच्या घरच्यांना धकका बसला..(पो़खरणपेक्षा मोठा असावा बहुतेक)

त्यांना तिथे सोडून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो...आता परिक्षेचे क्षण होते माझे अणी स्टिफनचे..सुशांतचे सगळ्यात जवळचे मित्र म्हणून आमचीच शाळा सगळ्यात आधी भरणार होती....

क्रमशः
(पुढील भागात -मांडवली)

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

लवंगी's picture

20 Sep 2009 - 3:34 am | लवंगी

भरलेल्या शाळेच वर्णन वाचायला उत्सुक ..

प्राजु's picture

20 Sep 2009 - 4:15 am | प्राजु

शाळेत कोणाकोणाला किती शिक्षा झाली?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

देवदत्त's picture

20 Sep 2009 - 4:55 am | देवदत्त

ह्म्म.. छान :)

तरीही... गोष्ट लहान वाटतेय. त्यात इतर तपशील आला असता तर आणखी मजा आली असती वाचायला. मध्येच हे सर्व लग्नाचे फोटो पाहताना ऐकलेले वर्णन वाटतेय. ;)

असो...
दुसर्‍या भागात दागिने वगैरे विकत घेताना वाचले तेव्हा वाटले, 'आधीच नोकरी लागून फक्त ४ महिने झालेत, त्यात पळून जाऊन लग्न करणार मग हा खर्च कशाला?' साड्या घेतल्या असे वाचल्यावर वाटले, 'वडिलमाणसांना खूश करण्यासाठी असेल.'

पुढे भरणार्‍या शाळेत ह्या सर्व गोष्टींची उत्तरे मिळतील अशी आशा :)

सुबक ठेंगणी's picture

20 Sep 2009 - 5:47 am | सुबक ठेंगणी

शाळा वाचण्यासाठी उत्सुक! :)

बाकी नुसतंच क्रमशः न लिहिता (पुढील भागात -मांडवली) हे पण आवडलं.

रेवती's picture

20 Sep 2009 - 6:57 am | रेवती

लग्न झालं तर एकदाचं! आयत्यावेळेस कुणी गोंधळ घातला नाही हे एक बरच झालं. पण पुढं काय झालं? दोन भागांमध्ये फारच वेळ लावतोयस. इतक्या वेळात त्यांना नातवंडही होतील.;)

रेवती

श्रावण मोडक's picture

20 Sep 2009 - 1:32 pm | श्रावण मोडक

असंच म्हणणार होतो. 'असा मी' मधलं 'लग्नाला जातो मी...' आठवलं. लिहि रे लवकर. एकदाची मांडवली करून टाक.

स्वाती दिनेश's picture

20 Sep 2009 - 8:17 am | स्वाती दिनेश

पुढील भागातली मांडवली वाचायची उत्सुकता आहे,
स्वाती

दशानन's picture

20 Sep 2009 - 8:41 am | दशानन

लै भारी रे...

पुढे काय झालं :?

लवकर लिही !

***
राज दरबार.....

अवलिया's picture

20 Sep 2009 - 11:50 am | अवलिया

येवु दे रे पुढचे भाग पटापट :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मदनबाण's picture

20 Sep 2009 - 12:31 pm | मदनबाण

(पुढील भागात -मांडवली)
ह्म्म,,, तोडपानी देऊन झाली असेल का मांडवली :?
वाचतोय रे... लवकर लिही पुढचा भाग. :)

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

स्वाती२'s picture

20 Sep 2009 - 5:50 pm | स्वाती२

छान! आता मांडवली लवकर होऊ दे.