डॅम इट !

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
13 Apr 2009 - 12:13 pm

"डॅम इट !"
"अरे नगमा, दिपीका सारख्यांपासुन तो कोण तो बिहारी नट, त्यांच्या नावाचा तिकिटासाठी विचार होतो आणी मराठीतील एका कलाकरालाच्या नावाची अफवा सुद्धा उठत नाही म्हणजे काय ? महेश कोठारे तावातावाने बोलत होता. काहि वेळाने धाप लागल्यावर परत एकदा 'डॅम इट' म्हणुन तो खाली बसला.

"अरे बाबा त्यांच्या नावाला ग्लॅमर असत रे ! कळतय का तुला ?" स्मिता तळवळकर महेशला समजावत्या झाल्या.

"का ? माझ्या श्वास चित्रपटाला ग्लॅमर न्हवते ? ऑस्कर पर्यंत वारु दौडला की त्याचा !" संदिप सावंतानी हिरिरिने आपला मुद्दा मांडला.

"डॅम इट ! घरघर लागायची वेळ आलीये आता. काहितरी केलेच पाहिजे. ह्या राजकिय अभिसरणाच्या प्रक्रियेत आपणही उतरलेच पाहिजे." जोग सरांच्या चिरंजीवांसाठी चित्रपट काढल्यापासुन महेशराव फारच अगम्य बोलायला लाग्ले आहेत.

"तसा मला नगरपाल पदाचा राजकीय अनुभव आहेच. काय म्हणता ?" किरण शांताराम अंदाज घेत म्हणाले.

"अहो तुम्हाला आता कशाला उद्याची बात चे रिमिक्स सहन होत नाही, तुम्ही स्वत:चे रिमिक्स कसे सहन करणार राजकारणात ?" देशाला मराठी नेतृत्व कसे खंबीर हवे ! आमच्या अजिंक्य सारखे. काय देखणा आणी करारी दिसलाय तो 'वासुदेव बळवंत' मध्ये." इती रमेश देव.

"आमचा सुशांतसुद्धा देखणा आणी करारीच आहे म्हणले" किरणरावांचा संयम आता सुटायला लागला होता.

अचानक जोरात टेबल ठोकल्याचा आवाज झाला. सर्वांनी बघितले तर जयश्रीताई हातानी सगळ्यांना गप्प बसायला सांगत होत्या. गंमत काय झाली होती, की त्या गेले अर्धा तास बोलण्यासाठी तोंड उघडत होत्या पण त्यांच्या तोंडातुन शब्द बाहेर पडेपर्यंत त्या जांभई देत आहेत समजुन दुसराच कोणीतरी बोलायला सुरुवात करत होता.

"अशी असावी सासु नंतर एका मुत्सद्दी आणी खंबीर स्त्री ची प्रतिमा बनली आहे माझी." एकदाचा त्यांचा आवाज बाहेर आला.

"बाई अहो मग असे असेल तर आम्ही तुमच्या चार काय चारशे पावले पुढे हाये म्हणायचे की तिच्यामायला." कोपर्‍यातुन निळुभाउ म्हणाले.

"माझ्या मते आपण एक भक्कम पाठींबा असलेल्या आणी सामान्य जनतेच्या मनापर्यंत पोचलेल्या स्त्रीला निवडणुकीला उभे करावे. मी आणी तळवळकर जीम ह्यासाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न करु. संजय सुरकर साथीला असेलच." स्मिताताई म्हणाल्या.

"पण स्त्रीच का ? एखादा पुरुष सुद्धा ह्या किंवा ह्यापेक्षा जास्ती गुणांनी युक्त असु शकतो. आणी आधार म्हणाल तर आज मी एकट्याच्या जिवावर अख्खा सिनेमा ओढुन नेतोय." एकदाचे अनासपुरे रेकले.

"ह्या सगळ्या गुणांनी आम्हे सुद्धा युक्त आहोत." भरत जाधव.

"च्यायला श्रीखंडाची जाहिरात एकल्या सारखे वाटले." निळुभाउ.

"हे बघा, जनतेच्या हिताचे आणी योग्य निर्णय राबवु शकेल असा माणुस तिकडे गेला पाहिजे. जेष्ठ असेल तर अजुनच उत्तम" श्रीराम लागु म्हणाले.

"निवडणुक लढवायची आहे 'काचेचा चंद्र' पुन्हा रंगभुमीवर आणायचे नाहिये डॉक्टर." जयश्रीताई पुन्हा बोलत्या झाल्या.

" मी काय म्हणतो..." महेश.

"काहि म्हणु नका. आधीच तो जबरदस्त काढुन डोक्याला त्रास दिला आहेत तेव्हडा बास नाहिये का ?" स्मिताताई.

'कॉलेजच्या गोष्टी' काढण्यापेक्षा ते बरे नाही का ? महेश.

"विमानाच्या तिकिटाशिवाय उदघाटनाला यायला जमणार नाही म्हणणारे आता जनतेची सेवा करणार म्हणे." किरण शांताराम.

वैयक्तीक आरोप प्रत्यारोप चालु असतानाच अचानक हॉल मध्ये शांतता पसरली. १० मिनिटांनी आम्ही आत डोकावुन पाहिले तो हॉल रिकामा ! सेवकाकडे विचारणा करता असे कळाले की 'नाना' येतोय म्हणुन फोन आला होता म्हणे.
______________________________________________________

संदर्भ :- काहि काळापुर्वी शिरीष कणेकर ह्यांनी मराठी निर्माते 'टायटॅनीक' वरुन मराठी चित्रपट काढण्याचे ठरवतात असा एक छोटेखानी विनोदी लेख लिहिला होता. त्या लेखाच्या आधारे हा निवडणुक तिकिटाचा प्रसंग रंगवण्याचा प्रयत्न केला आहे.

विनोदमौजमजाचित्रपटविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

13 Apr 2009 - 12:19 pm | मदनबाण

डॅम इट... पराराव भट्टी अगदी मस्त जमलीय !!! :)

(झपाटलेला ५चा अक्षरी)
मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

बबलु's picture

13 Apr 2009 - 12:30 pm | बबलु

छान झालाय लेख.

....बबलु

कुंदन's picture

13 Apr 2009 - 12:38 pm | कुंदन

येउं देत अजुन असेच मस्त मस्त लेख.....

नितिन थत्ते's picture

13 Apr 2009 - 12:40 pm | नितिन थत्ते

जबरा

खराटा
(रंग माझा वेगळा)

आंबोळी's picture

13 Apr 2009 - 12:42 pm | आंबोळी

छान झालय रे परा.
प्रो.आंबोळी

दशानन's picture

13 Apr 2009 - 12:42 pm | दशानन

लै भारी !

;)

निखिल देशपांडे's picture

13 Apr 2009 - 1:01 pm | निखिल देशपांडे

परशेठ मस्त जमलाय लेख...
"डॅम इट !"
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

दिपक's picture

13 Apr 2009 - 1:13 pm | दिपक

शिर्षक वाचल्याबरोबरच पहिली ईनीस्पेक्टर महेश जाधवांचीच आठवण झाली. :)

पराभाऊ जबरदस्तच आहे हा लेख.. अजुन येउद्यात असंच मस्त..

डॅम ईट!

धमाल मुलगा's picture

13 Apr 2009 - 2:35 pm | धमाल मुलगा

सह्ही रेवड्या उडवल्यास :)

ओह डॅम इट्ट! पण तू ह्या जाधवसाहेबांना नाही आणलंस ते?
आणि नार्वेकरांना? :)

अवांतरः यशवंत दत्त असायला हवे होते नाही का?? म्हणाले असते, "बास!!! गप्प बसा आता, नाहीतर सत्कार करुन टाकू"

अतिअवांतरः मारुती कांबळेचं काय झालं?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अवलिया's picture

13 Apr 2009 - 2:59 pm | अवलिया

मस्त रे परा ... अजुन येवु दे असेच खुमासदार :)

--अवलिया

योगी९००'s picture

13 Apr 2009 - 4:34 pm | योगी९००

मस्त जमलाय लेख...

"आमचा सुशांतसुद्धा देखणा आणी करारीच आहे म्हणले" किरणरावांचा संयम आता सुटायला लागला होता.
आहे नाही होता असे म्हणावे. सुशांत रे काही वर्षापुर्वी ह्रदयविकाराने गेला.

खादाडमाऊ

परिकथेतील राजकुमार's picture

13 Apr 2009 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार

अरे बाप रे, मला हे खरच माहित न्हवते.
माफी असावी.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

शितल's picture

13 Apr 2009 - 6:38 pm | शितल

मस्त लिहिले आहेस रे. :)

प्राजु's picture

14 Apr 2009 - 6:18 am | प्राजु

पहिलाच प्रयत्न असेल तर तो १००% यशस्वी झालेला आहे महाराजा. :)
उत्तम. येऊदे असेच अजून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

14 Apr 2009 - 6:55 am | नंदन

धमाल आली वाचून.

"च्यायला श्रीखंडाची जाहिरात एकल्या सारखे वाटले." निळुभाउ.
- =))

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2009 - 10:42 am | परिकथेतील राजकुमार

प्रतिक्रीया देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार ___/\___

आभारी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

विशाल कुलकर्णी's picture

14 Apr 2009 - 12:59 pm | विशाल कुलकर्णी

पर्‍या, मस्त सुटलाहेस, कल्ला एकदम !! =)) =D>
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

अनिल हटेला's picture

14 Apr 2009 - 3:59 pm | अनिल हटेला

=D> =D>
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

उत्खनक's picture

19 Jun 2015 - 3:18 pm | उत्खनक

झकास! =))