दोस्तहो,
हर्षद आनंदी ह्यांनी कलादालनमध्ये टाकलेले मढेघाटातले अप्रतिम फोटो बघून आणि त्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेली माहिती आणि त्याला मिळालेले प्रतिसादातील प्रश्न वाचून मला मढेघाटाविषयी ल्याहावेसे वाटले, ते असे,
एक म्हणजे शेवत्या घाट आणि मढे घाट हे दोन्हीही घाट वेगळे आहेत.
केळदमधून को़कणात उतरायला तीन घाटवाटा आहेत.
१. उपांड्याची नाळ,
२. शेवत्या घाट आणि तिसरी
३. मढेघाट,
पैकी मढेघाटाची वाट इतर दोन्ही घाटवाटांपेक्षा जास्त बरी आहे. उर्वरीत दोन वाटा त्यामानाने जरा अवघड आहेत. पण दोन्हीही घाटातला एक ऊत्तम ट्रेक होऊ शकतो. आत्ता पावसाळ्यात तर लईच भारी ट्रेक होईल, तो असा :
ट्रेकचं गांव : वाकी
वाकीतून नाणेमाचीमधून शेवत्या घाट चढून वर येणे. वा़की ते शेवत्या घाटमाथा चढून येण्यास साधारणपणे चार तास लागतात. घाटमाथा ते केळद गांव चालत जाणे. हि सगळी चाल सपाटीवरून आहे, वेळ लागतो अंदाजे दिड तास. केळदला मुक्काम करणे. दुसर्या दिवशी केळदवरून मढेघाट उतरून परत वाकी गाठणे.
महत्वाची सूचना : मढेघाट, शेवत्या घाट आणि उपांड्याची नाळ ह्या तिन्ही घाटवाटा पायी जाण्याच्याच आहेत. अजिबात गाडीरस्ता नाही. वरील ट्रेक करायचा झाल्यास जेवणाची सोय आपली आपणंच करावी, कुठेही हॉटेल्स नाहीत. वाकीपर्यंत कसे जावे ते मी कलादालनातील हर्षद आनंदी ह्यांच्या मढेघाट ह्या धाग्यावर लिहिलेले आहे.
हर्षद आनंदी ह्यांनी टाकलेले फोटो घाटमाथ्यापर्यंत पोहोचेपर्यंत दिसलेल्या सृष्टीसौंदर्याचेच आहेत. त्यात मढेघाटातील धबधबा दिसत नाही. ते तिथपर्यंत गेले नाहीत. पण कोणाला इच्छा असल्यास हा ट्रेक करून बघावा आणि तो धबधबा अवश्य बघावा.
प्रतिक्रिया
22 Jul 2009 - 11:58 am | हर्षद आनंदी
मी पोचलो.
पण अत्यंत धुके असल्याने, काही बघणे वा फोटो काढणे अशक्य होते. #o
माझे शेवटुन २,३,४ हे फोटो घाटावरचे आहेत. :)
माहीती बद्दल धन्यवाद !!! :\ :\ :\
22 Jul 2009 - 12:44 pm | पाषाणभेद
नाणेमाचीत शिवाजीमहाराजांनी कढाई केली होती ना?
भा. रा. भागवतांच्या पुस्तकात भिंगरी अन भवर्या महाराजांच्या सैन्याला मदत करत असल्याचा उल्लेख आहे.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
22 Jul 2009 - 5:52 pm | लिखाळ
माहिती उपयुक्त आणि चांगली आहे.
कधी योग आला तर छान भ्रमंती होईल :)
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)