शिवाजी महाराज कुणाचे? (संपादक - चर्चा भरकटते आहे. लगेच थांबवावी अन्यथा धागा अप्रकाशित करावा लागेल!)
लेखनप्रकार
मी "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" हा मराठी जनतेच्या नेत्रांमध्ये झणझणीत अंजन घालणारा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन दोनदा पाहिला. माझ्या आई-बाबांना (त्यांची प्रकृती ठीक नसून देखील) हा चित्रपट दाखवायला आवर्जून घेऊन गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना, आप्तेष्टांना हा चित्रपट अवश्य बघण्यास उद्युक्त केले. त्यातील अफजल खानाच्या वधाचा प्रसंग जिवंतपणे उभा करणारा जोशपूर्ण पोवाडा बघून माझ्यादेखील धमन्यांमधले रक्त, तेवढ्या काळापुरते का असेना, पण सळसळले. माझा चार वर्षाचा पुतण्या शिवाजी महाराजांचा परमभक्त आहे. त्याची आई जेव्हा त्याला शिवाजी महाराजांची गोष्ट सांगते तेव्हा हा चिमुरडा स्वतःला शिवाजी समजून काल्पनिक घोड्यावर स्वार होऊन सह्याद्रीच्या कडे-कपारीतून दुश्मनांचा नायनाट करून विजयश्री खेचून आणतो. तेव्हा त्या निरागस चेहर्यावरचा आवेशपूर्ण भाव मनाला स्पर्शून जातो. चित्रपटात जेव्हा शिवाजी महाराज विषण्ण होऊन "वेडात मराठे वीर दौडले सात...फक्त सातच? बाकीचे कुठे गेले?" असा खडा सवाल करतात तेव्हा माझ्याही मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना टोचते. मोगलांना धूळ चारून एकसंध राज्य स्थापन करण्याच्या महाराजांच्या बुलंद इराद्याची आणि अतुलनीय पराक्रमाची कथा आपल्या थंड झालेल्या रक्ताला जिवंत करणारी एक स्फूर्तीगाथा आहे असे मी मानतो. मी ब्राह्मण आहे हे सत्य या सगळ्या भावना माझ्या किंवा माझ्या पुतण्याच्या मनात उचंबळून आणण्यात अडथळा ठरत नाहीत. मी मराठी आहे; महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि माझ्या मातीने आणि माझ्या संस्कारांनी मला शिवाजी महाराजांवर प्रेम करण्याचा आणि त्यांच्या पराक्रमातून बोध घेण्याचा हक्क दिलेला आहे. माझ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर सर्व किंबहुना भारतातील सर्व जनतेला तो अधिकार आहे. ज्याच्या मनात स्वतःच्या मातीविषयी, आईविषयी, अस्मितेविषयी, भाषेविषयी आणि संस्कृतीविषयी प्रेम आणि पराकोटीचा आदर आहे त्यांना सगळ्यांना तो अधिकार आहे असे मी मानतो. स्वत:च्या संस्कृतीविषयी प्रेम असणे; आदर असणे म्हणजे इतरांच्या श्रद्धांना, आदरस्थानांना लाथा-बुक्क्यांनी बदडून काढणे आणि हाणामारी करून "तुम्ही आमच्यातले नाहीत" असे ठणकावून सांगणे म्हणजे गुंडगिरीखेरीज दुसरे काहीच नसून खुद्द शिवाजी महाराजांनी कधी अशा रानटी प्रेमाचे समर्थन केले नाही हे सर्वश्रुत आहे. 'मराठा सेवा संघ' आणि 'संभाजी ब्रिगेड' च्या पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे, प्रवीण गायकवाड या मराठी मनात दुहीची विषवल्ली पेरणार्या शिवाजी महाराजांच्या ठेकेदारांनी जो अश्लाघ्य प्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुठल्याश्या समितीवरील निवडीच्या वादावरून सुरु केला आहे आणि त्याला सुसंस्कृतपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडून रस्त्यावर उतरून बाबासाहेबांसारख्या वयोवृद्ध आणि सगळे आयुष्य शिवाजी महाराजांच्या चरणी वाहिलेल्या 'सभ्य' अभ्यासकावर भ्याड हल्ले करण्याची भाषा वापरून हिडीस स्वरूप दिलेले आहे ते अत्यंत खेदजनक आणि संतापजनक आहे. गुंडगिरी हे एकमेव धोरण असणार्या या संघटनांना शिवाजी महाराज किती माहित आहेत? ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराजांच्या चरणी वाहिले; ज्या व्यक्तीने आजच्या तरूण पिढीला 'जाणता राजा' सारख्या महानाट्यातून शिवाजी महाराजांच्या अभेद्य इराद्यांचे बाळकडू पाजले त्या व्यक्तीवर तुम्ही हल्ला करण्याच्या गोष्टी करता? शिवाजी महाराज हे काय या संघटनांची आणि त्यांच्या या उद्दाम नेत्यांची 'रजिस्टर्ड ट्रेडमार्क' असलेली मालमत्ता आहेत? "वेडात मराठे वीर दौडले सात" यातले मराठे म्हणजे काय फक्त जातीने मराठा असलेले मराठेच आहेत काय? मी ब्राह्मण असून महाराष्ट्रात जन्मलो, मराठी बोलतो आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रातून स्फूर्ती घेतो म्हणून मी स्वतःला मराठा समजतो. जे मराठी आहेत, ज्यांना महाराष्ट्रधर्माची चाड आहे ते सगळे मराठे आहेत असे मी मानतो. कुठल्यातरी क्षुल्लक कारणांवरून एवढे वादंग उभे करण्यात कसले आले आहे शिवाजी प्रेम?
खुद्द बाबासाहेब पुरंदरे या सगळ्या वादावर मौन ठेवून आहेत. हा त्यांचा सुसंस्कृतपणाच म्हणावा लागेल. वाद आणखी चिघळू नये म्हणून त्यांचे हे मौन खरच प्रशंसनीय आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत घेतलेली भूमिका देखील समंजसपणाची आहे. कदाचित बाबासाहेब या दोन संघटनांच्या आवेशाला घाबरून गप्प बसले आहेत असे उद्दामपणे म्हणायला देखील हे शिवाजी महाराजांचे ठेकेदार कमी करणार नाहीत. ते कदचित खरे असेल देखील आणि त्यात वावगे काहीच नाही. रात्री रस्त्यावरून एकटे जातांना ५-७ माथेफिरू गुंडांनी अडवले तर कुठली ही व्यक्ती घाबरून सगळा ऐवज त्यांच्या स्वाधीन करेल. पण म्हणून त्या गुंडांच्या पराक्रमाचे कौतुक होणार नाही; त्यांच्या शौर्याला कुणी सलाम करणार नाही. त्याचप्रमाणे 'मराठा सेवा संघा'च्या किंवा 'संभाजी ब्रिगेड'च्या शिवाजी महाराजांचे चरित्र अगदी मुखोद्गत असणार्या विद्वान कार्यकर्त्यांनी उद्या खरेच त्यांच्यावर हल्ला केला तर त्यांच्या या पराक्रमाचे कौतुक फक्त पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे आणि प्रवीण गायकवाड यांनाच असणार आहे. कुठलाच सुसंस्कृत माणूस गुंडप्रवृत्तीने एका वयोवृद्ध अभ्यासकावर केलेल्या हल्ल्याचे कौतुक करणार नाही.
मराठे-ब्राह्मण हा वाद खूप जुना आहे आणि तो मुख्यत्वेकरून मराठी ब्राह्मणांच्या बुद्धीचा कस लागणार्या तथाकथित क्षेत्रांतील वर्चस्वातून जन्मलेला आहे असे म्हटले जाते. तसं पाहिलं तर ब्राह्मण ही जात शांतताप्रिय (सहसा हाणामारी, गुंडगिरी, गुन्हेगारी यात न गुंतणारी) आणि थोडीशी संकोचप्रिय आहे. नाकाच्या सरळ रेषेत आयुष्याचा प्रवास करायचा, कुणाला लुबाडायचे नाही, फसवायचे नाही, कुणाच्या भांडणात पडायचे नाही, प्रत्यक्ष मारामार्या, गुंडगिरी यापासून शक्य तेवढे लांब रहायचे आणि शांत जीवन जगायचे आणि मुख्य म्हणजे जगू द्यायचे असा मराठी ब्राह्मणांचा जगण्याचा मध्यममार्ग आहे. आकाराने लहान असलेला हा वर्ग संस्कांरानी देखील बांधलेला असतो. शिवाय अंतर्गत दुहीमुळे 'एकीचे बळ' ही संकल्पना फक्त पुस्तकातच वाचलेली असल्याने 'आपला कुणी वाली नाही' या रास्त भावनेमुळे हा वर्ग समाजात वावरतांना थोडा घाबरूनच असतो. मराठ्यांच्या अंतर्गत दुहीचा पण स्वतंत्र असा इतिहास आहे. या सगळ्या गोष्टींचा राजकारणात येथेच्छ वापर करण्यात येतो आणि राजकारणी आपल्या स्वर्थाची पोळी सुखेनैव भाजून घेत असतात हे देखील सर्वश्रुत आहे.
ब्राह्मणांना जेवढे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर, ना. गोखले, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके, राजगुरु, सेनापती बापट, संत ज्ञानेश्वर प्रिय आहेत तेवढेच शिवाजी महाराज, म. फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील (हे जैन होते), संत गाडगेबाबा, संत तुकाराम प्रिय आहेत हे मात्र मी छातीठोकपणे सांगू शकतो. आमच्या घरी संपूर्ण तुकाराम गाथा आहे, शिवचरित्र देखील आहे आणि पुतण्याला सांगण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या गोष्टी अजून तरी नसून शिवाजी महाराजांच्या आहेत. ब्राह्मण हिंदूच नव्हे तर मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि इतर सगळ्या धर्मांविषयी सारखाच सलोख्याचा दृष्टीकोन बाळगून असतात. भगवान बुद्धांची तर मी कित्येकदा प्रार्थना म्हणतो आणि भगवान महावीरांची "णमो अरिहंताणम..." ही प्रार्थना देखील मी बर्याचदा म्हणतो. अहमद हुसेन आणि मोहम्मद हुसेन यांनी गायिलेलं "खुदा से करता हूं मैं ये दुआ मदिने में..." हे नितांत सुंदर मुस्लिमधर्मीयांचं भजन ऐकून सगळी मानवजात कशी एक आहे याची खात्री पटते. या पार्श्वभूमीवर 'मराठा सेवा संघ' आणि 'संभाजी ब्रिगेड' यांनी एकाच मार्गाने निष्कारण पोसलेलं हे जातीयवादाचं भूत महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे हे निश्चित.
'मी शिवाजीराजे...' मध्ये चर्चिले गेलेले मुद्दे किती महत्वाचे आहेत हे या सतत हाणामारीची भाषा करून हिरो ठरू पाहणार्या नेत्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. मराठी माणूस का मागे पडतो? मराठी माणसाला उत्तर भारतीयांच्या खमक्या दुनियेत का अजिबात स्थान नसते? मराठी माणूस का नेहमीच बापडा आणि बिचारा असतो? मराठी माणूस का नेहमीच भेदरलेला, चाचरत लाचारपणे अशुद्ध हिंदी बोलणारा असतो? मराठी माणूस का मोठ्या हुद्द्यांवर नसतो? मराठी माणसाचे उद्योग क्षेत्रातले स्थान का नेहमीच हास्यास्पद विषय ठरतो? मराठी माणूस का नाही मल्होत्रा, खन्ना, अगरवाल, ओबेरॉय असल्या दमदार नावांच्या यादीत स्थान पटकावू शकत? फॅशन, मॉडेलिंग, अभिनय, मीडिया या व अशा ग्लॅमरस क्षेत्रांमध्ये मराठी माणसाचा कुठेच मागमूस का नसतो? मुंबईतला मराठी माणूस का नेहमी बदलापूर, खारघर ला जीवन कंठण्याच्या गोष्टी करत असतो? इथे मराठी माणूस म्हणजे समस्त महाराष्ट्रवासी अभिप्रेत आहेत. मराठा, ब्राह्मण, वाणी, शिंपी, चांभार, न्हावी, माळी असे सगळे मराठी या समाविष्ट आहेत कारण या सगळ्याच मराठी जनांची अवस्था वर नमूद केल्याप्रमाणेच आहे. कुठल्याच जातीत जन्म घेणे हे कुणाच्या हातात नसते आणि तो दोष तर अजिबातच नसतो. राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाला माझा आक्षेप आहे. ते म्हणतात की बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण म्हणून जन्मले हा त्यांचा दोष नाही. त्यांच्या समंजस भूमिकेतले हे विधान खटकले. मी ब्राह्मण कुटुंबात जन्मलो, माझ्या शिक्षक आई-वडिलांनी हजारो मुलांसारखेच मला ही चांगले संस्कार दिले आणि मान ताठ ठेवून सचोटीने जगण्याचे बळ माझ्या मनगटांमध्ये भरले याचा मला रास्त अभिमान आहे. ब्राह्मण कुटुंबात जन्माला येणे हा दोष कसा असू शकतो? किंबहुना कुठल्याही जातीत जन्माला येणे हा दोष कसा काय असू शकतो?
पुरुषोत्तम खेडेकर, अनंत चोंदे, विनायक मेटे आणि प्रवीण गायकवाड यांनी या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून विनाकारण जातीद्वेषाची ही बीजे रुजविण्याचे निंदनीय प्रकार ताबडतोब बंद करावेत असे मला वाटते. आपण जर काही विधायक कार्य करून महाराष्ट्रधर्म पुढे नेऊ शकत नसू तर निदान निव्वळ गुंडगिरी करून आणि आढ्यताखोरपणा करून जातीयतेची विषवल्ली तरी पेरू नये. या स्वतःला मराठ्यांचे स्वयंघोषित नेते म्हणवणार्या नेत्यांना शिवाजी महाराज किती कळले आहेत? साहित्य, समाजसेवा, कला, वैद्यकक्षेत्र आदि कुठल्या क्षेत्रात यांनी जनतेची निस्वार्थ सेवा केलेली आहे? बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रातले जाणते शिव-अभ्यासक आहेत आणि त्यांचे शिवाजी महाराजांविषयीचे संशोधन आणि ज्ञान हे खचितच इतर कुणाही लुंग्या-सुंग्यापेक्षा जास्त आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. मनाचा मोठेपणा दाखवून महाराष्ट्रातल्या जनतेला एकत्र घेऊन पुढे जाणे हे सध्याच्या काळात सगळ्यात महत्वाचे आहे हे ही न कळण्याइतपत या संघटना जात्यांध झालेल्या आहेत? असे जर असेल तर ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे असेच म्हणावे लागेल. आधीच महाराष्ट्रात परप्रांतियांच्या आक्रमणाचे संकट तोंडाशी येऊन ठेपलेले आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मराठी माणसाचा आवाज आणि मराठीची हाक क्षीण होत चालली आहे. परप्रांतीयांचे हे आक्रमण नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव, अहमदनगर सारख्या शहरांमधूनही जोमाने फोफावते आहे. ५-१० वर्षात या सगळ्या शहरांची आणि आपल्या अस्सल मराठी गावांची अवस्था मुंबईप्रमाणे झाली तर कदाचित शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याच मराठी भूमीत पोरके होईल. बाहेर सगळीकडे हिंदी बोलावे लागेल आणि या लोकांच्या दंडेलीला आपल्याच घरात सहन करत बसावे लागेल. परंपरेप्रमाणे दुहीचे आणि स्वार्थाचे राजकारण करून पुन्हा महाराष्ट्रधर्म बुडवू नये अशी विनंती मी त्यांना करतो. त्यापेक्षा काहीतरी विधायक कार्यात जर ही शक्ती आणि ऊर्जा वापरली तर त्याचा महाराष्ट्राला आणि मराठी जनतेला नक्कीच फायदा होईल. उगीच गुंडगिरी आणि दंडेलशाही करून काहीही साध्य होणार नाही. कदाचित बाबासाहेब कुठल्या त्या समितीवर नेमले जाणारही नाहीत पण त्यामुळे मराठीची आणि महाराष्ट्राची यत्किंचितही प्रगती होणार नाही. नेहमीसारखे दुहीचे आणि स्वार्थाचे राजकारण करून या संघटना आणि त्यांचे भेदभाव पाळणारे दूरदृष्टीहीन नेते महाराष्ट्राची आणि मराठीची आणि तमाम मराठी जनतेची कवडीचीही मदत करत नाही आहेत. उलट सामान्य जीवन ढवळून काढण्याचे आणि शांतता आणि सलोखा भंग करण्याचे कार्य मात्र ही मंडळी अगदी मनापासून करत आहेत हे नक्की. सामान्य जनता या गुंडगिरीच्या प्रवृत्तीला आणि दुहीच्या विषवल्लीला अजिबात भीक घालणार नाही हीच अपेक्षा आणि आशा!! जय महाराष्ट्र!!!
--समीर
वाचने
54832
वाचनखूण
प्रतिक्रिया
102
मराठी
फक्त राजकारण
In reply to फक्त राजकारण by सुमीत
सहमत
उत्तम लेख
अगदी बरोबर,,,,
बाबासाहेब तुमच्या ज्ञातीचे आहेत म्हणुन
In reply to बाबासाहेब तुमच्या ज्ञातीचे आहेत म्हणुन by आम्हाघरीधन
अर्धी बाजू
In reply to बाबासाहेब तुमच्या ज्ञातीचे आहेत म्हणुन by आम्हाघरीधन
पण ज्या
समीर, खूप
सात वेळा?
In reply to सात वेळा? by समीरसूर
वाह समीर वाह!
In reply to वाह समीर वाह! by धमाल मुलगा
+१
In reply to +१ by इनोबा म्हणे
जबरदस्त!
धर्मवीर नव्हेच ..........
In reply to धर्मवीर नव्हेच .......... by आम्हाघरीधन
धर्मवीर...
In reply to धर्मवीर नव्हेच .......... by आम्हाघरीधन
धर्मवीर..
अशी किती तरी उदाहरणे देता येतील.
In reply to अशी किती तरी उदाहरणे देता येतील. by आम्हाघरीधन
द्या!
In reply to द्या! by धमाल मुलगा
जाऊ द्या ...
In reply to अशी किती तरी उदाहरणे देता येतील. by आम्हाघरीधन
सांगा उदाहरणे!
महाराजांन
In reply to महाराजांन by नितिन थत्ते
त्याचे कसे आहे ...
In reply to त्याचे कसे आहे ... by छोटा डॉन
(मी
In reply to (मी by नितिन थत्ते
नक्की काय हवे आहे ?
In reply to नक्की काय हवे आहे ? by छोटा डॉन
दुरुस्ती. प
In reply to दुरुस्ती. प by नितिन थत्ते
गैरसमज ...
छातीठोक पणे कुनीही सान्गावे
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
बासच!!!.. आवरा!!!... उगाच आपले कैच्याकै
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
मला एक कळत
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
मराठ्यांच्या विरोधाचे काय?
In reply to मराठ्यांच्या विरोधाचे काय? by मैत्र
मैत्रा,
In reply to मैत्रा, by ३_१४ विक्षिप्त अदिती
बुद्धिभेदाला विरोध
In reply to मराठ्यांच्या विरोधाचे काय? by मैत्र
मस्त प्रतिसाद ...
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
>>महाराजान्
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
गो
In reply to गो by मनीषा
हे सगळे
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
छ. शिवराय
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
खोटी विधाने करु नका...
In reply to छातीठोक पणे कुनीही सान्गावे by आम्हाघरीधन
आम्हाघरि धन ला उत्तर
In reply to आम्हाघरि धन ला उत्तर by चिन्या१९८५
जबरदस्त प्रतिसाद!
In reply to जबरदस्त प्रतिसाद! by राघव
धन्यवाद्.प
राजकारण आणि इतिहास यात गल्लत करता आहात............
In reply to राजकारण आणि इतिहास यात गल्लत करता आहात............ by आम्हाघरीधन
सामनाचा अग्रलेख वाचलात का?
एक मानसीक
तु कितीही उपहास केलास तरी सत्य बदलत नाही.
In reply to तु कितीही उपहास केलास तरी सत्य बदलत नाही. by आम्हाघरीधन
हेच
भावनेला जरा आवर घाल डान पन्ता
In reply to भावनेला जरा आवर घाल डान पन्ता by आम्हाघरीधन
ओ भाऊ,
In reply to ओ भाऊ, by धमाल मुलगा
धम्या अरे
In reply to धम्या अरे by मिंटी
+१
In reply to भावनेला जरा आवर घाल डान पन्ता by आम्हाघरीधन
उत्तर मिळेल का?
In reply to उत्तर मिळेल का? by मैत्र
हरलो बुवा!
सामनाच्या या लेखाला उत्तर :
In reply to सामनाच्या या लेखाला उत्तर : by आम्हाघरीधन
प्रकाटाआ
In reply to सामनाच्या या लेखाला उत्तर : by आम्हाघरीधन
अगदी अगदी!!!
ह्या
अश्याप्रक
महाराष्ट्रातील
थोडे इनो
लेख
प्रकाटाआ
मेटे व
In reply to मेटे व by अविनाशकुलकर्णी
अगदी अगदी
आपला तो बाब्या अन दुसर्याचे ते कार्टे
शिवस्मारक बातमी
In reply to शिवस्मारक बातमी by आम्हाघरीधन
सदर
तुमचा जीव आता भान्ड्यात पड्ला असेल
वाचा
लिन्क ओपन होत नाहिये
करता करविता
लिन्क
In reply to लिन्क by आम्हाघरीधन
अनेक
किव येते
राजकारण
In reply to राजकारण by प्रकाश घाटपांडे
बरोबर!
"पंतांच्या
In reply to "पंतांच्या by आम्हाघरीधन
जेंव्हा हे
In reply to जेंव्हा हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to जेंव्हा हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
व्वा !
In reply to व्वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१००% सहमत
पाणी खेळे मासा, त्याचा गुरु कोण?
In reply to पाणी खेळे मासा, त्याचा गुरु कोण? by आम्हाघरीधन
आवश्यकता नाही
In reply to पाणी खेळे मासा, त्याचा गुरु कोण? by आम्हाघरीधन
असतील
In reply to पाणी खेळे मासा, त्याचा गुरु कोण? by आम्हाघरीधन
चूकीचे अर्थ काढण्याचा काळ !
In reply to चूकीचे अर्थ काढण्याचा काळ ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा घ्या तो
१००%
१. दादोजी
In reply to १. दादोजी by आम्हाघरीधन
मुद्याचं का नाही बोलत तुम्ही?
पेशवाई
चर्चा भरकटत चालली आहे.