णमस्कार्स लोक्स ,
आउटस्टँगिंगचं विशेषण लागायला तसं अवघ्या एकोणिसावं वर्ष उघडलं .. आता "आउटस्टँडिंग " का ? तर आपण मला भेटलाय का कधी ? ह्म्म .. कळलं असेलंच ..
विनंती : पुढील वाक्य टेलेब्रांडच्या मराठीमधे डब केलेल्या जाहिरातींसारखी वाचून ऐकावीत ,
जसा मोठा होत गेलो .. तसा लांबच लांब वाढलो .. पण फक्त उभाच .. बाकी आम्ही पाप्याचे पितर .. उंची वाढता वाढता ६ फुट क्रॉस करून गेली. ताडा-माडाचं झाड झालो .. आणि हा माझ्या "आउटस्टँडिंग" होण्याकडचा प्रवास. बाबांचा स्वभाव मुळचा विनोदी. एकदा सर्व नातेवाईक आलेले. बारावी पास होउन इंजिनियरींगला ऍडमिशन खाणदाणातला पहिला वहिला इंजिनियर बनन्याची शक्यता असल्याने कौतुकाचा विषय होतो. पण म्हणतात ना ,,, आपला द्वेश बाकी लोकांपेक्षा आपलेच लोक करतात ... कोणीतरी नातेवाईक पिचकलाच ... काय रे .. जरा तुझ्या शरीराकडे पहा.. नुसतात वाकडा तिकडा वाढलाय .. तेवढ्यात तिर्थरूप कुजबुजले ... "तो शिवशेनेच्या प्रचाराचं काम करतो, त्यामुळे त्याने धनुष्या सारखी वाकडी बॉडी खास बनवलीये" एकच हशा !! अस्मादिक खट्टू ...
बसने प्रवास करताना नेहमीचाच त्रास... स्टंट्स करून बसमधे पहिला प्रवेश मिळवायचो .. आणि शेवटच्या सिट वरची मधली सिट पकडायचो !! करणार काय ? पाय बसायला हवेत ना सिटींमधे .. उगाच वाकडं तिकडं बसायला लागे .. कधी गर्दीत सिटाबाहेर पाय बाहेर काढून बसलो की उभे असलेले नाकं तोंडं मुरडायचे, खिडकीशेजारी बसलो तर शेजारी बसणार्याला पायांमुळे अर्धंच सिट टेकवण्यापुरती जागा मिळे. कधी कधी रोजच्या बस रूट ला असलेली मुलगी आवडली तर जागा पकडायचो ... पण तिला कधी " बस ना, तुझ्याच साठी जागा पकडलीये" असं म्हणायची हिम्मत होत नसे .. मग उगाच हे सिट चुकून भेटलंय .. आपल्याला बसता येत नाही ... म्हणून आपण बसा .. असं दाखवून मी तिला सिट देत असे. ती माझ्याकडे कसल्याश्या नजरेने ओठ वाकडे करून जागेवर अशी बसत असे जसं तिनेच माझ्यावर उपकार केले. ( ह्या मुलींचे ओठ एवढे लवचिक कसे बरं असतात ,,, एकदम शिताफीने सिल मासा पाण्यात जश्या कलाकृती करतो ,,,, तश्या ह्या ओठांच्या कवायती दाखवतात ... आमच्या सारख्यांचा अजुन मोठा होत जातो हो .. न्यूनगंड... मग कसलाच धीर होत नाही ... मनातल्या मनात लाईन मारण्याचा सुद्धा .
उंची जास्त असल्याने वर्गात सर्वांत मागची बेंच भेटत असे .. ह्याचं त्यावेळी वाईट वाटे... मी तसा थोडासा सिन्सियर आणि हुशार मुलांशी सलगी असलेला .. ते सर्व बुटलर लोक होते .. त्यामुळे ते जायचे पहिल्या बाकावर आणि मी मागे.( ऍक्चूअली पुढे बसणार्या सुबक दिसणार्या रुपाली ला चोरून पहाणे मागनं शक्य नव्हतं) त्यामुळे आपण उंच असल्याचा फारच राग येई. पण सगळेच बुटलर थोडी स्कॉलर असतात ? मग टगे लोक ज्यांना मागे यायचं असायचं .. त्यांच्याबरोबर जागा स्वॅप करायचो .. आणि खुष व्ह्यायचो .. दुसर्या बाकावर "तुषार भुसारी" नावाचा मुलगा बसे. मुलींच्या ओळींत दुसर्याच बाकावर बसणार्या एका मुलीवर तो लाईन मारत असे. त्याला तिच्याकडे पाहिल्याशिवाय काही चैन पडत नसे. पण असं शेजारी पहायचं म्हणजे ९० अंशात मान वळवण्याची ना त्याच्यात हिम्मत होती ना मास्तरच्या आणि पोरीच्या नजरेतून सुटलं असतं .. पण हा मान न वळवता फक्त गारगोट्या (डोळ्यांतली बुब्बुळं) वळवायचा.. एवढे ? अल्मोस्ट ९० अंश.. एकदा त्याला म्हंट्ल .. ठोकळ्या .. एवढ्या काय गारगोट्या फिरवतो.. चकणा होशील ना एक दिवस .. त्या पेक्षा तू एक काम कर, तु नवं घड्याळ घेतलंस ना.. ते डोळ्यांसमोर ४५ अंशात ठेव .. डोळा जवळ नेऊन ऍडजस्ट कर.. तुला ती दिसेल ... ह्यामुळे ना मास्तर ला कळेल ना तिला .. तू ही हवा तितका वेळ तिला निहारू शकशील ... आणि चकणा ही होणार नाहीस .. भुसार्याने खुष होउन मला वडापाव खाऊ घातला. मास्तरलोकांना त्रास देण्यात आम्ही आग्रमानांकित होतो .. प्रत्येक कमेंट वर पन्नास प्रतिक्रिया (हशा) मिळायच्या .. आणि त्यामुळेच मास्तर लोकं डोळा ठेऊन असायचे ... जोक नाही खरं सांगतो.. आमच्या येडझवेपणाला काही मर्यादाच नव्हत्या .. एकदा बारावीच्या वर्गार बायोलॉजी-२ चं लेक्चर चालू होतं .. मॅडम ने "मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टिमची डायग्रॅम काढली ... आता त्या वेळी तो तास "छे .. काहीतरीच काय?" ह्या प्रकारचा होता. मुलांना डायग्रॅम काढायला सांगून मॅडम क्लासभर फिरत होती .. पोरं पोरी काहीतरी कुजबुजून हासत होती... ६व्या बाकापाशी मॅडम थांबल्या.. चंदनशिवे ने हाल्फस्केप वहीच्या पानावर अगदी छोटीशी डायग्रॅम काढली असावी. मॅडम म्हणाल्या .. काय चंदनशिवे .. "केवढंसं काढलंय आहे .. कसं व्हायचं ?" ह्यावर क्लास मधे एकसाथ एवढा प्रचंड हशा फुटला ... धो धो धो धो ... पुर्ण ज्यूनियर कॉलेजात एवढा कधी हसला नव्हता वर्ग... तेवढा मॅडमच्या वाक्यावर हसला .. ते पुरे की काय ... मागच्या बाकावर मी मोठी डायग्रॅम काढलेली .. मी वेगळ्या आवाजात बोललो .. "मॅम मी मोठं काढलंय ..." आता मात्र क्लास वर हसून हसून मरायची पाळी आली होती .. मॅडम आताशा ओशाळली असावी .. हा प्रकार मागं बसलेल्या महानगांपैकी मीच केला असनार ह्याची त्यांना खात्री होती .. त्यांनी रागाने एक नजर माझ्याकडे टाकली .. आणि निघून गेल्या .. क्लास हसतच राहिला .. नंतरचं लेक्चर ऑफ होतं .. क्लास पुर्ण वेळ हसत होता. झाल्या प्रकाराचा तोटा मला फायनल्स ला झाला ..बायो प्रॅक्टिकल्स ला वीस पैकी ११ मार्क मिळालेले. बाकींना १६ च्या वर होते .. असो .. आम्ही आउटस्टँडिंग ना ?
त्यावेळी ब्रांडेड कपडे घ्यायला तेवढे पैसे मिळत ... आपला "फॅशन स्ट्रीट" हाच शॉपींग मॉल होता. आता उंची जास्त. त्या पँट्स मला लांबीलाही पुर्ण होत नसत.. थ्री फोर्थ पेक्षा थोड्या लांब .. मी राज कपूर वाटायचो .. च्यायला ह्या उंची मुळे मी पुन्हा आउटस्टँडिंग झालो. बर्याचदा मित्र मैत्रिणींच्या घरी जायचो .. तर त्यांच्या दरवाज्याला कपाळमोक्ष करून घेणे जणू अंगवळणीच पडे. रेखा ही बारावीची मैत्रिण... नंतर मी डिवाय च्या इंजिनियरींग कॉलेजात तर ती एम.बी.बी.एस.ला डिवायच्याच मेडिकल कॉलेजात गेली.. बाप्प्या पण बि.जे कॉलेजात.. बर्याच वेळेस रेखाच्या घरी जायचो .. तिचं घर जुण्या बांधणीचं.. सिमेंट पत्रे ,, दोन्ही साइड ला उतारावालं.. बोलणे वगैरे झालं .. थंडीचे दिवस होते .. जॅकेट होतं .. निघायच्या वेळेस जॅकेट घालायला हात वर केला .. ताड्ड्ड् ... ताड्ड्ड्ड .. माझे हात वर फॅन मधे गेलेले .. फॅन आता नाचत नाचत फिरत होता .. मला फार ओशाळल्या सारखं झालेलं .. सगळे कौतुकाने (की कसे ते माहीत नाय) हसले .. रेखाची मम्मी म्हणाली .. अरे असू देत .. तो फॅन जुणाच होता ... आम्ही बदलणारच होतो .. बरा मुहुर्त लागेल आता .. पटकन निघू म्हंटलं .. तर दरवाज्याने कपाळ मोक्ष झाला .. ओरडावेसे वाटले .. पण सांगतो कोणाला ... तोंड दाबलं .. आणि बाहेर येउन ओरडून घेतलं .. बाप्या हसत होता .. काय साला मी खरंच आउटस्टँडिंग आहे ?
बापानं धनुष्य म्हंटल्याचं फारच मनावर घेतलं .. आण जिम लावली ... जोषात एकदम फुल्टू व्यायाम सुरू केला .. जेव्हा डिप्स मारताना दम जाई.. तेंव्हा वाकडातिकडा होउन मी रिपीटीशन पुर्ण करे . त्यावेळी बाकी पोरं मला हसत असायची ... म्हंटलं हसा लेको ... पण आता मी "टोटल आउटस्टँडिंग" होण्याच्या मार्गावर होतो ... हळू हळू दिवस पास झाले ... बॉडी बनु लागली .. जुणे कपडे फिट झाले. त्यांना बलजबरी वापरल्याने ३ शर्ट आणि २ पँट अंगावरच आळस देताना फाटल्या ... आता नविन कपडे .. फॅशन स्ट्रिट ला गेलो .. आधी कपडे फक्त उंचीला कमी होत... आता तर रूंदीतही धोका बसला .. च्यायला हा फॅशन स्ट्रीट काय फक्त साडेपाचफुटी लोकांसाठीव बनलाय का ? की मला आउटस्टँडींग दाखवण्याचा प्रयत्न ? कपडे शिउन घेणं फारच बोर आणि आउट ऑफ फॅशन वाटे .. वर्षाकाठी जे २००० रुपये शॉपींग ला मिळत .. त्यातून कसे बरं बजेट बसणार .. मग जरा जांगल्या दुकाणातून ४ ऐवजी २ ड्रेसचीच खरेदी व्हायची .. ते कपडे ओके ओके बसत ... पण वाढ कुठे थांबली ? जास्त व्यायामाचे तोटेच तोटे दिसायला लागले ..
खांदे ब्रॉड झाल्याने शर्ट्स ची साईझ ४४ वर पोचली .. एकदा गिफ्ट मधे मिळालेलं ४२चं शर्ट ट्रायल मधेच उसवलं ... मी ते फॉल्टी पिस आहे .. म्हणून शाळसूद पणे रिटर्न केलं .. आता पँटच्या फिटीगला प्रॉब्लेम येई तो हिप्स आणि थाईज मधे ... ३४ च्या कमरेच्या पँट्स .. आणि थाईज झाल्या २४ वगैरे .. कमरेत लूज होउनही साला त्या पँट्स थाईज मधे अडकायच्या.. नाईलाजाने कंमरेची जास्त साईझ घेउन त्यांना पट्ट्याने आवळावं लागे. टिशर्ट ह्यामुळेच आवडायचे की एक तर बॉडी फिट ... त्यात लवचिक .. आणि बॉडीही दिसे रपचिक .. मला ही मी "आउटस्टँडिंग"च वाटायला लागलो .. बस च्या सिटामधे आधी फक्त पायच मावत नव्हते .. आता तर खांद्यांनी ही शेजारच्याला ढूस्से द्यायला सुरूवात केली .. मला नेहमी प्रश्न पडतो .. आता एक हात ठेऊ उठे ? ऑटोमधेच काय ... स्कॉडा मधे देखिल बसताना थोडंस " आकुंचन पावून " बसावं लागायचं .. हे कमीच हो... साला विमानात .. शिटात पाय पुरना म्हणून आम्ही ४-४ तास स्टँडिंग प्रवास केलाय .. जॉबला लागलो ... आता फॉर्मल शुज घेणे क्रमप्राप्त आहे .. शुजची दुकानं पाहिली ... साला आमच्या पायाला फिट होईल असा एकपण बुट मिळेना .. शेवटी एका मोठ्या दुकानात आमच्या मापाचा शुज मिळाला !! बाईक खरेदीचा टाईम आला .. तेंव्हा तर फारच कससं झालं .. बुलेटही साला छोटीच दिसते .. कोणतरी मित्र बोंबलला .. साल्या तु सन्नी घे .. मस्त शोभेल .. म्हंटलं मेल्या .. घे बोलून .... कुठं भांडणं झाली की ये बोलवायला .. मग सांगतो ..
आणि ह्यामुळे मित्रांना "आउटस्टँडिंग" म्हणून चिडवायला चान्स मिळायचा .. एकदम उठून दिसण्याच्या पर्सनॅलिटीमुळे मित्र गृपफोटो मधे शेजारी उभे रहाणे टाळायचे .. कारण ते एकदमच झाकले जायचे ना ..
ख्वाटं नाय बोलत .. ह्ये पघा ..
तर मित्रांनो अशा ह्या आउटस्टँडिंग मिळणार्या वागणूकीमुळे मी फारच परेशान झालो होतो.. मला तर आता जगायचीच इच्छा उरली नव्हती .... असा मी निराशेच्या गर्तेत पोचलो होतो .. पण तेंव्हाच माझा मित्र .. टोनी ह्याने मला टेलेब्रांड्स च्या "चेंज यूवर थिंकिंग -चेंज यूवर लाईफ" ह्या अफलातून प्रॉडक्ट विषयी सांगतलं . आणि मी ते तत्काळ ऑर्डर केलं .. मित्रांनो .. खरं सांगतो ... इतका इफेक्टिव्ह प्रॉडक्ट आहे हा ... ह्याच्या वापराने मला फार फायदा झाला ... ह्यानेच मला वेगळं विचार करायला शिकवलं .. हॅरी मॉर्गनचं हे प्रॉडक्ट अफलातून आहे .. पहा ह्यामुळे काय फायदा झाला तो ..
मी विचार केला .. आर्रे .. आपण असे आहोत ह्यात काही वाईट नाही .. आठव ... जेंव्हा आपण रस्त्याने टाईट टिशर्ट घालून फिरायचो .. लोकं चोरून चोरून पहायची की नाही ? कितीतरी वेळा लोकांनी तुला "वा !! छान ! काय मस्त बॉडी बनवलीये " अशा कमेंट्स दिल्या की नाही .. आणि त्यामागून जाणारांनी पण "+१", "सहमत आहे" ,"असेच म्हणतो " असल्या प्रतिक्रिया देउन समर्थन केलं की नाही ? मग ?
एकदा जंगली महाराज रस्यावरच्या "सुभद्रा" मधे जेवायला गेलेलो तेंव्हा तिथे एक फॅमिली आलेली.. मी "सुपरमॅन"चा टिशर्ट घालून गेलेलो .. तेंव्हा मला पाहून एक छोटूला मोठ्याने सुपरमॅन ,,, ओरडलेला .. त्याने माझ्याबरोबर फोटू काढायचा आग्रहही केलेला .. तेंव्हा एकदम सेलेब्रेटीच्या थाटात त्याला एकाच हाताने उचलून उभा राहून फोटू काढला .. पोरगं जाम खुष झालं .. आणि मित्र पण गप्प झाले .. पुन्हा कोणी चिडवायचं नाव नाय घेतलं .. :)
खडकीच्या सिग्नलला फार गर्दी असते .. रोड ही नॅरो असतो.. एकदा मित्राबरोबर पुण्यात चाललेलो .. एक माणूस फुटपाथ सोडून रोडवरून चालत येत होता.. अशा स्वतःला रोड का दादा समजणार्यांसाठी मी एक क्लूप्ती करतो.. बाईकनेच त्याला कट मारावा ... बाईकचं हँडल त्याच्या कोपराला असं मारावं की बास ..त्याला चांगलंच खौन लागलं असावं .. बाईक पुढे गेल्यावर तो मागून ओरडला .. "ए (@$ञ$ थांब ... @*@& दिसत नाय का ? @**## " बास .... बाईक स्टँड ला लावली .. मित्र म्हणाला सोड अरे .. जाउ दे .. पण थांब म्हंटलं आणि बाईक वरून उतरलो .. हेल्मेट काढलं आणि त्याच्या डोक्यात घालणार .. इतक्यात .. भाऊसाहेबांचा टोनच चेंज झाला .. इतका वेळ शिव्या देणारा तो .. अचानक "ओ भाउ.. बघा ना तुम्हीच किती लागलंय .. .. हे संध्याकाळी लै सुजल हो .. बघा तुम्हालाच वाईट वाटंल " त्याच्या ह्या वाक्यामुळे सगळा रागंच निघून गेला .. आणि हसू आवरेना .. पहा .. झाला की नाही पर्सनॅलिटीचा फायदा ... बरेचदा बॉडी लँग्वेजनेच आर्धी कामं होतात ... चांगल्या ब्रांड्स चे कपडे घेतले की हव्या त्या मापाचे कपडे भरपूर व्हरायटीज मधे मिळतात ...
"चेंज युवर थिंकींग - चेंज यूवर लाईफ " ह्या अफलातून प्रॉडक्टने माझं अवघ जिवनच बदलून टाकल ... आता माझा चेहरा ही खुलला होता. .. मी फार आनंदी असायचो .. त्यामुळे चिडचिड कमी झाली .. जिवन हे स्वर्ग झालं ...
तर पहाता काय तुम्ही ही लवकर ऑर्डर करा .. "चेंज युवर थिंकींग - चेंज यूवर लाईफ " ..
ह्याचा प्रॉडक्ट कोड आहे ... ए.व्ही.१२९० , किंमत फक्त रुपये ५९९०/- फक्त ...पोस्टेज आणि हँडलिंग खर्च अतिरिक्त.. सर्व प्रॉडक्ट्स व्हीव्हीपीने पाठवले जातील , त्वरा करा .. आजच फोन करून ऑर्डर बुक केल्यास आपल्याला २०% डिस्काऊंट मिळेल .. आणि ह्या बरोबर आपल्याला फ्री मिळणार आहे ...
१. कुंड्या धुवायचं मशीन .. ज्या द्वारे आपण आपली नर्सरी एकदम व्यवस्थित मेंटेन करू शकता , आता मातित हात भरवायला नको .. एकदा मशीन मधे कुंड्या टाका .. एकदम चकाकतील तुमच्या कुंड्या !! ह्याची बाजारात किंमत आहे ९९० रुपये .. पण आपल्याला हे फुकट भेटणार आहे.
२. खास चमचे धुण्याची पावडर , ह्यामुळे चमच्याला आणखी कसलाही वास येणार नाही .. पावडर वासमारी आहे.
३. चष्म्याचे वायपर्स ... ह्यांना एकदा बसवले की वारंवार चष्मा पुसायचा त्रास नाही ...
अर्रे थांबा जाता कुठे .. इतकंच नाही ... आपल्याला भेटते आहे ... एक अन्न चावायचं गॅजेट .. खास दात पडलेल्यांना गिफ्ट देण्यासाठी एकदम उत्तम .. कोणत्याही प्रकारचं अण्ण चाऊन चाऊन चोथा करून बाहेर पडतं .. हे तोंडात बसवलं की आपले आज्जी आजोबा पण अक्रोडाचा आस्वाद घेउ शकतात .. ह्या सर्व प्रॉडक्ट्स ची बाजारात किंमत आहे ३००० रुपये जे आपल्याला फ्रि भेटत आहे ..
तेंव्हा पहाता काय ? फोन करा !! फोन नंबर आहे : ०० ००००० ००००० ...
प्रतिक्रिया
1 May 2009 - 3:41 pm | भडकमकर मास्तर
आयला टार्या, तो फोटो मस्त आहे...
ओऊटस्टॅन्डिंग पर्स्नॅलिटीमुळे फार त्रास सहन केलास रे...
..लेख छान झालाय...
त्या सुपरमॅनच्या गोष्टीत हसू आले.....पोराने बरोबर फोटो काढून घेतला :)) =))
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
1 May 2009 - 3:59 pm | अनंता
साला भिती दाखवतो का रे?
अरे जा, भित नाय म्हणावं.
ह.घ्या.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
1 May 2009 - 4:13 pm | बिपिन कार्यकर्ते
टार्या.... छप्परफाड्ड!!!!!!!!!! साल्या भयानकच आहेस तू म्हणजे. काल विडंबन आज लेख... हमखास टाळ्या घेणारं लिहितोस तू. मस्त लिहिलं आहेस, मजा आली. फोटो मात्र अतिअतिअतिजबरदस्त आहे. आणि ते टेलिब्रांड्स वाली आयडिया भारी. मी खरंच तसं वाचून बघितलं. एकदम फिट्ट बसतंय त्या तालावर....
हे संध्याकाळी लै सुजल हो
च्यायला, हा किस्सा तुझ्या तोंडूनच ऐकायला पाहिजे राव... आम्हाला लाभलं ते भाग्य. लै खत्री होतं ते. मला अजूनही कधी कधी ते आठवून हसू येतं.
बिपिन कार्यकर्ते
1 May 2009 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार
टार्या गुर्जीच्या नादानी तु पण क्रिप्टीक लिहायला लागला की भौ ;)
कहिपे निगाहे कहिपे निशाना.
च्यायला जीम तर मी पण लावली होती... पण माझ्या हातुन रोज तिकडे काय ना काय मोडायचे, कधी 'बुलवर्कर' कधी 'वेटबार' वाकायचा. मग फि पेक्षा जास्ती नुकसानच करतो म्हणुन मला काढुन टाकायचे. :(
अवांतर :- मी आणी धम्म्याने तुला मागच्या वेळी बुकलुन काढले होते तो किस्सा का नाही टाकला ?
रुत्समे मंडई
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
1 May 2009 - 4:23 pm | टारझन
ए गप्प ना लेका .. कशाला चारचौघात उतरवतोय ? पार्टी देऊ बोललोय ना ... :)
1 May 2009 - 5:27 pm | छोटा डॉन
टार्या, खत्तरनाक लेख आहे भौ, आवडला.
तु अगदी आतुन लिहीत असल्याने काहीही लिहलेस तरी छानच वाटते, हा सुद्धा अगदी टचिंग लेख आहे ...
असेच लिहीत रहा, सुरेख लिहतोस ...!!!
पुलेशु ...
>>"चेंज युवर थिंकींग - चेंज यूवर लाईफ "
क्या बात है, मस्त ...
अवांतर : पुण्यात आल्यावर कुस्ती खेळणार काय माझ्याशी ( ऑनलाईन गेम्समध्ये ) ?
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
1 May 2009 - 5:45 pm | शितल
जोरदार अनुभव कथन.
=))
1 May 2009 - 5:50 pm | प्राची
जबराट,चाबूक,टांगा पल्टी घोडे फरार(अवधूतचे सगळे प्रतिसाद)
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
1 May 2009 - 6:02 pm | विनायक प्रभू
क्लास महान, विद्यार्थी अतिमहान
1 May 2009 - 6:26 pm | मराठमोळा
सॉलिड मजा आली वाचताना... आउटस्टँडींगचा बराच त्रास झालेला दिसतोय..
"होते वेडे कुरुप पिलु तयात एक" या राजहंस कवितेची आठवण झाली.
टोनी ह्याने मला टेलेब्रांड्स च्या "चेंज यूवर थिंकिंग -चेंज यूवर लाईफ" ह्या अफलातून प्रॉडक्ट विषयी सांगतलं . आणि मी ते तत्काळ ऑर्डर केलं .. मित्रांनो .. खरं सांगतो ... इतका इफेक्टिव्ह प्रॉडक्ट आहे हा ... ह्याच्या वापराने मला फार फायदा झाला ... ह्यानेच मला वेगळं विचार करायला शिकवलं ..
सुनील पाल चा टेलीब्रांड वरचा विनोदी शो आठवला.. " मेरे दोस्त हलकट पिंटो ने मुझे एक प्रॉडक्ट के बारे मे बताया"
=)) =)) =)) =))
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
1 May 2009 - 6:36 pm | चतुरंग
बायलॉजीचा तास डोळ्यांसमोर आला! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, वरच्या फोटूला हिमनग आणि सात बुटके असं शीर्षक कसं वाटेल! B) :? )
चतुरंग
1 May 2009 - 7:42 pm | सँडी
वरच्या फोटूला हिमनग आणि सात बुटके असं शीर्षक कसं वाटेल!
एकदम मस्त वर्णन!
आम्च्या मनातल्या बातां तुम्ही खुद के साथ करताय रंगा भौ! ;)
अवांतरः फोटु पाहुन 'टारझन' नावाचा उलगडा आज झाला. मस्त रे! =D>
1 May 2009 - 6:37 pm | निखिल देशपांडे
अरे पुर्ण लेख त्या अॅड प्रमाणेच वाचला..... मजा आली मस्त लिहिले आहेस रे टार्या
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
1 May 2009 - 6:43 pm | अवलिया
लै भारी रे टाराशेट !
=))
--अवलिया
1 May 2009 - 6:53 pm | सहज
जबरी हीन आनी हिनकस लेख झाला आहे!
1 May 2009 - 7:09 pm | स्वाती दिनेश
टारोबा, मस्त लिवलय, आवडलं.
फोटू पण सॉलिड.
स्वाती
1 May 2009 - 7:22 pm | घाटावरचे भट
तूफान!!! आपल्याला आवडेश!!
1 May 2009 - 7:36 pm | नितिन थत्ते
लय भारी लेख.
खराटा
(रंग माझा वेगळा)
1 May 2009 - 8:11 pm | chipatakhdumdum
टार्या भाउ, तुम्हाला मानल ....
( ए पाण्डू, बावडी खरी हाये का खोटी ते जरा हात लावून तपास..)
( पाण्डूच्या अकलेचा आणि पाण्डूच्या हाताचा चुरा...हॅ हॅ हॅ..)
1 May 2009 - 8:17 pm | टिउ
एकदम हीन, हिडिस आणी अश्लील लेख...
बेक्कार हसलो...काहिही किस्से आहेत हे! भारी रे टार्या...
1 May 2009 - 8:23 pm | क्रान्ति
मस्त, जोरदार, भन्नाट! टेलीब्रँड्स जबर्दस्त!
=)) =)) =)) =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
1 May 2009 - 8:36 pm | अनामिक
लै भारी!!! आउटस्टँडिंग टारझणचे आउटस्टँडिंग अनुभव कथन आवडले.
-अनामिक
1 May 2009 - 9:34 pm | श्रावण मोडक
ठ्ठो!!!
1 May 2009 - 9:39 pm | भाग्यश्री
सगळ्यांशी सहमत..
लेख मस्तच जमलाय!! :))
www.bhagyashree.co.cc
1 May 2009 - 10:13 pm | उमेश__
एकदम भारी,,,,,,,,,,,,,
1 May 2009 - 11:47 pm | समिधा
खुपच छान लिहीलाय लेख. एकदम झकास
=)) =))
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
2 May 2009 - 12:13 am | संदीप चित्रे
तुझा बायोचा क्लास डोळ्यासमोर आला आणि खडकीचा माणूसही ... फस्सकन हसलोय एकदम :)
फोटो टाकलास त्याने तर तुझं आउटस्टँडींगपण अगदी नजरेत भरलं :)
टेलेब्रँडिंगची आयडिया तर खूपच आवडली ...
मजा आया दोस्त :)
2 May 2009 - 12:32 am | प्राजु
हसून हसून पोटात दुखायला लागलं.
टारू भाय... यू आर ग्रेट!!!
रिअली आउटस्टँडिंग..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 May 2009 - 1:04 am | स्वप्निल..
लेख पण आउटस्टँडिंग आणि तु पण!!!
मानगये बॉस!! अजुन येउ द्या!! =))
स्वप्निल
2 May 2009 - 2:27 am | बेसनलाडू
भारी अनुभवकथन! आवडले. आउटस्ट्यान्डिंग् असल्याने होणार्या त्रासाची कल्पना आली.
बाकी गृहपाठ न केल्याने शाळेत असताना बाईंनी "वर्गाबाहेर उभे रहा" म्हणून हाकलले की बाकीचे विद्यार्थी 'आउटस्ट्यान्डिंग्' विद्यार्थी म्हणून चिडवायचे त्याची आठवणा झाली.
(आउटस्ट्यान्डिंग्)बेसनलाडू
2 May 2009 - 8:23 am | आनंदयात्री
एक नंबर रे टार्या .. लेख आवडला.
2 May 2009 - 3:14 pm | नंदन
आऊटस्टँडिंग लेख!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 May 2009 - 4:44 pm | लवंगी
किती हसवताय..
3 May 2009 - 12:34 pm | टारझन
सर्वांचेच मनापासून आभार ;)
धन्यवाद्स !!
(निबंधकार) टारझन
4 May 2009 - 2:19 pm | विजुभाऊ
टार्या तू एकदा आमच्या धमु बरोबर फोट्टो काढुन बघच.......
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
9 May 2009 - 8:00 pm | टारझन
9 May 2009 - 8:08 pm | ब्रिटिश टिंग्या
बिकांनी स्वत:चा कान का पकडलाय?
9 May 2009 - 8:25 pm | बिपिन कार्यकर्ते
बिकांनी स्वत:चा कान का पकडलाय?
टार्याला भेटून मला 'मेरे किये कराये का' पश्चात्ताप झाला म्हणून कान पकडलाय मी.
बिपिन कार्यकर्ते
9 May 2009 - 8:47 pm | ब्रिटिश टिंग्या
लोल
१ लंबर!
9 May 2009 - 8:26 pm | टारझन
अर्रे त्यांनी स्वरभास्कर तात्याश्रींचं नाव घेतलं ना त्यावेळी ... त्यामुळंच काणाला हात लावला =))
तशी प्रथा असते म्हणे .. बाकी प्रकाश (घाटपांडे णव्हे) त्येच टाकत्याल
9 May 2009 - 8:22 pm | परिकथेतील राजकुमार
च्यायला टार्या तु फारच लहानखुरा दिसतोस राव धम्मु पुढे. माझ्या बरोबर फोटो काढताना तुला माझ्या पुढेच उभा केला पाहिजे, नाहितर झाकला जाणार तु पुर्ण.
परासींग
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
29 Apr 2011 - 12:11 pm | चिगो
खतरा फोटू...
जबरा लेख टार्या... घाबल्लो..
4 May 2009 - 6:32 pm | लिखाळ
टार्या..
लेख जबराट आहे.. एकदम जोरात.. :)
बायोलॉजी क्लास मस्त :)
शेवट तर फारच भारी... ह ह पु वा.
-- लिखाळ.
2 Jul 2009 - 10:34 pm | शैलेश देशमुख
जबर्दस्त लेख आहे टार्या. झकास.
2 Jul 2009 - 11:53 pm | अनिल हटेला
आउट स्टँडींग लेख आवडला....:-)
(हमेशा स्टँडीग..)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
28 Apr 2011 - 6:31 pm | विकाल
एक नंबर दादा.....!!!
जिओ.... टारानंद जिओ......!!!!!!!!!!!!!
29 Apr 2011 - 2:30 am | विनायक बेलापुरे
केवळ आउटस्टँडिंग !!!!!
29 Apr 2011 - 6:59 am | नरेशकुमार
भन्नाट माडी !
29 Apr 2011 - 11:30 am | llपुण्याचे पेशवेll
चामायला,
इतका भारी लेख कसा काय सुटला नजरेतून. असो. मस्तं लेख रे टार्या. लई भारी. :)
30 Apr 2011 - 8:09 am | माझीही शॅम्पेन
टार्या एडझाव्या कायच्या काय लिहितो राव ! शेवटी साइज़ कुठे कुठे मॅटर करेल सांगता येत नाही
अवांतर - तुझी आणि स्पा ची खरी-खुरी कुस्ती कधी बघायला मिळेल :)