अंत... भाग-३

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
10 Jun 2009 - 8:58 pm

मी फोन बंद केला व गाडी बंद करुन सरळ.. जे होईल ते होईल हा विचार करुन त्या गाडीच्या दिशेने चालू लागलो... दरवाजा उघडा होताच, मी जरासे आत बघण्यासाठी
वाकलो तोच एकदम पोटात जोरात कळ आली, माझा हात आपसूकच पोटाकडे गेला तर हाताला काही तरी ओले लागले..... मी ओरडलो... वोह शट... गोळी मारली मला तू.... असे म्हणत मी खाली कोसळलो.... !

मागील भाग...

डॉक्टरांनी माझा जिव वाचवला, पण मला गोळी मारणारा तो कोण ? हाच विचार डोक्यातून जात नव्हता, हॉस्पिटल मध्ये मी एकटाच होतो जवळपास कोणच नव्हते, शेवटी फोन करुन तीला बोलवावे हा विचार डोक्यात आला, मी फोन वर तिचा नंबर डायल केला...

ती- हल्लो.
मी- हाय.
ती- कसा आहेस आता, तब्येत ठिक आहे ?
मी- ठीक आहे, भेटायचे आहे तुला.
ती- सध्या शक्य नाही,
मी- भेट. गरजेचे आहे. आजच.

मी फोन कट केला व ती येईल की नाही हा विचार करु लागलो. तोच दरवाज्यावर ट्क टक झाली.. व दरवाजा उघडला गेला व रिंकी आत आली.

रिंकी- अरे हे काय झालं ?
मी- काही नाही असेच.
रिंकी- पोलिस आले होते त्यांना तो गोळी मारणारा सापडला का ?
मी- नाही अजून तपास करत आहेत.
रिंकी- पण तुला का ?
मी- रिंकी एक गोष्ट सांग मला, तुझा फोन माझ्या कडे आहे जे अजून कोणाला माहीत होते त्या दिवशी ?
रिंकी- कुणालाच नाही.
मी- त्याचा फोन तुझ्या फोनवर आला माझ्यासाठी, हेच मोठे कोडे आहे सध्या. जरा विचार कर जेव्हा तु मला फोन केला होतास फोन विसरला आहे हे सांगण्यासाठी तेव्हा तुझ्या आसपास कोण होते ? जरा प्रयत्न कर.
रिंकी- कोणच नव्हते रे, मी आपली ऑफिसच्या गॅलरी तून तुला फोन केला होता.
मी- तुझं ऑफिस कुठले आहे, नाव काय आहे ?
रिंकी- अरे सांगितले ना तुला, कॉलसेंटर आहे मॅकस्पेस.
मी- मॅकस्पेस ???? बायपास रोड वर ?
रिंकी- हो.
मी- गॉट इट. एक लिंक सापडली. चल जरा आपण तुझ्या ऑफिस कडे चलू.
रिंकी- आता ? तुला बेड रेस्ट सांगितला आहे ना ?
मी- मी ठीक आहे, पंधरा दिवस झाले आता आरामच करतो आहे, चल जरा काम करणाची वेळ आली आहे.
रिंकी- पण तु ह्या अवस्थेत ? डॉक्टर परमीशन देतील का ?
मी- चल तु. डॉक्टरांना माझे मी बघेन.

दुपारची वेळ होती, सकाळचा डॉक्टर व्हिजिट करुन गेला होता संध्याकाळचा पाच पर्यंत येणार , तो पर्यंत मी परत येऊ शकतो हा विचार करुन मी व रिंकी गुपचुप पणे बाहेर आलो व रिंकीच्या गाडीतून सरळ तीच्या ऑफिसकडे आलो.

रिंकी- मी येथे उभी राहून तुला फोन करत होते. हा कॉमन फोन आहे.
मी- ठिक.

मी जरा आसपास नजर फिरवली, नेहमी प्रमाणे जसे कॉल सेंटर मध्ये वातावरण असते तसेच येथे पण होते, जेथे रिंकी उभी होती तेथे सर्व बॉस च्या वेगवेगळ्या केबीन्स होत्या व समोर भल्यामोठ्या काचेतून बाहेरचा हायवे दिसत होता आम्ही १६ व्या मजल्यावर होतो... मी केबीन वर लिहलेली नावे वाचत होतो तोच एका केबीन वरील नाव पाहून मी दचकलो... ! म्हणजे धोका ? माझ्याशी धोका ? रिंकीने ज्या जागी उभे राहून मला फोन केला होता तेथून ही केबीन चार-पाच पाऊलावरच आहे. सत्य शोधायलाच हवे, नाही तर प्लान आपल्यावर उलटेल.

मी- रिंकी, चल. मला हॉस्पिटल मध्ये पोहचव.
रिंकी- ठिक, चल.

मी व रिंकी हॉस्पिटल मध्ये परत आलो व माझ्या रुम मध्ये पोहचलो तोच काही पोलिस अधिकारी आत आले व त्याच्या पैकी एक म्हणाला...

तो- नमस्कार मी इं. साठे, तुमच्याकडे लायसन्स पिस्तुल आहे ?
मी- नमस्कार, हो माझ्या नावानेच आहे.
तो- सध्या कुठे आहे ते ?
मी- माझ्या गाडीच्या स्टेरिंग व्हिलच्या खाली एका गुप्त जागी, का ?
तो - तुमचा पिस्तुल नंबर व परवाना नंबर आहे तुमच्याकडे ?
मी- आहे, पण सध्या येथे नाही आहे व मला लक्ष्यात नाही आहे.
तो- आम्ही शोध घेतला आहे, खरं सांगा गोळी कुणी झाडली तुमच्यावर ?
मी- म्हणजे ?
तो- आम्हाला शंका आहे गोळी तुम्ही स्वत:च तुमच्यावर झाडली आहे.
मी- व्हॉट... आर यु मॅड ?
तो - पुरावा आहे आमच्याकडे
मी - काय ?
तो- तुम्हाला परवाना मिळालेली पिस्तुल व गोळ्या ह्यांची डिटेल आमच्याकडे आहे.
मी- मग ?
तो- तुमच्यावर झाडलेली गोळी तुमच्याच पिस्तुलातून झाडली गेली आहे..
मी- आर यु मॅड ? माझी पिस्तुल माझ्या गाडीमध्ये आहे.
तो - लास्ट टाईम तुम्ही तुमची पिस्तुल कधी पाहील व चेक केली होती ?
मी- आठवत नाही.
तो - आठवून उत्तर द्या. नाही तर तुम्हाला त्रास होईल खुप व तुमची गाडी आमच्या ताब्यात आहे हे तुम्हाला माहीत असावेच.
मी- व्हॉट डू यु मीन ?
तो- मी सरळ सांगतो तुमच्या शरिरातून मिळालेली गोळी तुमच्याच पिस्तुलातून झाडलेली आहे ह्याचा पुरावा आहे आमच्याकडे.
मी - काय ? हे कसे शक्य आहे ? तुम्ही फोन डिटेल चेक करा... माझी पिस्तुल दाखवा मला मी सांगेन तुम्हाला..
तो- फॉरेन्सिकं लॅब मध्ये हे तथ्य समोर आले आहे, खरं सांगा.
मी- काय ? साहेब काही तरी गेम आहे..... मोठी गेम.

तोच डॉक्टर आत आले व म्हणाले..

डॉ. - काय चालू आहे येथे ? पेशेंट जख्मी आहे व तो अजून ही सिरियस आहे.
इं.साठे - माफ करा पण आम्हाला आमचे काम करु द्या. प्लिज.
मी- डॉक्टर.. जख्म दुखत आहे..
डॉ- मी बघतो.... माय गॉड... जख्मेतून रक्त येत आहे.. नर्स !
मी- डॉक्टर प्लिज हेल्प मी.
डॉ.- शांत रहा, मी करतो आहे मदत. नर्स, लवकर.... इं. साठे प्लिज तुम्ही निघा, नंतर तुमचा तपास करा मला माझे काम करु द्या.
साठे- मी येथेच आहे बाहेर.

मी कुणाच्या कळत नकळत आपली जख्म आपल्याच हाताने ओरबडून काढली होती.. कुणालाच कळाले नाही पण शक्यतो रिंकी...

*****

सहा तासानंतर...

ती - काय चालू आहे मला काही कळेल का ?
मी- कळेल.
ती- तो पोलिस अधिकारी... काय म्हणतो होता ते खरं आहे काय ?
मी- आर यु मॅड... मी स्वतः वर गोळी का झाडेन ते पण पोटावर ?
ती- ठिक आहे मग तु आपली जख्म का ओरबडलीस ?
मी - तुला कळाले ते ?
ती - हो..
मी - सांगेन सर्व काही पण थाबावे लागेल तुला काही काळ.. ही सर्व गेम आहे ... मोठी गेम.
ती- गेम... कसली ?'
मी -सांगेन तुला...

तोच रुम च्या खिडकीतून गोळ्या चालल्या व काही कळायच्या आत रिंकी जमिनीवर पडली व मी स्वतःला वाचवण्यासाठी... बेडच्या खाली जाण्यासाठी उठलो तोच डाव्या हातातून प्रचंड कळ आली व मी मटकन खाली पडलो... साठे आत दरवाजा जवळ जवळ तोडत आत येताना दिसले व माझ्या मागील खिडकीवर ते अंधाधुंद फायरिंग करु लागले... मी हळू हळू बेशुध्द पडलो....

क्रमशः

कथामौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

10 Jun 2009 - 9:33 pm | मस्त कलंदर

हा क्रमशः रोग खूप वाईट आहे..

पुढच्या भागाची वाट पाहतेय.. :W

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

विशाल कुलकर्णी's picture

11 Jun 2009 - 10:29 am | विशाल कुलकर्णी

असेच म्हणतो...
पण कदाचित त्यामुळेच कथेतली रंगत वाढतेय. मजा येतेय....
पुलेशु !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120

पर्नल नेने मराठे's picture

11 Jun 2009 - 1:19 pm | पर्नल नेने मराठे

मी प्ण
चुचु

अंतु बर्वा's picture

11 Jun 2009 - 12:16 am | अंतु बर्वा

हा क्रमशः आमचा अंत पाहतोय... :-)

Nile's picture

11 Jun 2009 - 1:35 am | Nile

+१

स्वप्निल..'s picture

11 Jun 2009 - 5:20 am | स्वप्निल..

मस्तच जमलाय्..राजे मागचं आठवावे लागेल एवढं क्रमश करु नका ..
लवकर लवकर लिहा..

स्वप्निल

अवलिया's picture

11 Jun 2009 - 6:34 am | अवलिया

आज संध्याकाळपर्यत पुढचा भाग आला नाही तर तुझा 'गेम' केला जाईल :)

राजे, जे काही चालु आहे ते मस्त आहे... :)
जियो ! दोस्त जियो !!!

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

सहज's picture

11 Jun 2009 - 7:32 am | सहज

राजे, जे काही चालु आहे ते मस्त आहे...

जबरी राजे!!

अवलिया's picture

12 Jun 2009 - 10:48 am | अवलिया

~X(

चौथा भाग कुठे आहे राजे ??????????????????

:T :T :T :T :T

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jun 2009 - 9:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

राजे, आज चौथा भाग नाही आला तर तुम्हाला एक गोळी घालण्यात येईल. ढिशक्यॅव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2009 - 1:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>राजे, आज चौथा भाग नाही आला तर तुम्हाला एक गोळी घालण्यात येईल. ढिशक्यॅव. :)

दशानन's picture

11 Jun 2009 - 2:46 pm | दशानन

घाला गोळ्या घाला..... ;)

पुढील भाग माझा आत्मा लिहील काय मग :?

थोडेसं नवीन !

निखिल देशपांडे's picture

11 Jun 2009 - 2:49 pm | निखिल देशपांडे

ह्या राजेच्या डोक्यावर बंदुक ठेवुनच लेख पुर्ण करुन घ्यावे लागणार...
राजे आजच्या आज सगळे अपुर्ण लेख पुर्ण करा... अन्यथा तुमच्या भुतालाही सोडणार नाही

==निखिल

अनंता's picture

11 Jun 2009 - 10:39 am | अनंता

ही सर्व गेम आहे ... मोठी गेम.
;)

विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

मि माझी's picture

11 Jun 2009 - 3:32 pm | मि माझी

अंतीम भाग लवकर टाका..

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2009 - 7:51 pm | परिकथेतील राजकुमार

राजा गेमाड्या एक तर महिन्या महिन्यानी एक भाग टाकतो आणी तो पण क्रमशः , तुझ्या दारुत गोळी मारली पाहिजे साल्या.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

12 Jun 2009 - 12:16 pm | स्वाती दिनेश

राजे, अंत पाहू नका.. लवकर टंका पुढचा भाग..
स्वाती

डॉ.प्रसाद दाढे's picture

12 Jun 2009 - 12:50 pm | डॉ.प्रसाद दाढे

मस्तच! पण पुढचं लवकर टंका हो!

शार्दुल's picture

13 Jun 2009 - 3:43 pm | शार्दुल

चौथा भाग कुठे आहे राजे ???????????? लवकर टाका हो ,,,आता तुम्ही आमचा अंत बघताहात,

नेहा

अनिल हटेला's picture

13 Jun 2009 - 9:41 pm | अनिल हटेला

लवकरात लवकर अपूर्ण असलेले लेख पूर्ण करा ,नाहीतर करच गेम होइन एक दिवस तुझी...;-)

(शूटाउट पेषालीष्ट) :-D
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)