माझे जगावेगळे छंद-२

पाऊसवेडी's picture
पाऊसवेडी in जनातलं, मनातलं
7 Sep 2009 - 10:52 am

एका रविवारी माझ्या साप पकडण्याची सुरुवात होणार हे एकदाचे ठरले आणि मग त्या रविवार पासून दर रविवारी खूप छानआणि खुंपच वेगेळे म्हणजे जे मला वाटत होते त्यापेक्षा वेगेळे अनुभव आले त्यातलेच मी काही मी तुम्हाला सागणार आहे पहिल्याच दिवशी मी गेले होते तेव्हा मला सापाचा स्पर्श कल्पनेतच होता कारण याआधी मी कधीही सापाला हात लावला नव्हता. पहिल्या दिवशी सगळ्याच लोकांनी लीम्बुतीम्बुची (पक्षी:माझी) मनसोक्त मजा केली. हे कोण नवीन ?? साप पकडायला शिकायचंय का?? वगेरे वगेरे विचारून भांडून सोडले आणि हळू हळू माझाच उत्साह कमी होतोय कि काय असे वाट्याला लागेले असतानाच तो आयुष्यात लक्ष्यात राहणारा क्षण आल जेव्हा मी पहिल्यांदाच साप हातात धरला त्याचे झाले असे कि कोणीतरी एक छोटासा गवत्या ( Green Keelback snake) आणला होता आणि सगळ्याचं आपसात ठरल्याप्रमाणे तो माझ्याकडे देऊन त्याच्या जागी ठेवण्याची जबाबदारी माझाय्वर टाकण्यात आली. आणि जेव्हा त्या काकांनी तो माझ्या ओंझळीत ठेवला तेव्हा एकदम भारीच वाटले तो स्वतःलाच वेटोळे घालून घाबरून बसलेला होता एकदमच लहान म्हणजे तो अगदीच ३०-३५ सेमीचा होता आणि मला वाटलेले त्यापेक्षा तो खूपच मऊ,एकदम हिरवागार रंगाचा आणि थोडासा मंद किवा कदाचित घाबरलेला असल्यामुळे असेल पण तो खूपच शांत होता मग त्याला पाहत त्याला त्याच्या जागी नेऊन ठेले (मधल्या वेळात त्याने दोनतीनदा त्याची जीभ बाहेर काढून माझी वाट लावली ) आणि अश्या प्रकारे सकाळी मला हसणाऱ्या बरेच लोकांची संध्याकाळपर्यंत "शिकशील बरे का लवकरच" अस म्हणण्यापर्यंत प्रगती झाली होती .

गवत्या( green keelback )

http://lh6.ggpht.com/_yiYp8WjYg9I/Sp4q3gg17BI/AAAAAAAAAC0/BcC6qfLqf7c/ke...

एकदा एका जगविख्यात समाजसेवा करणाऱ्या एका संस्थेची काही टुकार लोके आली असता त्यातल्या मेकपने नखशिखांत माखलेल्या (आणि असे उग्र वास सापांच्या जवळ चालत नाहीत असे सांगूनही )काही बायकांना सापाला हातात घेऊन फोटो काढायची इच्छा झाली (कारण ते त्यांच्या मासिकात लावायचे होते ) पण त्यांना इतकी भीती वाटत होती कि एक छोटी धूळनागीण हातात घेऊन मी दहा मिनिटे समोर उभी राहिले तरी कोणीच पुढे यायला त्या नव्हता अहो विषारी नाही आहे चावली तरी काही होणार नाही (मला चावली नसूनही ) असे मी आणि आजूबाजूचे सागेलेच लोक सांगत असूनही त्या बायका काही हात लावायला तयार झाल्या नाही शेवटी हो नाही करता करता त्यातली एक झाशीची राणी खास मासिकातील स्वताच्या आणि एकटीच्याच झळकणाऱ्या फोटो खातर तयार झाली आणि मग तू तोंडाकडे पकड आणि थोडी लांब जा म्हणजे मी शेपटीला धरते असा फोटो काढूयात असे म्हणून काही वेळाने पोझ ठरून आम्ही उभे राहिलो आणि खरतर ती नागीण बिचारी खूपच कंटाळलेली आणि त्रासलेली होती आणि त्यात मी पण नवखी असल्यामुळे मी तिला हलकेच आणि तोंडापासून थोडे लांब पकडले होते आणि इथेच माझे चुकले त्या बाईने तिला हात लावल्यानंतर तिला तो स्पर्श कसातरीच वाटल्याने तिने काय केले कुणास ठाऊक पण त्यामुळे ती नागिणीने फिरून मस्तपैकी अस्मादिकांची चव चाखली. माझीही साप चावण्याची आणि त्या लोकांची तो चावलेला पाहण्याची पहिलीच वेळ असल्याने सगळीच गडबड झाली. चावलेला साप बिनविषारी आह्हे काही होणार नाही हे सगळे मला माहिती असूनही पहिले पाच मिनिटे मला काहीच सुचले नाही तसाही dry bite होता हे मला काळात होते तरीही घाबरले.

धूळनागीण ( Racer )

http://lh5.ggpht.com/_yiYp8WjYg9I/Sp4q3jiwNNI/AAAAAAAAAC4/ci2_xmyVziM/Ra...

मग जेव्हा काकांनी समजले तेव्हा घाबरून जायच्या ऐवजी सगळ्यांनी एकसाथ चला आज पार्टी मिळणार असा गलका केला आणि सगळ्या गोंधळातून अस कळले कि पहिला साप चावल्यानंतर उपस्थित सगळ्यांना पार्टी द्यावी लागते आणि मग काय सगळ्यांनी संध्याकाळी माझाय्कडून पार्टी वसूल करून घेतली. पण ते दाताचे व्रण बघून आईने बस झाले आत्ता नाही जायचे साप धरायला असे चावणार असतील तर वगेरे म्हणयला लागली आणि मग नाही ग परत चावला तर मी बंद करेन असे तिला सांगून तिची समजूत काढली तर...........

पुढे हा प्रकार झालाच या प्रकारानंतर साप चावण्याची जवळ जवळ सवयच लागून गेल्यासारखे झाले कारण दर रविवारी नवीन साप पकडायचा म्हणजे नवीन युक्ती वापरायची आणि जी मला अर्थातच माहिती नसलेली मग चावणारच न साप पण त्या दिवशी सकाळी गेले तर सगळेच जण दिवड बद्दल बोलत होते ऐकून माहिती असलेला साप होता म्हणून मी मागे लागेले कि चला आज दिवड पकडायचा प्रयत्न करू सगळ्यांनी नको म्हणून समजावून सुद्धा मी ऐकत नव्हते म्हणून मग शेवटी जिरु दे हिची पण एकदा म्हणून काका तयार झाले आणि त्यांनी एक बर्यपैकी मोठा म्हणजे १.५-२ फुटाचा दिवड खाली सोडेल आणि जा आत्ता पकडून आण फक्त त्याला हरवू नकोस तू हरवलास त्याला तर आपले प्रशिक्षण संपले असे सांगून जवळच त्याचं काम करत बसले. मी जशीजशी सापाची जवळ जायला लागेले तसा तसा तो पुढे आणि मी त्याच्या समांतर रेषेत त्याच्यवर छ्त्रासारखा हात धरून मागे मागे अशी आमची वरात चालली पण तो बराच जाड असल्यामुळे मी पकडेन का अशी शंका मला आल्याने मी त्याला हात लावत नव्हते

"झाले का सगळे मंत्र म्हणून;झाले असतील तर उचल त्याला नाहीतर झुडपात गेला तर तुला मागे जायला लागेल " -इति काका

ते असे म्हणयला आणि त्याने झुडूपाकडे वळायला एकाच वेळ झाली मग धीर करून त्याला त्याच्या मध्यभागी पकडायला गेले तर तो फिरून अंगावर आला आणि त्याच अर्ध शरीर सरळ उभा राहून मोठा आ वासून उभा राहिला मग त्यावेळी मी तो नाद सोडून दिल्यावर परत........

"अग मानेच्या मागे धार त्याला"- अर्थात काका

मग परत सगळी धडपड करून मानेच्या मागे धरले तर पठ्ठ्या चावालाच हाताला आणि त्याच्या असंख्य दातांपैकी ३-४ माझ्या हातात आणि एक दोन दुसर्या चाव्याच्या वेळी माझं ओढणीत रुतून बसले आणि मग मात्र मीच इरेला पेटले म्हनला बघतेच आत्ता मग परत काकांनी कसे पकड ते समजावले आणि या वेळी मी बरोबर मानेच्या मागे त्याला पकडला त्याने पण हाताला विळखा वगेरे घालून सुटण्याचा निरर्थक प्रयत्न केला आणि मग शेवटी तो विळखा सोडवता सोडवता परत एकदा वचपा काढ्याचा म्हणून कि काय त्याने चावून घेतले आणि आमचा दिवड पकडण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला पण आत्ता आईपासून हात लपवायचा म्हणून मग तिला काही नाही के खरचटले आहे वगेरे सांगून वेळ मारून नेली .

दिवड (Checkered Keelback)

http://lh5.ggpht.com/_yiYp8WjYg9I/Sp4q3XEJMYI/AAAAAAAAACs/834ta3RGKow/20...

http://lh6.ggpht.com/_yiYp8WjYg9I/Sp4q3cca_7I/AAAAAAAAACw/Ky5Xi1tNVgc/ch...

तर मंडळी अश्या प्रकारे गेले अनेक दिवस मी साप पकडायला शिकत आहे. धामण, तस्कर,sand boa,shield tail सारखे बिनविषारी साप हाताळले पण आजूनही एकही विषारी सापाला हात लाऊन देण्यात आला नाही त्यमुळे सध्या तरी सजले बिनविषारी पकडते आणि खरे संग्याचा तर खूप समाधानी आहे यातच बघू जेव्हा संधी मिळेल तेव्हा हळू हळू विषारी पण पकडायला शिकेन आणि अर्थातच अनुभव नक्की टाकेनच तोपर्यंत रामराम मंडळी !!!

(कृपया मी साप पकडायला कोणाकडे शिकते हे विचरू नये कारण मी ते सांगू शकत नाही ते शिक्रेट आहे बरे का मंडळी तशी मला परवानगी पण नाही आहे :) )

सगळे फोटो आंतरजालावरून घेतले आहेत
समाप्त

मौजमजाअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

7 Sep 2009 - 11:02 am | श्रावण मोडक

फोटो दिसला नाही. पण लेख मात्र वाचला. छान. पुढे?

स्वाती दिनेश's picture

7 Sep 2009 - 11:08 am | स्वाती दिनेश

सापपकड प्रशिक्षणाचे दोन्ही भाग आवडले, पण फोटू दिसत नाहीत. :(
स्वाती

प्रमोद देव's picture

7 Sep 2009 - 11:08 am | प्रमोद देव

अनुभव मस्त आहेत पण लेखन मात्र खूपच कच्चे आहे. त्याकडे नीट लक्ष दे.
छायाचित्रही दिसत नाहीयेत.

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

पाऊसवेडी's picture

7 Sep 2009 - 11:17 am | पाऊसवेडी

माझ्याकडे फोटो दिसत आहेत
बाकी कोणाला फोटो दिसत आहेत का ?

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

सूर्य's picture

7 Sep 2009 - 11:30 am | सूर्य

असे साप पकडता तुम्ही म्हणजे कमाल आहे तुमची. साप बिनविषारी असले तरी दिसायला खतरनाक आहेत. :)
फोटो फायरफॉक्स वर दिसत नाहीयेत. आय.ई. वर दिसत आहेत.

- सूर्य

सहज's picture

7 Sep 2009 - 11:40 am | सहज

सर्वप्रकारचे साप हाताळण्यात तुम्ही तरबेज व्हा ही सदिच्छा!

Nile's picture

7 Sep 2009 - 12:50 pm | Nile

सही आहे ग! अश्या आठवणी मस्त असतात. जमलं तर अश्या वेळचे फोटो पण काढत्/काढुन घेत जा. ;)

बाय द वे: तुला जर टाईप करायला अवघड जात असेल तर हे वापरुन पहा: http://www.quillpad.in/marathi/editor.html

मदनबाण's picture

7 Sep 2009 - 2:01 pm | मदनबाण

ह्म्म..भारी छंद हाय...
काही बायकांना सापाला हातात घेऊन फोटो काढायची इच्छा झाली
अरे देवा !!! (चाल अस्त्रवाले नव्हे हो... ;) )

बाकी असेच आपले विविध छंदा बद्धल लिहील्यास वाचण्यास नक्की आवडेल. :)

(हरणटोळ ला घाबरणारा... ;) )
मदनबाण.....

लडाख सीमेवर चीनची घुसखोरी

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=596...

झकासराव's picture

7 Sep 2009 - 12:10 pm | झकासराव

सापाचे फोटु दिसत नाहीत. :(
मला एक शंका आहे.
बिनविषारी साप जरी चावला तरी त्याचा काहीच त्रास होत नाही का?
कसल इन्फेक्शन? किन्वा जखम? त्याची अजिबात काहीच काळजी घ्यावी लागत नाही का?
अनुभव चांगलेच लिहिले आहेत. :)

प्रसन्न केसकर's picture

7 Sep 2009 - 12:30 pm | प्रसन्न केसकर

साप पकडण्याच्या थ्रिल चा अनुभव येतो वाचताना. मी लहान असताना आम्ही लोकवस्तीपासुन लांब रहात होतो त्यामुळं सापांशी अनेकदा संबंध यायचा. खरंच ते जनावर मंत्रमुग्ध करतं. पण ते सगळं लांबुन दर्शन घेतानाच. जरा जवळ आल्यावर मात्र गर्भगळीत व्हायला होतं. दिवड्चा किस्सा वाचताना एक जुना प्रसंग आठवला - देहुरोड पोलिस स्टेशनला कामानिमित्त गेलेलो असताना तिथल्या फुलझाडांच्या ताटव्यात एक भला मोट्ठा नाग निघाला होता. बर्‍याच जणांनी काठ्यांनी
हलवुन त्याला चांगलाच डिवचला होता अन आम्ही पोहोचलो तेव्हा त्याला मारायची तयारी झाली होती. बरोबर असलेल्या सर्पमित्र फोटोग्राफरला तो नाग पकडायला मी मदत केली पण नंतर त्याला समोरच्या मैदानात नेऊन सोडेपर्यंत घामाच्या धारा लागल्या होत्या.

सुंदर लेखन. अजुन येऊ द्या चित्तथरारक अनुभव!

___

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

sneharani's picture

7 Sep 2009 - 12:41 pm | sneharani

चांगले अनुभव! फोटो दिसत नाहीत.

खादाड's picture

7 Sep 2009 - 1:05 pm | खादाड

विशारी साप पकड्ण्याच्या
मिशन साठी शुभेच्छा !

महेश काळे's picture

7 Sep 2009 - 1:24 pm | महेश काळे

लेख छान आहे..
छायाचित्रे सुद्धा उत्तम अहेत..

मी माझा ..महेश

सखाराम_गटणे™'s picture

7 Sep 2009 - 1:42 pm | सखाराम_गटणे™

फोटो दिसत नाहीत.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Sep 2009 - 2:19 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फोटो दिसत नाहीत.बाकी लिहलयं छान.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Sep 2009 - 2:20 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फोटो दिसत नाहीत.बाकी लिहलयं छान.

सूहास's picture

7 Sep 2009 - 4:33 pm | सूहास (not verified)

हे एक अमंळ वेगळच वेड,वेगळाच छंद आहे.

फोटो का दिसत नाहीत?...

सू हा स...

पाऊसवेडी's picture

7 Sep 2009 - 4:40 pm | पाऊसवेडी

>>>>जमलं तर अश्या वेळचे फोटो पण काढत्/काढुन घेत जा.
फोटो आहेतच रे पण त्यात मी पण आहे न :) म्हणून मी नाही टाकले

Nile's picture

8 Sep 2009 - 4:15 am | Nile

अरे मग तर टाकलेच पाहिजेत! ;)

अमोल केळकर's picture

7 Sep 2009 - 4:48 pm | अमोल केळकर

चांगला छंद आहे आपला. आपण लेखात उल्लेख केलेल्या काकांबद्दल ही लिहा की ( त्यांचे नाव नाही सांगितले तरी चालेल )
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुबक ठेंगणी's picture

7 Sep 2009 - 4:56 pm | सुबक ठेंगणी

तुमची श्टोरी एकदम थरारक!
पण फोटो मला अजूनही दिसत नाहियेत हो!

ह्यावरून्च थायलंडला गेले असताना तिथे एकाच माणसाने तीन ते चार विषारी साप पकडून दाखवले होते. त्याची आठवण झाली. पण तेव्हा मला ते साप आणि ते पकडणारे ह्या दोघांचीही दया आली होती.

लिखाळ's picture

7 Sep 2009 - 5:01 pm | लिखाळ

वा ! छान अनुभव आहेत. फोटोसुद्धा छान आहेत. दिवड एकदम भारदस्त आहे :)

... तसाही dry bite होता हे मला काळात होते तरीही घाबरले.

विषारी सापाचा जो चावा विषरहित असतो त्याला सुका दंश-ड्राय बाईट म्हणतात असे मला वाटते. विषारी सापाच्या दंशावेळी त्याने विष न सोडल्यास (असे शक्य असते की नाही कल्पना नाही) किंवा त्याचे दात
त्यावेळी पडल्याने विषारी दंश नसल्याने त्याला ड्राय बाईट म्हणतात असा माझा समज आहे. चु भू द्या घ्या.
(तसाही गवत्या बहुधा अर्धविषारी असल्याने (असे वाचलेले स्मरते)तुम्ही ड्राय बाईट म्हणाला असाल तर..पुन्हा..चु भू...)

अजून लिहा सापांबद्दल.
-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

धमाल मुलगा's picture

7 Sep 2009 - 5:04 pm | धमाल मुलगा

आमच्याकडं घरात झुरळ दिसलं तरी पार कपाटावर चढुन बसायची तयारी सुरु होते...पाल सापडली तर मग काही पहायलाच नको!
आणी ह्या बाईसाहेब खुन्नस धरुन साप काय पकडतात...त्यांचे चावे काय पचवतात..
लै भारी :)

अवांतरःतुमच्या पतीदेवांना एक पालीचं पिल्लू घरातून हुसकाऊन लावायला चार-पाच कपबश्या फोडायची आणि स्वतः जिरेमोहरीनं आंघोळ करुन घ्यायची गरजच *पडत नसेल/पडणार नाही (*रिलेट अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल :) ) :)

-(घरातले किटक हुसकावण्याच्या 'जबाबदारीला' विटलेला) ध. :)

पाऊसवेडी's picture

7 Sep 2009 - 5:30 pm | पाऊसवेडी

>>>>>अवांतरःतुमच्या पतीदेवांना एक पालीचं पिल्लू घरातून हुसकाऊन लावायला चार-पाच कपबश्या फोडायची आणि स्वतः जिरेमोहरीनं आंघोळ करुन घ्यायची गरजच *पडत नसेल/पडणार नाही (*रिलेट अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल )

थोडीशी सुधारणा
भविष्यातील पतीदेवांना म्हणा हो :)

धमाल मुलगा's picture

7 Sep 2009 - 5:43 pm | धमाल मुलगा

>>*पडत नसेल/पडणार नाही (*रिलेट अ‍ॅज अ‍ॅप्लिकेबल<<
म्हणुनतर असा सबक्लॉज टाकला होता ना :)

दशानन's picture

7 Sep 2009 - 5:44 pm | दशानन

:)

क्या बात है.... म्हणजे आजकाल साप तुला घाबरत असतील नै =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Sep 2009 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छंद चांगला आहे. लेखनही माहितीपूर्ण आहे. फोटो मात्र दिसले नाहीत.
फोटो तेवढे फ्लीकरवर अपलोड करुन टाकले तर दिसतील सर्वांना.
आमच्या कडे गवत्या साप अधुन-मधुन दिसतो. तेव्हा आपल्या छंदाची प्रेरणा घेऊन ट्राय करीन म्हणतो.

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Sep 2009 - 6:30 pm | बिपिन कार्यकर्ते

कोणाला कसला तर कोणाला कसला छंद... तुम्हाला सापाचा छंद... जबरदस्त लिहिलंय हां एकदम. इतकं सहजपणे लिहिलंय तुम्ही, साप पकडायचे क्लासेस चालू आहेत की भरतकामाचे असाच प्रश्न पडलाय मला. चक्क साप चावला हे तुम्ही किती सहजपणे लिहिलंय... ग्रेट. फोटू मात्र एकबी दिसंना. अजून काही आसंलच की लिहिण्यासारखं, लिहा.

बिपिन कार्यकर्ते

यशोधरा's picture

7 Sep 2009 - 10:28 pm | यशोधरा

लय भारी! दंडवत!
फोटू तेवढे दिसतील तर, अजून एक दंडवत घालीन :)

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Sep 2009 - 11:28 pm | बिपिन कार्यकर्ते

का दिसत नाहीयेत ते कळत नाही. पण प्रत्येक फोटोच्या खाली लिंक दिली आहे. त्यावर दिसतील फोटो. आता साप बघितल्यावर पाऊसवेडी म्याडम बद्दल आदर द्विगुणित झाला. :D

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

8 Sep 2009 - 2:21 am | प्राजु

फोटोज दिसत नाहीयेत.
अनुभव खूपच छान लिहिले आहेत. मस्त!!
तुमची साप पकडण्यात तरबेज होण्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. असेच इतरही अनुभव लिहा.
पु ले शु.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एकलव्य's picture

8 Sep 2009 - 3:29 am | एकलव्य

फोटोची वाट पाहतो आहे... बाकी वर्णन उत्तम!

ऋषिकेश's picture

8 Sep 2009 - 9:28 am | ऋषिकेश

मला फोटो नीट दिसताहेत (दोन्ही न्याहाळकांमधे) त्यामुळे लेख वाचायला अजून मजा आली.

अतिशय थरारक अनुभव आहेत तुमचे.. विषारी सापाला पकडण्यासाठी शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून २३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "मन डोले मेरा तन डोले...."

सखाराम_गटणे™'s picture

8 Sep 2009 - 9:52 am | सखाराम_गटणे™

फोटो खत्रा आहेत

पाऊसवेडी's picture

10 Sep 2009 - 12:39 pm | पाऊसवेडी

सगळ्यांना मनापासून धन्यवाद !!!!

प्रमोद काका मी पुढच्या वेळी आजून नीट लिहिण्याचा प्रयत्न करेन

>>>बाय द वे: तुला जर टाईप करायला अवघड जात असेल तर हे वापरुन पहा:
हे छान आहे रे हेच वापरते पुढच्या वेळी

>>>>त्याचे दातत्यावेळी पडल्याने विषारी दंश नसल्याने त्याला ड्राय बाईट म्हणतात असा माझा समज आहे. चु भू द्या घ्या.
गवत्या अर्धाविशारी पण नसतो पण मी धुल्नागीनिबद्दल म्हटले आहे कारण बरेच लोकांना त्याचा त्रास होतो असे मी ऐकले होते म्हणून मला पण तशीच भीती वाटली होती आणि dry bite दात असताना पण होतो कारण बरेचदा साप अगदी वरच्या वर चावतो ज्यामुळे विष ग्रंथी मधले विष तो सोडताच नाही अशा वेळी मग त्याचा त्रास होते नाही.

>>>>आमच्या कडे गवत्या साप अधुन-मधुन दिसतो. तेव्हा आपल्या छंदाची प्रेरणा घेऊन ट्राय करीन म्हणतो
नक्की करा बिचारा अगदीच गरीब असतो पण तो गवत्या आहे कि bamboo pit viper आहे ते नेअत पहा बरेच वेळा गोंधळ होतो लोकांचा पण हे दोनही साप एकाच रंगाचे असले तरी लगेच वेग वेगळे ओळखू येतात

संदीप चित्रे's picture

10 Sep 2009 - 7:19 pm | संदीप चित्रे

फोटो दिसत नाहीयेत पण तुमचे अनुभव खत्तरनाक !
तुम्ही एकंदर 'इस जंगलसे मुझे बचाओ'साठी एकदम योग्य स्पर्धक दिसताय !!! :)
पुण्याला निलिमकुमार खैरेंना भेटलात का?

विसोबा खेचर's picture

7 Oct 2010 - 11:51 am | विसोबा खेचर

दिवड, धामण गळ्यात घालून मिरवले आहेत. आपण शांत राहायचं, तेही तितकेच निवांतपणे आपल्या गळ्यात, अंगाखांद्यावर खेळतात..

धामण तशी शांत असते परंतु दिवड मात्र जरा रागीट..

ठाण्याचा सर्पमित्र अनिल कुबल हा आमचा दोस्त.. तो हे असले बिनविषारी साप आमच्या हातात देतो..:)

अनिलवर लौकरच एखादा लेख लिहायचा विचार आहे!

(मण्यारप्रेमी) तात्या.

भारतीय's picture

7 Oct 2010 - 12:07 pm | भारतीय

जबरदस्त छंद आहे तुमचा.. फोटोही छान आलेत.. लवकरच विषारी साप पकडून त्यालाही 'खच्याक' (म्हणजे फोटो काढून! ) करून ईथे आम्हाला दाखवा..

शुभेच्छा !

कवितानागेश's picture

7 Oct 2010 - 12:47 pm | कवितानागेश

एकदम 'पाशवी' अनुभव!
आवडला!

झकास. तो तीन क्रमांकाचा फोटो काढताना " स्माईल प्लीज" असे म्हंटलय का हो. दिवड एकदम खळखळून हसतेय्./हसतोय
अवांतर : ससा आणि साप या शब्दांचे स्त्रीलिंग काय हो.

वाटाड्या...'s picture

7 Oct 2010 - 10:56 pm | वाटाड्या...

विजुभाऊ...विजुभाऊ...

ससा - ससीण..
साप - सापीण...;)

ह्यावरून एक जोक आठवला...

साप नागाला म्हणतो : ए सापड्या...
नाग सापाला म्हणतो : ए XXX...

- वाटाड्या...