नयनी तुझ्या

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
21 May 2009 - 5:38 pm

शब्दांशिवाय भावना दिसतात नयनी तुझ्या
शब्द दडले डोकावून हसतात नयनी तुझ्या

गजरा माळून माझे भाव टिपशी आरशात
ताटवेच्या ताटवे फुलतात नयनी तुझ्या

वीज येवून मिळावी पावसात चिंब मिठी
थेंबहि मग पाण्याचे भिजतात नयनी तुझ्या

तु जवळ असताना चंद्रहि मग लाजतो
चांदण्याचे रंग कारण खुलतात नयनी तुझ्या

तु समोरी येताच माझे शब्द देतो फेकूनी
पाहूनच ऐकतो ते बोलतात नयनी तुझ्या

निरोप कशाला घ्यायचा मनास वाटे जरी
निरोपाचे हातहि मग झुरतात नयनी तुझ्या

ऋषिकेश
(१४-०५-२००९)

प्रेमकाव्यकविताप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

21 May 2009 - 5:44 pm | अवलिया

क्या बात है ऋषिकेश ! जियो यार जियो !!
:)

--अवलिया

टारझन's picture

22 May 2009 - 12:15 am | टारझन

बाबा रे !!! सर्व काही ठिक णा ?

मला 'मृग' कुठे तो दिसला नाही रे पण ;)

- पेंगुळनयन्या) टारझन

दादल's picture

21 May 2009 - 5:45 pm | दादल

चागली आहे!पण तात्याना आवडेल की नाही ,सागता येत नाही!

कपिल काळे's picture

21 May 2009 - 6:01 pm | कपिल काळे

मस्त मस्त

यशोधरा's picture

21 May 2009 - 6:10 pm | यशोधरा

>>तु जवळ असताना चंद्रहि मग लाजतो
चांदण्याचे रंग कारण खुलतात नयनी तुझ्या

क्या बात है! मस्त!

सहज's picture

21 May 2009 - 6:11 pm | सहज

क्या बात है ऋषिकेश!

पाषाणभेद's picture

21 May 2009 - 6:11 pm | पाषाणभेद

मस्त.
नयनांची जादू कळली वाटत.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

क्रान्ति's picture

21 May 2009 - 7:34 pm | क्रान्ति

तु जवळ असताना चंद्रहि मग लाजतो
चांदण्याचे रंग कारण खुलतात नयनी तुझ्या
खूपच सुन्दर!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

प्राजु's picture

21 May 2009 - 7:43 pm | प्राजु

खूप दिवसांनी गझल आली ऋषी..!
मस्तच!! खूप आवडली. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

21 May 2009 - 9:02 pm | मदनबाण

गजरा माळून माझे भाव टिपशी आरशात
ताटवेच्या ताटवे फुलतात नयनी तुझ्या

ऋषिकेशराव लयं भारी बघा !!! लयं आवडलं आपल्याला... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

विसोबा खेचर's picture

21 May 2009 - 11:49 pm | विसोबा खेचर

छानच रे ऋष्या... :)

तात्या.

नंदन's picture

22 May 2009 - 12:34 am | नंदन

क्या बात है! उत्तम गझल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

22 May 2009 - 5:21 pm | ऋषिकेश

बाकी प्रतिसाद आणि प्रोत्साहन देणार्‍या सार्‍यांचे मनापासून आभार!

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)