ट्र्कच्या मागे..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
31 Jan 2008 - 12:35 am

मंडळी,
आपण रस्त्यावरून जाता येता ट्रकच्या मागे लिहिलेली वाक्ये वाचतो. कधि कधी खूप गमतीदार असतात तर कधी आशिर्वाद मागणारी असतात. कधी कधी मैत्रीवर असतात. कधि कधी मनाला एकदम भिडतात. इथे तुम्ही वाचलेल्या ओळी इतरांसाठी लिहा..

मी वाचलेली,
" मेरा भारत महान"
आणि लगेचच खाली होतं
"Highly Inflamable"

तर ,
" मेरा भारत महान Highly Inflamable" असं वाचलं गेलं.. आणि हसू आलं.

- प्राजु.

विनोदप्रतिसाद

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

31 Jan 2008 - 12:54 am | चतुरंग

प्रियालि, शांति, अर्पणा, संजु, अजु, विजु
थांब लक्षुमि कुकुं लावते!

चतुरंग

स्वाती राजेश's picture

31 Jan 2008 - 1:05 am | स्वाती राजेश

मिनु, पिंकी, बबलु,राजु....
महाराष्ट्र बँकेच्या सौजन्याने.

...(पु.ल.देशपांडे यांच्या एका पुस्तकातील)

आई तुझा आर्शिवाद.

ए ३० का?

बुरी नजर से देखनेवाले तेरा मुह काला.

संजय अभ्यंकर's picture

31 Jan 2008 - 1:21 am | संजय अभ्यंकर

दिल्ली , पंजाबकडे...

१) मोटर मित्रांदी, मा शेरा वालींदी.

२) सोनु ते पप्पुदि गड्डी.

३) मन चांगा तो कटोरेमे गंगा

महाराष्ट्रात...

१) १३ मेरा ७

२) आई अप्पांचा आशिर्वाद

तामिळ्नाडुत..

१) वेळिये वेळ्मुडन (सर्वांचे कल्याण होवो)

२) ओरु कुटुंबम ओरु वारिसु (एक कुटुंब एक वारस)

(भटक्या) संजय अभ्यंकर

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2008 - 1:31 am | llपुण्याचे पेशवेll

'मुलगी शिकली प्रगती झाली'
'आण्णांचा सावधान आशिर्वाद'
पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस's picture

31 Jan 2008 - 5:26 am | पिवळा डांबिस

पेहेले राम बोलो,
फिर दरवाजा खोलो||

मुंबयकर,
पिवळा डाम्बिस

पिवळा डांबिस's picture

31 Jan 2008 - 5:31 am | पिवळा डांबिस

उगीच हॉर्न वाजवू नये
तुला चिरडायला एक सेकंद पुरेल

आपला उन्मत्त,
पिवळा डांबिस

प्राजु's picture

31 Jan 2008 - 6:34 am | प्राजु

एका टेम्पोच्या मागे..

आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!

- प्राजु

प्राजु's picture

31 Jan 2008 - 6:36 am | प्राजु

त्या पोलिओ लसिकरणा दरम्यान एका सिटीबस वर..

शहाणी आई बाळाला पोलिओचा डोस देई..

- प्राजु

अनिता's picture

31 Jan 2008 - 8:01 am | अनिता

१) भोपू बजाव * OK * गाडी भगाव
२) HORN मेरा भारत महान PLEASE

नंदन's picture

31 Jan 2008 - 8:37 am | नंदन

पंजाब --
(हृदयाची खूण) V १३, ८० V तेरे --> दिल वी तेरा, अस्सी वी तेरे

महाराष्ट्र --

नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
पाहा पन प्रेमाणे (देखो मगर प्यारसे ची मराठी आवृत्ती)

अवांतर --
पुण्यात एका रिक्षाच्या मागे 'शुक, शुक' अशी हाक न मारता 'अहो रिक्षावाले' अशी हाक मारावी अशी (नम्र) सूचना पहावयास मिळाली, असं कुठंतरी नुकतंच वाचण्यात आलं :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर's picture

31 Jan 2008 - 9:05 am | विसोबा खेचर

वा वा! प्राजू, छान संकलन..! :)

ही अजून काही वाक्ये-

बुरी नजरवाले तेरा मू काला! :)

देखो मगर प्यारसे!

आपला,
(ट्रक ड्रायव्हर) तात्या.

बेसनलाडू's picture

31 Jan 2008 - 9:13 am | बेसनलाडू

यावरून आठवले -
ट्रकएव्हढ्या मोठ्या एका स्कूलबसच्या मागे -
मुझे मत छेडो, मैं तो बच्चोंवाली हूं :))
(बच्चा)बेसनलाडू

चतुरंग's picture

31 Jan 2008 - 9:35 am | चतुरंग

"हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"

रिक्षाच्या मागे - "यायचं, का जाऊ?"
"बाबूजी धिरे चलना!"

चतुरंग

तात्या विंचू's picture

31 Jan 2008 - 10:47 am | तात्या विंचू

खालील हसरे भुत मला एका ट्रकच्या मागे लावलेले दिसले......
फोटोग्राफर : माझी वहिनि

इनोबा म्हणे's picture

31 Jan 2008 - 10:57 am | इनोबा म्हणे

पुण्यातील एका रिक्षामागे लिहीलेले हे वाक्य-
"देवा! सगळ्यांचं भलं कर,पण सुरुवात माझ्यापासून कर."

एका टेम्पोवाल्याने त्याच्या टेम्पोवर लिहीलेले हे वाक्य-
"देनेवाला तो महान है,पर जलनेवालोसे परेशान है|"

(पक्का पुणेरी) -इनोबा

विवेकवि's picture

31 Jan 2008 - 6:47 pm | विवेकवि

अस नेहमीच वाचायला मिळते

ह्यात नविन काय?

आपली ,

मिनु जोशी.

केशवराव's picture

1 Feb 2008 - 8:34 am | केशवराव

मिनु,
असं का म्हणतेस ? संकलीत साहित्य असेच असते. संकलन तर छान आहे ना?
ट्रक साहित्य प्रेमींनो तुमचे चालु द्या .

सुधारक's picture

1 Feb 2008 - 9:23 am | सुधारक

हीच खरी दौलत !

बन्ड्या's picture

1 Feb 2008 - 7:55 pm | बन्ड्या

आबा कावतोय...!
ढुन्ड्ते रहोगे.....!

आपला (ट्रान्स्पोर्ट )..बन्ड्या

बन्ड्या's picture

1 Feb 2008 - 7:55 pm | बन्ड्या

आबा कावतोय...!
ढुन्ड्ते रहोगे.....!

आपला .....(ट्रान्स्पोर्ट )बन्ड्या

विद्याधर३१'s picture

1 Feb 2008 - 11:14 pm | विद्याधर३१

लेटस चिन्गळी............

म्हणजे काय कोणास ठावूक.

विद्याधर

प्राजु's picture

1 Feb 2008 - 11:23 pm | प्राजु

अच्छा, टाटा, फिर मिलेंगे..

आण्णांचा, (तात्यांचा/ आबांचा/ आप्पांचा/ आणखी ब-याच कोणाचा) आशिर्वाद.

- प्राजु

देवदत्त's picture

1 Feb 2008 - 11:36 pm | देवदत्त

नागपूर-चंद्रपूर रस्त्यावर एका ट्रकमागे लिहिले होते-

"चमचे की है तीन दवाई
जूता, चप्पल और पिटाई"

प्राजु's picture

1 Feb 2008 - 11:38 pm | प्राजु

एका ट्र्कच्या मागे..

हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...

- प्राजु

वरदा's picture

2 Feb 2008 - 1:35 am | वरदा

झकास आहेत

धमाल मुलगा's picture

11 Feb 2008 - 11:32 am | धमाल मुलगा

कत्ल कर आ॑खो॑से, तलवार मे॑ क्या रख्खा है ! सैर कर ट्रक से, कार मे॑ क्या रख्खा है !!!

लय भन्नाट...येडाच झालो मी :)

-ध मा ल.

प्रभाकर पेठकर's picture

11 Feb 2008 - 12:15 pm | प्रभाकर पेठकर

हिम्मत है तो पास (ओव्हरटेक) कर, वरना बरदाश्त कर|

हा रस्ता माझ्या बापाचा आहे.

Don'T touch me, I am not THAT type of a Car.

बँक ऑफ **** ची कृपा. पण आता कर्ज फिटले आहे.

आई जेऊ घालेना, बाप भिक्षा मागू देईना, बायको रिक्षा चालवू देईना...

एका खटारा गाडीच्या मागे...
My another car is Rolls Royce...

धमाल मुलगा's picture

11 Feb 2008 - 12:20 pm | धमाल मुलगा

हा हा हा...

आई जेऊ घालेना, बाप भिक्षा मागू देईना, बायको रिक्षा चालवू देईना...
एका खटारा गाडीच्या मागे...
My another car is Rolls Royce...

हे एकदम झकास...

अवा॑तर : श्री.पेठकर, कार्यबाहुल्यामुळे काल-परवाच्या विका॑तास भेट घडली नाही, पुढच्या च्या पुढच्या वेळी यत्न करतो. ह्यावेळी साधा फोनही करता आला नाही, क्षमस्व.

आपला
- ध मा ल.

शैलेन्द्र's picture

9 Mar 2008 - 9:55 pm | शैलेन्द्र

तु तुझ्या घरि, मि मझ्झ्या घरि, रस्त्यावर मस्ति नाही बरी

सृष्टीलावण्या's picture

10 Mar 2008 - 7:39 am | सृष्टीलावण्या

ट्रकच्या पाठी "देवाक् काळजी"...

मुलापेक्षा मुलगी बरी देते प्रकाश दोन घरी...

एका उ. भा. ट्रकच्या मागे...
खीर खाते है चम्मच से
न की हाथ से,
प्यार होत है दिल से
न की जुबां से..

दुसरे एक हमखास वाक्य

१३ मेरा ७
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

झकासराव's picture

10 Mar 2008 - 8:38 pm | झकासराव

दोन आठवड्यापुर्वीच एका ट्रकवर वाचल होत.
"जली को आग कहते है, बुझी को राख
और जो चीज तुम्हारे पास नही है जानी
उसे हम हिंदि मे दिमाग कहते है"

मी उत्सुकतेने त्या ट्रकवरची नं प्लेट पाहिली तर पासींग हरयानाच होत
पंजाबच असतं तर अजुन मोठा जोक झाला असता :)

प्राजु's picture

10 Mar 2008 - 8:44 pm | प्राजु

हे मात्र एकदम आवडूनच गेलं..... झकासराव!
- (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर's picture

10 Mar 2008 - 9:39 pm | सुधीर कांदळकर

दुल्हन
शादी हो गयी मालिक से,
ड्रायव्हर से हो गया प्यार
अब कैसे करू इंतजार?