जॉनी मेरा नाम...

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
18 Jun 2009 - 9:06 pm


उजवीकडला लहान चणीचा जॉनी .(१९५/२००)
डावीकडला पहीला . सुजीत (सरंक्षण दलाचे आरक्षण असूनही ओपन कॅटेगरीत येऊन दाखवीन अशी मला खात्री दिली होती (१८०/२००)
त्याच्या शेजारी . एलन (एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय दोन्ही शाखेत प्रवेश नक्की. ( १८३/२००)

उतणार नाही मातणार नाही
मार्कांचा माज करणार नाही
यशाचा वसा टाकणार नाही
के.टी कलेक्टर होणार नाही
नोकरी शिवाय एम्.बी.ए करणार नाही
भार पालकांवरटाकणार नाही.

शपथविधी समारंभानंतर मास्तरने दिलेला सल्ला.

१. २४ तासात मार्क विसरायचे.
Gone, kaput,vamoss, history.
नविन पिच, नविन इनिंग

2. गोड हसली म्हणुन पोरींची गुलामी करायची नाही.

३.सेमिस्टर सुट्टीत अनुभव मिळण्याकरता मास्तर कडून जरुर मदत मागून घ्यायची

४.सर्व सेमिस्टर मधे डीस्टींक्शन मिळवायचे.

५. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होउन कॉलेज नीट सुरु व्हायला लागणार्‍या दिड महीन्यात कंप्युटर आणि मॅकॅनिकल ड्रॉइंग चा अभ्यास पूर्ण करायचा. कुठलाही क्लास न लावता ह्यातल्या 'पंडीताचे' फुकट मधे मार्गदर्शन.

६.दोन वर्ष नोकरी केल्याशिवाय एमबीए किंवा एमएस चा विचार सुद्धा करायचा नाही.

७.काहीही अडचण आल्यास मास्तर आपला वेठबिगार असल्यासारखा वापरायचा.

८. 'जॉनी' करता सर्व चार वर्षाच्या फी चा कमीत कमी भार पालकांवर पडेल ह्याची शक्कल मास्तर लढवणार.

९ अहंकाराचा वारा न लागो राजसा माझीया ......हे कायम लक्षात ठेवेन.

१० आज माझ्यासाठी मास्तर आहेत ,मी उद्याच्या जॉनीसाठी मास्तर होईन.

जाता जाता -तूर्तास, एव्हढेच
तीन कन्यकांचा असाच फोटो कधीतरी टाकेन.
सांगायची गोष्ट .मुलीपण काही मागे नाहीत.

समाजसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

18 Jun 2009 - 9:11 pm | संदीप चित्रे

धन्स मास्तर... का माहिती नाही पण फोटोखालची नावं वाचण्याआधीच जॉनी अचूक ओळखला :)

>> १. २४ तासात मार्क विसरायचे.
Gone, kaput,vamoss, history.
नविन पिच, नविन इनिंग

2. गोड हसली म्हणुन पोरींची गुलामी करायची नाही.

हे तर खासच.

नितिन थत्ते's picture

18 Jun 2009 - 9:16 pm | नितिन थत्ते

के.टी कलेक्टर होणार नाही
ओ कायतरी काय? गणितात KT घेतल्याशिवाय कोण इंजिनिअर झालाय काय?
(बाळ खराट्या, तू पालथे धंदे करून दरवेळी केट्या घेऊन पास झालास म्हणजे सगळेच तसे नसतात. हे तर टॉपचे लोक आहेत.)

(KT सम्राट) खराटा

अप्पा जोगळेकर's picture

20 May 2011 - 11:06 am | अप्पा जोगळेकर

बाळ खराट्या, तू पालथे धंदे करून दरवेळी केट्या घेऊन पास झालास म्हणजे सगळेच तसे नसतात. हे तर टॉपचे लोक आहेत.
जे सलग चार वर्षात विंजिनेर होतात ते सगळे अत्यंत हुशार असतात.

( ड्रॉपर + केटी सम्राट + ढब्बू )

चतुरंग's picture

18 Jun 2009 - 9:16 pm | चतुरंग

जॉनी मेरा नाम!! देवाची लेकरं आणि दयाळू वाटाड्या!!
__/\__

(धन्य)चतुरंग

घाटावरचे भट's picture

18 Jun 2009 - 9:24 pm | घाटावरचे भट

__/\__

- भटोबा

सहज's picture

18 Jun 2009 - 9:34 pm | सहज

__/\__

=D> =D> =D>

मुक्तसुनीत's picture

18 Jun 2009 - 9:56 pm | मुक्तसुनीत

:-)

दशानन's picture

19 Jun 2009 - 9:23 am | दशानन

दंडवत मास्तर !

थोडेसं नवीन !

लिखाळ's picture

18 Jun 2009 - 9:26 pm | लिखाळ

जोरात !
अभिनंदन :)

-- लिखाळ.
या मास्तरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

विकास's picture

18 Jun 2009 - 9:37 pm | विकास

सर्व यशस्वी "कलाकारांचे" अभिनंदन!

बरेचसे मुद्दे देखील पटले. मात्र, "प्रवेश प्रक्रिया पूर्ण होउन कॉलेज नीट सुरु व्हायला लागणार्‍या दिड महीन्यात कंप्युटर आणि मॅकॅनिकल ड्रॉइंग चा अभ्यास पूर्ण करायचा. कुठलाही क्लास न लावता ह्यातल्या 'पंडीताचे' फुकट मधे मार्गदर्शन." हा मुद्दा समजू शकला तरी पटत नाही. आपल्या शिक्षणपद्धतीतील ती मर्यादा आहे.

तसेच शिकत असताना अभ्यासात/शास्त्रात उत्सुकता अर्थात "इन्क्विझिटीव्हनेस" ठेवीन, तसा प्रयत्न करेन असे पण म्हणावेसे वाटते.

आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे (विशेष करून) इंजिनियर होताना (पण इतरही पदव्यांमधे) भाषेचे महत्व कमी करणार नाही. भाषा (मराठी, इंग्रजी इतर जी कुठली योग्य असेल ती) शिकत राहीन आणि त्याचा संवाद माध्यम म्हणून जास्तीत जास्त वापर करण्यात तरबेज होईन. त्यासाठी भरपूर अवांतर वाचेन. म्हणजे भाषापण चांगली होईल, अनेकांशी संवाद साधता येईल आणि समुपदेशनाची गरज कमी भासेल ;) (शेवटचा भाग ह.घ्या. हे.वे.सां.न.ल.)

रेवती's picture

18 Jun 2009 - 9:56 pm | रेवती

आणखी एक शपथ म्हणजे जातीयता मानणार नाही.:)

रेवती

विकास's picture

18 Jun 2009 - 10:17 pm | विकास

+१ :-)

विनायक प्रभू's picture

18 Jun 2009 - 10:19 pm | विनायक प्रभू

मान्य. अ‍ॅडमिशन झाल्यावर सांगतो
मात्र मर्यादा (लिमिट्स) ओलांडायची सवय आत्तापासुन.

रेवती's picture

18 Jun 2009 - 9:54 pm | रेवती

अहो काय हे सर!
डोळ्यात पाणीच आलं आपले सल्ले वाचून!
कसले ग्रेट आहात आपण!
सगळे सल्ले सोन्यासारखे!
एक (की अनेक?) जबाबदार नागरीक व जबाबदार वाटाड्या घडवण्याचे! ही मुले नशिबवान आहेत, आपल्यासारखा वाटाड्या मिळाला म्हणून!
अजून एक, ते मुलींचे फोटूपण टाका की लवकर!

रेवती

मुशाफिर's picture

18 Jun 2009 - 9:47 pm | मुशाफिर

गुरू आणि शिष्य दोघांनाही!

मुशाफिर.

टारझन's picture

18 Jun 2009 - 9:50 pm | टारझन

मस्तर ... उत्तम हो :)

पण केटी शिवाय इंजिनियरींग ला मज्जा मज्जा नाही .. आणि एखादा सब्जेक्ट क्रिटीकल ला जाण्या(किंवा नेन्या) सारखं थ्रील नाही कुठं

यशोधरा's picture

18 Jun 2009 - 9:53 pm | यशोधरा

अगदी मनापासून अभिनंदन!

सुबक ठेंगणी's picture

19 Jun 2009 - 12:33 pm | सुबक ठेंगणी

अभिनंदन...
तुमची टीम माझ्यासाठी एक आदर्श...आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठीही...

क्रान्ति's picture

18 Jun 2009 - 9:54 pm | क्रान्ति

धन्य ते गुरू आणि धन्य ते शिष्य!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

भिंगरि's picture

18 Jun 2009 - 10:18 pm | भिंगरि

सर,

तुमचे आणि तुमच्या शिष्योत्तमांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढच्या वाटचालिसाठि हार्दिक शुभेछ्छा!

प्राजु's picture

18 Jun 2009 - 10:29 pm | प्राजु

अभिनंदन!!! अगदी मनापासून.

मास्तर तुम्हाला दंडवत!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एक's picture

18 Jun 2009 - 10:40 pm | एक

इंजिनियरींग साठी "प्रगती", २१ अपेक्षीत - रेडीमेड उत्तरं, प्रो. च्या रेडीमेड नोट्स वापरणार नाही.

एकवेळ डीस्टीन्क्शन नाही मिळालं हरकत नाही पण रेफरन्स किंवा टेक्स्ट ला पर्याय नाही..
मॅथ्स ला केटी घ्यावीच लागते असा काही नियम नाही..अभ्यास-सराव स्वःताचा स्वःता केला तर ८ ही सेम्स मधे डीस्टींक्शन शक्य आहे.

मस्त कलंदर's picture

18 Jun 2009 - 10:45 pm | मस्त कलंदर

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

चतुरंग's picture

18 Jun 2009 - 10:49 pm | चतुरंग

तयार जेवण घेऊ नका. अपेक्षित्,प्रगती नो नो...
मॅथ्सला केटी लागायचे कारण नाही!

(M2 92/100)चतुरंग

घाटावरचे भट's picture

19 Jun 2009 - 3:14 am | घाटावरचे भट

आणि स्वतःचा अभ्यास करून ४० ही शक्य आहे. ;)

-भटोबा (यम २ - ४०/१००, फष्ट अ‍ॅटेम्ट)

अवांतर - अनिल कुंबळे ब्याटिंग करताना ५० रन झाले की ब्याट वर करायच्या ऐवजी ४० रन झाले की ब्याट वर करायचा म्हणतात...

बबलु's picture

18 Jun 2009 - 11:24 pm | बबलु

जॉनी मेरा नाम !!
देवाची लेकरं आणि दयाळू वाटाड्या !!

(स्वगतः आमच्या वेळी मास्तरांसारखा वाटाड्या का नाही भेटला राव?)

....बबलु

नितिन थत्ते's picture

18 Jun 2009 - 11:37 pm | नितिन थत्ते

Gone, kaput,vamoss, history
हे काय सुधरलं नाय.

(अशिक्षित व मठ्ठ)खराटा

विनायक प्रभू's picture

19 Jun 2009 - 9:04 am | विनायक प्रभू

अ‍ॅडमिशन मिळाल्यावर मार्क 'पुराणातील वांगी' व्हावीत चे इंग्रजी भाषांतर. जरा जास्तच आक्रमक.

एकलव्य's picture

19 Jun 2009 - 1:27 am | एकलव्य

अभिनंदन!

६.दोन वर्ष नोकरी केल्याशिवाय एमबीए किंवा एमएस चा विचार सुद्धा करायचा नाही.

हे तर मस्तच!!

Nile's picture

19 Jun 2009 - 5:32 am | Nile

गोड हसली म्हणुन पोरींची गुलामी करायची नाही.

ह.ह.पु.वा. (राहताहेत बिचारी ब्रम्हचारी जन्मभर) ;)
यशस्वी विद्यार्थ्यांचे अन त्यांच्या मार्गदर्शकाचे हार्दीक अभिनंदन!! :)

धनंजय's picture

19 Jun 2009 - 3:35 am | धनंजय
गोड हसली म्हणुन पोरींची गुलामी करायची नाही.

ह.ह.पु.वा.

असेच म्हणतो. अहो सर - कोवळ्या वयात चक्रम प्रेमात पडू द्यात की पठ्ठ्यांना. त्या वयात पडणेही सोपे, धूळ झाडून उठणेही सोपे.

सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

मदनबाण's picture

19 Jun 2009 - 5:08 am | मदनबाण

__/\__

:)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

स्वाती२'s picture

19 Jun 2009 - 6:20 am | स्वाती२

सर, तुमचे आणि तुमच्या गुणवंतांचे अभिनंदन. तुमच्या Ten Commandments खासच.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 9:18 am | विसोबा खेचर

एलन (एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय दोन्ही शाखेत प्रवेश नक्की.

हम्म! अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेत प्रवेश म्हणजेच यश का?? उद्या वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून तो मुलगा कुणी पेशालिस्ट डॉक्टर झाला तर तो पेशंटना लुटणार नाही, कट प्रॅक्टिसच्या रॅकेटमध्ये सापडणार नाही याची खात्री आहे का तुम्हाला? त्या दृष्टीने त्याच्यावर काय संस्कात केलेत?? जळ्ळं त्या सी ई टी परिक्षेत चार मार्क पडले तर फोटो डकवून कवतिकं कसली करताय??

एखाद्या परिक्षेत २०० पैकी १९०+ मार्क पडले तर त्यात त्या पोरांनी किंवा तुम्ही काय असे मोठे दिले लावलेत? लाईफच्या परिक्षेसंबंधी काय शिकवता पोरांना? की १९०+ मिळाले म्हणजे फोटू डकवून मिरवण्यातच सार्थक झाले??

जी मुलं नापास झाली, अयशस्वी ठरली त्यांच्याकरता काय केलेत??

६.दोन वर्ष नोकरी केल्याशिवाय एमबीए किंवा एमएस चा विचार सुद्धा करायचा नाही.

पुन्हा तेच! विंजिनियरींग, मेडीकल आणि एम बी ए..!

त्यापेक्षा स्वत:चा काही धंदा करेन, स्वत:च स्वत:च्या पायावर उभा राहीन, असं का नाही काही शिकवत त्या पोरांना??

मास्तर, कुणावर संस्कार करणारच असाल, गायडन्स देणारच असाला तर पोरांना नुसते परिक्षार्थी बनवू नका! त्यात दूरगामी धोके आहेत!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2009 - 9:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोरं भविष्यात काय करतील कोणी पाहिलं तात्या, आणि लाइफचं भविष्य जगता-जगता येईल शिकता, हे वय शिकण्याचे आहे, दुनियादारीची ओळख होतच राहील की !

पण ज्यांच्याकडून अपेक्षाच नाही, असे पोरं घडवणे म्हणजे मोठ्ठ काम तेव्हा अशा माणसाचं कौतुक नक्कीच आहे !

स्वगत : तात्या, काहून मास्तरच्या मागे लागलाय कोणास ठाऊक ?

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 9:33 am | विसोबा खेचर

स्वगत : तात्या, काहून मास्तरच्या मागे लागलाय कोणास ठाऊक ?

;)

भाग्यश्री's picture

19 Jun 2009 - 12:45 pm | भाग्यश्री

का बळंच चिडताय हो तात्या?
त्या मुलांचे एम जर इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हायचे असेल,प्रभू मास्तरांना त्यात मदत कराविशी वाटली, तर आपलं काय बिघडलं? संस्कार त्या मुलांचे आई बाप पाहतील! नाही का?
(परवापासून जास्तच चिडताय बुवा... का शुद्धलेखन,ऑस्कर बरोबर इंजिनिअरिंग पण आलं आता?)
http://www.bhagyashree.co.cc/

Nile's picture

19 Jun 2009 - 1:11 pm | Nile

जरा थंड घ्या! :)

विनायक प्रभू's picture

19 Jun 2009 - 9:26 am | विनायक प्रभू

तेच.
अहो तात्या,
मी त्या मुलांना अगदी तुमच्या भाषेत काय काय सांगितले ते सर्व इथे कसे लिहु?

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 9:27 am | विसोबा खेचर

मास्तर,

तुम्ही तुमची कवतिकं नेहमीच सांगत असता म्हणून आता मीही एक माझं कवतिक सांगतो..

आजपर्यंतच्या आयुष्यात तीन निराश मुलं भेटली. अगदी निराश. समोर काही नाही, फक्त अंधार!

मी त्या पोरांना आयुर्विमा महामंडळाच्या दलाली बद्दलची सर्व माहिती सांगितली. सर्व खाचा खोचा समजावल्या. या धंद्यात किती कष्ट करावे लागतात आणि योजनाबद्ध कष्ट केले असता काय होऊ शकतं हे सांगितलं, समजावलं, त्यांना तयार केलं.

मला सांगायला आनंद वाटतो की आज ते तिघेही जण अक्षरश: खोर्‍यानं पैसा कमावताहेत, स्वत:च्या पायावर उभे आहेत. या धंद्यात किती पैसा मिळू शकतो ते रामदासरावांना विचारा..!

तात्या.

मुक्तसुनीत's picture

19 Jun 2009 - 9:36 am | मुक्तसुनीत

तात्या ,
तुमच्या तीन लोकांबद्दल , त्यांना तुम्ही केलेल्या मदतीबद्दल ऐकून आनंदच झाला ! मनःपूर्वक अभिनंदन.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 9:57 am | विसोबा खेचर

तुमच्या तीन लोकांबद्दल , त्यांना तुम्ही केलेल्या मदतीबद्दल ऐकून आनंदच झाला ! मनःपूर्वक अभिनंदन.

अरे आता बोलू नये, परंतु खरंच साफ अंधार होता रे त्यांच्या आयुष्यात! साला शिक्षणात गती नाही. घरची अत्यंत गरीबी, खायचे वांधे. अरे साधे ३५ मार्क मिळायची मारामार तिथे मास्तरच्या त्या सीईटीची आणि विंजिनियरींगची बातच सोड!

आमचा बापू सोनावणेच बघ. साला काय केलं नाही आयुष्यात बापूने? वडापाव विकला, फटाके विकले, आंबे विकले, रिक्षा चालवली! पण आज बापू अगदी मजेत मस्तीत आपलं आयुष्य जगत आहे. साला शाळेतले मार्क फाट्यावर मारले बापूने!

आमचा काल्या शिंदे. शाळेत जायचेच वांधे होते पण जेमतेम दहावी पर्यंत पोहोचला परंतु दहावी नापास झाला. समजावणारं, समुपदेशन करणारं, पाठीवरून मायेचा हात फिरवणारं कोण नव्हतं. बाप एक नंबरचा बेवडा. त्याला आणि आईला मारझोड करायचा. पण आज काल्या पेंटिंगची मोठमोठी कामं घेतो. अगदी भिंती खरवडण्यापासून काल्याने मेहनत घेतली. प्रसंगी उपाशी राहिला! पण स्वत:च्या पायावर उभा राहिला. ना काल्याने दहावीच्या/बारावीच्या/सीईटीच्या मार्कांचा बागुलबुवा मानला ना त्याला काही किंमत दिली. अरे बिचार्‍या आमच्या काल्याला सी ई टी म्हण्जे काय हे पण माहीत नाय रे! फाट्यावर मारलं सबकुछ आणि स्वकष्टाने स्वत:च्या पायावर उभा राहिला! आज काल्याकडे १० रंगारी पगारी नोकरीवर कामाला आहेत..!

असो. तुमची आणि मास्तरांची दहावी-बारावीच्या मार्कांची आणि सी ई टीच्या यशाची (!) कवतिकं चालू द्यात! साला उथळपणा सगळा!

जाऊ द्या! आपंण काय नाय बोलत..

नायतर पुन्हा माझ्यावर तेजोभंगाचा वगैरे आरोप व्हायचा!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2009 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण निराश मुलासांठी घेतलेले कष्ट , परिश्रमही मास्तराच्याच दर्जाचं आहे !
आपलेही अभिनंदन !

अवांतर : आयुर्विमा महामंडळाच्या दलालीचा धंदा प्रामाणिक असतो का ? (माहिती हवी आहे) ;)

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

19 Jun 2009 - 9:48 am | विनायक प्रभू

वयोमानाप्रमाणे कार्यक्षेत्र मी कमी केले आहे.
साधारण १४ वर्ष मी आणि बंधूनी मराठी माणसांना नोकरी आणि कामधंद्यात मदत हे मोफत अभियान चालवलेले होते.
कामधंद्याकरता सरकारी सबसीडी कशी मिळवायची लाच न देता.
साधारण २०० असावेत.
आणि मी धंदा करु नका असे सांगतो अशा निर्णयापर्यंत कसे काय पोचलात तात्या.
माझी ती बाजु मी इथे लिहीत नाही.
पण रामदासाना माहीत आहे.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 10:10 am | विसोबा खेचर

साधारण १४ वर्ष मी आणि बंधूनी मराठी माणसांना नोकरी आणि कामधंद्यात मदत हे मोफत अभियान चालवलेले होते.

अहो मग त्या बद्दल लिवा ना! मला वचायला नक्कीच आवडेल. आपण तर साला ज्ळ्ळ्या त्या विंजिनियरींगच्या पोरांची आणि सी ई टी ची कवतिकं वाचून पार हैराण झालो!

असो,

बाकी मर्जी आपली. काय लिवायचं, काय नाय हा आपला अधिकार मी नाकारत नाय! काय चाहेल ते लिवा...

तात्या.

अवलिया's picture

19 Jun 2009 - 9:40 am | अवलिया

मास्तर !
जरा एकदा इंडियातुन भारतात या हो !!
अर्थात तुम्हाला सवड असेल तेव्हा या हो !!
काही घाई नाही... अजुन चार वर्षानी आलात तरी आम्ही आहोत तितेच असु (जिवंत असलो तर) !!

आम्ही काय भारतातली रिकामटेकडी पिचका-या मारणारी माणसे !!
आम्हाला काही कळत नाही तुमचे काय चालले आहे ते.... :)

चालु द्या तुमची कवतिके !!!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

दशानन's picture

19 Jun 2009 - 9:47 am | दशानन

=))

सही बोल्य्या नान्या तु ;)

थोडेसं नवीन !

पण मास्तरांचे हार्दिक अभिनंदन.खरोखर मास्तर तुमचे काम खुपच मोलाच व महत्वपुर्ण आहे. तुमच्या शिष्यांचे देखिल मनपुर्वक अभिनंदन.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

शैलेन्द्र's picture

19 Jun 2009 - 10:08 am | शैलेन्द्र

"आज माझ्यासाठी मास्तर आहेत ,मी उद्याच्या जॉनीसाठी मास्तर होईन""

खरय खरय.... हे फार महत्वाच.....

प्रमोद देव's picture

19 Jun 2009 - 11:07 am | प्रमोद देव

तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही असेच करत राहा इतकेच म्हणतो.
आम्हाला तुमच्याबद्दल आदरच वाटतो.
ज्याला जे आवडेल ते ते त्याने करावे ,मात्र ते निष्ठेने करावे हे महत्वाचे आणि प्रभूमास्तर ते करताहेत. तेव्हा त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

तात्याने जे आजवर केलेय,सद्या करतोय आणि भविष्यात करेल(हे सर्व चांगल्या कामाबाबतीतच बरं का!) तेही उत्तमच आहे.
मात्र कृपा करून आपल्या कामाची एक-दुसर्‍याशी तुलना करू नका.

ज्याला जे जमेल ते त्याने करावे,उगाच उंटाच्या बुडख्याचा मुका घेऊ नये....इति. रावसाहेब.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 11:19 am | विसोबा खेचर

तात्याने जे आजवर केलेय,सद्या करतोय आणि भविष्यात करेल

देवबाप्पा,

मी आजवर अगदी अभिमानाने सांगावं असं काहीच केलं नाही. आता विषय निघालाच होता म्हणून फक्त मी त्या तीन पोरांबद्दल लिहिलं. एरवी मी अमूक केलं, तमूक केलं असं वारंवार सांगणार्‍यातला मी नाही. या दुनियेत कुठेच काही न बोलता खूप काही काम करणारी माणसं मी पाहिली आहेत! त्यांचं मोठेपण पाहिलं की मी स्वत:बद्दल काय लिहावं असा मला प्रश्न पडतो..

मात्र कृपा करून आपल्या कामाची एक-दुसर्‍याशी तुलना करू नका.

तुलनेचा प्रश्नच येत नाही. मास्तर मला वयाने वडील आहेत, अनुभवाने, ज्ञानाने वडील आहेत. परंतु सी ई टी ची परिक्षा आणि त्यातलं यश, इंजिनियरींग-मेडीकलला प्रवेश इत्यादी गोष्टींना ते अवास्तव महत्व देत आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे..

असो, त्यांना पटतंय तेच ते करत आहेत..त्या बाबत मी अधिक आग्रह धरू शकत नाही. मला तो अधिकार नाही...

तात्या.

ऍडीजोशी's picture

19 Jun 2009 - 12:20 pm | ऍडीजोशी (not verified)

पास होण्याची मारामार असलेल्या मुलाला धंदा करायला सांगणं हे ठीक आहे. पण ज्याच्यात हुशारी आहे, क्षमता आहे अशांना शिकवलं तर तेच जास्त योग्य होईल.

आज तुमच्या एका मित्राला भिंती घासण्यापासून सुरुवात करावी लागली, तेच जर तो मित्र सिवील इंजीनियर झाला असता तर भविष्य अजून उज्वल व्हायचे चान्स अधीक वाढले नसते का?

बुद्धी आणि शिक्षणाची आवड असताना न शिकणं हा बुद्धीदात्यावर अन्याय आहे. होउ दे ना इंजीनियर, काढेल स्वत:चं वर्कशॉप. आणि मेकॅनीक म्हणून सुरुवात केलेल्या माणसापेक्षा ते अधीक प्रोफेशनली चालवून जास्त नफा मिळवेल.

रंगारी रू. ३०० रोजावर काम करतो, इंटीरियर डेकोरेटर हजारात फी लावतो. कारण त्याच्या कडे रंगार्‍यापेक्षा जास्त ज्ञान आणि व्यवसायीकता असते. हा फरक शिक्षणानेच येतो.

डॉक्टर / इंजीनियर ह्या पदव्या म्हणजे सर्वस्व नाही पण हे अभ्यासक्रम माणसाच्या अंगभूत गुणांना झळाळी देण्यासाठी माणसानेच तयार केलेत. त्यामुळे शक्य असेल आणि बौध्धीक कुवत असेल तर शिक्षण घेणे योग्यच आहे.

स्वाभिमानाच्या व स्वातंत्र्याच्या (कुणाची गुलामी नको) कल्पनांपायी स्वत: ची बुद्धी वाया घालवणे हा प्रकार बुद्धीपलिकडचा आहे.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 12:47 pm | विसोबा खेचर

स्वाभिमानाच्या व स्वातंत्र्याच्या (कुणाची गुलामी नको) कल्पनांपायी स्वत: ची बुद्धी वाया घालवणे हा प्रकार बुद्धीपलिकडचा आहे.

हम्म! बरेच प्रकार बुद्धीपलिकडले असतात!

आपला,
(निर्बुद्ध!) तात्या.

ऍडीजोशी's picture

19 Jun 2009 - 1:20 pm | ऍडीजोशी (not verified)

तात्या अख्ख्या प्रतिसादातलं एकच वाक्य घेउन त्यावर नका बोलू हो. हे नुस्तंच वाक्य काही आगा पिछा नसलेलं वाटतं. ह्या वाक्या आधी लिहिलेल्या गोष्टीही महत्वाच्या आहेत.

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 1:28 pm | विसोबा खेचर

ह्या वाक्या आधी लिहिलेल्या गोष्टीही महत्वाच्या आहेत.

तुझ्या मते असतील!

मी तुझ्या मताचा आदर करतो..

तात्या.

नितिन थत्ते's picture

19 Jun 2009 - 1:05 pm | नितिन थत्ते

अ‍ॅडीशी १०० % सहमत. (अ‍ॅ आता नीट टंकता येतंय).
शिक्षण घेण्याची पात्रता असेल तर शिक्षण घेण्याचाच प्रयत्न करावा. शिक्षणाने नुसतीच नोकरी मिळते असे नाही तर नेटवर्कही जमवायला सोपे पडते. धंदा करायचा तर नेटवर्क हवे. शिक्षण घेतले (म्हणजे कॉलेजात गेले) की हे नेटवर्क उभे करणे सोपे जाते.

खराटा
(रंग माझा वेगळा)

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 1:28 pm | विसोबा खेचर

शिक्षणाने नुसतीच नोकरी मिळते असे नाही तर नेटवर्कही जमवायला सोपे पडते.
शिक्षण घेतले (म्हणजे कॉलेजात गेले) की हे नेटवर्क उभे करणे सोपे जाते.

???

वरील वाक्ये अंमळ हास्यास्पद वाटतात!

असो, प्रत्येकाची मतं!

तात्या.

प्रशु's picture

19 Jun 2009 - 2:47 pm | प्रशु

मास्तर तुम्हाला साष्टांग दंडवत...................

विनायक प्रभू's picture

20 May 2011 - 10:04 am | विनायक प्रभू

तेंव्हा नेमकी शक्कल कशी लढवणार हे माहीत नव्हते.
फक्त इच्छा होती.
देवाच्या दयेने रस्ता मिळाला.
जॉनी ला जवळ जवळ ३ वर्षाची कॉलेज आणि पुस्तकांची फी स्कॉलरशीप म्हणुन देउ शकलो.
जॉनीच्या पहील्या ४ सेमिस्टर चे मार्क ९.३/१०
कॉलेज विजेटीआय.

रेवती's picture

20 May 2011 - 10:14 am | रेवती

४ सेमिस्टर चे मार्क ९.३/१०
अगदी छान! तुमचे आणि तुमच्या शिष्यांचे अभिनंदन!
मुलीही कमी नाही म्हणताय तर त्याबद्दलही लिहावे.

गोगोल's picture

20 May 2011 - 1:51 pm | गोगोल

मदत हवी असल्यास अवश्य कळवा.

विनायक प्रभू's picture

21 May 2011 - 12:32 am | विनायक प्रभू

आर्थिक मदत काहीही नको.
पण जॉनीसारखा कोणीही नजरेत आला तर जरुर कळवा.

हवालदार's picture

19 Jun 2009 - 6:33 pm | हवालदार

प्रकटाआ

नावातकायआहे's picture

20 May 2011 - 11:58 am | नावातकायआहे

अभिनंदन!!! अगदी मनापासून.

मास्तर तुम्हाला दंडवत!!

नगरीनिरंजन's picture

20 May 2011 - 12:01 pm | नगरीनिरंजन

मास्तर, सलाम!