रमत गमत जगायचं, हसत हसत मरायचं
जन्मभर उन्हाच्या झळा सोसून सावलीसाठी झुरायचं
बकुळगंधाच्या स्मृती घेऊन बाभुळबनात फिरायचं
एकाकीपण विसरून जाऊन मैफलीत बहरायचं
निखळलेल्या प्रतिबिंबातलं चांदणं हाती धरायचं
निसटलेल्या क्षणांमधली स्वप्नं शोधत फिरायचं
हळूच मिटल्या पापणीतला अश्रू होऊन झरायचं
तृणावरच्या दंवासारखं कोवळ्या उन्हात विरायचं
तहानल्या जीवांसाठी मेघ होऊन उतरायचं
वाळवंटातल्या पथिकामागे सावली होऊन फिरायचं
रित्या ओंजळीला गोड गुलाबी आठवणींनी भरायचं
बहरासाठी वाटा सजवून पाचोळ्याचं आयुष्य सरायचं
प्रतिक्रिया
5 May 2009 - 9:49 am | मराठमोळा
>>मरत मरत जगायचं, जगत जगत मरायचं
ही ओळ तेवढी आवडली नाही क्रांतीतै. याऐवजी "रमत गमत जगायच, हसत हसत जगायचं" कसं वाटलं असतं?
आयुष्याच्या कवितेत मरण कशाला?
हळूच मिटल्या पापणीतला अश्रू होऊन झरायचं
तृणावरच्या दंवासारखं कोवळ्या उन्हात विरायचं
तहानल्या जीवांसाठी मेघ होऊन उतरायचं
वाळवंटातल्या पथिकामागे सावली होऊन फिरायचं
या ओळी खुप आवडल्या. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
5 May 2009 - 9:59 am | सागर
क्रांतिजी,
खूप हृदयस्पर्शी कविता... फार सुंदर
खास करुन पुढील ओळी एकदम टच्ची :)
निखळलेल्या प्रतिबिंबातलं चांदणं हाती धरायचं
निसटलेल्या क्षणांमधली स्वप्नं शोधत फिरायचं
रित्या ओंजळीला गोड गुलाबी आठवणींनी भरायचं
बहरासाठी वाटा सजवून पाचोळ्याचं आयुष्य सरायचं
- सागर
5 May 2009 - 10:25 am | सायली पानसे
खुपच आवडली. शेवटच्या ओळि तर खुपच छान...
5 May 2009 - 10:29 am | सँडी
एक नंबर.............................
शब्द न् शब्द अप्रतिम!
-संदीप कुलकर्णी.
काय'द्याच बोला.
5 May 2009 - 10:43 am | उमेश__
निखळलेल्या प्रतिबिंबातलं चांदणं हाती धरायचं
निसटलेल्या क्षणांमधली स्वप्नं शोधत फिरायचं
सुंदर कल्पना.........
अप्रतिम!
5 May 2009 - 10:46 am | अश्विनि३३७९
खरच अगदी सगळ्या ओळी सुंदर आहेत..
5 May 2009 - 11:08 am | प्रकाश घाटपांडे
आयुष्यावरच्या कविता अवघड वळणांच्या असतात.
विशेष आवडले. आमच्यासारख्या काव्य(अ)रसिकाला देखील.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
6 May 2009 - 6:45 am | अवलिया
हेच म्हणतो
--अवलिया
5 May 2009 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार
क्रांतीतै मस्तच आहे ग कवीता. खुप आवडली.
पराग्रज
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
5 May 2009 - 1:33 pm | पाषाणभेद
"बाभुळबनात फिरायचं"
आम्हीही बाभुळबनात फार म्हणजे फार फिरलो आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
5 May 2009 - 1:35 pm | ऋषिकेश
कविता ठिक वाटली. काहि ठिकाणी विनाकारण शब्दबंबाळ झाल्यासारखी वाटली.
आशय मस्त!
ऋषिकेश
5 May 2009 - 3:11 pm | जागु
क्रांती मला पुर्ण कविता खुप आवडली.
5 May 2009 - 8:22 pm | प्राजु
केवळ अप्रतिम.
सगळीच कविता उत्तम आहे.
पण या ओळी खूप आवडल्या..
हळूच मिटल्या पापणीतला अश्रू होऊन झरायचं
तृणावरच्या दंवासारखं कोवळ्या उन्हात विरायचं
तहानल्या जीवांसाठी मेघ होऊन उतरायचं
वाळवंटातल्या पथिकामागे सावली होऊन फिरायचं
सुंदर!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 May 2009 - 8:29 pm | यन्ना _रास्कला
रमत गमत जगायचं, हसत हसत मरायचं
सान्गा कस जगायच... कन्हत कन्हत कि गान म्हनत !
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
5 May 2009 - 10:38 pm | बेसनलाडू
विशेष आवडले.
(वाचक)बेसनलाडू
6 May 2009 - 4:55 am | शितल
सुंदर..:)
6 May 2009 - 12:48 pm | दत्ता काळे
बकुळगंधाच्या स्मृती घेऊन बाभुळबनात फिरायचं
आणि
बहरासाठी वाटा सजवून पाचोळ्याचं आयुष्य सरायचं
ह्या ओळी तर केवळ अप्रतिम.