'संसार से भागे फिरते हो' हे चित्रलेखा या चित्रपटातईल गाने,शब्द रचना आणि संगीत या दोन्हीमुळे माझी अत्यंत आवडते. गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा हा सिनेमा पाहीला आणि त्यातील गीत संगीताचे गारुड मनातून जाईना इतके ते विलक्षण .उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हणून मानावे इतके ते सुंदर आणि परिपूर्ण.
हे एक भक्तिरसातलेच गाणे पण याची वृत्ती अत्यंत वेगळी .अचंबीत करणारी.त्यातला विषय विस्मयकारकतेने प्रकट केलेला.रोशन यांचे संगीत साधे सोपेसे .
पण गाण्याची परिणामकारकता जोरकसपणे ,प्रभावीपणे व्यक्त करणारे.
चित्रपटाचे एकूण संगीतच रोशन यांच्या नेहेमीच्या पठडीहून वेगळे ,निराळे.संपूर्णपणे अभिजात भारतीय शास्त्रोक्त संगीताचा स्पर्श असणारे.
आणि गीतकार साहिर म्हणजे एखादा विशय वेगळ्याच तर्हेने आणि प्रभावीपणे मांडण्यत वाकबगार .तो गाण्याची सुरुवातच मुळी पाप आणि पुण्य यांच्या प्रचलीत व्याख्यांना ,त्यांच्या अर्थाला आव्हान देतच करतो.तो म्हणतो पाप ,पुण्य या नुसत्या परंपरागत धर्माने निश्चीत केलेल्या भावना आहेत.
ये पाप है क्या ये पुण्य है क्या
रीतों पर धर्म की मुहरे है.
धर्म या शब्दाचा अर्थच शाश्वत न बदलता येणारा असा आहे पण साहीरला तेथेच दोष आढळ्तो..
तो पुढे म्हणतो
हर युग में बदलते धर्मों को
कैसे आदर्श बनाओगे
पुढील काव्यपंक्ती म्हणजे तर त्याने आश्यर्यचकीत करणारा शब्दखेळच.
तो म्हणतो म्हणतो "भोग " ही एक तपस्या आहे तर सदाचारी साधू संत हा त्यागात अडकलेला आहे..'त्याग का मारा ' आहे.खरे तर हे चित्र उलट असायला हवे.
जसे त्याग ही एक तपस्या आणि भोगी हा भोगात अडकलेला ,भौतीकात फसलेला ..भोग का मारा'..पण साहीर केवळ चार ओळीत भल्याभल्यांना आडवे करतो, एक वेगळेच तत्वज्ञान तो मांडू लागतो.
ये भोग भी एक तपस्या है
तुम त्याग के मारे क्या जानो..
आणि विधात्याने ..ईश्वराने निर्मिलेल्या गोष्टींचा स्वीकार न करणे म्हणजे हा त्याचा अपमान आहे म्हणण्यापर्यंत तो मजल मारतो.
अपमान रचयिता काहोगा
रचना को अगर ठुकराओगे..
आणि याच पध्दतीने ,रीतीने अत्यंत कौशल्याने सर्व संग परित्याग आणि भौतीक गोष्टींचा स्वीकार यांच्यातला झगडा मांडत राहतो.
तो पुढे म्हणतो
हम कहते है ये जग अपना है
तुम कहते हो झूठा सपना है..
आणि पुढे टोचून टोमणे मारत तो म्हणतो,
हम जनम बीता कर जाएंगे
तुम जनम गंवाकर जाओगे..
तर असा हा साहीर विलक्षण खास विशिष्ठ शैलीत समोर येणारा .
चित्रपटांच्या गाण्यांमध्ये नजरबंदी ..जादू.. चेटूक करणारा .एकमेवाद्वितीय असा.
चित्रलेखातली साहिरची इतर गाणी लाजवाबच आहेत.
ऐ री जाने ना दूंगी
छा गए बादल
काहे तरसाए जियरा
मन रे तू काहे
सखी री मेरा मन
या सगळ्या विविध रत्नांमध्ये 'संसार से भागे 'हा कोहीनूरच.
मीनाकुमारीसारखी एखाद्या हुंकारानेही अनेक गोष्टी व्यक्त करणारी नटी असल्यावर आणखी काय हवे.
Movie: Chitralekha
Singer(s): Mohammad Rafi, Asha Bhonsle
Music Director: Roshan
Lyricist: Sahir Ludhianvi
Actors/Actresses: Ashok Kumar, Pradeep Kumar, Mehmood, Meena Kumari
Year/Decade: 1964, 1960s
सन्सार से भागे फिरते हो
भगवान को तुम क्या पाओगे
इस लोग को भी अपना ना सके
उस लोक में भी पछताओगे
सन्सार से भागे फिरते हो
( ये पाप है क्या ये पुण्य है क्या
रीतों पर धर्म की मोहरें हैं ) -२
रीतों पर धर्म की मोहरें हैं
हर युग में बदलते धर्मों को
कैसे आदर्श बनाओगे
सन्सार से भागे फिरते हो
( ये भोग भी एक तपस्या है
तुम त्याग के मारे क्या जानो ) -२
तुम त्याग के मारे क्या जानो
अपमान रचेता का होगा
रचना को अगर ठुकराओगे
सन्सार से भागे फिरते हो
( हम कहते हैं ये जग अपना है
तुम कहते हो झूठा सपना है ) -२
तुम कहते हो झूठा सपना है
हम जनम बिता कर जायेंगे
तुम जनम गँवा कर जाओगे
सन्सार से भागे फिरते हो
भगवान को तुम क्या पाओगे
सन्सार से भागे फिरते हो
--राजा रानडे.
प्रतिक्रिया
18 Aug 2009 - 10:45 am | सहज
सन्सार से भागे फिरते हो
18 Aug 2009 - 11:12 am | अडाणि
लहानपणी आकाशवाणीवर 'बेला के फुल' कार्यक्रम ऐकताना साहिर लुधीयानवी यांचे नाव ऐकले नाही असा एक दिवस जायचा नाही..
फार सुंदर आठवण करून दिलीत, धन्यवाद !
अवांतरः
-
अफाट जगातील एक अडाणि.
18 Aug 2009 - 12:21 pm | रामदास
बरेच दिवस वाट बघायला लावलीत .
लेख आवडला.आता बाकीच्या गाण्यांवर लिहा.
30 Sep 2016 - 4:39 pm | नया है वह
बाकीच्या गाण्यांवर कधी?
18 Aug 2009 - 3:02 pm | क्रान्ति
साहिरच्या सगळ्याच रचना अतिशय प्रभावी आणि सहजपणे मोठं तत्वज्ञान मांडणार्या असतात. हे एक उदाहरण.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
18 Aug 2009 - 7:43 pm | सूहास (not verified)
गाण्याचे बोल्....स॑गीत तर छान आहेच ..पण सादरीकरण ही एकदम झकास आहे...मिनाकुमारी आणी अशोक कुमार वर चित्रीकरण झालेले...
सू हा स...
18 Aug 2009 - 8:31 pm | प्रदीप
लेखन सुंदर झाले आहे, आवडले.
अजून एक जाणवले म्हणजे, साहिरच्या इतर गीतात नेमही उर्दू शब्दांची रेलचेल असते. पण हिंदू पाश्चभूमि असलेल्या ह्या चित्रपटातील सर्व गीते त्याने संपूर्ण हिंदी शब्दांत लिहीलेली आहेत. त्यात कुठेही उर्दू शब्द नाही. आणि तरीही ती गीते वरील उदाहरणाप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
<चित्रपटाचे एकूण संगीतच रोशन यांच्या नेहेमीच्या पठडीहून वेगळे ,निराळे.संपूर्णपणे अभिजात भारतीय शास्त्रोक्त संगीताचा स्पर्श असणारे.>
हे मात्र पटले नाही. हे संगीत रोशनच्या नेहमीच्या शैलीतच आहे असे मला वाटते.
असेच लिखाण अजून होण्यासाठी शुभेच्छा. विशेषतः साहिरवर अजून येऊं दे.
18 Aug 2009 - 9:23 pm | प्राजु
लेखन आवडले.
साहिर लुधियानवी ची बहुतेक सगळीच गाणी मला आवडतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Aug 2009 - 12:19 am | बबलु
अतिशय सुंदर रसग्रहण.
साहिरच्या काही रचना भेदून जातात.
(अवांतरः-- चित्रलेखा मधलंच "काहे तरसाए... जियरा" या गाण्याच्या नृत्याबद्दल एकदा वेळ मिळाला की एक लेख टंकावा म्हणतो.
चित्रपट क्षेत्रातील नृत्यदिग्दर्शनाचा अजोड आणि अजरामर नमुना आहे तो).
....बबलु
19 Aug 2009 - 2:00 am | बेसनलाडू
लेखाची वाट पाहत आहे बबलुशेठ!
(उत्सुक)बेसनलाडू
रानडेसाहेब, लेख चांगला आहे. असेच आणखी येऊ देत.
(वाचक)बेसनलाडू
19 Aug 2009 - 5:50 am | स्वाती२
सुरेख रसग्रहण.
बबलु, तुमचाही येऊदे लेख.
30 Sep 2016 - 4:58 pm | महासंग्राम
वाह साहिर म्हणजे चित्रपटसृष्टी मधला एक सिताराच होता.
30 Sep 2016 - 6:00 pm | मारवा
ये भोग भी एक तपस्या है
ही ओळ कहर आहे.
साहीर ग्रेट आहे.
30 Sep 2016 - 6:00 pm | मारवा
ये भोग भी एक तपस्या है
ही ओळ कहर आहे.
साहीर ग्रेट आहे.
30 Sep 2016 - 10:45 pm | जयन्त बा शिम्पि
मला सुद्धा साहीर यासाठी आवडतो की, जे आपल्या मनात सुद्धा येत नाही, तेच त्यांच्या गीतात उमटते.
' ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारो क्या जानो ' या ओळी तर आवडतातच, पण आणखी एक गीत आहे " चित्रलेखा " मधील . यातील शेवटच्या ओळीकडे लक्ष द्या , " कोई ना संग मरे " एकदम वास्तवाच्या अगदी जवळ जाणारे.
मन रे तू काहे ना धीर धरे
वो निर्मोही मोह ना जाने, जिनका मोह करे
मन रे ...
इस जीवन की चढ़ती ढलती
धूप को किसने बांधा
रंग पे किसने पहरे डाले
रुप को किसने बांधा
काहे ये जतन करे
मन रे ...
उतना ही उपकार समझ कोई
जितना साथ निभा दे
जनम मरण का मेल है सपना
ये सपना बिसरा दे
कोई न संग मरे
मन रे ...