अभिनंदन

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
20 Apr 2009 - 8:05 pm

घमघमणा-या अत्तरकुपीत बंद फुलांचं स्पंदन असतं
उगाळण्यानं गंधाळायला दु:ख कधी का चंदन असतं?

पंचम लावून कोकिळ गातो सुरेल मंजुळ वसंतगाणी
कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी
मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं

दिवसरात्र या खुळ्या मनाची भिरभिर वा-यावरची वरात
कधी, कुठं ते हरवुन जाईल, धडधड अन् काहूर उरात
भीती कसली? वा-यालाही क्षितिजकडांचं बंधन असतं

जगण्यासाठी आधाराची काठी असते वेडी आशा
जे होतं ते भल्याचसाठी, सांगत असते अबोल भाषा
मर्म जाणलं ज्यानं, त्याचं जीवन ही अभिनंदन असतं

तप्त उन्हातहि माथ्यावरती अविरत त्याची शीतल छाया
आयुष्याची स्फूर्ती, शक्ती, निर्गुण ती घनगंभिर माया
भासही त्याचे अमोल ठेवा, दर्शन सौख्य चिरंतन असतं

कविताप्रकटनविचारसद्भावना

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

20 Apr 2009 - 8:08 pm | मराठमोळा

छान कविता लिहिल्याबद्दल... :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

प्राजु's picture

20 Apr 2009 - 8:31 pm | प्राजु

इतकी तरल आणि सहज ओघवती कविता खूप दिवसांनी वाचली. मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सागर's picture

20 Apr 2009 - 10:48 pm | सागर

अप्रतिम क्रान्तिजी...

प्राजुशी सहमत...तरलता आणि सहजपणा अगदी नेमकी जाणवते कवितेत
खास करुन

कधी भासते प्रेमगीत ते, कधी भासते आर्त विराणी
मनीमानसी सुखदु:खाचं अखंड सागरमंथन असतं

या ओळी खास जवळच्या वाटल्या... माझे नाव असल्यामुळे नाही ;)
खरेच हृदयस्पर्शी ओळी आहेत

(कविताप्रेमी) सागर

बेसनलाडू's picture

20 Apr 2009 - 11:07 pm | बेसनलाडू

आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

धनंजय's picture

21 Apr 2009 - 6:55 pm | धनंजय

खूप छान कविता.

सुंदर ....कविता आवडली .

घमघमणा-या अत्तरकुपीत बंद फुलांचं स्पंदन असतं
उगाळण्यानं गंधाळायला दु:ख कधी का चंदन असतं? .... खूपच छान !

उदय सप्रे's picture

21 Apr 2009 - 4:10 pm | उदय सप्रे

खूपच छान !

उमेश कोठीकर's picture

21 Apr 2009 - 5:55 pm | उमेश कोठीकर

क्रान्ति,इतके तरल आणि सहज कसे काय लिहू शकता तुम्ही?

जयवी's picture

21 Apr 2009 - 7:56 pm | जयवी

क्रान्ति.......फार फार सुरेख !! तुझं काव्य मनपासून भावतं! अशीच लिहिती रहा :)

मानस's picture

21 Apr 2009 - 8:00 pm | मानस

अप्रतिम .... फारच छान.

जगण्यासाठी आधाराची काठी असते वेडी आशा
जे होतं ते भल्याचसाठी, सांगत असते अबोल भाषा
मर्म जाणलं ज्यानं, त्याचं जीवन ही अभिनंदन असतं

क्या बात है!!

जागु's picture

21 Apr 2009 - 9:22 pm | जागु

खुप छान.

चंद्रशेखर महामुनी's picture

21 Apr 2009 - 10:12 pm | चंद्रशेखर महामुनी

क्रांति... प्रत्येक कडवे खुपच सुंदर आहे ग.......

चन्द्रशेखर गोखले's picture

21 Apr 2009 - 10:28 pm | चन्द्रशेखर गोखले

खुप सुंदर कविता लिहिल्या बद्दल अभिनंदन !
बाकी प्रजुताईंच्या मताशी सहमत..