दादा, दे ना, ते माझे पैसे आहेत ना... !
देत नाही, माझापण हिस्सा आहे ह्यात... समजले, अर्धे घे.
ठीक, अर्धे तरी दे.
ठीक आहे हे घे... !
आमच्या घरी रक्षाबंधन व भाऊबीज च्या दिवशीचा नेहमीचा संवाद माझा व माझ्या ताईचा. बाबा नाही तर आई ओवाळणी साठी कधी पाच तर कधी दहा रुपये माझ्या हाती ठेवायची व डोळे वटारुन दम द्यायची की ताईलाच सर्व पैसे दे नाही तर बघ. पण मी पण हुशार आई समोर ओवाळणी घालत असे ताटात व ताई ने हातात पैसे घेतले व आई किचन मध्ये गेली कि लगेच ताईच्या हातातून पैसे काढून घेत असे व सरळ गच्चीवर.. मग ताई माझ्या वर रागवायची दंगा करायची पण अर्धे पैसे घेऊन गप्प बसायची.. कधी तक्रार करायची नाही ना आईला सांगायची.. ! आमचे नेहमीचेच ठरलेले मला पैसे मिळाले की अर्धे ताईला व तीला मिळाले की अर्धे मला पण भांडून असे आरामात नाही ;) मज्जा येत असे.. ते दिवसच वेगळे होते.. !
माझ्या बहिणीची संख्या देखील अफाट आहे... घरातल्या घरातच सांगतो ना... माझ्या मोठ्या माऊशीच्या दोन मुली, माझ्या लहान माऊशीच्या तीन मुली, मामाच्या दोन, काकांच्या दोन मुली, अत्याची एक मुलगी व लहान अत्याची दोन मुली... ह्या १२ जणी व इतर दुरच्या पाहूण्यातील ५ जणी म्हणजे मी त्यांना ओळखतो पण त्यांच्या आई-वडीलांना जास्त ओळखत नाही अश्या... ह्या घरातल्या... सर्वजणामध्ये मी एकुलता एक कुलदिपक :D ना वडीलांच्या पाहुण्यामध्ये मुलगा ना आईकडच्या मध्ये.. त्यामुळे सर्वात जास्त लहानपणी लाडावलेला सुध्दा मीच.. व माझ्या सर्व बहिणीमध्ये व माझ्यात एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे आमचे वय.. सर्वांच्या मध्ये एक्-दोन वर्षाचे अंतर... त्यामुळे आमचा दंगा चालूच असायचा, जेव्हा अजोबा होते तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीला व दिवाळीला सर्वजण एकत्र होत... मामाचा वाडा एकदम भरुन जात असे व त्यात आम्ही सर्व चिल्लीपिल्ली... जबरदस्त दंगा ! मी नेहमी म्हणायचो आईला कि बरं आहे रक्षाबंधन मे मध्ये येत नाही... सगळ्यांना पैसे द्यावे लागले असते ना मला ;) पण भाऊबीजला माझी चंगळ असायची आजोबा ओवाळणी साठी चिल्लर १५-२० रुपये देत असतं.. मी त्यांचे आठ-आठ आणे मध्ये करुन आपल्या खिश्यात ठेवत असे व सगळ्यांना पन्नास पैसेच ओवाळणी देत असे व बाकी अर्धे आपल्या खिश्यात..! जसा जसा मोठा झालो तसा तसा हिस्सा घेण्याचा प्रकार बंद झाला व त्यांना ओवाळणी पुर्ण मीळू लागली.. मग मी त्यांना असेच एकदा गप्पा मारता मारता सांगितले की मी असे करत असे व तुमची अर्धी ओवाळणी ढापत असे ... सगळ्या मुलींनी मीळून मला चांगलाच धोपटला... ते असे कि येता जाता दे रट्टा... मार खावून खावून वैताग आला व त्याना मारुन मारुन... मी पण काय करणार.. कुणाकडे तक्रार करु शकतो होतो.. आजोबांच्या कडे जाऊन सांगितले तर... त्यांच्या हातात नेहमीच छडी.. त्यामुलींचा मार परवडला पण ह्यांचा... नको.. ! आई कडे.. जाणे म्हणजे आगीतून फुफाट्यात... ;) चप्पल.. झाडू.. लाटणे.. तांब्या... हातात येईल त्या गोष्टीचा प्रसाद मिळण्याची शक्यता जास्त त्यामुळे तोंड दाबुन मुक्क्याच्या मार.. अशी माझी गत.. पण मज्जा येत असे ! आम्ही आज ही कधी भेटलो तर सर्वात प्रथम ह्याच गोष्टीचा उल्लेख होतो की सगळ्यांनी मीळून मला कसा धुतला होता तो :D
बहिणी म्हटले की आमचे नाते पक्के होते... इकडे तिकडे भटकताना देखील खुपजणी अश्या भेटल्या की जन्माचे नाते असावे... ! मला जरा देखील दुखलं-खुपलं कि त्यांना देखील त्रास होतो हे मी अनुभवलेले.. बेंगलोरची अनिता असो.. वा जयपुरची प्रिया.. अथवा दिल्लीची अनामिका... अथवा येथे मिपावर भेटलेली ताई गँग असो... ! सगळ्याच जबरा.. ! हे नातेच असे विचित्र आहे की जीव ओवाळून टाकावा ! कोण राज म्हणतं.. कोण दा.. तर कोणी दादा... तर कोणी.. काळ्या.. कोण बेबट्या.. तर कोणी... मस्सकली.. तर कोणी राजाड्या.. तर कोणी माजुरड्या... चालू असतं .. सगळ्या माझ्या टोपण नावांची लिस्ट द्यायची तर येथे एक अखा लेख लिहावा लागेल.. ;) कधी फोनवर तर कधी मेल द्वारे... कधी व्यनी ने तर कधी खरडीने... मिपाने मला काय दिले तर... अशी काही नाती दिली जी मला जन्मभरासाठी पुरतील... धन्यवाद तात्या ;)
आता रक्षाबंधन येईल...अक्षरशः दोन्ही हात भरुन जातील येवढ्या राख्या... सर्वात जास्त आनंद देत असेल मला तर रक्षाबंधनाचा दिवस... कितीतरी जणी माझ्या आठवणी काढतात व आठवणीने राखी पाठवतात.. ह्यातील काहीजणी तर मला भेटल्या सुधा नाही आहेत.. पण तरी ही एक नाते आहे... भाऊ-बहिणीचे.. मी नेहमी म्हणतो देवाने मला काहीच कमी दिले नाही.... माझ्यावर तर देवाचा खास वरदहस्त आहे की काय असे वाटते कधी कधी.... !
माझा एक मित्र जो माझ्या सोबत राहत असे तो रक्षाबंधन व त्यानंतर येणा-या राख्या अक्षरशः डोळे फाडून फाडून पाहत असे.. व वर कमेंट... राज भाई.. बहोत लकी हो यार... तुम्हे चाह ने वालों की कमी नही है दुनिया में !
येस , खरोखर मी लकी आहे.... थॅक्स... गॉड !
प्रतिक्रिया
28 Jul 2009 - 6:05 pm | स्वाती दिनेश
भाऊ बहिणीचं नातच तसं हृद्य असतं, त्या नात्यातच ती ताकद असते.
भावस्पर्शी..
स्वाती
28 Jul 2009 - 6:15 pm | विनायक प्रभू
भारी.
असेच लिखाण येउ देत.
28 Jul 2009 - 6:24 pm | सहज
राजेभाउ चांगले लिहले आहे.
५ ऑगस्टला आहे ना रक्षाबंधन. तोवर गाणे बघा
:-)
29 Jul 2009 - 9:40 am | दशानन
छान आहे गाणे :)
+++++++++++++++++++++++++++++
28 Jul 2009 - 6:34 pm | लवंगी
भाग्यवान आहात. या लेखाच्या निमित्ताने आता दूरदेशी पांगलेल्या सगळ्या नाठाळ भावांच्या आठवणी जाग्या केल्यात.
28 Jul 2009 - 7:24 pm | टारझन
राजे ... आमच्या काळजाला हदरवून गेलास मित्रा !!
अत्यंत हृदयस्पर्षी लेखण ...
सुरेख .. केवळ अप्रतिम .. कित्ती प्रामाणिक लिहीलं आहेस दोस्ता ...
जियो यारो ... मला राजे सारखा मित्र दिल्याबद्दल मिही मिपाचा पर्यायानं तात्यांचा आभारी आहे :)
- (आभारप्रेमी) टारझन
28 Jul 2009 - 11:11 pm | क्रान्ति
सुरेख लिहिलंय राजे हो! खूप खूप सहज आणि मनापासून लिहिलंय. :)
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
29 Jul 2009 - 9:58 am | विशाल कुलकर्णी
खुप सुरेख, राजे ! डोळ्यात पाणी आलं !
आम्ही तिघेही भाऊच, बहीण नाही, त्यामुळे लहानपणी आपल्याला सख्खी बहिण नाही याचं खुप वैषम्य वाटायचं. पण जसजसा मोठा होत गेलो तसं उमजायला लागलं. बहिणभावाचं नातं हे फक्त बहिण भावाचंच असतं, तिथं सख्खं, चुलत, मावस,सावत्र असं काही नसतं. उगाच नाही मोठ्या बहिणीला आईचा दर्जा दिला जात. माझ्या मते हे जगातलं सर्वश्रेष्ठ नातं असतं. या अप्रतिम लेखाबद्दल खुप खुप धन्यवाद !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
29 Jul 2009 - 10:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिर्षकावरुन मला वाटलं पुन्हा 'ते क्षण, त्या आठवणी, वो बाते' असे काही असेल. पण, लेखन वाचल्यावर भाऊ, बहिणीच्या नात्यावर र्हद्य लिहिलंय तेव्हा बरं वाटलं. बहीण भावाचं नातं खूप वेगळं आणि हळवं असतं , सतत भावांची काळजी, आईची काळजी, बाबांची काळजी, सतत मनातल्या मनात चिंता करणारं बहीण नावाचं एक मोठ पात्र भावांच्या आयुष्यात असतं नाही का !
-दिलीप बिरुटे
(हळव्या बहिणीचा हळवा भाऊ)
29 Jul 2009 - 10:40 am | निखिल देशपांडे
शिर्षकावरुन मला वाटलं पुन्हा 'ते क्षण, त्या आठवणी, वो बाते' असे काही असेल. पण, लेखन वाचल्यावर भाऊ, बहिणीच्या नात्यावर र्हद्य लिहिलंय तेव्हा बरं वाटलं.
+१ सहमत
बाकी मस्त लिहिलयत राजे
निखिल
================================
29 Jul 2009 - 12:57 pm | दशानन
>>>शिर्षकावरुन मला वाटलं पुन्हा 'ते क्षण, त्या आठवणी, वो बाते' असे काही असेल.
=))
>>बहीण भावाचं नातं खूप वेगळं आणि हळवं असतं , सतत भावांची काळजी, आईची काळजी, बाबांची काळजी, सतत मनातल्या मनात चिंता करणारं बहीण नावाचं एक मोठ पात्र भावांच्या आयुष्यात असतं नाही का !
१००% सहमत.
+++++++++++++++++++++++++++++
29 Jul 2009 - 10:26 am | पाषाणभेद
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
29 Jul 2009 - 12:02 pm | पूजादीप
राजे तूम्ही बालपनीच्या आठवणी जाग्या केल्या... नात्यांचे सूंदर वर्णन केले आहे. धन्यवाद...
29 Jul 2009 - 5:39 pm | ऋषिकेश
आमच्या कडे यक्झ्याक्टली उलट आहे.. दूरदूरपर्यंत नात्यात बहीण नाही.. त्यामुळे मानलेल्या बहिणींची संख्या नात्यातल्या बहिणींच्या कैकपट आहे.. अर्थात तरीही बहीण ही बहीणच असते.. माया तीच.. नाते तेच
लेख आवडला हे वे सां न
(एका बंगाली बहीणीसाठी दर रक्षाबंधनाला मासे हादडणारा)ऋषिकेश
------------------
चांदण्या शिंपीत जाशी.....!!!
30 Jul 2009 - 8:52 am | दशानन
>>मानलेल्या बहिणींची संख्या नात्यातल्या बहिणींच्या कैकपट आहे..
सेम सेम... पण देवाच्या दयेने नात्यातल्या बहिणी व मानलेल्या बहिणींची माया आमच्यावर अफाट आहे :)
>>अर्थात तरीही बहीण ही बहीणच असते.. माया तीच.. नाते तेच
१००% सहमत.
+++++++++++++++++++++++++++++
30 Jul 2009 - 12:50 am | स्वाती२
सुरेख लेख राजे.
30 Jul 2009 - 2:06 pm | अवलिया
वा ! मस्त !!
सुरेख लेखन, असेच लिहित रहा !
30 Jul 2009 - 4:59 pm | स्पृहा
मनातल्या भावनांचे प्रकटीकरण आवडले..........:)
खरच सुंदर मनोगत आहे.
4 Aug 2009 - 2:11 pm | दशानन
>>>मनातल्या भावनांचे प्रकटीकरण आवडले..........
धन्यवाद... धन्यवाद... तै ;)
ह्यालाच भावनांचे प्रकटीकरण म्हणतात काय =))
माहीत नव्हतं !
+++++++++++++++++++++++++++++
30 Jul 2009 - 9:33 pm | बिपिन कार्यकर्ते
वा राजे!!! सुंदर आठवणी जागवल्या तुम्ही.
बिपिन कार्यकर्ते