काव्यशास्त्रविनोद:। (काव्यशास्त्राद्वारे विनोद)

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जनातलं, मनातलं
15 Feb 2008 - 6:19 pm

चितां प्रज्वलितां दृष्ट्वा वैद्य: विस्मयम् आगत: ।
नाहं गतो न मे भ्राता कस्य इदं हस्तलाघवम् ।।

भावार्थ -चितेला जळताना पाहून वैद्यबुवांना आश्चर्य वाटले,
ते मनांत म्हणाले, ह्या व्यक्तिवर उपचार करायला मी सुद्धा गेलो नव्हतो आणि
माझा भाऊ पण. मग कोणाचे बरे हे हस्तकौशल्य?

सुभाषितेप्रकटनभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

वरदा's picture

15 Feb 2008 - 6:40 pm | वरदा

काही कळ्ळं नाही....

इनोबा म्हणे's picture

15 Feb 2008 - 6:51 pm | इनोबा म्हणे

वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.)

बाकी विनोद छान आहे...चालू द्या...

सृष्टीलावण्या's picture

16 Feb 2008 - 6:32 am | सृष्टीलावण्या

@काही कळ्ळं नाही....

वरदाताई, ही तर माझ्यासारख्या व्यावसायिक भाषांतरकारासाठी नामुष्कीची बाब आहे.

असे केले तर, तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांना ह्याचा अर्थ विचारा अर्थात त्यांची मनस्थिती (mood) चांगली आहे का हे पाहूनच.

विसोबा खेचर's picture

16 Feb 2008 - 8:12 am | विसोबा खेचर

वरदाशी सहमत आहे. खरं सांगायचं तर मलाही काही कळलं नाही!

हा विनोद होता का?

तात्या.

धोंडोपंत's picture

16 Feb 2008 - 8:29 am | धोंडोपंत

हा हा हा हा हा,

छान छान. अशीच सुभाषिते येऊ द्या.

आपला,
(गीर्वाणप्रेमी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विकेड बनी's picture

15 Feb 2008 - 7:11 pm | विकेड बनी

>>वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.)

तरी बरं की या वरदाबाईंचे आडनाव वैद्य नाही.

वैद्यबुवांचे तर्कट आवडले.

प्राजु's picture

15 Feb 2008 - 7:55 pm | प्राजु

छान आहे. वैद्यबुवांची कमालच म्हणायची , इतका विश्वास स्वतःच्या हातच्या गुणा(??)बद्दल!

- प्राजु

वडापाव's picture

15 Feb 2008 - 8:56 pm | वडापाव

असे विनोद अजून अनुभवायला मिळाले तर आपल्या चेह-यावर खळीसंगे हास्य फुलतं... व आपण आनंदलो आहोत ह्या जाणीवेनेच समाधान वाटतं... येऊद्यात अजून काही विनोद(भावार्थासकट द्या - आम्हांला काहीच 'कळ्ळे' नाही असे होता कामा नये)

भडकमकर मास्तर's picture

16 Feb 2008 - 7:34 am | भडकमकर मास्तर

शूलिजातः कदशनवशाद भैक्ष्ययोगात्कपाली
वस्राभावाद्गगनवसन स्नेहशून्याज्जटावान
इथ्थम राजन्स्तवपरिचयात इश्वरत्त्वमयाप्तम
तस्मान्मैह्यम किमिति क्रुपया नार्धचंद्रम ददासि

भावार्थ : ( कवी राजाकडे मदत मागत असावा)...( हे राजा बघ माझे कसे हाल झाले आहेत, )अन्न नाही, वस्त्र नाही, तेल नसल्यामुळे केसांच्या जटा झाल्या आहेत्,म्हणजे मी ईश्वरत्त्वालाच पोचलो आहे (मी जणू जटाधारी शंकर झालो आहे)..तर मग हे राजा तू मला ( एकच गोष्ट उरली ती म्हणजे) अर्धचंद्र का देत नाहीस?...( याचा दुसरा अर्थ म्हणजे मला हाकलून का देत नाहीस?)

अवांतर : संस्क्रुत शुद्धलेखन मिष्टेक्ससाठी माफी असावी... बर्‍याच वर्षांनी लिहितोय ...

भडकमकर मास्तर's picture

16 Feb 2008 - 7:36 am | भडकमकर मास्तर

अवांतर : आता इथे बरेच संस्क्रुत लिहिणार, पण पायमोड्या म कसा लिहायचा?

धोंडोपंत's picture

16 Feb 2008 - 8:27 am | धोंडोपंत

मृ --- mRu--- असे लिहावे.

आपला,
(पर्यायसूचक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव's picture

16 Feb 2008 - 3:04 pm | केशवराव

धोंडोपंत,
मला वाटते त्याना पाय मोड्या म म्हणजे अर्धा म म्हणायचे असावे.

----------- [अंदाज बांधणारा केशवराव. ]

सृष्टीलावण्या's picture

16 Feb 2008 - 9:54 am | सृष्टीलावण्या

पायमोड्या म आणि इतर मराठी टंकलेखनासाठी माझ्यामते http://www.chhahari.com/unicode/
सगळ्यात सोपे आणि उपयोगकर्ता मित्रत्वाचे (user friendly) आहे.

सृष्टीलावण्या's picture

16 Feb 2008 - 9:56 am | सृष्टीलावण्या

सुंदर, मनोहारी, चित्तवेधक....

अवलिया's picture

16 Feb 2008 - 3:13 pm | अवलिया

वैद्य राज नमस्तुभ्यम
यमराज सहोदरः.
एकः हरति प्राणं
अपरः प्राणानि धनानि च..

समजायला सोपे आहे असे मला वाटते

नाना

भडकमकर मास्तर's picture

16 Feb 2008 - 11:56 pm | भडकमकर मास्तर

पुरा कवीनाम् गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः
अद्यापितत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव

भावार्थ : पूर्वी एकदा कवींची गणना करताना ( करंगळीपासून मोजणी सुरू केली) प्रथम स्थान कालिदासाला दिले गेले. पण अजूनही कालिदासाच्या तुलनेचा कवी नसल्यामुळे ( शेजारील बोटाचे )अनामिका हे नाव सार्थ झाले.

भडकमकर मास्तर's picture

17 Feb 2008 - 8:42 am | भडकमकर मास्तर

हे अगदी फ़ेमस आहे...
इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख तानि सहे चतुरानन
अरसिकेषु कवित्त्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख

भावार्थ : हे ब्रह्मदेवा, ( माझ्या नशिबात) बाकी काहीही वाईट लिही , ते मी सहन करेन पण अरसिक माणसाला कवित्त्व शिकवण्याचे काम माझ्या माथी नको लिहूस ,नको लिहूस ,नको लिहूस....

भडकमकर मास्तर's picture

17 Feb 2008 - 8:56 am | भडकमकर मास्तर

अस्माकम् बदरीचक्रम् युष्माकम् बदरीतरु:
बादरायणसंबंधात् यूयम् यूयम् वयम् वयम्

भाषांतर : आमच्या ( बैलगाडीचे)बोरीच्या झाडापासून केलेले चाक, तु्मच्या दारात बोरीचे झाड...
( मात्र) बादरायणसंबंधामुळे तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत.............

भावार्थ : हा प्रवासी बैलगाडीतून आपली फ़ॆमिली घेऊन निघालाय आणि मुक्कामाच्या जागी दूरदूरच्या ओळखी काढून, संबंध जोडून फ़ुकटात मुक्काम करायची आणि पाहुणचार झोडायची कला त्याला चांगली साधली आहे.....म्हणून पहिल्या ओळीत फ़ुकट्या प्रवासी म्हणतो, " आमच्या बैलगाडीचे बोरीच्या झाडापासून केलेले चाक, तु्मच्या दारात बोरीचे झाड...आपला मोठा संबंध आहे"त्यावर तो खमक्या यजमान दुसया ओळीत म्हणतो, "आपल्यात असले ओढून ताणून नातं क्रिएट करू नका , हा असला बादरायणसंबंध आहे आणि तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत...थोडक्यात चालू पडा..."

लिखाळ's picture

18 Feb 2008 - 12:24 am | लिखाळ

सृष्टीलावण्य,
फार मस्त ! विनोदी काव्य आवडले.
--लिखाळ.
मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

महेश हतोळकर's picture

18 Feb 2008 - 4:46 pm | महेश हतोळकर

कमले कमला श्येत्ये हरः श्येत्ये हिमालयौ|
हरी: श्येत्ये क्षीरौदधी मन्ये मत्कूण शंकया||

कमळात कमला (लक्ष्मी) वसते (निजते), हर (महादेव) वसतो (निजतो) हिमालयात,
हरी वसतो (निजतो) क्षीरसागरात, मला (तर) ढेकणाची शंका (येते).

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Feb 2008 - 1:24 am | llपुण्याचे पेशवेll

बेडबग (अर्थात ढेकणाना) ला कंटाळलेला..डॅनी....
पुण्याचे पेशवे

वरदा's picture

18 Feb 2008 - 5:50 pm | वरदा

वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.)

अहो हा विनोद आहे असं तुम्हाला वाटलं म्हणजे सगळ्यांनाच वाटेल असं नाही खरं ना?

असे केले तर, तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांना ह्याचा अर्थ विचारा अर्थात त्यांची मनस्थिती (mood) चांगली आहे का हे पाहूनच.

गरज नाही वाटत मला...कळ्ळं नाही म्हणजे त्यात कसलाच विनोद वाटला नाही असं म्हणायचं होतं मला...

ही तर माझ्यासारख्या व्यावसायिक भाषांतरकारासाठी नामुष्कीची बाब आहे.

आता ते तुम्ही बघा बुवा मी प्रामाणिक प्रतिसाद दिला...

बाकी सतलज यांचं सुभाषित आवडलं माझी आजी असं काहीसं म्हणंत असल्याचं आठवतंय छान सुभाषित आणि भावार्थही छान दिलाय....आणि मी यांचं सुभाषित आमच्या नववीच्या पुस्तकातलं खुप वर्षांनी वाचून छान वाटंलं.....

सुनील's picture

21 Feb 2008 - 1:48 am | सुनील

तातेन कथितं पुत्र |
पत्र लिख ममाज्ञः |
न तेन लिखितं पत्र |
पितुराज्ञा न लंघिता ||

बापाने पोराला सांगितले, माझ्या आज्ञेनुसार पत्र लिही. पोराने पत्र लिहिले नाही आणि बापाची आज्ञाही उल्लंघली नाही !!

आता हे कसे ?

तातेन कथितं पुत्र |
पत्र लिख ममाज्ञः |
नतेन लिखितं पत्र |
पितुराज्ञा न लंघिता ||

नतेन = नम्रपणाने.

टीप : संस्कृत लिखाण हे स्मरणशक्तीच्या आधारे केले आहे. चुका आढळल्यास समजून घ्या आणि शक्य असल्यास सुधारून ध्या, ही विनंती.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.