शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
1 Jun 2009 - 12:17 pm

मी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा मराठी जनतेच्या नेत्रांमध्ये झणझणीत अंजन घालणारा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दोनदा पाहिला. माझ्या आई-बाबांना (त्यांची प्रकृती ठीक नसून देखील) हा चित्रपट दाखवायला आवर्जून घेऊन गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना, आप्तेष्टांना हा चित्रपट अवश्य बघण्यास उद्युक्त केले. त्यातील अफजल खानाच्या वधाचा प्रसंग जिवंतपणे उभा करणारा जोशपूर्ण पोवाडा बघून माझ्यादेखील धमन्यांमधले रक्त, तेवढ्या काळापुरते का असेना, पण सळसळले. माझा चार वर्षाचा पुतण्या शिवाजी महाराजांचा परमभक्त आहे. त्याची आई जेव्हा त्याला शिवाजी महाराजांची गोष्ट सांगते तेव्हा हा चिमुरडा स्वतःला शिवाजी समजून काल्पनिक घोड्यावर स्वार होऊन सह्याद्रीच्या कडे-कपारीतून दुश्मनांचा नायनाट करून विजयश्री खेचून आणतो. तेव्हा त्या निरागस चेहर्‍यावरचा आवेशपूर्ण भाव मनाला स्पर्शून जातो. चित्रपटात जेव्हा शिवाजी महाराज विषण्ण होऊन "वेडात मराठे वीर दौडले सात...फक्त सातच? बाकीचे कुठे गेले?" असा खडा सवाल करतात तेव्हा माझ्याही मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना टोचते. मोगलांना धूळ चारून एकसंध राज्य स्थापन करण्याच्या महाराजांच्या बुलंद इराद्याची आणि अतुलनीय पराक्रमाची कथा आपल्या थंड झालेल्या रक्ताला जिवंत करणारी एक स्फूर्तीगाथा आहे असे मी मानतो. मी ब्राह्मण आहे हे सत्य या सगळ्या भावना माझ्या किंवा माझ्या पुतण्याच्या मनात उचंबळून आणण्यात अडथळा ठरत नाहीत. मी मराठी आहे; महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि माझ्या मातीने आणि माझ्या संस्कारांनी मला शिवाजी महाराजांवर प्रेम करण्याचा आणि त्यांच्या पराक्रमातून बोध घेण्याचा हक्क दिलेला आहे. माझ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर सर्व किंबहुना भारतातील सर्व जनतेला तो अधिकार आहे. ज्याच्या मनात स्वतःच्या मातीविषयी, आईविषयी, अस्मितेविषयी, भाषेविषयी आणि संस्कृतीविषयी प्रेम आणि पराकोटीचा आदर आहे त्यांना सगळ्यांना तो अधिकार आहे असे मी मानतो. स्वत:च्या संस्कृतीविषयी प्रेम असणे; आदर असणे म्हणजे इतरांच्या श्रद्धांना, आदरस्थानांना लाथा-बुक्क्यांनी बदडून काढणे आणि हाणामारी करून "तुम्ही आमच्यातले नाहीत" असे ठणकावून सांगणे म्हणजे गुंडगिरीखेरीज दुसरे काहीच नसून खुद्द शिवाजी महाराजांनी कधी अशा रानटी प्रेमाचे समर्थन केले नाही हे सर्वश्रुत आहे. 'मराठा सेवा संघ' आणि 'संभाजी ब्रिगेड' च्या पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे, प्रवीण गायकवाड या मराठी मनात दुहीची विषवल्ली पेरणार्‍या शिवाजी महाराजांच्या ठेकेदारांनी जो अश्लाघ्य प्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुठल्याश्या समितीवरील निवडीच्या वादावरून सुरु केला आहे आणि त्याला सुसंस्कृतपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडून रस्त्यावर उतरून बाबासाहेबांसारख्या वयोवृद्ध आणि सगळे आयुष्य शिवाजी महाराजांच्या चरणी वाहिलेल्या 'सभ्य' अभ्यासकावर भ्याड हल्ले करण्याची भाषा वापरून हिडीस स्वरूप दिलेले आहे ते अत्यंत खेदजनक आणि संतापजनक आहे. गुंडगिरी हे एकमेव धोरण असणार्‍या या संघटनांना शिवाजी महाराज किती माहित आहेत? ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराजांच्या चरणी वाहिले; ज्या व्यक्तीने आजच्या तरूण पिढीला 'जाणता राजा' सारख्या महानाट्यातून शिवाजी महाराजांच्या अभेद्य इराद्यांचे बाळकडू पाजले त्या व्यक्तीवर तुम्ही हल्ला करण्याच्या गोष्टी करता? शिवाजी महाराज हे काय या संघटनांची आणि त्यांच्या या उद्दाम नेत्यांची 'रजिस्टर्ड ट्रेडमार्क' असलेली मालमत्ता आहेत? "वेडात मराठे वीर दौडले सात" यातले मराठे म्हणजे काय फक्त जातीने मराठा असलेले मराठेच आहेत काय? मी ब्राह्मण असून महाराष्ट्रात जन्मलो, मराठी बोलतो आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रातून स्फूर्ती घेतो म्हणून मी स्वतःला मराठा समजतो. जे मराठी आहेत, ज्यांना महाराष्ट्रधर्माची चाड आहे ते सगळे मराठे आहेत असे मी मानतो. कुठल्यातरी क्षुल्लक कारणांवरून एवढे वादंग उभे करण्यात कसले आले आहे शिवाजी प्रेम?

खुद्द बाबासाहेब पुरंदरे या सगळ्या वादावर मौन ठेवून आहेत. हा त्यांचा सुसंस्कृतपणाच म्हणावा लागेल. वाद आणखी चिघळू नये म्हणून त्यांचे हे मौन खरच प्रशंसनीय आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत घेतलेली भूमिका देखील समंजसपणाची आहे. कदाचित बाबासाहेब या दोन संघटनांच्या आवेशाला घाबरून गप्प बसले आहेत असे उद्दामपणे म्हणायला देखील हे शिवाजी महाराजांचे ठेकेदार कमी करणार नाहीत. ते कदचित खरे असेल देखील आणि त्यात वावगे काहीच नाही. रात्री रस्त्यावरून एकटे जातांना ५-७ माथेफिरू गुंडांनी अडवले तर कुठली ही व्यक्ती घाबरून सगळा ऐवज त्यांच्या स्वाधीन करेल. पण म्हणून त्या गुंडांच्या पराक्रमाचे कौतुक होणार नाही; त्यांच्या शौर्याला कुणी सलाम करणार नाही. त्याचप्रमाणे 'मराठा सेवा संघा'च्या किंवा 'संभाजी ब्रिगेड'च्या शिवाजी महाराजांचे चरित्र अगदी मुखोद्गत असणार्‍या विद्वान कार्यकर्त्यांनी उद्या खरेच त्यांच्यावर हल्ला केला तर त्यांच्या या पराक्रमाचे कौतुक फक्त पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे आणि प्रवीण गायकवाड यांनाच असणार आहे. कुठलाच सुसंस्कृत माणूस गुंडप्रवृत्तीने एका वयोवृद्ध अभ्यासकावर केलेल्या हल्ल्याचे कौतुक करणार नाही.

मराठे-ब्राह्मण हा वाद खूप जुना आहे आणि तो मुख्यत्वेकरून मराठी ब्राह्मणांच्या बुद्धीचा कस लागणार्‍या तथाकथित क्षेत्रांतील वर्चस्वातून जन्मलेला आहे असे म्हटले जाते. तसं पाहिलं तर ब्राह्मण ही जात शांतताप्रिय (सहसा हाणामारी, गुंडगिरी, गुन्हेगारी यात न गुंतणारी) आणि थोडीशी संकोचप्रिय आहे. नाकाच्या सरळ रेषेत आयुष्याचा प्रवास करायचा, कुणाला लुबाडायचे नाही, फसवायचे नाही, कुणाच्या भांडणात पडायचे नाही, प्रत्यक्ष मारामार्‍या, गुंडगिरी यापासून शक्य तेवढे लांब रहायचे आणि शांत जीवन जगायचे आणि मुख्य म्हणजे जगू द्यायचे असा मराठी ब्राह्मणांचा जगण्याचा मध्यममार्ग आहे. आकाराने लहान असलेला हा वर्ग संस्कांरानी देखील बांधलेला असतो. शिवाय अंतर्गत दुहीमुळे 'एकीचे बळ' ही संकल्पना फक्त पुस्तकातच वाचलेली असल्याने 'आपला कुणी वाली नाही' या रास्त भावनेमुळे हा वर्ग समाजात वावरतांना थोडा घाबरूनच असतो. मराठ्यांच्या अंतर्गत दुहीचा पण स्वतंत्र असा इतिहास आहे. या सगळ्या गोष्टींचा राजकारणात येथेच्छ वापर करण्यात येतो आणि राजकारणी आपल्या स्वर्थाची पोळी सुखेनैव भाजून घेत असतात हे देखील सर्वश्रुत आहे.

ब्राह्मणांना जेवढे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर, ना. गोखले, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, राजगुरु, सेनापती बापट, संत ज्ञानेश्वर प्रिय आहेत तेवढेच शिवाजी महाराज, म. फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील (हे जैन होते), संत गाडगेबाबा, संत तुकाराम प्रिय आहेत हे मात्र मी छातीठोकपणे सांगू शकतो. आमच्या घरी संपूर्ण तुकाराम गाथा आहे, शिवचरित्र देखील आहे आणि पुतण्याला सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या गोष्टी अजून तरी नसून शिवाजी महाराजांच्या आहेत. ब्राह्मण हिंदूच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि इतर सगळ्या धर्मांविषयी सारखाच सलोख्याचा दृष्टीकोन बाळगून असतात. भगवान बुद्धांची तर मी कित्येकदा प्रार्थना म्हणतो आणि भगवान महावीरांची "णमो अरिहंताणम..." ही प्रार्थना देखील मी बर्‍याचदा म्हणतो. अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांनी गायिलेलं "खुदा से करता हूं मैं ये दुआ मदिने में..." हे नितांत सुंदर मुस्लिमधर्मीयांचं भजन ऐकून सगळी मानवजात कशी एक आहे याची खात्री पटते. या पार्श्वभूमीवर 'मराठा सेवा संघ' आणि 'संभाजी ब्रिगेड' यांनी एकाच मार्गाने निष्कारण पोसलेलं हे जातीयवादाचं भूत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे हे निश्चित.

'मी शिवाजीराजे...' मध्ये चर्चिले गेलेले मुद्दे किती महत्वाचे आहेत हे या सतत हाणामारीची भाषा करून हिरो ठरू पाहणार्‍या नेत्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. मराठी माणूस का मागे पडतो? मराठी माणसाला उत्तर भारतीयांच्या खमक्या दुनियेत का अजिबात स्थान नसते? मराठी माणूस का नेहमीच बापडा आणि बिचारा असतो? मराठी माणूस का नेहमीच भेदरलेला, चाचरत लाचारपणे अशुद्ध हिंदी बोलणारा असतो? मराठी माणूस का मोठ्या हुद्द्यांवर नसतो? मराठी माणसाचे उद्योग क्षेत्रातले स्थान का नेहमीच हास्यास्पद विषय ठरतो? मराठी माणूस का नाही मल्होत्रा, खन्ना, अगरवाल, ओबेरॉय असल्या दमदार नावांच्या यादीत स्थान पटकावू शकत? फॅशन, मॉडेलिंग, अभिनय, मीडिया या व अशा ग्लॅमरस क्षेत्रांमध्ये मराठी माणसाचा कुठेच मागमूस का नसतो? मुंबईतला मराठी माणूस का नेहमी बदलापूर, खारघर ला जीवन कंठण्याच्या गोष्टी करत असतो? इथे मराठी माणूस म्हणजे समस्त महाराष्ट्रवासी अभिप्रेत आहेत. मराठा, ब्राह्मण, वाणी, शिंपी, चांभार, न्हावी, माळी असे सगळे मराठी या समाविष्ट आहेत कारण या सगळ्याच मराठी जनांची अवस्था वर नमूद केल्याप्रमाणेच आहे. कुठल्याच जातीत जन्म घेणे हे कुणाच्या हातात नसते आणि तो दोष तर अजिबातच नसतो. राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाला माझा आक्षेप आहे. ते म्हणतात की बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण म्हणून जन्मले हा त्यांचा दोष नाही. त्यांच्या समंजस भूमिकेतले हे विधान खटकले. मी ब्राह्मण कुटुंबात जन्मलो, माझ्या शिक्षक आई-वडिलांनी हजारो मुलांसारखेच मला ही चांगले संस्कार दिले आणि मान ताठ ठेवून सचोटीने जगण्याचे बळ माझ्या मनगटांमध्ये भरले याचा मला रास्त अभिमान आहे. ब्राह्मण कुटुंबात जन्माला येणे हा दोष कसा असू शकतो? किंबहुना कुठल्याही जातीत जन्माला येणे हा दोष कसा काय असू शकतो?

पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे आणि प्रवीण गायकवाड यांनी या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून विनाकारण जातीद्वेषाची ही बीजे रुजविण्याचे निंदनीय प्रकार ताबडतोब बंद करावेत असे मला वाटते. आपण जर काही विधायक कार्य करून महाराष्ट्रधर्म पुढे नेऊ शकत नसू तर निदान निव्वळ गुंडगिरी करून आणि आढ्यताखोरपणा करून जातीयतेची विषवल्ली तरी पेरू नये. या स्वतःला मराठ्यांचे स्वयंघोषित नेते म्हणवणार्‍या नेत्यांना शिवाजी महाराज किती कळले आहेत? साहित्य, समाजसेवा, कला, वैद्यकक्षेत्र आदि कुठल्या क्षेत्रात यांनी जनतेची निस्वार्थ सेवा केलेली आहे? बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रातले जाणते शिव-अभ्यासक आहेत आणि त्यांचे शिवाजी महाराजांविषयीचे संशोधन आणि ज्ञान हे खचितच इतर कुणाही लुंग्या-सुंग्यापेक्षा जास्त आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मनाचा मोठेपणा दाखवून महाराष्ट्रातल्या जनतेला एकत्र घेऊन पुढे जाणे हे सध्याच्या काळात सगळ्यात महत्वाचे आहे हे ही न कळण्याइतपत या संघटना जात्यांध झालेल्या आहेत? असे जर असेल तर ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे असेच म्हणावे लागेल. आधीच महाराष्ट्रात परप्रांतियांच्या आक्रमणाचे संकट तोंडाशी येऊन ठेपलेले आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मराठी माणसाचा आवाज आणि मराठीची हाक क्षीण होत चालली आहे. परप्रांतीयांचे हे आक्रमण नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव, अहमदनगर सारख्या शहरांमधूनही जोमाने फोफावते आहे. ५-१० वर्षात या सगळ्या शहरांची आणि आपल्या अस्सल मराठी गावांची अवस्था मुंबईप्रमाणे झाली तर कदाचित शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याच मराठी भूमीत पोरके होईल. बाहेर सगळीकडे हिंदी बोलावे लागेल आणि या लोकांच्या दंडेलीला आपल्याच घरात सहन करत बसावे लागेल. परंपरेप्रमाणे दुहीचे आणि स्वार्थाचे राजकारण करून पुन्हा महाराष्ट्रधर्म बुडवू नये अशी विनंती मी त्यांना करतो. त्यापेक्षा काहीतरी विधायक कार्यात जर ही शक्ती आणि ऊर्जा वापरली तर त्याचा महाराष्ट्राला आणि मराठी जनतेला नक्कीच फायदा होईल. उगीच गुंडगिरी आणि दंडेलशाही करून काहीही साध्य होणार नाही. कदाचित बाबासाहेब कुठल्या त्या समितीवर नेमले जाणारही नाहीत पण त्यामुळे मराठीची आणि महाराष्ट्राची यत्किंचितही प्रगती होणार नाही. नेहमीसारखे दुहीचे आणि स्वार्थाचे राजकारण करून या संघटना आणि त्यांचे भेदभाव पाळणारे दूरदृष्टीहीन नेते महाराष्ट्राची आणि मराठीची आणि तमाम मराठी जनतेची कवडीचीही मदत करत नाही आहेत. उलट सामान्य जीवन ढवळून काढण्याचे आणि शांतता आणि सलोखा भंग करण्याचे कार्य मात्र ही मंडळी अगदी मनापासून करत आहेत हे नक्की. सामान्य जनता या गुंडगिरीच्या प्रवृत्तीला आणि दुहीच्या विषवल्लीला अजिबात भीक घालणार नाही हीच अपेक्षा आणि आशा!! जय महाराष्ट्र!!!

--समीर

राजकारणविचार

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

1 Jun 2009 - 12:36 pm | पर्नल नेने मराठे

मराठी माणूस का नेहमीच बापडा आणि बिचारा असतो? मराठी माणूस का नेहमीच भेदरलेला, चाचरत लाचारपणे अशुद्ध हिंदी बोलणारा असतो?

हल्लि बद्ल्तेय चित्र रे!!! मी (ब्राह्मण) व माझी मैत्रिण (मराठा) एका फिलिपिनाशी बस मधे भान्ड्त होतो. इकडे फारसा चान्स मिळ्त नाही भान्डायला सो हात धुवुन घेत होतो. आणी भान्द्णात अस्ल्या तल्लिन झ्हालो कि मग मराठीत भान्डु लागलो.
बसमधे ३-४ लोकानी टाळ्व्या वाजव्ल्या मग कळ्ले कि ते मराठीच होते.
साग्नाय्चा मुद्दा अस्सा कि आम्हि अजिबात घाबरत नाही, भेदरत, चाचरत नाही. <):)
चुचु

सुमीत's picture

1 Jun 2009 - 12:51 pm | सुमीत

फक्त राजकारण आहे, जातीच्या नावावर स्वतः लोणी खाण्या साठी.
ह्या लोकांना जसे शिवाजी महाराज कळत नाहीत तसे काँग्रेस वाल्यांना गांधी आणी दलित नेत्यांना आंबेडकर.
पुतळे उभारा, दंगली करा पण त्यांची शिकवणी कडे मात्र कानाडोळा करा.

चिरोटा's picture

1 Jun 2009 - 1:36 pm | चिरोटा

फक्त राजकारण आहे, जातीच्या नावावर स्वतः लोणी खाण्या साठी.

ह्या मेटे लोकाना पवारांचा आशीर्वाद आहेच.द्वेष निर्माण करुन मराठा वोट बँक निर्माण करायचा हा डाव आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

mamuvinod's picture

1 Jun 2009 - 1:50 pm | mamuvinod

मा. समिरसुरजी,

एक उत्तम व अभ्यासु लेख.

सगळ्या लोकाचे एकच मत येणार - हे फक्त जातीचे राजकारण

थोरले महाराजाचा विजय असो

शार्दुल's picture

1 Jun 2009 - 1:55 pm | शार्दुल

हे फक्त जातीचे राजकारण,,,,,,,,,

नेहा

http://epaper.pudhari.com/epaperimages/3152009/3152009-md-pun-5/15734391...

कुणी कोणत्या जातीत जन्माला याव हे आपल्या हातात निश्चितच नाही. पण ज्या पद्धतीने बाबासाहेब पुरण्दरे यान्नी हिन्दु मुस्लिम द्वेश निर्माण होइल, स्वराज्य स्थापणेच्या प्रेरणे मागे ब्राह्मणच होते असा खोटा इतिहास सादर केला त्याला तुम्ही विरोध कर्णार की नाही ?? कि केवळ बाबासाहेब तुमच्या ज्ञातीचे आहेत म्हणुन मुक(/वरिल लेख) समर्थन करणार आहात काय ?
१००% सत्य लिहिणार्या कुणाही ज्ञातीच्या व्यक्तीला या समितीवर नेमावे, त्याला कुणाचाही विरोध होणार नाही.
केवळ काल्पनिक कथा रचुन शिव चरित्राचा विचका करनार्या व्यक्तिला काय म्हणुन तिथे नेमायचे?

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

मैत्र's picture

1 Jun 2009 - 4:29 pm | मैत्र

शासनाने दादोजी कोंडदेव पुरस्कार मागे घेतला ही वस्तुस्थिती आहे. त्यावर बाबासाहेबांनी काही उत्तर दिलेले नाही हे अनाकलनीय आहे.

पण त्याला जर "सांस्कृतिक दहशतवाद" म्हणत असतील (संदर्भ - पुढारीमधील बातमी), तर ब्रिगेडच्या वागण्याला काय म्हणायचं - तालिबानी दहशतवाद? शिवधर्म आणि ब्रिगेड एकच ना? मग तिथली धारणा, विचारसरणी आणि तालिबान यात काय फरक आहे?
कुणाही ज्ञातीच्या व्यक्तीला या समितीवर नेमावे,त्याला कुणाचाही विरोध होणार नाही.
दुसर्‍या एखाद्या ब्राम्हण व्यक्तीने तुमचे म्हणणे मान्य केले की दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास यांचा राज्याच्या घडामोडींमध्ये काही सहभाग नव्हता / ही काल्पनिक पात्रे आहेत (असाही आरोप केला आहे ना काही ठिकाणी?) ... तर त्यांना तुम्ही घ्याल का समितीवर?
आणि ब्रिगेडने किंवा मराठा सेवा संघ / समन्वय समितीने घेण्यासाठी महाराष्ट्र / शिवाजी महाराज ही त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे का की माझ्या घराचे रचनाकार मीच ठरवणार?

मला काही इतिहासाचे ज्ञान नाही. म्हणजे शालेय पुस्तके (जी पुरंदरे प्रभृती मंडळींनी लिहिलेली - खोटी) आणि
ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ इंडिया एवढेच स्त्रोत आहेत. मी काही तुमच्या प्रमाणे बखरी किंवा इतरी ऐतिहासिक दस्तावेज वाचलेले नाहीत. (बाबासाहेबांनी खोटा इतिहास लिहिला, काल्पनिक कथांनी शिवचरित्राचा 'विचका' केला असे अधिकाराने सांगणार्‍या व्यक्तीने मराठा इतिहासाचा सखोल अभ्यास केला असावा असे गृहीत धरायला हरकत नाही).
ग्रँट डफ या अत्यंत नामवंत इंग्रज इतिहासकाराबद्दल आपलं काय मत आहे ते कळावे म्हणजे पुढे चर्चा करता येईल.

मनीषा's picture

1 Jun 2009 - 6:48 pm | मनीषा

पण ज्या पद्धतीने बाबासाहेब पुरण्दरे यान्नी हिन्दु मुस्लिम द्वेश निर्माण होइल, स्वराज्य स्थापणेच्या प्रेरणे मागे ब्राह्मणच होते असा खोटा इतिहास सादर केला त्याला तुम्ही विरोध कर्णार की नाही ??
हा शोध तुम्ही कुठुन लावला ? काही संदर्भ /पुरावा देउ शकाल का?
बाबासाहेब पुरंदर्‍यांनी जो इतिहास लिहिला आहे तो त्यांनी सप्रमाण लिहिला आहे . अनेक माहित असलेल्या कथा पण ज्यांना पुरावे देता येणार नाही त्या त्यांनी त्यांच्या शिवचरित्रात सांगीतलेल्या नाहीत. कुठेही उगीच वायफळांचा मळा पिकवला नाहीये .
त्यांनी शिवाजीची डोळस भक्ती केली आहे. त्यांनी स्वतः अनेक वेळा सांगीतले आहे की ते शिवाजीला देव मानत नाहीत पण अनेक संशोधनांनंतरही त्यांच्या चारित्र्यात कुठेही खोट अढळत नाही. ज्यांना कुणाला काही माहित असेल त्यांनी पुराव्यानिशी सांगावे मग ते मान्य करतील ... पण आज पर्यंत असे कोणीही केले नाही.
बाबासाहेबांनी कधीच कुठल्याही धर्माच्या/जातीच्या बाजूने अथवा विरुद्ध विधाने केलेली नाहीत त्यामुळे असे विधान करणे चुकीचे आहे .

अमोल केळकर's picture

1 Jun 2009 - 4:00 pm | अमोल केळकर

समीर, खूप छान आणि मनापासून लिहिले आहेस
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

समीरसूर's picture

1 Jun 2009 - 4:03 pm | समीरसूर

हा प्रतिसाद सात वेळा टाकण्यात आला आहे. हे मुद्दाम केले आहे की काही तांत्रिक चूक आहे हे कळत नाही. असो. त्याने मजकुरातही काही फरक पडत नाही आणि सत्यातही!

१. स्वराज्य स्थापनेच्या मागे ब्राह्मणच होते फक्त यावरच बाबासाहेबांनी आयुष्यात लक्ष केंद्रित केले होते असे मला वाटत नाही. शिवाजी महाराज हाच त्यांचा ध्यास आणि श्वास होता हे सर्वज्ञात आहे. आणि या संघटनांनी आणि त्यांच्या नेत्यांनी काय तीनशे-साडे तीनशे वर्षे मागे प्रवास करून सत्य शोधून काढले आहे काय?
२. या मुद्यावर शांतपणे तोडगा काढता येऊ शकतो. हाणामारीची भाषा एका ज्येष्ठ अभ्यासकाविरुद्ध करणे याला गुंडगिरी म्हणतात आणि ही शिवरायांची संस्कृती खचितच नाही. या संघटनांचा उपयोग अधिक विधायक कार्यातही होऊ शकतो याबद्दल मत काय? सतत हाणामारी आणि विध्वंसक कारवायांमध्येच या संघटना आणि त्यांचे हे विघ्नसंतोषी नेते गुंतलेले असतात हे खरे नाही काय?
३. १००% सत्य लिहिणारी व्यक्ती सत्य कुठून शोधून आणणार? टाईम मशिनद्वारे त्याला शिवशाहीत पाठवून सत्य जाणून घेण्याची काही योजना आहे का 'संभाजी ब्रिगेड' किंवा 'मराठा सेवा संघा'कडे? की फक्त मराठा व्यक्ती त्या पदावर बसवली की ती १००% सत्यच (म्हणजे शक्य तेवढ्या ब्राह्मणांना शिव्या देईल, समर्थ रामदासांना शिव्या घालेल, संत ज्ञानेश्वरांना शिव्या घालेल असेच ना?) सांगेल असा दृढ विश्वास आहे या समस्त विद्वान मंडळींना?
४. फक्त ब्राह्मणांचे खच्चीकरण करायचे, त्यांना शिव्या द्यायच्या, त्यांच्यातल्या चांगल्या लोकांचा, इतिहासात होऊन गेलेल्या थोर पुरुषांचा (सावरकर, गोखले, समर्थ रामदास इत्यादी) देखील अतिशय खालच्या पातळीवर उतरून अपमान करायचा ही शिवरायांना रुचेल अशी संस्कृती आहे असे मत आहे काय खेडेकर, मेटे आणि गायकवाड या प्रभृतींचे? उलट ब्राह्मण असा अपमान झाला तरी आपल्या संस्कारांमुळे शांत राहतात आणि आपल्या संस्कृती नुसार रस्त्यावर उतरून हिडीसपणा करत नाहीत आणि तेच योग्य नव्हे काय? ब्राह्मणांना कधी असे शिवाजी महाराज, संत तुकाराम किंवा डॉ. आंबेडकर किंवा म. फुले यांच्याविरुद्ध निष्कारण तोंडाची वाफ दवडतांना पाहिले आहे काय? हे शहाणपण या विद्वान नेत्यांना आणि मुर्खासारखे त्यांचे अनुकरण करणार्‍यांना कसे येत नाही?
५. मी वर नमूद केल्याप्रमाणे समस्त मराठी जनतेला सोबत घेऊन महाराष्ट्रधर्म पुढे नेण्यात या नेत्यांना कमीपणा वाटतो काय?
६. परप्रांतीयांच्या आक्रमणाच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून चालणार आहे काय? इतरही महत्वाचे प्रश्न मराठी जनतेसमोर असतांना ही जातीयतेची विषारी फळे चाखून कुणाचे भले होणार आहे? का नाही कधीच या संघटना कुठले रक्तदान शिबीर आयोजित करत, का नाही कधी विदर्भात जाऊन शेतकर्‍यांना मदत करत, का नाही पूरासारख्या आपत्तीच्या काळात जीव ओतून काम करत, का नाही कधी अनाथ मुलांना खाऊ आणि खेळणी वाटत? असली कामे करणे कमीपणाचे वाटते का त्यांना? की त्यातून पराक्रम दिसून येत नाही? की उगीच कुणालाही धोपटायचे यात शौर्य वाटते त्यांना?

काहीतरी खुस्पट काढून ब्राह्मणांना त्रास द्यायचा आणि होणारे काम बिघडवून टाकायचे याखेरीज या संघटनांना आणि त्यांच्या प्रसिद्धीला हपापलेल्या नेत्यांना दुसरे काहीही येत नाही. पण असला नाठाळपणा पुढे केधीच कामात येत नाही हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. देव त्यांना मदत करो!

--समीर

धमाल मुलगा's picture

1 Jun 2009 - 4:12 pm | धमाल मुलगा

अगदी शंबरावर शंबर टक्के सहमत.

बाकी, ह्या मराठी 'मुजाहिद्दीन' विचारांच्या कोत्या मनोवृत्तीच्या संस्कृतीहीन कळपाची पत्रास ती काय बाळगायची? ह्यांना काही भरीव, 'क्रिएटिव्ह' करणं जमत तर नाहीच...पण कोणी काही केलं की त्यात विचका करायला मात्र पुढं. नुसती राखी सावंतगिरी! असं कोणी विचारत नाही ना, मग तसं तमाशा करु, 'बद ही सही, नाम तो हुआ' अशी गत ह्यांची.

ह्यांना काय कळावेत बाबासाहेब पुरंदर्‍यांचे कष्ट? काय कळाव्यात त्यांनी संशोधनासाठी खाल्लेल्या खस्ता? कोणीतरी काहीतरी लिहिलेल्या चार पत्रावळ्या वाचायच्या आणि त्यावर उफराटी बिनबुडाची मतं हेतुपुरस्सर बनवुन बोळ्याभाभड्यांच्या माथी मारायची. बाकी, राडे तमाशे करायला उपाशी-रिकामा तरुण आहेच हाताशी.

जाऊ द्या! काय बोलायचं?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

इनोबा म्हणे's picture

1 Jun 2009 - 4:19 pm | इनोबा म्हणे

धमालराव आणि समीर यांच्याशी अगदी सहमत.
बाकी 'संभाजी ब्रिगेड' किंवा त्यांच्या भाऊबंदांबद्दल आम्ही काय बोलावे? ज्या शंभूछत्रपतींनी हिंदू धर्मासाठी बलीदान केले त्यांच्याच नावाने चालणारी ही संघटना हिंदू धर्मच खोटा आहे म्हणते. यावरुनच यांची काय ती अक्कल कळते.

मैत्र's picture

1 Jun 2009 - 4:25 pm | मैत्र

ज्या शंभूछत्रपतींनी हिंदू धर्मासाठी बलीदान केले त्यांच्याच नावाने चालणारी ही संघटना हिंदू धर्मच खोटा आहे म्हणते. यावरुनच यांची काय ती अक्कल कळते.

जबरदस्त मुद्दा !! केवळ अशक्य विचारधारणा आहे या ब्रिगेड वाल्यांची!
संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं, तुळापूरला उत्सव करायचा ... आणि म्हणायचं हा धर्मच खोटा!!
म्हणजे जिजाऊंची शिवनेरीच्या शिवाईची श्रद्धा खोटी, का राजांची रोहिडेश्वराची शपथ खोटी, का प्रतापगडाची महाराष्ट्राची भवानीदेवी खोटी का अखिल मराठ्यांची जेजुरी खोटी, का संत तुकाराम महाराजांची विठ्ठल भक्ती खोटी ?

इतकं विलक्षण वागतात आणि विधाने करतात आणि आम्ही मराठी / मराठा आहोत म्हणतात?

आम्हाघरीधन's picture

1 Jun 2009 - 4:33 pm | आम्हाघरीधन

धर्मवीर नव्हेच ..........
एकीकडे धर्मवीर म्हणायचे अन दुसरीकडे 'दारुबाज, बाईल्वेडा'. शम्भुराजेन्चे बलिदान हे स्वराज्या साठी होते, जनतेच्या राज्या साठी होते , धर्मासाठी नाही. त्याना धर्मवीर म्हणुन त्याना केवळ एका धर्मापुरता मर्यादीत करताना मनाला वेदना होतात. ते सर्व धर्मीय जनतेचे राजा होते हे सत्य मानाल कि नाही. प्रत्यक्ष औरन्ग्यापुत्र त्यान्च्या शरणी आला होता ते त्यान्च्या निधर्मी वागणुकी मुळेच हे ही विसरलात काय?

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

मैत्र's picture

1 Jun 2009 - 4:51 pm | मैत्र

महाराजांचे नाव जिथे जिथे आहे तिथून हे विशेषण काढून टाकाल?
आत्ता गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा तुळापूरला कार्यक्रम झाला तेव्हा त्यांना धर्मवीर असं संबोधलं नव्हतं?

धर्मवीर म्हणजे धर्माचे रक्षण करणारा लढवय्या... याचा अर्थ दुसर्‍या धर्मांवर हल्ला करणारा कट्टर नव्हे.
हेही खरे की शंभूराजे लढले स्वराज्यासाठी.. पण धर्मासाठी बलिदान दिले हाही इतिहास खोटा आहे का?
इतर धर्मातल्या अनुयायांशी समभावाने वागणे असेल तर तो मनुष्य धर्मवीर असू शकत नाही का?

प्रत्यक्ष औरन्ग्यापुत्र त्यान्च्या शरणी आला होता -- हे निधर्मी वागणूकीमुळे का महाराजांनी औरंगजेबाला शह देण्यासाठी केलेली ती एक जबरदस्त खेळी होती. आणि राजांच्या व मराठी राज्याच्या शक्ती मुळे त्याला असे वाटले की औरंगजेबाशी लढू शकेल असा एकच राजा आहे आणि त्यांचे सहाय्य घेण्यासाठी तो आला. यात धर्म कुठे आला?

त्याना धर्मवीर म्हणुन त्याना केवळ एका धर्मापुरता मर्यादीत करताना मनाला वेदना होतात

- मग याच युगपुरुषांना ज्या धर्मात त्यांनी आयुष्य घालवलं आणि ज्यासाठी लढले त्यातल्या जाती पोटजातीमध्ये मर्यादित करताना त्याहून जास्त वेदना व्हायला हव्यात ना?

मनीषा's picture

1 Jun 2009 - 6:55 pm | मनीषा

धर्मवीर का म्हणता येणार नाही ?
औरंगझेबाने त्यांना सांगितले होते कि धर्म बदलला तर प्राण तर वाचतीलच , आणि मोठी जहगिरी / सरदारी मिळेल .
पण ते मान्य न करता त्यांनी अतिशय क्रुरपणे दिला गेलेला मृत्यु स्विकारला ... आणि ते स्वतः महाराष्ट्र धर्मासाठीच तर लढत होते ना?
(संभाजी आणि शिवाजी महराजांची राजवट ही धार्मिक सहिष्णूता जोपासणारी होती .... )

आम्हाघरीधन's picture

1 Jun 2009 - 4:36 pm | आम्हाघरीधन

उलट ब्राह्मण असा अपमान झाला तरी आपल्या संस्कारांमुळे शांत राहतात आणि आपल्या संस्कृती नुसार रस्त्यावर उतरून हिडीसपणा करत नाहीत आणि तेच योग्य नव्हे काय?
किती सत्य वदता आहात? ०% . अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

धमाल मुलगा's picture

1 Jun 2009 - 4:58 pm | धमाल मुलगा

>>अशी किती तरी उदाहरणे देता येतील.
द्या! पण सप्रमाण सिध्द करुन दाखवा म्हणजे झालं. नाहीतर नुसत्या फुसकुल्या सोडायच्या आणि अंगावर बेतलं की पळून जायचं असलं करु नका म्हणजे मिळवली.

द्याच उदाहरणं.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

छोटा डॉन's picture

1 Jun 2009 - 5:09 pm | छोटा डॉन

चालायचेच धमाल राव ...
तुम्ही उत्तरांची अपेक्षा ठेवलीत याचेच आम्हाला आश्चर्य वाटले, सोडुन सोडा हो, हे काय उत्तर देणार ???

काहितरी बिनबुडाची भडखाऊ आणि उपयोगशुन्य जातीयवादी विधाने करायची, ४ त्याहुन बिनबुडाच्या पुस्तकांचे दाखले द्यायचे, ब्राम्हणांच्या नावाने बोटे मोडायची आणि एवढे करुन "शिवाजी आणि संभाजी"सारख्या सुर्यप्रत महान व्यक्तींना लाज आणायची असले ह्यांचे धंदे ...
जाऊ द्या, सोडुन सोडा ...
राहु द्या ह्यांना त्यांच्याच कोषात.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

समीरसूर's picture

2 Jun 2009 - 12:01 pm | समीरसूर

किती उदाहरणे देऊ शकता तुम्ही? मागे एकदा पुरुषोत्तम खेडेकर यांनी समर्थ रामदासांना अद्वातद्वा शिव्या घातल्या होत्या. कारण काय तर ते ब्राह्मण होते म्हणून. तेव्हा कुठला ब्राह्मण रस्त्यावर उतरून 'संभाजी ब्रिगेड' सारखी मारामारी आणि गुंडगिरी करत हिंडला होता? आता देखील बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या ज्येष्ठ अभ्यासकावर कारण नसतांना चिखलफेक होत असतांना ब्राह्मण काही कुणाच्या घरात घुसून हाणामारी करत नाहीयेत. हा मक्ता 'संभाजी ब्रिगेड', 'मराठा सेवा संघ' आणि मेटेंच्या 'शिवसंग्राम' असल्या गुंडप्रवृत्तीच्या संघटनांचा आहे. मागे भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत शिरून त्यांनी जो तमाशा केला होता त्यासाठी तर त्यांना रासुका लावायला पाहिजे. ब्राह्मण कधीच समुदाय निर्माण करून असले संस्कृतीहीन वर्तन करत नाहीत हे त्रिवार सत्य आहे. मी सांगीतले त्याप्रमाणे त्याला बरीच कारणे आहेत. माझ्या लेखात ती कारणे मी नमूद केली आहेत. माझे कित्येक मराठा मित्र देखील हा जो खेडेकर महाशयांनी धर्म बदलणे, इतिहास बदलणे असला खुळचटपणा चालवलेला आहे त्याला कडाडून विरोध करतात. भविष्याची चाहूल घेऊन एक चांगले जीवन जगायचे की असला दहशतवाद पोसून सामान्यांचे जगणे अवघड करायचे हे देखील खेडेकर, मेटे, गायकवाड आणि चोंदे यांना कळत नसेल तर त्यांना तो धडा तरूण, धडाडीच्या मराठा युवकांनी शिकविण्याची गरज आहे. लालू प्रसाद बिहारमध्ये विकास न करता गुंडशाहीच्या जोरावर आणि जातीयतेच्या बळावर निवडणुका जि़कण्याची गुर्मीची भाषा करत होते. तिथल्या लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. तसे या खेडेकर वगैरेंच्या बाबतीत होणे गरजेचे आहे. मराठ्यांना आरक्षण पाहिजे असा पवित्रा घेऊन विनायक मेटे मराठ्यांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. एकदा तो मिळाला की मग राजकारणात घुसून वाट्टेल तशी लूट करायला ते मोकळे; मग कुठले शिवाजी आणि कसली शिवशाही!! असा त्यांचा आणि या सगळ्या स्वार्थी नेत्यांचा डाव आहे.

--समीर

नितिन थत्ते's picture

1 Jun 2009 - 4:39 pm | नितिन थत्ते

महाराजांना 'गोब्राह्मणप्रतिपालक' असे पहिल्यांदा कुणी म्हटले?
महाराज स्वतःला तसे म्हणवून घेत होते काय? ब्राह्मणांचा प्रतिपाळ हे महाराजांच्या मनातील कर्तव्य होते काय?

खराटा
(रंग माझा वेगळा)

छोटा डॉन's picture

1 Jun 2009 - 5:16 pm | छोटा डॉन

त्याचे कसे आहे खराटासाहेब की त्या काळात गाय ही हिंदु धर्माची धार्मिक मानबिंदु समजली जायची, गायीवर संकट मह्णजे समस्त हिंदुधर्मावर हल्ला असे असायचे, म्हणुन तर मुस्लिम आक्रमकांनी देवळे फोडल्यावर त्याच्या समोर गाय मारुन हिंदु धर्मावर आक्रमण केले. असो.
आता विषय राहिला "ब्राम्हणांचा" , तर त्या काळात म्हणजे सुमारे ४००-५०० वर्षे मागे ब्राम्हण हे फक्त आणि फक्त धार्मिक कार्य करत होते, धर्माची सर्व कमान ह्यांच्याकडुन संभाळली जायची. धर्मरक्षक, धर्माची व्याख्या करणारे, मार्गदर्शन करणारे असे ते ब्राम्हण होते. अर्थात सर्वच नाही पण पैठण, काशी, आळंदीचे वगैरे नक्की होते ...

आता स्वधर्मरक्षा करायची म्हणजे वरील बाबींचे संरक्षण आले.
आता ह्यालाच "गोब्राम्हणप्रतिपालक" म्हटले तर दुखते कुठे ?

का केवळ विरोधासाठी विरोध करणार आहात ?
असो, चालु द्यात, आम्हाला आता राग वगैरे येत नाही पण कीव वाटते. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढची सुशिक्षीत पिढी नक्की देईल. त्यांनी ह्या सर्व जात्यंधाना "तुम्ही आम्हाला लाज आणलीत" असे नाही सुनावले तर विचारा आम्हाला.
तोवर चालु द्यात ....

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

नितिन थत्ते's picture

1 Jun 2009 - 6:01 pm | नितिन थत्ते

(मी दुसर्‍या धाग्यावर स्मारक बांधण्याची काय गरज आहे असे विचारले आहे)
स्मारक बांधायचेच असेल तर कोणीही त्या समितीत असायला काहीच हरकत नाही. पुरंदरे देखील असूद्यात.

मी नुसतेच प्रश्न विचारले आहेत. त्यातला महत्वाचा प्रश्न महाराज स्वतःला गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवत होते का? हा आहे
उत्तर माहीत असेल त्यांनी द्यावे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

छोटा डॉन's picture

1 Jun 2009 - 6:12 pm | छोटा डॉन

आपल्या वरील प्रतिसादावरुन आपल्याला "पहिल्यांदा कोण म्हणले" ह्याच मुद्द्यात स्वारस्य आहे असे दिसते आहे.
म्हणण्यामागचा व "उपाधी"मागचा अर्थ आपण चक्क "दुय्यम" मानता असे माझे प्रथमदर्शनी मत झाले आहे.

मला अर्थ आणि उपयोग जाणण्यात जास्त इंटरेस्ट असल्याने मी प्रतिसाद तसा लिहला. बाकी कोणी म्हणले हा मुद्दा माझ्यालेखी क्षुल्लक असल्याने मी त्याचा विचार केला नाही, शोध घेतला नाही, त्याची गरज वाटत नाही.
आपल्याला ह्याचे जरुर उत्तर मिळेल अशी शिवचरणी प्रार्थना ...

बाकी,
मुळ प्रतिसादातले "प्रेषक खराटा ( सोम, 06/01/2009 - 16:39) . महाराजांना 'गोब्राह्मणप्रतिपालक' असे पहिल्यांदा कुणी म्हटले?" हे वाक्य आणि माझ्या प्रतिसादानंतर "महाराज स्वतःला गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवत होते का? " असे विचारणे ह्यातील विसंगती समजली नाही.
असो, ते जास्त महत्वाचे नाही.

आता त्या काळी बहुतांश लेखन करणारे, बखरी लिहणारे, इतिहास लिहुन ठेवणारे हे देशातले म्हणताल तर बहुतांश ब्राम्हण ( मराठी, बंगाली, दक्षिणी, उत्तरेतले वगैरे ... ) अथवा इंग्रज् फ्रेंच डच आदी असे होते.
आता ह्या मुद्द्याचा वापर " ब्राम्हणानीच गोब्राम्हणप्रतिपालक पदवी बळेबळे बहाल केली" असा चुकीचा अर्थ लावण्यास होऊ शकतो.
असो, त्यालाही आमच्या लेखी जास्त महत्व नाही ...

अवांतर :
का हो, जसा "ऍट्रासिटी कायदा" आहे तसे इतर जातींविषयी भडकावु आणि बिनबुडाची विधाने तसेच आरोप करण्याला विरोध करण्यासाठी कोणता कायदा आहे का ?

------
(सुस्पष्ट )छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

नितिन थत्ते's picture

1 Jun 2009 - 6:25 pm | नितिन थत्ते

दुरुस्ती.
पहिल्यांदा कोणी म्हटले असे विचारल्यावर त्याचे उत्तर त्याकाळातील लेखकांनी असे आले तरच महाराज तसे म्हणवत होते का? या प्रश्नाला अर्थ उरतो.
आणि जर हा उल्लेख अलिकडचा असेल तरच मोटिव्हचा आरोप करता येईल.
असा आरोप बिनबुडाचा आहे का? हे पाहण्यासाठीच प्रश्न विचारले आहेत.

>>का हो, जसा "ऍट्रासिटी कायदा" आहे तसे इतर जातींविषयी भडकावु आणि बिनबुडाची विधाने तसेच आरोप करण्याला विरोध करण्यासाठी कोणता कायदा आहे का ?
माहीती नाही. पण असला तर तो माझ्यावर लागू शकणार नाही. मी (माझ्याखेरीज) इतर जातीविषयी भडकाऊ विधाने कधीही करीत नाही.

खराटा
(रंग माझा वेगळा)

छोटा डॉन's picture

1 Jun 2009 - 7:02 pm | छोटा डॉन

>>असा आरोप बिनबुडाचा आहे का? हे पाहण्यासाठीच प्रश्न विचारले आहेत.
ओके, हेतु समजला.
जाणाकार ह्याचे उत्तर देतीलच.
वर स्पष्ट केल्याप्रमाणे आम्हाला ह्या मुद्द्यात जास्त इंटरेस्ट नसल्याने आम्ही चौकशी केली नाही, आम्हाला तुर्तास माहित नाही.
कोणाला पक्की माहिती असल्यास सांगावे ...

>>पण असला तर तो माझ्यावर लागू शकणार नाही. मी (माझ्याखेरीज) इतर जातीविषयी भडकाऊ विधाने कधीही करीत नाही.
तुमच्याबद्दल नाही हो खराटाशेठ,
मी जनरल विचारतो आहे, तुम्ही आरोप केले असे मा केव्हा म्हटले ?

मी आपली जनरल चौकशी करत आहे, गैरसमज नसावा ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

आम्हाघरीधन's picture

1 Jun 2009 - 4:49 pm | आम्हाघरीधन

महाराजान्नी निर्माण केलेले राज्य हे सर्व धर्मीय सर्व जातीय जनतेचे राज्य होते हे सप्रमाण सत्य असतान्ना ते अचानक 'ब्राह्मणप्रतिपालक' कसे काय झाले!!!!!
छ. शिवराय यान्च्या राज्याभिषेकाला मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला, दलित समाजाने विरोध नाही केला........ मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे. जर हे सत्य सान्गने कुणाला द्वेश वाटत असेल तर आहोत आम्ही द्वेशी असेच म्हणावे लागेल.

अफझल खानाचा वध वर्णिताना क्रिष्ना भास्कर कुलकर्नी झाकावा, गागाभट्टाची खोटी कथा घुसवुन राज्याभिषेकाला विरोध ब्राह्मण ज्ञातीने केला हे झाकावे. असे पराक्रम पुरन्दरे यानी केले नाहीत असे छातीठोक पणे कुनीही सान्गावे.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

उगाच आपले कैच्याकै...पुरंदरे अश्या सो कॉल्ड खोट्या कथा का लिहितील वा घुसवतील? त्यांचा (किंवा कोणाचाहि) त्यात काय फायदा?

उगाच आपले काहिहि बोलायचे हि ब्रिगेडी टोळक्याची अन टाळक्यांची सवयच आहे म्हणा

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

निखिल देशपांडे's picture

1 Jun 2009 - 4:57 pm | निखिल देशपांडे

मला एक कळत नाही तुम्ही म्हणता तसा पुरंदरेनी सर्व इतिहासाचे ब्राम्हणीकरण केले असेल तर मग त्यावर आताच का वाद??? बाबासाहेब मागचे ८६ वर्ष फक्त शिवचरित्रावरच काम करतात मग आधी त्यांना विरोध नव्हता???जाणता राजाला तर सर्व मराठा नेत्यांनी अतिथी म्हणुन हजेरी लावलिच असेल मग आताच हा मुद्दा का??? दर वेळे प्रमाणे विधानसभा निवडणुकिच्या तोंडावर महाराजांचे नाव घेउन काही तरी वाद घालायचा आणी मत विभाजन करायचे.
==निखिल

ब्राम्हण काही राज्यकर्ते वतनदार नव्हते. ज्या ज्या वतनदारांनी, सरदारांनी महाराजांना विरोध केला त्यांचे काय?
का राजे फक्त आदिलशहा आणि मुघलांविरुद्ध लढले. स्वकीयांचा विरोध हा इतिहास खोटा आहे का?
शहाजीराजांना अटक करण्यात अफझलखानाला साथ देणारे मराठे नव्हते काय? निंबाळकर, मुधोळकर घोरपडे, शिर्के, जावळीचे मोरे, मामा मोहिते, महाराजांचे सावत्र भाऊ, हे सगळे काय ब्राम्हण होते काय?

मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे -- प्रत्यक्ष संत ज्ञानेश्वरांशी ब्राम्हण समाज कसा वागला होता हेही सर्वश्रुत आहे. ब्राम्हण समाजात हेकट आणि शास्त्राधारावर मोठेपणा करणारे अनेक नग होते.
हो पण थोरल्या महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी धर्मशास्त्राचा मोडता घालणारे काही बिनडोक ब्राम्हण वगळता कोणी विरोध केला ते सांगाल का?

कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राम्हण होता हे तर पुरंदरे यांनी पण लिहिलं आहे. आणि महाराजांनी त्यामुळे अभय देऊनही त्याने तलवार चालवली व नंतर त्याला मारले गेले हे तर पुरंदरे यांनी लिहिलं आहे. कुठे झाकलं आहे? का नाव बदललं आहे?
पण याच प्रसंगात महाराजांचे वृद्ध वकील गोपीनाथपंत उर्फ पंताजी बोकील हे कुठल्या जातीचे होते? ते का झाकलं जात आहे?
वकीली / चिटणीशी हा पेशा होता बलुतेदारांसारखा. ते सर्व तर ब्राम्हणच होते ना. इतकी वर्ष त्यांनी महाराजांची इमाने इतबारे चाकरी केलीच ना?

ज्यांच्यामुळे महाराजांचे आयुष्य आणि स्वराज्य टिकले ते बाजीप्रभू देशपांडे कुठल्या जातीचे होते? का हाही इतिहास खोटा आहे?
महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातल्या ब्राम्हणांचे काय? त्यांचा पुढचा इतिहास माहीत आहे आणि सत्य आहे पण त्यांनी शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी केलेले काम कमी होते का? किंवा त्यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला काय विरोध केला?

आग्र्याहून सुटका झाल्यावर औरंग्याने पकडून ज्यांचे हाल केले आणि तरीही त्यांनी एक शब्दही काढला नाही ते दोन ब्राम्हणच होते ना? ज्यांच्या संगतीने महाराज राजगडापर्यंत आले ते संन्याशी काय होते?

मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला -- हे तर इतिहासात नसावं ... यांच्याशी लढण्यात महाराजांचं आयुष्य गेलं. हेन्री ऑक्झिंडेन आला ते स्वराज्याच्या शक्तीमुळे, समर्थन होते म्हणून नाही. याच इंग्रजांनी करार मोडून सिद्दी जौहरला तोफा पुरवल्या होत्या ज्यामुळे महाराजांचे प्राण किंवा स्वराज्य तरी धोक्यात आले होते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jun 2009 - 5:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मैत्रा, समीरसूर, धमु, छोटा डॉन, ऋषिकेश इत्यादी मित्रांनो

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

पुरावे नसताना किंवा न देता आरोप करणे, कायद्याच्या राज्यात हिंसेच्या, हात तोडण्याच्या धमक्या ८६ वर्षाच्या माणसाला देणे (भले तो माणूस अभ्यासक असेल वा रंक) याला मनाचा भाव म्हणायचं का याचं उत्तर द्या आधी!!

शिवाजी महाराज हिंदूंचे राजे नव्हते तर मग मुसलमान आक्रमकांविरुद्ध तलवार का उचलली त्यांनी? आणि छत्रसाल बुंदेल्यांना मदत का केली? एका विचारांचा पुरस्कार म्हणजे दुसर्‍या विचारांचा आणि विचारकांचा खातमा असा होतो का? शिवरायांच्या पदरी इब्राहिमखान गारदी होताच, पण तो 'आपला' होता, आणि औरंगजेब, निजामशहा हे परकीय आक्रमक होते. तसेच टोपीकर इंग्रज आणि जंजीर्‍याचा सिद्दीसुद्धा!

आजही आपल्याला शिवाजीमहाराजांना शिकवलं कोणी यावरून वाद घालायची गरज आहे का जातीपाती मोडून काढण्याची? शिवाजीमहाराजनामक सूर्याला 'तो कोणाचा' असे प्रश्न विचारून लाज आणायची वेळ आहे का आपण त्यांचे आदर्श उचलून, जातीभेद विसरून, धर्मभेद सोडून देऊन आपले आणि परके ओळखण्याची वेळ आहे?

मराठ्यांच्या या (सो कॉल्ड, कारण सगळे मराठे यांना थोडीच मानतात!) मूठभर नेत्यांना स्वतःचं अस्तित्त्व जाणवून देण्याची राजकीय गरज असेल, पण आपण का या परप्रकाशित लोकांना मोठं बनवत आहोत? खंडोजी खोपड्याला शिक्षा झाली हा इतिहास आठवायचा का कोणी गद्दार सुटला हा इतिहास??

मैत्र's picture

1 Jun 2009 - 5:41 pm | मैत्र

सर्व ब्राम्हण जणू महाराजांचे विरोधकच होते असा बुद्धिभेद करणार्‍या आणि ८६ वर्षाच्या आदरणीय व्यक्तीला हात तोडण्याच्या धमक्या देणार्‍या लोकांना विरोध केलाच पाहिजे. जर त्यांच्याशी तात्विकच विरोध आहे यांचा तर तत्त्वानुसार शिवचरित्रासाठी आणि महाराष्ट्र धर्म जागृत ठेवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल आदर हवा आणि दोन इतिहासकारांनी आपले मुद्दे घेऊन भांडावं... पण इतके तत्त्वनिष्ठ आहेत का हे लोक? इतकी सरळ वृत्ती आहे का?

सरळ सरळ हिंदु धर्म विरोधी आहेत... ब्रिगेडने खरंच जाहीर करावे की महाराष्ट्रातल्या सर्व दैवतांच्या अस्तित्वाला यांचा विरोध आहे. बरं होईल. असलं नसलं समर्थन ताबडतोब खतम!
'मारावे अनुल्लेखे' हे अशा वृत्तीला पुरेसे होत नाही. हे जेव्हा सिद्ध होते की ही वृत्तीच खराब आहे मग लोकांचा बुद्धिभेद होत नाही.

सिंहगडावर तानाजी मालुसरेंचा पुतळा पाहून आत्ताच्या पिढीतल्या कोणाही सामान्य ब्राम्हणाची छाती अभिमानाने आणि विलक्षण आदराने भरून येते. मग घोडखिंड पाहून बाजीप्रभूंच्याबद्दल या ब्रिगेडवाल्यांना तसा आदर का वाटत नाही?

असे मुद्दे काढून जे ब्राम्हणांवर आगपाखड करत आहेत आणि खुद्द महाराजांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला व ज्यांनी महाराजांना हाल सोसून, मरण पत्करून साथ दिली अशा लोकांना नजरे आड करत आहेत त्यांच्या हे लक्षात का येत नाहीये की ते चक्क
खुद्द शिवाजी महाराजांवर, त्यांच्या कर्तृत्वावर अविश्वास दाखवत आहेत??
याहून मोठा गुन्हा तो काय?

त्यामुळेच यांचे म्हणणे खोडून काढणे ब्राम्हणाचे तर सोडा प्रत्येक मराठी माणसाचे ज्याला महाराजांबद्दल आणि स्वराज्याच्या इतिहासाबद्दल आदर आहे त्या प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.

छोटा डॉन's picture

1 Jun 2009 - 5:28 pm | छोटा डॉन

मैत्रभौ, एकदम खणखणीत प्रतिसाद ...

अहो पण कुणाला सांगत आहात ? तुम्हाला अशी अपेक्षा आहे का ही लोक आपल्या म्हणण्यावर जरासुद्धा विचार करतील ?
तसे असते तर असे वाद झालेच असते का ?
सोडुन सोडा हो, जाऊ द्यात ...

छ. शिवराय यान्च्या राज्याभिषेकाला मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला, दलित समाजाने विरोध नाही केला........ मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे. जर हे सत्य सान्गने कुणाला द्वेश वाटत असेल तर आहोत आम्ही द्वेशी असेच म्हणावे लागेल.

=)) =)) =)) =))
अतिशय उच्च विनोद आहे हा ...!!!

आमच्या तर डोळ्यासमोर चित्रसुद्धा आले लगेच.
महाराजांचा राज्याभिषेकावेळी इंग्रज हे तोरण वगैरे बांधत असुन गडाची सजावट वगैरे करत आहेत, झालेच तर शोभेची दारु वगैरेचा मक्ता इंग्रजांकडेच आहे, त्यांचे नेटनेटक्या कपड्यातले एक घोडदळ गडाला पहारा देत आहे.
मुस्लिमांचे काय सांगावे, महाराज मुस्लिमांविरुद्द नव्हतेच त्यामुळे हा मुद्दा बाद आहे. महाराजांचा विरोध हा मुस्लिम दिल्लीश्वर राज्यकर्त्यांना होता. असो, तर मुस्लिमही काम करत होते असे मानु आणि तसे होतेच.
मात्र ...
मात्र ब्राम्हण हे गडाखाली निदर्शने करत होते, जमल्यास आक्रमक होऊन गडावर चालुन यायचा त्यांचा विचार होता पण देशप्रेमी इंग्रजांमुळे ते जमले नाही , तरी काही टवाळ ब्राम्हण तरुणांनी खालुनच आपल्या घोषणा चालु ठेवल्या. शेवटी त्यांना राखेचे तोबरे देण्यात येऊन विरोध मोडुन काढण्यात आला....

वा वा, काय कल्पनाविलास आहे ...
उच्च विनोद आहे बरं, धो धो हसलो ...

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

नितिन थत्ते's picture

1 Jun 2009 - 6:27 pm | नितिन थत्ते

>>महाराजान्नी निर्माण केलेले राज्य हे सर्व धर्मीय सर्व जातीय जनतेचे राज्य होते हे सप्रमाण सत्य असतान्ना ते अचानक 'ब्राह्मणप्रतिपालक' कसे काय झाले!!!!!

अचानक म्हणजे कधी झाले?

खराटा
(रंग माझा वेगळा)

मनीषा's picture

1 Jun 2009 - 7:07 pm | मनीषा

गो ब्राम्हण प्रतिपालक म्हणजे धर्माचा रक्षणकर्ता ... गाय, ब्राम्हण ही हिंदू धर्माची प्रतिक आहेत..
आणि मराठा , दलित इ. सर्व हिंदूच आहे...
पण धर्मरक्षक म्हणजे फक्त हिंदूचा राजा आणि इतर सर्व धर्मांचा द्वेष्टा असा नाही ... धर्मरक्षक याचा अर्थ त्यांच्या राजवटी मधे सर्व धर्मांना रक्षण होते .. असा आहे . महाराजांनी कुठल्याही मुसलमानाला हिंदू केले नाही .. त्यांनी कुठलीही मशीद तोडली नाही. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात ब्राम्हण, मुसलमान, मराठा असे सर्व लोक होते.
त्यांनी नेहमी गुणवत्ता आणि निष्टेला महत्व दिले ... जातीपतीचे राजकारण/ समाजकारण केलेले नाही.
(हे सर्व बाबासाहेंबानीच त्यांच्या शिवचरित्रात लिहिले आहे... आणि तरी त्यांच्यावर इतके आरोप केले जात आहेत )

नितिन थत्ते's picture

1 Jun 2009 - 7:19 pm | नितिन थत्ते

हे सगळे मान्यच आहे.
तरीही गाय हे हिंदूधर्माचे प्रतीक हे ठीक पण ब्राह्मण हे हिंदूधर्माचे प्रतीक कसे?

महाराज गोब्राह्मणप्रतिपालक 'अचानक' म्हणजे कधी झाले?

खराटा
(रंग माझा वेगळा)

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2009 - 10:27 pm | llपुण्याचे पेशवेll

छ. शिवराय यान्च्या राज्याभिषेकाला मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला, दलित समाजाने विरोध नाही केला........ मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे. जर हे सत्य सान्गने कुणाला द्वेश वाटत असेल तर आहोत आम्ही द्वेशी असेच म्हणावे लागेल
एक काम करा धुळ्याला शंकर कृष्ण देव यांचे समर्थ ग्रंथालयात जा तिथे संभाजीराजे आणि समर्थ रामदास यांच्यात जो काही थोडा पत्रव्यवहार झाला (कारण शिवाजीमहाराजांच्या निर्वाणानंतर फार थोडा काळच रामदास हयात होते.) त्याचे अस्सल कागदपत्र मिळतील. हवे तर कागदपत्रे मिळवून वाचा, हवेतर त्याचे कार्बन डेटींग करा आणि त्याचा खरेपणा शोधा. त्यावर संभाजीराजांची मुद्रा आणि सही आहे. त्यात संभाजीराजे असे म्हणतात
'आबासाहेबांप्रमाणे आम्हासही गोब्राम्हणप्रतिपालक बिरुद मिरवावेसे वाटते. असे वाटते घाला घालावा व काशी विश्वेश्वरादी क्षेत्रे मुक्त करावी'
आणि ती पत्रे वाचल्यावर सांगा जे वरती तुम्हास वाटते ते खरे आहे का खोटे.
आणि तरीही जे वरती तुम्ही लिहीले हे तुम्हास सत्य आहे असे वाटत असेल तर तुम्ही द्वेशीच नाही तर मूर्खही आहात.

कृष्णाजी भास्कराचा उल्लेख तुम्हाला शिवचरित्रात मिळाला नाही. अरेरे, नीट वाचाहो पुस्तक.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मैत्र's picture

2 Jun 2009 - 9:32 am | मैत्र

अफझल खानाचा वध वर्णिताना क्रिष्ना भास्कर कुलकर्नी झाकावा

ब. मो. पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकात कृष्णाजी भास्कर वकीलाने राजांवर वार केला हे लिहिलं आहे.
मग कोणी आणि कुठे झाकलं? बरं हे तुम्हाला माहीत नाही असं कारण नाही.
श्रीमंत कोकाटे लिखित - राजांचे खरे शत्रु कोण या पुस्तकात पान ७ वर त्यांनी चक्क हा संदर्भ दिला आहे!
म्हणजे पुरंदरे यांनी एका घातकी वकीलाबद्दल सरळ लिहिले तर ते खरे - इतके की त्यांना विरोध करताना उलट त्यांचाच संदर्भ देता येतो आणि त्यांनी लिहिलेले बाकीचे खोटे?

याच पुस्तकात सेतुमाधवराव पगडी आणि कोणी एक बेंद्रे यांच्या शिवचरित्र अभ्यासाचे संदर्भ आहेत - हे दोन्ही ब्राम्हण होते का? नावावरुन वाटते. त्यांच्या इतिहास संशोधनाचा संदर्भ घेतला तर चालतो का?

पुन्हा एकदा तोच मुद्दा की इतिहासात विविध प्रसंगी काही लोक जे ब्राम्हण होते ते काही अयोग्य / स्वराज्याविरुद्ध किंवा फक्त आपल्या स्वार्थापुरते वागले म्हणून गेल्या सातशे वर्षातले सर्व ब्राम्हण हे नालायक आणि घातकी आहेत. मूळात भारतभर असलेला हिंदू धर्मच साफ चुकीचा आणि त्याज्य आहे म्हणणे इतके टोकाचे आहे की याला समान उपमा देणेही शक्य नाही.

चिन्या१९८५'s picture

2 Jun 2009 - 3:37 pm | चिन्या१९८५

छ. शिवराय यान्च्या राज्याभिषेकाला मुसलमान्नानी विरोध नाही केला, इन्ग्रजान्नी विरोध नाही केला, दलित समाजाने विरोध नाही केला........ मात्र विरोध केला तो महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने हे सर्वश्रुत आहे
त्याचबरोबर अनेक मराठा सरदारांनी विरोध केला हे तु का झाकतोस??शिर्के,घाटगे,मोरे,निंबाळकर,मोहिते,दळवी,सावंत या आणि इतर मराठा सरदारांनी शिवराज्याभिषेकास विरोध केला कारण त्यांच्यामते शिवाजी महाराज आणि ते एकाच लेव्हलचे होते.स्वतः इतिहास झाकायची कामे करायची आणि दुसर्‍यांवर आरोप करायचे.

अफझल खानाचा वध वर्णिताना क्रिष्ना भास्कर कुलकर्नी झाकावा
पुरंदर्‍यांनी लिहिलेल्या आनि सांगितलेल्या शिवचरीत्रात कृष्णाजी भास्कराचा स्पष्ट उल्लेख आहे आणि त्याला महाराजांनी सांगुनही तो थांबला नाही म्हणुन महाराजांनी त्याच्यावर प्रतिहल्ला केला हेही आहे.उगाच पुरंदर्‍यांचे शिवचरीत्र न वाचता काहीही पसरवु नकोस.

गागाभट्टाची खोटी कथा घुसवुन राज्याभिषेकाला विरोध ब्राह्मण ज्ञातीने केला हे झाकावे
शिवराज्याभिषेकाच्या वेळी २०००० ब्राह्मण गडावर उपस्थित होते.याचा अर्थ त्यांचा राज्याभिषेकास विरोध नव्हता.काही ब्राह्मणांनी विरोध केला म्हणुन सगळ्याच ब्राह्मणांनी विरोध केला असे म्हणायचे असेल तर काही मराठ्यांनी विरोध केला म्हणजे सगळेच मराठे राज्याभिषेकाच्या विरुध्द होते असे म्हणायचे का??

जयसिंघराव पवारांचे मत तरी तुम्हाला मान्य आहे का.आता हे वाचा की प्रा.पवार याबद्दल काय म्हणतात ते-
जयसिंगराव पवारांची राज्याभिषेकाबद्दलची मते
प्रा.जयसिंगराव पवार आपल्या 'छत्रपती शिवाजी महाराज' अरुंधती प्रकाशन्,कोल्हापुर या पुस्तकात शिवराज्याभिषेकावरही प्रकाश टाकतात.ब्रिगेडच म्हणन आहे की शिवाजी महाराजांनी स्वतःला 'राजे' हे पद लावुन घेण्यासाठी राज्याभिषेक केला.पण हे लोक विसरतात की शिवराज्याभिषेकापुर्वी ६ वर्षापुर्वीच औरंगजेबाने शिवरायांना 'राजा' हा किताब दिला होता. शिवरायांनी राज्याभिषेक का केला यावर प्रा.पवार आपल्या पुस्तकात प्रकाश टाकतात्.पृष्ठ १२७ वर 'शिवराजाभिषेक सोहळा' या भागामध्ये राज्याभिषेकावर सविस्तर विवेचन केलेले आहे.त्यात ते लिहितात राजाभिषेक हा एक असामान्य दिवस होता. हिंदु समाजाच्या इतिहासात आलेला हा असा वैभवशाली दिवस होता.या युगात सर्वत्र मुसलमान राजे.आम्हा हिंदुंना राजे होता आले नाहींअव्हे होता येणारच नाही अशा न्युनगंडाने पछाडलेल्या हिंदु समाजात महाराजांनी राजाभिषेक करुन नवचैतन्य निर्माण केले.आणि अशा हिंदु समाजास ब्रिगेड सोडत आहे,नव्हे हिंदुंमधील नवचैतन्यासच ब्रिगेड विरोध करत आहे. पुढे प्रा. पवार लिहितात गुप्तकालानंतरच्या काळात राजाभिषेक केल्याचे हिंदु समाजास माहीत नव्हते आणि देवगिरीच्या यादवांनंतर महाराष्ट्रात खरेखुरे राजपदही नाहीसे झाले होते.खुद्द महाराजांचे वडीलही 'राजे' पद लावत्.परंतु त्यांची सत्ता मुसलमान राजासारखी नव्हती.ते मुसलमान राजांचे चाकर होते.महाराजांना असे राजपद नको होते.त्यांना खरेखुरे राजपद्,स्वतंत्र राजेपण्,हवे होते.आदिलशहा,कुतुबशहा,मोघल्,पौर्तुगिज्,इंग्रज यांच्यासाठी महाराज म्हणजे जहागिराचा बंडखोर पुत्र,राज्यातील एक बंडखोर्,लुटारि मनुष्य होते.एव्हढेच नव्हे तर महाराष्ट्रातील मोरे,दळवी,सुर्वे,निंबाळकर इत्यादी मराठे महाराजांना आपल्याप्रमाणेच आदिलशहाचे चाकर समजत होते.त्यांच्या कागदपत्रात याबद्दल अनेक पुरावे उपलब्ध आहेत्.महाराजांना राजाभिषेकाने हे दाखवुन द्यायचे होते की,प्रस्थापित मुसलमानी राजवटींविरुध्द बंडखोरीची पायरी महाराजांनी ओलांडली असुन त्यांनी 'मराठी राज्याची' स्थापना केलेली आहे व ते आदिलशहा-मोघल यांच्यासारखे हिंदुंचे राज्यकर्ते (बादशहा) बनले आहेत.एव्हढेच नव्हे तर राजाभिषेक करुन महाराजांना मुसलमानी सत्ताधिशांना हा इशारा द्यायचा होता की आता हिंदुंचे राज्य निर्माण झालेले आहे, त्यांना त्यांचा अभिषिक्त राजा मिळाला आहे.आणि येथुन पुढे हिंदुंवर होणारा अन्याय व जुलुम सहन केला जाणार नाही.तसा तो झाला,तर अन्याय व जुलुम करणार्‍यास हिंदुंची सत्ता ,हिंदुंची बादशाही,हिंदुस्तानात प्रस्थापित झालेली आहे.ती स्वतंत्र्,सार्वभौम आहे.राजाभिषेक हे सार्वभौमत्वाचे लक्षण होते.

त्यानंतर प्रा.पवार राजाभिषेकातील गागा भट्टाच्या प्रकरणाबद्दल लिहितात्.त्यात ते लिहितात कि अकबराच्या काळात कृष्ण नृसिंह शेष याने कलियुगात क्षत्रियच नाहीत असा सिध्दांत मांडला होता आणि त्याचा प्रभाव हिंदुस्तानातील हिंदु जनतेवर होता.महाराष्ट्रातील काही ब्राह्मण पंडितही त्यास अपवाद नव्हते.यामध्ये विश्लेशण करताना प्रा.पवार हे दाखवुन देतात की राजाभिषेकास फक्त काही ब्राह्मणांचा विरोध होता.पण ब्रिगेड मात्र 'सर्व ब्राह्मणांचा राज्याभिषेकास विरोध होता' असा साफ खोटारडा प्रचार करते आहे.प्रा.पवार हे ही लिहितात की दळवी,सुर्वे,निंबाळकर्,मोहिते या मराठे सरदारांचाही शिवराज्याभिषेकास विरोध होता.जर काही ब्राह्मण राज्याभिषेकाच्या विरोधात होते म्हणुन सर्वच ब्राह्मण विरोधात होते असे म्हटले जाते तर काही मराठ्यांवरुन सर्वांवरच तसा आरोप का केला जात नाही??इतरही ब्राह्मण राजाभिषेकास अनुकुल कसे होते हे प्रा.पवारांच्या पुढील लिखाणातुन स्पष्ट होते.त्यामध्ये शिवरायांच्या कुळाचा इतिहास तपासण्यासाठी पाठवलेल्या ब्राह्मणांचा उल्लेख प्रा.पवार करतात महाराजांनी आपल्या पदरी असलेले बाळाजी आवजी,केशवभट्ट पुरोहीत्,भालचंद्रभट इत्यादी पंडीतांचे शिष्टमंडळ उत्तरेतील जयपुर,अंबर्,काशी याठिकाणी पाठवले.या शिष्ठमंडळाने जयपुरचे राजघराण्यातुन सिसोदिया कुलाची शिवाजी महाराज याच वंशातील आहेत हे सांगणारी वंशावळ प्राप्त केली.पुढे हे मंडळ काशीला गेले ;तेथे हिंदु जगतामध्ये प्रसिध्द असलेल्या गागा भट्ट या महापंडीताला त्यांनी महाराजांच्या वतीने राजाभिषेकाचे आर्ध्वयत्व स्वीकारण्याची वनंती केली आणि ती त्यांनी मानली.विश्वेश्वर उर्फ गागा भट्ट यांचे मुळ घराणे महाराष्ट्रातील पैठण या गावचे होय्.या घराण्यात अनेक महापंडीत होउन गेले होते.खुद्द गागा भट्ट हा हिंदु जगतातील एक सर्वश्रेष्ठ पंडित समजला जात असे. हिंदु धर्मशास्त्र व तत्वज्ञानात त्याच्या तोडीचा कोणी पंडित हिंदुस्तानात नव्हता. हिंदु जगतामध्ये 'ब्रह्मदेव' व 'व्यास' अशा नावांनीच तो ओळखला जात जाई.अशा महापंडिताला महाराजांनी राजाभिषेकास पाचारण केले होते.गागा भट्ट आल्यानंतर आपल्या अलौकिक विद्वत्तेने व बुध्दिचातुर्याने त्याने ज्या मंडळींनी राजाभिषेकास विरोध केला होता त्यांच्या शंकांचे निरसन करुन समाधान केले आणि पुढील समारंभाच्या तयारीस तो लागला.ब्रिगेड व इतर ब्राह्मणद्वेशी असा खोटा प्रचार करत आहेत की महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी राज्याभिषेक करण्यास विरोध केल्याने गागा भट्टास आणले गेले.त्याला प्रा.पवारांनी वर उत्तर दिलेले आहे की गागा भट्ट हा सर्वश्रेष्ठ पंडित असल्याने त्याला राज्याभिषेकास आणले गेले व त्याला महाराष्ट्रात आणणार्‍या शिष्ठमंडळातही महाराष्ट्रातील ब्राह्मणच होते.

त्यानंतरच्या परीच्छेदात प्रा.पवार लिहितात की महाराजांनी चिपळुणला जाउन परशुरामाचे दर्शन घेतले.ज्या परशुरामाचे महाराजांनी जाउन दर्शन घेतले त्याला ब्रिगेड शिव्यांची लाखोली वाहते.म्हणजे महाराज चुक होते असे ब्रिगेडचे म्हणने आहे का??तसे असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे.पृष्ठ १२९ वर राजाभिषेक सोहळ्याचे वर्णनही प्रा.पवार करतात्.ब्रिगेड ज्याचा विरोध करते त्या गणेशाचे पुजन करुन राजाभिषेकास सुरुवात झाली हे प्रा.पवार लिहितात्.पुढील पृष्ठावर ते लिहितात की छत्र धारण झाल्यानंतर गागा भट्ट व इतर ब्राह्मणांनी महाराजांना शुभाशिर्वाद दिला,पंतप्रधान मोरोपंतांनी महाराजांना मुजरा करुन ८००० होनांचा अभिशेक केला. जर हे सगळे ब्राह्मण राज्याभिषेकाच्या विरोधात होते तर त्यांनी असे कशाला केले असते??

महाराजांच्या राज्यात देश्,धर्म यांची कुठलीही भावना नव्हती असे ब्रिगेड म्हणते.त्यांनी प्रा.पवारांचे पृष्ठ १३२ वरील विवचन वाचावे. ते लिहितात चैतन्यहीन गोळ्यासारखा हिंदु समाज पडुन होता ,त्यात शिवाजी राजाच्या राजाभिषेकाने चैतन्य भरले,जिवंतपणा आणला. हिंदुंचे राजपद निर्माण केले.आपल्या समाजास उन्नत केले.इस्लामी सत्तेला यशस्वीपणे आव्हान देणारी हिंदुंची एक सामर्थ्यशाली सत्ता म्हणुन हिंदुस्तानातील सर्व जातीजमाती महाराजांच्या राज्याकडे आता पाहु लागल्या.राजाभिषेकाने अशा राज्याची राजशास्त्रीय आणि धर्मशास्त्रीय दृष्ट्या खरी स्थापना झाली.ब्रिगेड इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे शिवजयंती व शिवराज्याभिषेक दिन साजरा करुन शिवराज्याभिषेक शकास विरोध करतात. त्या शिवराज्याभिषेक शकाबद्दल प्रा.पवार लिहितात महाराजांनी या समारंभाचे ऐतिहासिक महत्व चिरकाल रहावे ,यासाठी राजाभिषेकापासुन राजाभिषेक शक सुरु केला.शक सुरु करणे म्हणजे सामान्य बाब नाही.शक सुरु करणे म्हणजे नवे युग सुरु करणे.अखिल हिंदु समाजात व हिंदवी राजकारणात या राजाभिषेकाने नवे युग सुरु झाले आहे,हेच महाराजांना या शकाच्या निर्मितीने घोषित करावयचे होते.

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

राघव's picture

4 Jun 2009 - 12:20 am | राघव

अप्रतीम..!!
चिन्याशेठ, अत्युच्च प्रतिसाद!

तुमचा इतिहासाचा गाढा अभ्यास मागेही दिसलेला आहेच.
शतशः धन्यवाद.

राघव

चिन्या१९८५'s picture

6 Jun 2009 - 2:24 pm | चिन्या१९८५

धन्यवाद्.पण आम्हा घरी धन ने उत्तर तर दिलेलेच नाही.

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

मराठ्याना फक्त आणि फक्त राजकारणी घोषीत केले नाहीत याबद्दल धन्यवाद.
राजकारण आणि इतिहास यात गल्लत करता आहात............
मराठे बोलताना दिसले की राजकारण आहे असे नेहमीच का भासते तुम्हाला ?? की जाणिवपुर्वक तसे भासविता? आम्ही सर्व पक्षीय आहोत तसे सामाजिक सन्घटनेच्या आन्दोलना बाबत सर्व पक्षान्ना फाट्यावर मारणारेही आहोत.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

धमाल मुलगा's picture

1 Jun 2009 - 5:42 pm | धमाल मुलगा

पुढारीमधल्या दुव्यांना लिकवून काय उपेग? विचार कसा सर्व बाजुंनी व्हायला हवा की नाही?
चला, आम्हीच मदत करतो तुम्हाला:
http://www.saamana.com/2009/June/01/AGRALEKH.HTM
हे घ्या!
आता हे वाचा नीट! नुसतं वाचु नका तर समजुन घ्या! मनन करा त्यावर आणि मग सांगा, काय ते :)
चालेल?

- (अजुनही आपल्या सप्रमाण सिध्द करता येण्याजोग्या "अशी किती तरी उदाहरणे " ह्यांच्या प्रतिक्षेत) धमालराव देशमुख-पाटील.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 5:54 pm | परिकथेतील राजकुमार

एक मानसीक अत्यावस्थ संघटनेच्या तेव्हड्याच अत्यावस्थ समर्थकाची आणी काही 'प्रस्थापीत बामण प्रभुतींची' झुंज बघुन , मनात अपार करुणा दाटुन आली.

खरेतर या विषयावर इतके लिहिले आणी बोलले गेले आहे की पुन्हा काहि लिहावे असे वाटतच न्हवते. मला एक कळत नाही, तुम्ही लोक संभाजी ब्रिगेडचा इतका राग राग का करता ? अहो ती एक मानसीक रुग्णांची संघटना आहे, तुम्ही तीच्या पेकाटात लाथा घालुन तीला अजुन आक्रमक करत आहात. त्यांना सांभाळुन घ्या, त्यांना आपले म्हणा.

जीजाबाई या राजांच्या माता व शहाजीराजे हे त्यांचे वडील आहेत हे मान्य करुन ह्या लोकांनी आपल्यावर किती उपकार केलेत ह्याची तुम्हा लोकांस जाण नाही. आपल्या जोड्याची कातडी करुन ह्यांना घातली तरी ते उपकार फिटणार नाहीत.

महाराजांचा घोडा त्यांना एका आदिलशाहीतील मुसलमानाने घोड्याच्या पायात ताईत वगैरे बांधुन आणी कुत्रा एका इंग्रजाने आगीत उड्या वगैरे मारायचे ट्रेनींग देउन भेट दिला होता. महाराजांचे खरे गुरु दादोजी कोंडदेव नसुन, श्रीमंत कोकाटे हे स्वतः होते आणी त्यांनीच रामदासांना हेरेगीरी करताना पकडले होते. हा खरा इतीहास तुम्ही कधी जाणुन घेणार आहात का नाही ?

प (रा)जवाडे
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

तु कितीही उपहास केलास तरी सत्य बदलत नाही.

सत्य सान्गणारे जर मानसिक रुग्ण आहेत असे तुला वाटत असेल तर तुला मानसिक आजार झाला आहे असेच म्हणावे लागेल. तुला स्व ज्ञातीच्या लोकान्चा निष्कारण उदोउदो करण्याचा मानसिक आजार जडला आहे. हे मात्र १०००००००००% सत्य आहे.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

इनोबा म्हणे's picture

1 Jun 2009 - 6:43 pm | इनोबा म्हणे

>>सत्य बदलत नाही.
हेच तर सांगतोय तुला केव्हापासून... तु किती ही गळा काढलास तरी सत्य बदलत नाही.

आम्हाघरीधन's picture

1 Jun 2009 - 6:46 pm | आम्हाघरीधन

अतिशय उच्च विनोद आहे हा ...!!!

आमच्या तर डोळ्यासमोर चित्रसुद्धा आले लगेच.
महाराजांचा राज्याभिषेकावेळी इंग्रज हे तोरण वगैरे बांधत असुन गडाची सजावट वगैरे करत आहेत, झालेच तर शोभेची दारु वगैरेचा मक्ता इंग्रजांकडेच आहे, त्यांचे नेटनेटक्या कपड्यातले एक घोडदळ गडाला पहारा देत आहे.
मुस्लिमांचे काय सांगावे, महाराज मुस्लिमांविरुद्द नव्हतेच त्यामुळे हा मुद्दा बाद आहे. महाराजांचा विरोध हा मुस्लिम दिल्लीश्वर राज्यकर्त्यांना होता. असो, तर मुस्लिमही काम करत होते असे मानु आणि तसे होतेच.
मात्र ...
मात्र ब्राम्हण हे गडाखाली निदर्शने करत होते, जमल्यास आक्रमक होऊन गडावर चालुन यायचा त्यांचा विचार होता पण देशप्रेमी इंग्रजांमुळे ते जमले नाही , तरी काही टवाळ ब्राम्हण तरुणांनी खालुनच आपल्या घोषणा चालु ठेवल्या. शेवटी त्यांना राखेचे तोबरे देण्यात येऊन विरोध मोडुन काढण्यात आला....

वा वा, काय कल्पनाविलास आहे ...
उच्च विनोद आहे बरं, धो धो हसलो ...

इन्ग्रज दिमतीला जरूर नसतील, मुस्लिम महाराजान्च्या सैन्यात होते हे तुला माहीत नसेल तर तुझे दुर्दैव.......... ब्राह्मण मन्डळी विरोधात होती हे सत्य तु कसे नाकारु शकतोस. उपहास केला म्हणजे सत्य लपेल अशी तुझी भावना असेल तर तुझ्या भावना मी समजु शकतो. भावनेला जरा आवर घाल डान पन्ता........

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

धमाल मुलगा's picture

1 Jun 2009 - 6:49 pm | धमाल मुलगा

सांगा ना, सामनातला तो अग्रलेख वाचलात का?

द्या ना उदाहरणं...सप्रमाण सिध्द होतील अशी. :) द्या की राव. का माझ्या प्रतिसादांकडं दुर्लक्ष करताय?
:)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

मिंटी's picture

1 Jun 2009 - 7:00 pm | मिंटी

धम्या अरे जाऊ देत ना..... तुझ्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत त्यांच्याकडे म्हणुन तर दुर्ल्क्ष करत आहेत ना ते....
कश्याला उगाच अपेक्षा करतोस तु ?????

ऋषिकेश's picture

1 Jun 2009 - 7:04 pm | ऋषिकेश

धमु, तुझ्याच काय कोणत्याच तर्कशुद्ध प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नाहि आहेत.
आहेत त्या फक्त वावड्या.. उठवून दोच-चार मतं इळाली तर बघताहेत बापडे..

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

मैत्र's picture

2 Jun 2009 - 12:02 am | मैत्र

भावनेला आवर घालून उपहास न करता विचारलेल्या काही प्रश्नांची नीट उत्तरे मिळतील का? नीट म्हणजे किमान एखादे उदाहरण देऊन किंवा मत सिद्ध करून.
नुसते "सर्वश्रुत आहे" याला गोबेल्स नीती म्हणतात.

http://www.misalpav.com/node/8009#comment-122770

http://www.misalpav.com/node/8009#comment-122769

http://www.misalpav.com/node/8009#comment-122776

http://www.misalpav.com/node/8009#comment-122783

http://www.misalpav.com/node/8009#comment-122794

आपण एकाही प्रश्नाला उत्तर दिलेले नाही पण इतरांच्या उपहासाला प्रतिक्रिया देत आहात म्हणून थेट विचारतो.
पुरंदरे, राजवाडे अगदी कोकाटे यांच्या इतका अभ्यास नाहीये माझा. ग्रँट डफ याबद्दल आपलं काय मत आहे?

नवा मुद्दा: शिवरायान्नी नागनाथ महाराला गावची पाटिलकी दिली त्याच महार समाजाला शिवरायंचे नाव घेवुन आपण भांडणे लावलीत...... किती हे आपले थोर उपकार,................... तुमच्या मुद्द्याचा संदर्भ माहीत नसल्याने मी त्यावर काही विचारू शकत नाही. जर एका व्यक्तीला एका गावाची पाटिलकी दिली तर त्यांची विचारधारणा आपण किंवा राऊत यांनी पाळली पाहिजे म्हणता हे मला योग्य वाटते. हाच निष्कर्ष लावून वर म्हटल्याप्रमाणे शिवरायांकडे आयुष्यभर काम केलेल्या, प्राण दिलेल्या ब्राम्हणांची जी मी यादी दिली आहे त्याचा विचार करता तुमचे कर्तव्य काय होते? का या सर्वांना सामावून घेण्यात खुद्द महाराज चुकले आणि आपला सुमारे साडे तीनशे वर्षापूर्वीच्या परिस्थितीचा अंदाज त्यांच्या निर्णयापेक्षा जास्त योग्य आहे?

तुम्ही काही उत्तरे दिलीत तर या चर्चेला पुढे अर्थ आहे... आणि आपण पुरावे दिलेत ब्रिगेड किंवा कोकाटे यांच्या संग्रहातून आणि ते खरे व योग्य असतील तर चांगले आहे. दुसरी बाजू समजेल तरी (काही आहे तरी अशी आशा करतो) !

इतिहास हा वेगवेगळ्या घटनांनी बनलेला असतो. महाराष्ट्राचा, प्राचीन भारताचा, युरोप अमेरिका, ग्रीस ई. देशांचा आणि अगदी गेल्या दोनशे वर्षांचा जगाचा इतिहास हा अशाच अनाकलनीय आणि धक्कादायक घटनांचाच आहे. यात एक समान सूत्र आहे राजकारण, सत्ता, आक्रमण, स्वातंत्र्याच्या रक्षणाचे यशस्वी आणि अयशस्वी प्रयत्न. यात सहसा एकच समुदाय अखंडपणे अधिकारात (डॉमिनन्ट) राहिल्याचे उदाहरण नाही.
एक अतिशय महत्त्वाची गोष्ट - अनेकदा खूप मोठ्या घटनेमागे असलेल्या व्यक्ती - ज्या खूप चुकीच्या किंवा खूप बरोबर वागलेल्या असतात - ( नंतर घडलेल्या इतिहासाचा आता हाईंड साइट मध्ये विचार करता) या व्यक्ती त्यांच्या समुदायाचे प्रतिनिधित्व करतातच असे नाही. त्यामुळे कोणत्याही घटनांचे जनरलायझेशन हे अत्यंत धोकादायक आणि चुकीचे आहे.
आणि ज्या जनरलायझेशनला काही शतकांमध्ये समान आधार नाही तेच खरे असे सांगणे हे समाजाशी द्रोह करण्यासारखे आहे!

मैत्र's picture

2 Jun 2009 - 2:50 pm | मैत्र

उत्तरच द्यायला तयार नाही !
कोणी तिरकं बोललं तर त्याला उत्तर द्यायला वेळ आहे. पुरंदरे समितीत नाहीत याच्या लिंक शोधून द्यायला वेळ आहे.
पण एकाही प्रश्नाला उत्तर द्यायला वेळ नाही.

राजकारणात नाव काढणार तुम्ही. सोयीस्करपणे प्रश्नांना आणि कोंडीत आणणार्‍या गोष्टींना बगल देणे हे राजकारणातल्या यशस्वितेचे सगळ्यात मोठे साधन असते.

आम्हाघरीधन's picture

1 Jun 2009 - 7:05 pm | आम्हाघरीधन

सामनाच्या या लेखाला उत्तर :

ब. मो. पुरन्दरे हे ब्राह्मण आहेत या कारणासाठी हा विरोध आहे असे आपले मत चुकिचे आहे असे मी मानतो. ज्यान्नी आपले सम्पूर्न आयुष्य शिवरायान्च्या कर्तुत्वाचा पाढा जनते समोर आनण्या साठी वेचले असे सान्गण्याचा आपण प्रयत्न केला आहे त्यान्नी वर्णिलेल्या विविध प्रसन्गान्तुन ****असे जे सादरीकरण केले आहे ते चुक आहे की नाही याची शहानिशा न करता आपण हा लेख लिहिला आहे.... आपणाला शिवराय किति प्रमाणात समजले आहेत हे आम्ही बघतोच आहोत.

ज्या शिवरायान्नी रायगडावर मस्जिद बान्धायला लावली त्यान्चे च नाव घेवुन आपण हिन्द-मुस्लिम दन्गे घडवुन आणलेत.... किती वेदना झाल्या असतील शिव्रयान्च्या ह्र्दयाला!!!!!!!!!!. ज्या शिवरायान्नी नागनाथ महाराला गावची पाटिलकी दिली त्याच महार समाजाला शिवरायंचे नाव घेवुन आपण भांडणे लावलीत...... किती हे आपले थोर उपकार,...................
या संजय राऊत साहेबांनी सर्व प्रथम इतिहास वाचला आहे काय याचीच शंका त्यांच्या लिखानातुन येते आहे. कुणी पढविलेले आणि चढविलेले लगेच उघडे पडतात... तसे त्यांचे झाले आहे. त्यांनी अंध राजकारणाचा चश्मा उतर्वुन मग मैदानात यावे, सर्व ऐतीहासिक गोष्टींवर चर्चा करायची आमची तयारी आहे.

जय जिजाऊ.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

संपादक - आक्षेपार्ह विधाने टाकून महापुरुषांची निंदानालस्ती करु नये. अन्यथा संपूर्ण प्रतिसाद उडवले जातील.

ऋषिकेश's picture

1 Jun 2009 - 10:57 pm | ऋषिकेश

आक्षेपार्ह भाग संपादीत केल्यामुळे प्रतिसाद काढुन टाकला आहे.

धमाल मुलगा's picture

1 Jun 2009 - 7:33 pm | धमाल मुलगा

कुणी पढविलेले आणि चढविलेले लगेच उघडे पडतात... तसे त्यांचे झाले आहे. त्यांनी अंध राजकारणाचा चश्मा उतर्वुन मग मैदानात यावे, सर्व ऐतीहासिक गोष्टींवर चर्चा करायची आमची तयारी आहे.

हेच्च तर म्हणतोय मी दादा :)

पण आपलेपणाने एक सांगू, कम्युनिष्टांसारखे जे जे आपल्या विरोधी ते ते केवळ असत्य असा पवित्रा घेऊन काय भले होणार?
असे हवेत बाण मारण्यापरास, जरा दाखले देऊन सप्रमाण सिध्द करा ना.

आता, कदाचित कुणी पुर्वग्रहदुषित कोत्या वैचारिक गर्तेत अडकून म्हणेल की सगळा इतिहास ब्राम्हणांनीच लिहिला त्यामुळे तुम्हाला दाखले काय द्यायचे..ते ब्राम्हणांविरोधीच असणार. मग असं असेल तर आपल्या म्हणण्याप्रमाणेच असलेल्या विचारधारेचे पाईक साडेतीनशे वर्षं वयाचे आहेत काय?
त्यांनी स्वत: पाहुन हा "दुरुस्ती केलेला इतिहास" सांगायला सुरुवात केलेली आहे? त्यांनी कोणत्या पुराव्यावर हे मुद्दे मांडले आहेत?
जर ते इतिहासाच्या दस्ताऐवजात सापडत नसतील तर केवळ भावनीक अवाहने करकरुन कुठवर हा लढा देणार?
आपण समर्थन करत असलेल्या विचारसरणीच्या जन्मदात्यांकडे काही मूळ पुरावे उपलब्ध आहेत काय?
असल्यास त्यांची सत्यासत्यता पडताळली आहे काय?
अशी सत्यासत्यता पडताळाण्याची एक प्रणाली असते ह्याची त्यांना कल्पना आहे काय? शिवकालीन लेखन/संदर्भ शोधताना आणि त्यांचे दाखले देताना त्या काळातली भाषा (मोडी/फारसीप्रचुर प्राकृत मराठी), भाषांवरचे परकीय वर्चस्व(अरबी/फारसी) ह्यांचा/ ह्या भाषेतील कागदपत्रांचा अभ्यास केलेला आहे काय?
आणि केवळ एकाच बाजुने इतिहासाची शोधयात्रा न करता, महाराज ज्यांच्याशी लढले त्यांच्याकडच्या तर्जुमे, कागदपत्रं, खलिते, शिलालेख ह्या सर्व साधनांच्या अभ्यासात कोणी भरीव कार्य करुन योग्य तो शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काय?

ह्या आणि आपण खुद्द तटस्थवृत्तीने विचार केल्यास ह्यांच्या अनुशंगाने उद्भवणार्‍या इतर प्रश्नांची उत्तरे शोधाल काय?
ह्यांची उत्तरे मिळाली की एक सकस चर्चा नक्कीच होईल.
कारण, पुरावे आणि भावना ह्यांची गल्लत करण्यात काही अर्थ नाही. ते काम शुध्द मुर्खांचे. आपण व्यासंगी दिसता, आपल्या उत्तरांच्या प्रतिक्षेत :)

- धमालराव देशमुख-पाटील.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 7:07 pm | परिकथेतील राजकुमार

ह्या मानसीक रुग्णांच्या सत्याच्या काहि प्रती आम्हाला आंतरजालावर सापडल्या त्या इथे देत आहोत.

भाग १

भाग २

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

आम्हाघरीधन's picture

1 Jun 2009 - 7:20 pm | आम्हाघरीधन

अश्याप्रकारची वाक्ये इथे लिहिली जावीत का?
त्यांनी आयुष्यभर उदोउदो केला आम्ही एक्दाच लिहिले तर आपला आक्षेप!!!!! किती विसंगती.........

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

इनोबा म्हणे's picture

1 Jun 2009 - 7:22 pm | इनोबा म्हणे

महापुरुषांच्या बाबतीत इतकी घाणेरडी भाषा वापरणार्‍या या भिकारचोट लोकांना जोड्याने मारले पाहिजेत.
ब्राह्मणांना शिव्या घालणार्‍या यांच्या खेडेकराची बायको भाजपाची आमदार आहे. तिथे बरे यांना ब्राह्मण चालतात. साले हरामखोर. जातीच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरायचे उद्योग आहेत सगळे.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 7:23 pm | परिकथेतील राजकुमार

थोडे इनो घ्याच बॉ आता.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

आम्हाघरीधन's picture

1 Jun 2009 - 7:25 pm | आम्हाघरीधन

Lekh
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

इनोबा म्हणे's picture

1 Jun 2009 - 10:06 pm | इनोबा म्हणे

आक्षेपार्ह भाग संपादीत केल्यामुळे प्रतिसाद काढुन टाकला आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

1 Jun 2009 - 8:10 pm | अविनाशकुलकर्णी

मेटे व कंपनिवर चिडुन व बौधिक वाद घालुन उपयोग आहे? यांचा बोलावता धनि कोण आहे? हे बघण महत्वाच आहे..बौधिक वाद संपला आहे व धुळवड चालु आहे...फार ताकद वान आहेत यांचे बोलवते धनि..सार राजकारण त्यांच्या हातात आहे..८० वर्षाच्या बाबा साहेबांचे हात तोडायचि भाषा होत आहे पण सारे साहित्यिक,व बुध्धिवादि मुग गिळुन गप्प आहेत..नाहि म्हणायला आय बी एन च्या वागळेनि झोडला .पण बाकि गप्प आहेत..आचार्य अत्र्यांचि आठवण येते..

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jun 2009 - 10:37 pm | llपुण्याचे पेशवेll

अगदी अगदी मनातले बोललात कुलकर्णी साहेब.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रती मा. संपादक साहेब,

तुमचे हे मात्र असे आहे, आपला तो बाब्या अन दुसर्‍याचे ते कार्टे. आम्ही लिहिले तर आम्हाला दामदट्टी करण्याचा प्रयत्न अन तुम्ही लिहिले तर त्याची वाहवा........ असो हे संकेत स्थळ आपल्या मालकीचे असल्याने आपण आपणाला हवे ते संपादित करु शकता. विरोधी विचारांवर कारवाई करु शकता.

जय जिजाऊ

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jun 2009 - 5:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सदर प्रतिसादातली दुसरी लिंक म्हणते:

"बाबासाहेब पुरंदरे हेच खरे जेम्स लेन."

वर्तमानात, जिवंत असणार्‍या, दोन माणसांंमधे जे लोक गफलत करत आहेत त्यांना ऐतिहासिक दस्तऐवजांचा अर्थ नीट उलगडता येईल का? आणि त्या अर्थावर कोणीही विश्वास का ठेवावा?

झालात का शान्त एकदाचे. बाबासाहेबान्ना ह्टवले या समिती वरुन्...आणि घेतले कोणाला मग??
लाज आहे आपल सरकार्...आता आपल सरकार म्हणायची लाज वाट्ते.....

आम्हाघरीधन's picture

2 Jun 2009 - 1:20 pm | आम्हाघरीधन

http://3.bp.blogspot.com/_81cfc5t36GE/RvpkeTZlpTI/AAAAAAAAAGw/c7fqZLs7hW... h/Reality of Janata Raja Natak 1.JPG
http://4.bp.blogspot.com/_81cfc5t36GE/RvpkejZlpUI/AAAAAAAAAG4/ohwTplLJV2... h/Reality of Janata Raja Natak 2.JPG
http://1.bp.blogspot.com/_81cfc5t36GE/RuTtUaO1mAI/AAAAAAAAAGY/lfIcam_2PS... h/Loknayak 30aug.JPG

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

Dhananjay Borgaonkar's picture

2 Jun 2009 - 1:37 pm | Dhananjay Borgaonkar

लिन्क ओपन होत नाहिये

Dhananjay Borgaonkar's picture

2 Jun 2009 - 1:43 pm | Dhananjay Borgaonkar

यान्च्या करवित्याला विधानसभेची चिन्ता आहे. म्हणुन मत फोडायची बाकी काही नाही......

आम्हाघरीधन's picture

2 Jun 2009 - 3:13 pm | आम्हाघरीधन
३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jun 2009 - 5:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अनेक वाक्यांचा धडधडीत चुकीचा अर्थ लावला आहे हे उपरोल्लेखित लिंक्सवरून दिसत आहेच.
उदा: दुसरी लिंकः

'शिष्यादिच्छेत पराजयम' याचा अर्थ लावताना गुरूपेक्षा शिष्य वरचढ निघाल्याचा गुरूला आनंद होतो असं आहे. यात शिष्याला कमी लेखण्याचा लवलेशही नाही. अनेक वेळा हेच वाक्य शिष्य गुरूपेक्षा वरचढ निघाला की वापरतात!
"पंतांच्या चेल्याने पंताच्या कित्यावर ताण चालवली होती" या वाक्यातून सरळच समजत आहे की पंतांचा चेला त्यांच्या वरचढ आहे. सूर्या दाखवायला लागत नाही, तो दिसतोच. पण म्हणून दिव्याचं महत्त्व कमी होत नाही.

उपरोल्लेखित लिखाण अतिशय पूर्वग्रहदूषित नजरेनेच लिहिलं आहे यात तीळमात्र शंका नाही.

Dhananjay Borgaonkar's picture

2 Jun 2009 - 4:29 pm | Dhananjay Borgaonkar

तुमचे हे इतिहासकार (अ)ज्ञानी कोण आहेत?
खाली फक्त सभाजी ब्रिगेड अस लिहिल आहे.

त्याना जाउन इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक वाचायला सान्गा.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jun 2009 - 5:45 pm | प्रकाश घाटपांडे

अशा विषयांना निवडणुकीच्याच तोंडावर उत येत असतो. राजकारण्यांना लोकांच्याच सहभागातून त्यांना फॅसिझम निर्माण करायचा असतो. गरीब, बेराजगार, अल्पशिक्षित, अपरिपक्व जनतेला हाताशी धरुन त्यांच्यात द्वेषाच्या आधारावर एखादी अस्मितेची नशा निर्माण करायची त्याला 'स्वाभिमान` हे नाव द्यायचं व त्याचा झुंडशाहीसाठी कुशलतेने वापर करायचा. या नशेत ती जनता आपले मूलभूत प्रश्न विसरते. एखाद्या दारुडयाला भूक लागली की त्याला अन्नाऐवजी दारुच द्यायची. हळूहळू त्याचे शरीर भूक लागल्यानंतर अन्नाऐवजी दारुचीच मागणी करु लागते. जो ती मागणी पूर्ण करतो तो त्याला आपला हितचिंतक वाटतो. जो त्याला अन्न द्यायचा प्रयत्न करतो तो त्याला शत्रू वाटतो. अशा पद्धतीने जनतेची कोंडी करुन त्याला मार्ग दाखवल्याचा आभास निर्माण केला जातो.
इथे ऐतहासिक विश्लेषणाच्या नावाखाली जातीय अस्मितेच्या विषवल्ली पसरवायचा उद्योग पुर्वीपासुन चालु आहे.
इतिहासाची मढी उकरुन किती काळ तथाकथित अस्मितेच्या नशेत जगणार? अहो आपल्या खापरपणजोबांचे नाव तरी आपल्याला माहित आहे का? इतिहासात काय घडले असेल याचे उपलब्ध / अनुपलब्ध गोष्टीवरुन याचे तर्क कुतर्क करत बसणार? देशासमोरील आजचे प्रश्न काय आहेत याला प्राधान्य द्या. हेच गुर्‍हाळ किती काळ चालवत रहाणार?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

समीरसूर's picture

3 Jun 2009 - 9:02 am | समीरसूर

अगदी बरोबर बोललात घाटपांडे साहेब.

अतिशय क्षुल्लक गोष्टींवरून वाद उकरून काढायचे आणि त्यांवर भांडत बसायचे ही खोडच आहे 'संभाजे ब्रिगेड' आणि 'मराठा सेवा संघ' या संस्थांना. आता वितंडवाद घालून इतिहास बदलणार आहे का? किंवा कुणाचीही सरशी झाली तरी त्याने आपल्या आताच्या समस्यांवर उत्तरे मिळणार आहेत का? वर्तमानातल्या समस्या आणि भविष्यातली स्वप्ने लाथाडून भूतकाळाची भूते जिवंत करून काहीही उपयोग होणार नाही हे देखील कळत नाही या बिनडोक नेत्यांना आणि खोट्या अस्मितेची नशा चढवणार्‍या त्यांच्या निर्बुद्ध अनुयायांना. या संघटनांमधल्या ९९% लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास ओ की ठो माहित नाही आणि चालले दंडेलशाही करायला. आमच्या गावातही एका ब्राह्मण प्राचार्यावर असाच हल्ला केला होता 'संभाजी ब्रिगेड' च्या मद्यधुंद कार्यकर्त्यांनी. कारण अतिशय क्षुल्लक होते किंबहुना कारण नव्हतेच पण उगाच तमाशा करून दहशत निर्माण करायची या हेतूने तो हल्ला करण्यात आला होता. त्या मद्यधुंद रेड्यांमध्ये कित्येक त्या प्राचार्यांचे माजी विद्यार्थी होते. त्यांना 'शिवाजी' हा शब्द तरी व्यवस्थित लिहिता येईल की नाही इतपत त्यांच्या दिव्य ज्ञानाविषयी शंका होती. स्वतः शिवाजी महाराजांइतके नसू द्या पण काही तरी भव्य करायचे अशी स्वप्न नाही पडत या कार्यकर्त्यांना. कुठल्याही थोर व्यक्तींवर केवळ ती ब्राह्मण आहेत म्हणून अतिशय अश्लाघ्य पद्धतीने टीका करायची, मारहाण करायची आणि स्वतः शोध लावलेल्या सत्याची भलावण करायची एवढेच ते काय यांचे कतृत्व! खर तर खेडेकर, प्रवीण गायकवाड, अनंत चोंदे आणि विनायक मेटे यांच्यावर कायद्याने जमावबंदी आणि भाषणबंदी आणली पाहिजे. लोकांच्या मनात निष्कारण एकमेकांविषयी द्वेष पसरविण्याखेरीज हे नग दुसरं काहीच करत नाहीयेत. अतिशय घातक आणि विध्वंसक अशा प्रकारचे कार्य चालवले आहे या लोकांनी. असो. कधीतरी त्यांना आपण वाट चुकलेलो आहोत हे नक्की कळेल आणि त्यांच्या राजकारणातल्या आकांक्षा तर खचितच पूर्ण होणार नाहीत. शरद पवारांसारख्या पैशाने गबर (आणि सगळा मराठा समाज आपल्याच पाठीशी आहे असा फाजील आत्मविश्वास बाळगणार्‍या) राजकारण्याच्या इच्छा फलद्रूप नाही झाल्यात तिथे या बुजगावण्यांची काय कथा!! शरद पवार स्वतःला आणि त्यांचे समर्थक त्यांना खूप धूर्त आणि हुषार राजकारणी समजायचे. सोनिया गांधी शरदरावांपेक्षा १००० पटीने जास्त हुषार, मुत्सद्दी आणि धोरणी राजकारणी सिद्ध झाल्या. आता या जन्मात तरी त्यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही हे सत्य आहे. त्याला कारण त्यांची राजकारणाची कुचकामी आणि गुळमुळीत शैली हेच होते. शिवाय जमीन, पैसा, गुंतवणूक इत्यादी बाबींवरून त्यांचे तसे नाव ही खराब झालेले आहेच. मागे एका प्रतिसादात मी वर्तवलेले सगळे अंदाज खरे ठरले आणि त्यातले एक शरदरावांविषयी होते. सोनिया गांधींनी कृतीचे राजकारण करून सत्ता पटकावली तर शरदरावांनी केवळ गुळमुळीत, दुटप्पी आणि बिनबूडाचे राजकारण केले म्हणून त्यांना आपटी खावी लागली. पुन्हा कृषीमंत्री पद देऊन खरं तर सोनियाने शरदरावांना भीक घालून गप्प केले आहे पण काही लोकांना त्यातही समाधान वाटते. त्यांना मत्स्योत्पादन मंत्रीच करतील की काय अशी मला शंका येत होती पण बाई हुषार आहेत हे खरे. आता शरदरावांचा आणि राष्ट्रवादीचा आवाज अधिकाधिक क्षीण होत जाणार हे नक्की. असो. त्यांना धडा मिळाला आणि तसाच या सगळ्यांना मिळेल आणि तो मिळावाच. तेच सर्व समाजाच्या दृष्टीने चांगले आहे.

--समीर

आम्हाघरीधन's picture

2 Jun 2009 - 7:07 pm | आम्हाघरीधन

"पंतांच्या चेल्याने पंताच्या कित्यावर ताण चालवली होती" या वाक्यातून सरळच समजत आहे की पंतांचा चेला त्यांच्या वरचढ आहे. सूर्या दाखवायला लागत नाही, तो दिसतोच. पण म्हणून दिव्याचं महत्त्व कमी होत नाही.

जेंव्हा हे पंत गुरु नाहीतच तर त्यांचा उदोउदो करण्या मागचा हेतु पुर्वग्रह दुषीत आहे असे मानायला जागा आहे.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jun 2009 - 9:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जेंव्हा हे पंत गुरु नाहीतच तर त्यांचा उदोउदो करण्या मागचा हेतु पुर्वग्रह दुषीत आहे असे मानायला जागा आहे.

पंत गुरू नाहीतच याचे काही पुरावे देणार आहात का, पुन्हा कोणी, दोन-चार वर्षांत जे काही लिहिलं आहे तेच 'ऐतिहासिक दस्तऐवज' आहेत असं सांगणार आहात? संशोधकांनी (बाबासाहेब, निनाद बेडेकर इ.) यांनी पुरावे तपासून विधानं केली आहेत. आपल्याला कुठल्या कागदपत्रांमधे सापडलं हे सगळं? आणि आपण म्हणता हे खरं आहे तर एवढी वर्ष कुठे लपले होते हे पुरावे?

एखाद्या माणसाने त्याचा गुणी शिष्य मोठा व्हावा यासाठी झटून प्रयत्न केले, त्या प्रयत्नांची कोणी प्रशंसा केली तर ती चूक? उद्या सचिन मोठा फलंदाज आहे हे म्हणताना काय रमाकांत आचरेकरांना वाईट ठरवणार आहात का, का आचरेकरांनी काही शिकवलंच नाही सचिनला? डून स्कूलमधे काल जल्लोष झाला कारण तिथले चार माजी विद्यार्थी मंत्री झाले. त्या चौघांनी आपल्या कार्यकालात अनेक चांगली कामं केली तर काय डून स्कूल खराब आहे असा आरडाओरडा करायचा का, का या लोकांच्या चांगल्या कामात डून स्कूलचा काय वाटा असा प्रश्न विचारणार आहात?

प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं, गुरुचं काही एक स्थान असतं, तसंच ते प्रसिद्ध, गुणी आणि महान लोकांच्याही आयुष्यात असतं. दादोजी कोंडदेवांना थोडं श्रेय दिल्यामुळे शिवाजीराजे खुजे नाही होत. खुजे असतात ते लोकांना योग्य ते श्रेय न देणारे लोकं!

शिवाय 'असे मानायला जागा आहे' असं आपण म्हणता; खात्रीपूर्वक असं विधान आपण करू शकत नाहीत.

इनोबा म्हणे's picture

3 Jun 2009 - 8:06 am | इनोबा म्हणे

सहमत आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2009 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं, गुरुचं काही एक स्थान असतं, तसंच ते प्रसिद्ध, गुणी आणि महान लोकांच्याही आयुष्यात असतं. दादोजी कोंडदेवांना थोडं श्रेय दिल्यामुळे शिवाजीराजे खुजे नाही होत. खुजे असतात ते लोकांना योग्य ते श्रेय न देणारे लोकं!

व्वा ! क्या बात कही !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकरवडी's picture

3 Jun 2009 - 9:30 am | बाकरवडी

अप्रतिम !
अवांतर :- पण या लोकांना कळेल तर ना ?

:B :B :B बाकरवडी :B :B :B

आम्हाघरीधन's picture

3 Jun 2009 - 11:56 am | आम्हाघरीधन

प्रति, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे साहेब,
प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचं, गुरुचं काही एक स्थान असतं, तसंच ते प्रसिद्ध, गुणी आणि महान लोकांच्याही आयुष्यात असतं. दादोजी कोंडदेवांना थोडं श्रेय दिल्यामुळे शिवाजीराजे खुजे नाही होत. खुजे असतात ते लोकांना योग्य ते श्रेय न देणारे लोकं!

जर दादोजी खरोखरच गुरु असते तर आमची काहीही हरकत नव्हती. मात्र ते गुरु नसतांना त्यांना गुरुपदी बसविण्याचा जो अट्टाहास केला गेला त्याला हरकत आहे आमची. कुणाला जर पुरावे हा प्रकार कळतच नसेल तर व्यर्थ आहे हा वाद. असतील पुरावे दादोजी गुरु असल्याचे तुमच्याकडे तर निश्चित पणे महाराष्ट्र सरकारला द्या. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते ?' हे चर्चासत्र् मराठा विकास मंचाने आयोजित केले होते त्याला उपस्थित राहावे आणि पुराव्यानिशी सिद्ध्द करावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र तुमचे तथाकथित शिवशाहिर त्याला उपस्थित राहिले नाहित. काही उत्तर देवु शकले नाहीत. 'पाणी खेळे मासा, त्याचा गुरु कोण?'.

जय जिजाऊ

समीरसूर's picture

3 Jun 2009 - 5:50 pm | समीरसूर

१. दादोजी शिवाजी महराजांचे गुरु नव्हते याचा पुरावा काय? कुणीतरी एक-दोन पुस्तके (कुणीतरी साळुंखे म्हणून असले भाकड लिखाण करण्यात पटाईत आहेत असे ऐकले आहे) लिहून त्यात म्हटले की दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते म्हणजे ते खरेच आहे असे आहे काय?
२. इतकी वर्षे दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु होते हा इतिहास महाराष्ट्राला (आणि मराठ्यांना) चालत होता; आता अचानक काही वर्षात तो खोटा कसा काय वाटायला लागला. ज्यांनी हे संशोधन केले त्यांच्या संशोधनाच्या सत्यतेची आणि त्यांनी घेतलेल्या कष्टांची सत्यता काय? ती कुणी पडताळून पाहिली?
३. आणि दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असे क्षणभर मानले तरी त्याने आपल्या आत्ताच्या जगण्यात काय फरक पडतो? त्याने शिवाजी महाराजांची राजा म्हणून योग्यता १०० पटींनी वाढते काय?
४. आणि दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे म्हटले (जे खरे आहे) तर त्यामुळे शिवाजी महाराजांची एक धडाडीचा राजा म्हणून योग्यता लगेच कमी होते का?
५. इतिहास हा इतिहास असतो; त्याला बदलता येत नसते. त्यातून उपयुक्त धडे घेऊन पुढे जायचे असते. असं असतांना 'मराठा विकास मंचा'ला "दादोजी कोण होते" असे चर्चासत्र आयोजित करण्याचा रिकामटेकडा उद्योग कुणी सांगीतला होता? त्या चर्चासत्रातून काय साध्य होणार होते? असल्या चर्चासत्रांकडे तसल्याच संघटनांच्या लोकांखेरीज कुणी ढुंकूनही बघत नसतांना फक्त जातीय द्वेष पसरविणे या उद्देशाखेरीज दुसरा कोणता उद्देश या चर्चासत्रांमुळे साध्य होतो?
६. असल्या निरुद्योगी आणि निरुपयोगी चर्चासत्रात भाग घेऊन वाद आणखी वाढवणे योग्य वाटले नसावे म्हणूनही कदाचित बाबासाहेबांनी तिकडे दुर्लक्ष केले असावे आणि ते योग्यच आहे. शिवाय पुन्हा कुणी हल्ला-बिल्ला केला तर काय करावे अशी भीती देखील त्यांना वाटले असावी जे की रास्तच आहे. शेवटी असल्या फालतू चर्चासत्रांपेक्षा कुणालाही जीव प्यारा असतो. ते तर काही मद्यधुंद कार्यकर्त्यांना हाणामारी आणि गुंडगिरी करण्यासाठी घेऊन येऊ शकले नसते आणि ते त्यांच्या शिवसंस्कृतीमध्ये कधीच बसले ही नसते.
७. ब्राह्मणांना जर ब्राह्मणेतर थोर पुरुषांविषयी अभिमान आणि आदर वाटू शकतो तर या संघटनांच्या लोकांना थोडी सभ्यता दाखवणे एवढे जड का जावे? इतकी संकुचित मनोवृत्ती का आहे यांची? आयुष्यभर शिवरायांच्या चरणी आपल्या बुद्धीची आणि श्रमांची सेवा अर्पण करणारे बाबासाहेबच आहेत; खेडेकर, मेटे, गायकवाड किंवा चोंदे नाहीयेत. बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास आणि विचार जेवढा जागता ठेवला आणि त्याचा जेवढा प्रचार आणि प्रसार केला त्याच्या अर्धा टक्का तरी या सगळ्या मुजोर लोकांनी केला आहे काय? भांडणांखेरीज आणि गुंडगिरीखेरीज या लोकांनी काय दिवे लावले आहेत?

--समीर

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Jun 2009 - 6:21 pm | llपुण्याचे पेशवेll

असतील पुरावे दादोजी गुरु असल्याचे तुमच्याकडे तर निश्चित पणे महाराष्ट्र सरकारला द्या. २४ एप्रिल २००६ रोजी पुणे येथे 'दादोजी कोंडदेव कोण होते ?' हे चर्चासत्र् मराठा विकास मंचाने आयोजित केले होते त्याला उपस्थित राहावे आणि पुराव्यानिशी सिद्ध्द करावे असे आवाहन करण्यात आले होते
हा मराठा विकासमंच म्हणजे काय सरकार आहे काय? आलेत मोठे मराठा विकास मंचवाले.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2009 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर मागे दादाजी कोंडदेव गुरु आहेत का यावर चर्चा झाली होती तो धागा मला प्रयत्न करुनही सापडेना. 'शिवाजी राजांचे गुरु कोण' या उपक्रमवरील चर्चेत मागेच आमचे मत मांडले आहे. असो, इतिहासातील अपूर्‍या दस्तऐवजांचा स्वतःच्या फायद्यासाठी अर्थ काढण्याचा सध्याचा काळ आहे. केवळ जातीचे चूकीचे संदर्भ अर्थ लावून आपण ऐतिहासिक व्यक्तींना आपल्या खूज्या विचारांनी खूजे करतोय. असे मला तरी वाटते.

बाकी चालू द्या !

-दिलीप बिरुटे

अमोल केळकर's picture

5 Jun 2009 - 3:19 pm | अमोल केळकर

हा घ्या तो धागा

--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

दवबिन्दु's picture

3 Jun 2009 - 6:18 pm | दवबिन्दु

शिवाजी महाराज कुणाचे?

माझेत. :)
___________________________________
देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥

आम्हाघरीधन's picture

3 Jun 2009 - 6:48 pm | आम्हाघरीधन

१. दादोजी शिवाजी महराजांचे गुरु नव्हते याचा पुरावा काय? कुणीतरी एक-दोन पुस्तके (कुणीतरी साळुंखे म्हणून असले भाकड लिखाण करण्यात पटाईत आहेत असे ऐकले आहे) लिहून त्यात म्हटले की दादोजी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते म्हणजे ते खरेच आहे असे आहे काय?

अहो महाशय,
भाकडकथा लिहिण्यात तुमच्या समाजाचा आज वर कुणिही हात धरु शकलेले नाही. साळुंके किस झाड की पत्ती.... कुठल्या तरी सत्य कि असत्य नारायणाची पुजा केल्याने बुडालेले जहाज वर येते असे ऐकले आहे..... खरे किती छान कथा आहे...... टायटानिक वर आणायला किती घालावे लागतील सत्य नारायण?

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

महाशय,

तुमच्या या प्रतिसादातल्या भाषेवरूनच तुमच्या मनात ब्राह्मणांविषयी किती अनाठायी द्वेष आहे हे दिसून येते.

भाकडकथा लिहिण्यात तुमच्या समाजाचा आज वर कुणिही हात धरु शकलेले नाही.

इथे कुणीच जातीवरून बोलत नाहीये. माझा स्वतःचा आक्षेप आहे तो खेडेकर वगैरेंसारख्या निरुद्योगी लोकांवर आणि त्यांनी पोसलेल्या ब्राह्मणद्वेषावर. माझ्या लिखाणात मी कुठेही मराठा जातीला काहीही बोललेलो नाही कारण मला माहिती आहे हा सगळा प्रकार दोन-चार निरुद्योगी लोकांमुळे घडून येत आहे. मराठा जातीचा यात काहीही संबंध नाही. किंबहुना माझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे मी स्वतःला देखील मराठा समजतो हे तुम्हाला ठाऊक असेलच. शिवाय माझ्या लेखात मी ब्राह्मणांचे दोष देखील दाखवलेले आहेत. माझे स्वतःचे कित्येक मित्र अस्सल ९६ कुळी मराठा आहेत आणि त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आचार-विचारांविषयी मला खूप आदर आहे. हे जर सगळे असे आहे तर हे तुमच्या लक्षात येऊन तुम्ही असली बिनबुडाची सरळ-सरळ जातीवरची विधाने टाळली पाहिजेत. बरं, तुम्ही जे लिहिता त्यासाठी तुमच्याकडे पुरावे नसतातच. मी मांडलेल्या एकाही मुद्यावर तुमचा एक ही तर्कशुद्ध प्रतिसाद आलेला नाही. किंबहुना कुणाच्याच बिनतोड मुद्यांवर तुम्ही भाष्य करत नाहीत. केवळ काहीतरी लिहून खर्‍या मुद्यांकडे दुर्लक्ष करता. याला चर्चा नाही म्हणत; रडीचा डाव म्हणतात. ब्राह्मणांनी असे कुठले लिखाण केले आहे सांगा बरे? उलटपक्षी साळुंकेंसारख्या अतिविद्वान लेखकांनीच असले फालतू लिखाण करून वादाला तोंड फोडले आहे. काय संशोधन आहे त्यांचे? बाबासाहेबांच्या अर्धा टक्का तरी व्यासंग आहे का त्यांचा? बाबासाहेबांप्रमाणे त्यांनी आयुष्य शिवचरणी वाहिलेले आहे काय? ब्राह्मणांनी कधीच असे फूट पाडणारे आणि समाजाची वीण सैल करणारे, समाजात जाती-जातींविषयी विष पेरणारे लेखन केलेले नाही हे सगळ्या जगाला माहिती आहे. नुसते सरसकट विधान केले म्हणून ते खरे ठरत नाही.

एवढी चर्चासत्रे घडवून आणता; निदान एका मुद्यावर तरी तर्कशुद्ध आणि विचारपूर्वक मत द्या. तसे होणार नसेल तर मग या चर्चेला काहीही अर्थ नाही आणि यातून एकच निष्कर्ष काढता येईल की या संघटनांचा आणि त्यांच्या विघ्नसंतोषी नेत्यांचा ब्राह्मणांना त्रास देणे याखेरीज दुसरा कुठलाही हेतू नाही. विनाकारण गुंडगिरी करून समाजाची शांतता भंग करणे; सरळमार्गी ब्राह्मणांना धमकावून, मारून-धोपटून खाली दाबणे आणि स्वतःची शून्य कर्तबगारी असतांना, अर्धवट ज्ञान असतांना आरडा-ओरडा करून लक्ष वेधून घेणे हेच यांचे उद्दिष्ट आहे असे सिद्ध होते. काहीतरी विधायक काम करून सगळ्या महाराष्ट्राला सोबत घेऊन पुढे जाणे जमत नसेल तर असल्या बाष्कळ विषयांवरून निदान आपल्या राज्यातली शांतता तरी भंग करू नका.

--समीर

शुभान्कर's picture

3 Jun 2009 - 7:23 pm | शुभान्कर

छत्रपती शाहु महाराजांनी विश्वासाने राज्यकारभार एका ब्राम्हणाच्या हातात दिला.
आणि तो पेशव्यांनी (ब्राम्हणांनी) जवळ्पास १०० वर्ष चालवला हा इतिहास मेट्यांना माहीत नाही काय? मराठयांपेक्षा ब्राम्हणांनी महाराष्ट्राचा जास्त वर्ष कारभार सांभाळला
(छत्रपतींना योग्य तो मान देऊन) हे मेटे सोयिस्कर विसरतात.

वेताळ's picture

3 Jun 2009 - 7:47 pm | वेताळ

आता ब्राम्हण श्रेष्ठ की मराठा श्रेष्ठ ह्यावर आली आहे. संपादक जागे असतील तर ती इथेच थांबवावी.
जातपाती मुळे महाराष्ट्राचे अगोदरच खुप नुकसान झाले आहे.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ