मर्यादा

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
9 Sep 2009 - 8:31 am

रौद्र तांडवे अंगे घुसळीत
चंद्रमोहीत श्वासा सोडीत
युगायुगांचे जीवन पेरीत
सांभाळली मर्यादा

कोटी कोटी मस्त्य थवे
एक दुजांचे जीवन नवे
मनुजही घेती थोडे बरवे
सांभाळूनी मर्यादा

नद्या मुखींचा गाळ गळोरा
त्यामधूनी ये विश्व आकारा
खाडी बनली मस्त्य धुमारा
सांभाळूनी मर्यादा

खोल तळाशी भुतल क्रंदन
ज्वालांचेही रसमय नर्तन
सागर अद्भुत खेळ चिरंतन
सांभाळूनी मर्यादा

जसा होतसे मानव सक्षम
सागर भासू लागे धनसम
कसे लुटू दोनच कर मम
यंत्रे वाढवू मर्यादा

अगडबंबशी जाल रोवीली
मस्त्यथव्यांची रास खेचली
कोटी तृणागत मृत फ़ेकली
उधळण अमर्याद

खाडीप्रत जाती मस्त्यथवे
धारून अंतरी बीज नवे
विषमयी गटारे तेथ मिळे
हत्याकांड अमर्याद

सागर जीवन जलकोष्टक
केले मानवे विस्कळीत
विषवल्ली वाढेल अंदाधूंद
तोडून साऱ्या मर्यादा.

कवितासमाजजीवनमानराहणी

प्रतिक्रिया

सहज's picture

9 Sep 2009 - 9:37 am | सहज

अमर्याद मासेमारी, पर्यावरण असंतुलन :-(

पाषाणभेद's picture

9 Sep 2009 - 9:58 am | पाषाणभेद

कोठे होतात इतके दिवस? खोल समुद्रात मासेमारी करत होता काय? अन आता खाडीत मासेमारी करताय?
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

प्राजु's picture

9 Sep 2009 - 9:51 pm | प्राजु

चांगली आहे कविता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Sep 2009 - 10:21 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!!! अरूणराव, मस्तच आहे कविता. वेगळा विषय आणि वेगळीच मांडणी. आवडली.

बिपिन कार्यकर्ते

अरुण मनोहर's picture

10 Sep 2009 - 1:57 am | अरुण मनोहर

सर्व वाचकांना धन्यवाद.

हृषीकेश पतकी's picture

10 Sep 2009 - 11:56 am | हृषीकेश पतकी

कविता छान जमली आहे...
आपला हृषी !!

मदनबाण's picture

10 Sep 2009 - 12:58 pm | मदनबाण

कविता आवडली...

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

लिखाळ's picture

10 Sep 2009 - 7:46 pm | लिखाळ

निसर्ग मर्यादा सोडत नाही आणि आपण मात्र अमर्याद नासधूस करुन निसर्गाला ओरबाडतो आहोत असे सांगणारी कविता आवडली.
थोडी क्लिष्ट वाटली.

-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?