वडील

बहुगुणी's picture
बहुगुणी in जे न देखे रवी...
18 May 2009 - 5:57 am

महिनाभर सुटी काढून
आलो होतो भारतात
पंचाहत्तरी विसरून
उत्साहाने राहिलात

एकच शल्य मनात
परत येतांना वाढले
फक्त तुमच्या सान्निध्यात
मी किती क्षण काढले?

वय विसरून विमानतळास
पोचवायला निघालात
"आलास, भेटलास,
हेच पुरेसं" म्हणालात

एव्ह्ढंसं कुठे नाव झालं
सार्‍या सिनीयर सिटिझन्सना कळवलंत
तुमच्या साठी मात्र वेळ नव्हता
"दगदग होते हो त्याची" म्हणत सांभाळलंत

दरवर्षी घरी येताना
खूप सुखवेन म्हणतो
मात्र परत जाताना
काळाची भीती आणतो

काय करतोय जगावेगळं?
कसलं ध्येय? कसलं नाव?
सोडून द्यावं सगळं, सगळं
आता घ्यावी घरी धाव

कविताप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 May 2009 - 6:00 am | प्राजु

काय करतोय जगावेगळं?
कसलं ध्येय? कसलं नाव?
सोडून द्यावं सगळं, सगळं
आता घ्यावी घरी धाव

रोज येतं हेच मनांत.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

Nile's picture

18 May 2009 - 6:09 am | Nile

साधी सरळ सोपी आणि प्रत्येकाची कविता! :) छान :)

अवलिया's picture

18 May 2009 - 6:58 am | अवलिया

चालायचच !

--अवलिया

चन्द्रशेखर गोखले's picture

18 May 2009 - 7:04 am | चन्द्रशेखर गोखले

अतिशय भावुक झालो ! फार आवडली..

सहज's picture

18 May 2009 - 7:08 am | सहज

>सोडून द्यावं सगळं, सगळं
आता घ्यावी घरी धाव

एक रक्कम / तारीख ठरवा आणी होउन जाउ दे.

शुभेच्छा!

लवंगी's picture

18 May 2009 - 7:35 am | लवंगी

:(

विसोबा खेचर's picture

18 May 2009 - 8:47 am | विसोबा खेचर

छान कविता रे!

यशोधरा's picture

18 May 2009 - 9:17 am | यशोधरा

आवडली कविता.

बहुगुणी's picture

18 May 2009 - 10:02 am | बहुगुणी

अभिप्रायाबद्दल सर्वांना धन्यवाद!

मदनबाण's picture

18 May 2009 - 10:06 am | मदनबाण

कविता फार आवडली. :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

समिधा's picture

18 May 2009 - 10:11 am | समिधा

खुप आवडली कविता.खुप जणांच्या मनातली आहे कविता.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

राघव's picture

18 May 2009 - 12:22 pm | राघव

मी तर पुण्यात असूनही नागपूरची आठवण येते.. बाहेरदेशी राहतांना काय वाटत असेल!
मनापासून आवाडली कविता! मग केव्हा येताय परत?? :)

राघव

मीनल's picture

18 May 2009 - 5:57 pm | मीनल

मानातल लिहिल आहे.
लांब राहून एक अपराधी भावना मनात डसत राहते सारखी.
आपण काहीतरी चूकतो आहे असच वाटत.प्रेम घ्यायला ,द्यायला, कर्तव्याला
सोडून द्यावं सगळं, सगळं
आता घ्यावी घरी धाव

हेच वाटत राहत.

मीनल.

बिपिन कार्यकर्ते's picture

18 May 2009 - 6:00 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रतिक्रिया देत नाहीये... जस्ट वडिलांना फॉरवर्ड केली आहे...

बिपिन कार्यकर्ते

अनामिक's picture

18 May 2009 - 7:09 pm | अनामिक

काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाहीये.... मनातल्या भावना अगदी सहज उतरल्या आहेत. जवळ्-जवळ सगळ्याच पाल्य आणि पालकांची हीच परिस्थिती आहे!

-अनामिक

क्रान्ति's picture

18 May 2009 - 8:34 pm | क्रान्ति

अगदी खास मनातली मनापासूनची कविता खूप खूप आवडली.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

चतुरंग's picture

18 May 2009 - 9:00 pm | चतुरंग

(पल्याडचा) चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

18 May 2009 - 9:05 pm | llपुण्याचे पेशवेll

खूपच छान. :(

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

जयवी's picture

18 May 2009 - 9:53 pm | जयवी

खूपच आवडली.
कालच "ओढ माहेरची" म्हणून एक लेख पोस्ट केलाय इथे. http://misalpav.com/node/7800
सगळे हेच भाव. अगदी मनातलंच वाचल्यासारखं वाटलं .