सुशांत :"मी आणी प्रियाने पळून जाऊन लग्न करायचं ठरवलंय"
मी:"काय???"
सुशः "हो..आणी तुला साक्षीदार म्हणून यायचय."
मी: "बरं बाबा...मी करेन तुला हवी ती मदत.."
अशा रितीने चालू झाली एका लग्नाची गोष्ट.गोष्ट आहे माझा मित्र सुशांत आणी त्याची प्रेयसी प्रिया यांच्या लग्नाची.
सुशांतने प्रियाला सेकंड ईयर मधे प्रपोज केलेलं...तिचा होकार आला लाष्ट ईयरला.
सुशांत माझा ईंजिनियरींगच्या पहिल्या दिवशी झालेला मित्र...आणी आम्ही जिवलग मित्र कधी झालो ते समजलंच नाही आम्हाला..नुकतीच त्याला ४ महिन्यांपूर्वीच नोकरी लागलेली.
प्रिया त्याच्याच सोसायटीत राहणारी.१ वर्षापूर्वी ती 'हो' म्हणाल्यापासून दोघांच सुरळीत चाल्लेलं.
पण एक मोठा झोल झाला....प्रिया सुशांत पेक्षा १.५ वर्षाने मोठी...सो तिच्या घरच्यांनी तिच्याकरता स्थळं बघायला सुरुवात केलेली.
परिस्थीती काय तर..आमच्या बापड्याला नोकरीला लागून चारच महिने झालेले..पुण्यात स्वत:च घर पण नाही...शिक्षण काकांकडे राहून घेतलेलं. आणी सगळ्यात मोठा अडसर म्हणजे...मुलगी मराठा आणी मुलगा ब्राम्हण.घरचे कसे तयार होणार????
असाच एक दिवस सुशांत चा मला फोन आला.
"काय करोयस?? वेळ असेल तर पटकन एक तासात ए बी सी(अप्पा बळवंत चौक) मधे ये."
ए बी सी मधे आम्ही भेटलो, तर म्हणाला की प्रियाच्या घरच्यांनी तिच्या लग्नाची तयारी चालू केलीय..ती पण त्यांना आता थोपवू शकत नाहिये..मी ३०-४० हजार वाचवलेत...थोडे ऊधार घेउ (अस्मादीक तेंव्हा बेकार होते.. ह्यांचं लग्न लावलं त्याच्या पुण्याईवर ह्यांच्या लग्नाच्या १ महिना आत नोकरीला लागलो)
मी: बरं , आता काय कराचयं??
क्रमशः
(माफी : आज टंकायला जास्त वेळ नसल्याने एव्हढचं...क्षमा असावी .पुढील सगळे भाग मोठे टाकायचा प्रयत्न करीन.)
प्रतिक्रिया
10 Sep 2009 - 3:07 pm | अवलिया
हं
(माफी : आज टंकायला जास्त वेळ नसल्याने एव्हढचं...क्षमा असावी .पुढील प्रतिसाद मोठे टाकायचा प्रयत्न करीन.)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
10 Sep 2009 - 3:16 pm | प्रभो
या यॉर्करने क्लीन बोल्ड झालो
10 Sep 2009 - 4:06 pm | श्रावण मोडक
पूर्ण लिहून झाल्यावर प्रतिसाद टंकतो.
10 Sep 2009 - 4:12 pm | सखाराम_गटणे™
+१
10 Sep 2009 - 8:10 pm | अनिल हटेला
(आळशी)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
10 Sep 2009 - 8:33 pm | बिपिन कार्यकर्ते
पुढचं लिहा लवकर. प्रतिसाद होल्ड वर ठेवला आहे.
बिपिन कार्यकर्ते
10 Sep 2009 - 11:58 pm | संदीप चित्रे
डिट्टो
10 Sep 2009 - 4:56 pm | विशाल कुलकर्णी
लिही रे बाबा लवकर पुढचा आणि शेवटचा भाग !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
10 Sep 2009 - 11:43 pm | प्रभो
कंटाळलास का रे एवढ्या लवकर?
10 Sep 2009 - 6:10 pm | रेवती
वाचते आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे.
रेवती
10 Sep 2009 - 6:15 pm | sujay
पुढील भाग लवकर लिहा, वाचतो आहे.
सुजय
10 Sep 2009 - 6:37 pm | दशानन
ह्म्म्म्म
वाचतो आहे...
10 Sep 2009 - 7:37 pm | प्राजु
त्रोटक!! इतक्यातच कंटाळलात का?
अशा वेगाने गोष्ट लिहिलित तर त्या प्रिया आणि सुशांतच्या मुलांच्या लग्नापर्यंत नक्की पूर्ण होईल. ;)
लवकर लिहा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Sep 2009 - 8:23 pm | टारझन
"कहाणी घर घर की" किंवा "क्यों की .... " लिहायचा विचार करतोय का बे मेल्या? एवढांच कंटाळा असेल तर तुला काही क्लुप्त्या देतो ..
जमतंय का ते पहा ...
युयुत्सु स्टाईल मधे ४-५ शब्द लिहून झाले की नविन ओळीवर लिहायला सुरू कर .. किंवा तेच तेच वेगवेगळ्या अँगलनं कॉपी पेस्ट करून टाक .. इंजिनियरींग ला करायचास नं तस्सं !!
बाकी पुढचे भाग असले फुसके आले तर आपली उघड उघड तासली जाईल ह्याची णोंद घ्यावी प्रभो साहेब ! घाई असेल तर सेव्ह करा कुठे तरी .. गुगलने एवढे पैसे खर्च करून ड्राफ्ट सेव्ह करण्याची सोय उपलब्ध केली आहे .. त्याचा वापर करा !
आणि हो .. लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होत चाल्लाय म्हणून थांबतो बापडा ..
- जंबो