"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ?

तळेकर's picture
तळेकर in जनातलं, मनातलं
18 Feb 2008 - 12:23 pm

"ल "या अक्षराचे वळण असे करता येईल ?

lalaa
शक्य असेल तर जरुर करा.
आणि ते आमच्या संगणकात कसे करता येईल तेही सांगा.

हे ठिकाणमांडणीभाषाशुद्धलेखनप्रश्नोत्तरेमाहिती

प्रतिक्रिया

मिसळपाव - बुधवार दिनांक २०-०२-०८ ला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ०९ ते १२ पर्यंत तात्पुरते बंद आहे. म्हणुन म्हटलं ईतर सुधारणा करता आहातच तर हेही करा.
"ल "हे अक्षर चे वर म्हटल्याप्रमाणे वळणदार असावे.
"मनोगतला" हे जमले आहे आपल्याला का जमनार नाही.

बेसनलाडू's picture

19 Feb 2008 - 11:09 am | बेसनलाडू

१. सध्याचे वळण काही वाईट नाही. मी शाळेत असल्यापासून आतापर्यंत आता आहे त्याच वळणाने 'ल' हे अक्षर लिहिले आहे; त्यात काही गैर आहे, ते वळण शुद्धलेखनाच्या नियमानुसार चुकीचे वगैरे आहे, असेही नाही. तसेही मिसळपावावर शुद्धलेखनाचे नियम पाळायचे असतात, असे नाही.
२. मनोगताला जमलेल्या गोष्टी मिसळपावाला जमतीलच/जमायलाच हव्यात (आणि vice versa) असे नाही.
सबब, सध्याचे वळण तसेच राहिले तरी चालेलसे वाटते.
(विश्लेषक)बेसनलाडू

चतुरंग's picture

19 Feb 2008 - 11:22 am | चतुरंग

"ल" असाच मी ही लिहित आलेलो आहे. त्यात काही चूक आहे असे मलाही वाटत नाही.
असेनाका ते असेच, अहो सगळ्यांनीच एकसारख्या गोष्टी कशासाठी करायच्या जर तो नियमभंग नसेल तर?

चतुरंग

तळेकर's picture

19 Feb 2008 - 11:30 am | तळेकर

मला आपलं वाटलं मराठीत "ळ " आहे हिंदी मधे नाही. हेच आपल्या मराठीच वेगळंपण "ल " अक्षरातही ऊठूण दिसावं/असावं.

सृष्टीलावण्या's picture

19 Feb 2008 - 11:30 am | सृष्टीलावण्या

तळेकरकाकांनी दाखविलेला 'ल' हाच खरा मराठी 'ल' आहे. आपण जो संगणकावर वापरतो तो मूळ हिंदी 'ल' आहे. मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे.

तसं जर असेल तर मग मी माझे मत बदलेन - पण आणखी काही संदर्भ देता येईल का, की त्याने पक्की खात्री होईल?

चतुरंग

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 6:15 pm | विसोबा खेचर

तळेकरकाकांनी दाखविलेला 'ल' हाच खरा मराठी 'ल' आहे. आपण जो संगणकावर वापरतो तो मूळ हिंदी 'ल' आहे. मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे.

मराठी 'ल' आणि हिंदी 'ल' यात भाषिक फरक कसा काय असू शकतो. अहो लिपी तर देवनागरीच आहे ना?

मराठीपणाच्या अस्मितेसाठी आपण हिंदीचे हे जोखड फेकून द्यायला हवे.

अहो हे फार होतंय हो! नाही, मायमराठीबद्दल आम्हालाही पिरेम आहे, परंतु केवळ एका 'ल' या अक्षरामुळे हिंदीचे जोखड मराठी अस्मितेला धक्का लावत आहे असे वाटत नाही. आणि जर तसे असेल तर मराठी अस्मिता अगदीच कमकुवत म्हटली पाहिजे!

जय महाराष्ट्र, जय मराठी!

आपला,
(हिंदीप्रेमी) तात्या.

सृष्टीलावण्या's picture

19 Feb 2008 - 8:34 pm | सृष्टीलावण्या

मराठी 'ल' आणि हिंदी 'ल' यात भाषिक फरक कसा काय असू शकतो. अहो लिपी तर देवनागरीच आहे ना?

फरक आहे आणि तो पण मामुली जसा आपण टंकलेखनात हिंदीतला 'श्व' मान्य केला जो मराठीत आपण लिहित नाही. असो. मुद्दा देवनागरी लिपीचा नसून आपल्या शासनाने हिंदी वर्णमाला जशीच्या तशी स्विकारण्याचा आहे.

केवळ एका 'ल' या अक्षरामुळे हिंदीचे जोखड मराठी अस्मितेला धक्का लावत आहे असे वाटत नाही.

हं, हे पण खरेच.

प्रमोद देव's picture

19 Feb 2008 - 12:56 pm | प्रमोद देव

ल हे अक्षर मराठी पद्धतीने लिहिल्यास ते जास्त आवडेल.
मी स्वत: हिंदी लिहितानाही मराठी पद्धतीचा ल च लिहितो. इथे मात्र तो तसा टंकला जात नाहीये.

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 5:44 pm | विसोबा खेचर

अरे नीलकांता,

जरा मंडळी काय म्हणताहेत ते बघ रे प्लीज आणि जमलं तर आपल्यालाही मनोगतासारखा जळ्ळा तो 'ल' काढता येतोय का ते बघ! :)

आपला,
(संपादक) तात्या.

"मनोगतला" हे जमले आहे आपल्याला का जमनार नाही.

अहो तळेकर साहेब, कुठे ते थोर मनोगत आणि कुठे मिसळपाव! का उगाच उच्चवर्णीय, उच्चभ्रू, सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, हुश्शार आणि स्कॉलर मनोगताची मिसळपावच्या टपरीशी तुलना करताय? अहो तिकडच्यासारखे भाषेचे, व्याकरणाचे, शुद्धलेखनाचे कडक नियम मिसळपावच्या रांगड्या प्रकृतीला झेपणार नाहीत हो! :)

आज मनोगत हे एक मराठीतलं एक बलाढ्य संकेतस्थळ आहे. दीपस्तंभच म्हणा ना! त्या मानाने मिसळपाव हे अगदीच एक लहान गलबत! परंतु आम्ही एक गोष्ट मात्र अभिमानाने म्हणू इच्छितो की मिसळपावच्या या लहान गलबताला अगदी अंधार्‍या वादळी रात्रीही मार्गदर्शनाकरता कधी कुठल्या दीपस्तंभाकडे बघायची सवय नाही आणि नसेल! मग भले ते एखाद्या खडकावर आपटून फुटलं तरी बेहत्तर!

आपला,
(वादळवार्‍यातला) तात्या.

बाय द वे, मला एक सांगा तळेकर साहेब, आपण म्हणता तो 'ल' वापरल्याने आणि मिसळपावचा 'ल' वापरल्याने अर्थात नक्की काय फरक पडणार आहे? आणि अहो तुम्ही तर 'शाहूस्पर्ष शाहू महाराज' या लेखात ज्या लेखाचा दुवा दिला आहे त्यातही मिसळपाववर आहे तोच 'ल' आहे की! :)

आपला,
तात्या बर्वा, रत्नांग्री. :)

असो..!

तरीही आपल्या म्हणण्याला मान देऊन मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव त्यांच्या परिने तुम्हाला हवा तसा 'ल' देण्याचा प्रयत्न करतील एवढे आश्वासन तूर्तास देतो. जमल्यास उत्तमच, नाय जमल्यास माफ करा! :)

आपला,
तात्या वेलणकर. :)

तळेकर's picture

19 Feb 2008 - 6:08 pm | तळेकर

तात्या, नीलकांताला हे जमेल. आणि हो उगाच आपण "मिसळपाव"ला कमी लेखू नका. अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे मनोगतला जमले नाही ते आपल्या मिसळपावला जमले आहे.
मनोगत बरोबर तुलना केल्यामुळे आपण दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा.

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 6:46 pm | विसोबा खेचर

तात्या, नीलकांताला हे जमेल.

तसं झालं तर उत्तमच आहे! आपल्याला तर बुवा कुठलाही 'ल' चालणार आहे! :)

आणि हो उगाच आपण "मिसळपाव"ला कमी लेखू नका.

तळेकर साहेब, आपण जर माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नीट काळजीपूर्वक वाचलात, तर मिसळपावला मी कुठेही कमी लेखलेलं नाही हे आपल्या सहज लक्षात येईल! :)

रांगडा स्वभाव, टपरी, गलबत असे शब्द वापरणं म्हणजे माझ्या मते तरी कुठेही कमी लेखणं होत नाही! :)

अशा पुष्कळ गोष्टी आहेत की जे मनोगतला जमले नाही ते आपल्या मिसळपावला जमले आहे.

ओहोहो, क्या केहेने तळेकरसाहेब! जियो...!! :)

मनोगत बरोबर तुलना केल्यामुळे आपण दुखावले गेला असाल तर मला क्षमा करा.

अहो छे हो, त्यात क्षमा वगैरे कसली मागताय? मी आपली अशीच गंमतीत काही मुक्ताफळे उधळली होती त्याकरता उलटपक्षी तुम्हीच मला क्षमा करा! :)

आणि मनोगत काय किंवा इतर कुठले संस्थळ काय, मिपाची कुणाही सोबत तुलना केल्यामुळे मी कधीच दुखावला जाणार नाही! In fact, मनोगत हे आजही माझं पहिलं प्रेम आहे. अहो मुळचा मनोगतीच मी! :)

आणि खरं विचाराल तर मी देखील आता पुन्हा मनोगत जॉईन करण्याचा सिरियसली विचार करत आहे. अहो आमच्या वेलणकरशेठने मनात कुठलीही अढी न ठेवता केव्हाच मिपाचे सभासदत्व घेतले आहे! :)

मग मीच का मागे राहू? मीही पुन्हा एकदा मनोगत जॉईन करून बसंतच्या लग्नाचे, शिंत्रेगुरुजींचे, आणि सालस चे पुढील भाग तिथेच पुरे करेन म्हणतो! :)

आपला,
(मुळचा मनोगती आणि मुख्य म्हणजे सर्वच मराठी संस्थळांबद्दल मनात प्रेम असणारा!) तात्या.

असो! वादावादी, भांडणं, मारामार्‍या वगैरे चालायच्याच! त्या शिवाय मजा नाही! :)

झगडा, मतभेद असलेच तर ते माणसांशी/चालकमालकांशी!

'मराठी संकेतस्थळ' या आपलेपणाच्या, मराठीपणा जोपसणार्‍या 'संकल्पने'शी नाही! कधीही नाही..!

असो.. !

आपला,
(मराठी) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2008 - 8:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'ल' चे काय काढलं राव !!! विषयांतर होऊन पाहा याचा समारोप कुठे जातोय ?

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Feb 2008 - 9:21 pm | बिपिन कार्यकर्ते

डॉ. साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण मला तात्याचा प्रतिसाद पाहून बरे वाटले. मला तात्याचा दिलदार पणा आवडतोच, पण महेश वेलणकर ही ग्रेटच. त्यांनीही इथे सदस्यत्व घेतले आणि ते सुद्धा खर्‍या नावानेच, सरळ.... टोपणनाव वगैरे भानगड नाही. रोखठोक मामला. असे पाहिजे. राग आपापसात. तो संस्थळांवर का काढा?

तात्या, मागे तू कुठे तरी लिहिले होतेस ना की, मनोगत हे नेहमीच तुझे 'first love' राहील. तू तिथे परत जायचा विचार करतो आहेस.... व्हेरी गुड.

बिपिन.