नुसती ठिकाणं सांगतात्..आम्ही इथे अमेरिकेत बसून काय करायचं त्यांचं
प्राजु बरं झालं सांगितंलंस्...बरीच मागे गेल्याने पाहिली नाही मी रेसिपी..झकास आहे एकदम्...आता ह्या विकएन्ड ला करतेच ट्राय...
तात्या मला येत असती तर दिली असती रेसिपी ...मी झणझणीत उसळ बनवून वर कांदा टॉमॅटो, फरसाण टाकते की झाली माझी मिसळ तयार.....जास्तीत जास्त म्हणजे गोड आणि तिखट चटणी टाकते त्यावर असेल तर...
पण लोक खूप वेगवेगळे प्रकार करतात्..माझ्या एका मैत्रीणीकडे साबुदाणा, खारे शेंगदाणे वगैरे घालायचे त्यावर..
म्हणून म्हटंलं विचारून पहावं सगळ्यांना...
ठाण्याचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या मामलेदार च्या मिसळीची कृती:
साहित्य -
कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ ,बटाटे ४/५,लसुण १ मोठा गड्डा,१ बोटभर आल्याचा तुकडा
तेल १.५वाट्या,तिखट १.५वाटी,गरम मसाला ४ चमचे
१०० ग्राम पापडी,२५०ग्राम हिरवे वाटाणे,५००ग्राम फरसाण
चवीनुसार मीठ
कृती -
हिरवे वाटाणे ५/६ तास भिजत घालावेत. नंतर कुकर मधुन ३/४ शिट्ट्या देऊन शिजवावे.बटाटे उकडून घ्यावे.४/५ कांद्यातील ३ कांदे वाटून घ्यावे. लसुण व आले वाटून पेस्ट करावी,उरलेले २ कांदे बारीक चिरुन घ्यावे.
पापडी कुटून घ्यावी व पाण्यात भिजत घालावी.
एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेल तापत ठेवावे. चांगले तापले की त्यात वाटलेला कांदा घालुन परतावे,मग वाटलेला लसुण घालून परतावे. १.५ वाटी तिखटातील ३/४ वाटी त्यात घालावे व भरपुर परतावे,गरम मसाला घालुन परतावे.इतके परतावे की तेल सुटले पाहिजे.मग त्यात उकडलेले वाटाणे घालावे,पाण्यात भिजवलेली पापडी घालावी,मीठ घालावे.पाणी घालून उकळू द्यावे.
उरलेले १/२ वाटी तेल एका कढईत तापत ठेवावे.त्यात बारीक चिरलेले २ कांदे घालून परतावे,उरलेले तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हे मिश्रण वेगळे ठेवावे.
खोलगट ताटलीत आधी फरसाण,त्यावर बटाटे ,त्यावर रस्सा,आणि त्यावर कांदा घालून द्यावा.
"जादा तिखा"- ३नं हवे असेल तर वेगळी तर्री वरुन घ्यावी.
वि.सू.
१.ह्या मिसळी बरोबर पाव चांगला लागतो ,पण दही ह्या मिसळी बरोबर खाऊन तिचा अपमान करू नये.नंतर ताक प्यावे.
अतिशय महत्त्वाचे:
२.दुकानातून फरसाण घेताना त्यात गोडसर पदार्थ उदा.बेदाणे,मक्याचा चिवडा इ. न घालण्यास सांगावे.
स्वाती,
तुमची ही मिसळ झक्कास्स्स्स्स्स्च आहे.
माझ्याकडून मी ह्यात काही (माझ्या तिखट चवीशी सुसंगत असे..) बदल केले आहेत.
१) आले-लसूण बरोबर काही हिरव्या मिरच्या वाटून घेणे.
२) रंग आणि तिखटपणा ह्यांचा सुंदर प्रितीसंगम व्हावा म्हणून 'काश्मीरी मिरच्या' + 'गुंटूर मिरच्या' असे १:१ असे किंवा अधिक तिखट हवे असेल तर १:३ असे प्रमाण घ्यावे.
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
आजपर्यंत कुठल्याच पाककृतीचे मानले नाहीत इतके ह्या मिसळ पाककृतीचे अगणित धन्यवाद.
तुमच्या मेनू मधे ही डीश ऍड करा.. भारतात आलोकी लगेच भेट देतो..
स्वातीताई.. तोंडाला पाणी सुटल. नुसता जळफळाट झाला.. साला इथे ..च्या मारी. ह्या युकेच्या फुल्या फुल्य फुल्या फुल्या..चांगले फरसाण, पापडी मिळतील तर शप्पथ
स्वातीताई कट्ट्याच्या आमंत्रणा बद्दल मनापासून धन्यवाद..
पण आता भारतात परतायचे दिवस जवळ आले आहेत त्याची आवरा आवर चालू आहे..तेव्हा तुम्हीच सगळे भारतात या झकास कट्टा जमवू..
(२० दिवसांनी भारतात परतणारा) केशवसुमार
रंग आणि तिखटपणा ह्यांचा सुंदर प्रितीसंगम व्हावा म्हणून 'काश्मीरी मिरच्या' + 'गुंटूर मिरच्या' असे १:१ असे किंवा अधिक तिखट हवे असेल तर १:३ असे प्रमाण घ्यावे
मी सहसा बेडगी आणि संकेश्वरी यांचे मिश्रण वापरतो. आता तुमच्या प्रतिसादाप्रमाणे काश्मिरी + गुंटूर वापरून बघेन.
(लवंगी मिरची आवडणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
असे वर्णन वाचूनच आता परत एकदा मिसळ करावीशी आणि खावीशी वाटावी असे तोंडाला पाणी सुटले आहे, पण केशवसुमार म्हणतात त्याप्रमाणे जर्मनीच्याही भरपूर फुल्या फुल्या...चांगले फरसाण,पापडी,शेव मिळेल तर शपथ!
स्वाती

काय पण झ्याक लिवलय राव!! तोंडाला पाणी सुटलं.. बाकी स्वतीताई रेसिपि बी झ्याक :)
-(झ्याकप्याक)ऋषिकेश

प्रभाकररव, वेळ जात नाहिये का? कशाला असं झक्क्क्क्कास वर्णन लिहायचं.. आणि आम्हांला जळवायचं?
असो.. वर्णन बाकी एक्दमच.. भन्नाट..!

असं उन्मनी अवस्थेत नेणारं लिहू नका हो आणि ते ही सकाळी, सकाळी!
अहो हे वाचून मी आज माझ्या प्रेझेंटेशनला गेलो आणि इंट्रोडक्शन मधे 'सँपल्-पाव' असं काहीतरी बरळलो!
माझा मॅनेजर मराठी नसला तरी भारतीय आहे, काय "सँपल" माणूस आहे असा चेहरा करुन तो बघायलाच लागला!!
रविवार दि. ३ फेब्रु. २००८ रोजी मी घरी मिसळपाव करणार आहे. अस्सल कोल्हापूरी..! तेव्हा इथे मँचेस्टर मध्ये मिसळ कट्टा (बर्फात) करू. आपण सर्वांनी जरूर यावे. आपापल्या भाडे खर्चाने यावे ही विनंती...
तुमचे निमंत्रण म्हणजे माझ्या सारख्या गरीब भारतियाला 'न खात्या देवाला नैवेद्य' असे आहे. तरी पण आपल्या निमंत्रणात आपल्या मनाचा मोठेपणा दिसतो. मनापासून धन्यवाद.
मामिची पाककृती येथे दिल्याबद्दल तुझे आभार मानून परके करत नाही!
इथे केव्हा येते आहेस? तू इथे आल्यावर आपली मामिची एक डेट नक्की! :)
तुझा,
(शाळूसोबती) तात्या.
प्रभाकरशेठ,
आपण मिपाचे सभासदत्व घेऊन मिपाच्या टपरीवर नव्या जोमाने कार्यरत झालात याचे बरे वाटले. आपलीही मिसळीची पाककृती झक्कासच आहे! अर्थात, अहो बोलूनचालून पट्टीचे बल्लवाचार्य तुम्ही! त्यामुळे आपली पाककृती झकासच असणार हे ओघानेच आले. आपल्या हातची खाल्लेली बिर्याणी आणि सुकामटण आजही आम्हाला याद आहे. आता आपल्या हातचं सुग्रास भोजन चापायला पुन्हा पुण्याला केव्हा येऊ तेवढं सांगा! :) बाय द वे, आपण, आपल्या सौ, आणि आपले चिरंजीव ठाण्याला एकदा आमच्यासोबत मिपा खायला आला होतात ते आम्हाला अजूनही याद आहे! पुन्हा केव्हा येता तेवढं सांगा! आम्ही वाट पाहात आहोत! अवांतर - बाय द वे, वहिनींना भेटून तेव्हा खूप बरं वाटलं होतं. एवढ्या साध्या, सोज्वळ बायकोला इतका डांबीस नवरा कसा काय मिळाला, देव जाणे! :) असो..!
मंडळी,
इथे दिवसेंदिवस मिपाच्या अधिकाधिक पाककृती येत आहेत हे पाहून संतोष वाटला. प्राजूच्या घरीही मिपा खायला जायची माझी इच्छा आहे, परंतु अमेरिकेचे विमान भाडे आमच्यासारख्या गरीबाला कसे परवडणार? त्यामुळे प्राजूकडे जायचं सध्या रहीत केलं आहे! :)
असो,
सगळ्यांनी मिळून मिपाधर्म वाढवावा हीच सदिच्छा!
आपला,
(मिसळवेडा) तात्या.
--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे |
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)
आपण मिपाचे सभासदत्व घेऊन मिपाच्या टपरीवर नव्या जोमाने कार्यरत झालात याचे बरे वाटले. तात्यांचे कार्य आणि आम्ही येणार नाही? कसे शक्य आहे.....?
आपलीही मिसळीची पाककृती झक्कासच आहे!
ही पाककृती माझी नाही हे नम्रपणे सांगू इच्छितो. स्वाती दिनेश ह्यांच्या कडूनच मनोगतावर शिकलो. मिसळीच्या पाककृतीचे श्रेय १००टक्के त्यांचेच आहे. आता आपल्या हातचं सुग्रास भोजन चापायला पुन्हा पुण्याला केव्हा येऊ तेवढं सांगा!
कधीही या. मात्र मांसाहारी डोहाळजेवणासाठी आधी फोन करून सर्व 'आलबेल' आहे ह्याची खातरजमा करून घ्यावी. एवढ्या साध्या, सोज्वळ बायकोला इतका डांबीस नवरा कसा काय मिळाला, देव जाणे!
ह्हा:..ह्हा:...ह्हा:.... दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं.
या वीकएंडला मी मिसळ करून पाहीन. जर चव बराब्बर जमली तर माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायांत घालीन!!
अहो, गेली एकवीस वर्षे मी या मिसळीसाठी तळमळतोय हो! :(((
कॉलेजात असतांना ती आमचे मुख्य अन्न होती!!
..
..
आधी प्रत्येक ट्रीपला ठाण्याला जायचं जमायचंच असं नाही, आणि नंतरनंतर बाधण्याची (मिसळ नाही हो, तिथलं पाणी)भिती वाटे.
आजवर हताश असलेला,:(
पण आता हुरूप आलेला,:)
पिवळा डांबिस
आता पर्यंत हजारदा ठाण्यास गेलो असेन.
मा.मि.ची किर्ती लहानपणा पासुन ऐकतोय.
परंतु, त्याचा पत्ता नेमका सापडत नाही.
जेव्हां वेळ असतो तेव्हा हातात भलि मोठी टूलबॅग असते, ती घेउन पत्ताही शोधता येत नाही.
त्यामुळे मा.मि.ची तल्लफ त्या कुंजविहारीचा वडा खाउन भागवतो.
आता मात्र ठरलं. शेंडी तुटो वा पारंबी! मा.मि.चा पत्ता शोधणारच.
साला इथे ..च्या मारी. ह्या युकेच्या फुल्या फुल्य फुल्या फुल्या..चांगले फरसाण, पापडी मिळतील तर शप्पथ
केशवकुमार तुम्ही यु,के. मधे कुठे राहता माहीत नाही. पण इथे "साया" मधे फरसाण मिळतात( चांगल्या प्रकारचे).शिवाय हलदीरामचे सर्व प्रॉडक्ट मिळतात.
साया ची दुकाने खूप ठिकाणी आहेत.
माझ्या घरी जवळजवळ आठवड्याला मिसळ बनतेच. अगदी "कोल्हापूरी".
आता जेव्हा कधी यु.के. मधे याल तेव्हा साया ला भेट द्या.
माझ्याघरी मिसळ खायलासुध्दा....
नावच एक खेड आहे मॅन्चेस्टर नावाच्या शहराजवळ .. तिथे राहतात आस्मादिक.. काय म्हन्जे काय बी मिळत नाय स्वातीताई इथे( दारू आणि प्राण्यांची प्रेते सोडून) बाजार हटिला एतवारी मॅन्चेस्टरला २० मैलावर जाव लागतया..
(युके मधला खेडूत) केशवसुमार
बाय द वे.. बर्मिंगहाम मधून काल झकास फरसाण आणि पापडी आलेली आहे ( २ पाउंडाचा फरसाण आणि २५ पाउंड्चा प्रवास, काय करणास साला जिभेचे चोचले ) त्यामुळे ह्या शनिवारी हुर्रे.. ढाकू माकूम ढाकू माकूम ढा.....मिसळ पाव
(आनंदित)केशवसुमार
(सगळ्यांच्या मिपाच्या नावाने दोन घास काढून ठेवतो अस हवर्या सारख बघू नका.. नाहीतर साला आमचंच जुने एक विडंबन म्हणायची वेळा यायची
मिसळीवर मज राग भयंकर
दुसर्या दिवशी आग भयंकर)
म्हणजे आता आपले यु.के. आणि यु. एस. मधे दोन नविन मि. पा. कट्टे तयार झाले म्हणायचे....आता आपल्याला ठाणे आणि कोल्हापुरच्या मिसळीच्या ठिकाणांची नुसती नावं ऐकून गप्पं बसायला नको...स्वाती ती रेसिपि करून पाहिली ह्या विकएन्ड्ला...एकदम झकास...थँक्यू गं...
म्हणजे आता आपले यु.के. आणि यु. एस. मधे दोन नविन मि. पा. कट्टे तयार झाले म्हणायचे....
वा वा! वरील वाक्य नुसतं वाचूनच सार्थक झाल्यासारखं वाटलं!
मिपाधर्म वाढवा, महाराष्ट्र धर्म वाढवा!
मिसळपाव मस्तकी धरा, अवघा हलकल्लोळ करा...! :)
हे असे जगभर मिपाकट्टे भरलेले पाहावेत हीच इच्छा होती, संत तात्याबांचे हेच जिवीतकार्य होते, आणि याच करता तात्याबांनी अवतार घेतला होता! आता आमचे कार्य पूर्ण होत आले! :)
वरदा, प्राजू, तुमच्यासारख्या प्रामाणिक मिसळधर्मीयांच्या हाती मिपा सोपवून आता मी सुखाने वैकुंठात जाईन! (तुकोबांकरता जसा आला होता तसा एखादा गरूड उडत उडत येण्याची वाट पाहतो आहे! :)
हेचि दान देगा देवा, मिपाचा विसर न व्हावा
विसर न व्हावा, देवा विसर न व्हावा
मिसळ खाईन आवडी,
हेची माझी सर्व जोडी....
माझी सर्व जोडी, हेचि माझी सर्व जोडी..
सर्वांनी आपापले राग लोभ प्रेम माया ममता आदि षड्रिपू मिसळीच्या रश्श्यात बुडवावेत आणि मिसळीशी एकरूप व्हावे हीच संत तात्याबांनी जगाला दिलेली शिकवण सर्वांनी आचरणात आणावी! :)
आता मिसळीकडे पाहून संत तात्याबा इतकंच म्हणतील,
भेटी लागी जीवा, लागलिसे आस!
:)
आपला,
(मिपाधर्मी) तात्या.
लै भारी 6 Feb 2008 - 4:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे असे जगभर मिपाकट्टे भरलेले पाहावेत हीच इच्छा होती, संत तात्याबांचे हेच जिवीतकार्य होते, आणि याच करता तात्याबांनी अवतार घेतला होता! आता आमचे कार्य पूर्ण होत आले! :)वरदा, प्राजू, तुमच्यासारख्या प्रामाणिक मिसळधर्मीयांच्या हाती मिपा सोपवून आता मी सुखाने वैकुंठात जाईन! (तुकोबांकरता जसा आला होता तसा एखादा गरूड उडत उडत येण्याची वाट पाहतो आहे! :)
हाहाहाहा)))))))ह. ह. पु. वा.
तुम्ही जर वैकु॑ठाची भाषा करायला लागलात तर आम्हा बालका॑चे कस॑ होणार. हे असल॑ हृदयाला घर॑ पाडणारे बोल सोडा तात्याबा !
अहो, तुम्ही वैकु॑ठाला गेलात तर आम्हाला तर्रीदार लेखन कुठुन नशीबी व्हावे? तिखटजाळ प्रतिक्रिया कुठे वाचायला जायच॑ आम्ही पामरा॑नी? (आयला हे लै म्ह॑जी लैच स्वार्थी होतय काय?)
हा॑...कस॑ होणार त्या मामलेदाराच॑? तुमच्याशिवाय त्याच्या मिसळीची खुमारी काय रहाणार?
----
बाकी हे एकदम झक्कास हा॑... यु.के. आणि यु.एस. मध्ये मिपाकट्टे !!! येकदम ज॑क्शन वाटल॑ बॉ :)
अहो आत्ता कुठे आम्ही तुमच्याकडून शिकायला सुरुवात केलेय्... ही काय निर्वाणिची भाषा....आपला ठाण्याचा कट्टा कोण सांभाळणार मग?
ते काही नाही सगळे मिळून धमाल करूया असं लिहा....हे सोपवून मोकळं होणं काही चालणार नाही.....
श्री. केशवसुमार,
तुमच्या सर्व फुल्या-फुल्यांना मी 'फुले' समजून स्विकारले आहे. मिसळीच्या तिखट तर्री इतकेच आपले मिसळीवरील प्रेम मनस्वी आहे ह्याची खात्री पटली.
श्री. विसोबा खेचर,
पुण्यात कट्टा जमवाच. सर्व उपस्थितांना स्वखर्चात मिसळ खाऊ घालेन.
श्री. चतुरंग (आणि इतर मिसळप्रेमी)
कधीही या. एकत्र बसून मिसळ चापू.
प्रतिक्रिया
30 Jan 2008 - 11:09 pm | पिवळा डांबिस
नुसते चांगली मिसळ मिळणारया हाटेलांची नामावळी काय उपयोगी?
नुसतं अनिवासी लोकांना जळवायचं लक्षण!
रेसिपी द्या म्हणजे घरी ट्राय तरी करू!
30 Jan 2008 - 11:13 pm | विसोबा खेचर
पिवळ्या डांबिसाशी सहमत आहे! :)
आपला,
(हिरवा हलकट!) तात्या.
30 Jan 2008 - 11:12 pm | विसोबा खेचर
वरदा,
प्रत्येकाने आपापली मिसळ-पाककृती येथे द्यावी ही तुझी कल्पना छानच आहे. परंतु प्रथम तुझी मिसळीची पाककृती येथे देऊन याची सुरवात तूच करावीस असे वाटते! :)
तात्या.
30 Jan 2008 - 11:12 pm | प्राजु
वरदा.. स्वातीने रेसिपी दिली आहे कोल्हापूरी मिसळीची. बघ एकदा नीट. भन्नाट आहे. नक्की करून बघ. आपण अनिवासी आहोत हे लक्षातच नाही रहात.
(मिसळप्रेमी) प्राजु
31 Jan 2008 - 10:41 pm | वरदा
नुसती ठिकाणं सांगतात्..आम्ही इथे अमेरिकेत बसून काय करायचं त्यांचं
प्राजु बरं झालं सांगितंलंस्...बरीच मागे गेल्याने पाहिली नाही मी रेसिपी..झकास आहे एकदम्...आता ह्या विकएन्ड ला करतेच ट्राय...
तात्या मला येत असती तर दिली असती रेसिपी ...मी झणझणीत उसळ बनवून वर कांदा टॉमॅटो, फरसाण टाकते की झाली माझी मिसळ तयार.....जास्तीत जास्त म्हणजे गोड आणि तिखट चटणी टाकते त्यावर असेल तर...
पण लोक खूप वेगवेगळे प्रकार करतात्..माझ्या एका मैत्रीणीकडे साबुदाणा, खारे शेंगदाणे वगैरे घालायचे त्यावर..
म्हणून म्हटंलं विचारून पहावं सगळ्यांना...
1 Feb 2008 - 2:06 pm | स्वाती दिनेश
ठाण्याचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या मामलेदार च्या मिसळीची कृती:
साहित्य -
कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ ,बटाटे ४/५,लसुण १ मोठा गड्डा,१ बोटभर आल्याचा तुकडा
तेल १.५वाट्या,तिखट १.५वाटी,गरम मसाला ४ चमचे
१०० ग्राम पापडी,२५०ग्राम हिरवे वाटाणे,५००ग्राम फरसाण
चवीनुसार मीठ
कृती -
हिरवे वाटाणे ५/६ तास भिजत घालावेत. नंतर कुकर मधुन ३/४ शिट्ट्या देऊन शिजवावे.बटाटे उकडून घ्यावे.४/५ कांद्यातील ३ कांदे वाटून घ्यावे. लसुण व आले वाटून पेस्ट करावी,उरलेले २ कांदे बारीक चिरुन घ्यावे.
पापडी कुटून घ्यावी व पाण्यात भिजत घालावी.
एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेल तापत ठेवावे. चांगले तापले की त्यात वाटलेला कांदा घालुन परतावे,मग वाटलेला लसुण घालून परतावे. १.५ वाटी तिखटातील ३/४ वाटी त्यात घालावे व भरपुर परतावे,गरम मसाला घालुन परतावे.इतके परतावे की तेल सुटले पाहिजे.मग त्यात उकडलेले वाटाणे घालावे,पाण्यात भिजवलेली पापडी घालावी,मीठ घालावे.पाणी घालून उकळू द्यावे.
उरलेले १/२ वाटी तेल एका कढईत तापत ठेवावे.त्यात बारीक चिरलेले २ कांदे घालून परतावे,उरलेले तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हे मिश्रण वेगळे ठेवावे.
वरुन घालायसाठी कांदे बारीक चिरावे,उकडलेले बटाटे चिरावे.
खोलगट ताटलीत आधी फरसाण,त्यावर बटाटे ,त्यावर रस्सा,आणि त्यावर कांदा घालून द्यावा.
"जादा तिखा"- ३नं हवे असेल तर वेगळी तर्री वरुन घ्यावी.
वि.सू.
१.ह्या मिसळी बरोबर पाव चांगला लागतो ,पण दही ह्या मिसळी बरोबर खाऊन तिचा अपमान करू नये.नंतर ताक प्यावे.
अतिशय महत्त्वाचे:
२.दुकानातून फरसाण घेताना त्यात गोडसर पदार्थ उदा.बेदाणे,मक्याचा चिवडा इ. न घालण्यास सांगावे.
1 Feb 2008 - 10:30 pm | सुनील
स्वाती,
ह्या महिनाअखेर भारतात जाईन तेव्हा मामलेदारची भेट पहिली!
(माममेदारप्रेमी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Feb 2008 - 2:54 pm | प्रभाकर पेठकर
स्वाती,
तुमची ही मिसळ झक्कास्स्स्स्स्स्च आहे.
माझ्याकडून मी ह्यात काही (माझ्या तिखट चवीशी सुसंगत असे..) बदल केले आहेत.
१) आले-लसूण बरोबर काही हिरव्या मिरच्या वाटून घेणे.
२) रंग आणि तिखटपणा ह्यांचा सुंदर प्रितीसंगम व्हावा म्हणून 'काश्मीरी मिरच्या' + 'गुंटूर मिरच्या' असे १:१ असे किंवा अधिक तिखट हवे असेल तर १:३ असे प्रमाण घ्यावे.
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
आजपर्यंत कुठल्याच पाककृतीचे मानले नाहीत इतके ह्या मिसळ पाककृतीचे अगणित धन्यवाद.
1 Feb 2008 - 9:21 pm | केशवसुमार
तुमच्या मेनू मधे ही डीश ऍड करा.. भारतात आलोकी लगेच भेट देतो..
स्वातीताई.. तोंडाला पाणी सुटल. नुसता जळफळाट झाला.. साला इथे ..च्या मारी. ह्या युकेच्या फुल्या फुल्य फुल्या फुल्या..चांगले फरसाण, पापडी मिळतील तर शप्पथ
1 Feb 2008 - 11:42 pm | स्वाती दिनेश
साला इथे ..च्या मारी. ह्या युकेच्या फुल्या फुल्य फुल्या फुल्या..चांगले फरसाण, पापडी मिळतील तर शप्पथ
केशवसुमार, अगदी सहमत!
फक्त युके ऐवजी जर्मनी वाचा...
स्वाती
अवांतरः येता का युकेतून जर्मनीला एखाद्या विकेंडला,मिसळ कट्टा करू,:)
2 Feb 2008 - 9:42 am | केशवसुमार
स्वातीताई कट्ट्याच्या आमंत्रणा बद्दल मनापासून धन्यवाद..
पण आता भारतात परतायचे दिवस जवळ आले आहेत त्याची आवरा आवर चालू आहे..तेव्हा तुम्हीच सगळे भारतात या झकास कट्टा जमवू..
(२० दिवसांनी भारतात परतणारा) केशवसुमार
1 Feb 2008 - 10:27 pm | सुनील
रंग आणि तिखटपणा ह्यांचा सुंदर प्रितीसंगम व्हावा म्हणून 'काश्मीरी मिरच्या' + 'गुंटूर मिरच्या' असे १:१ असे किंवा अधिक तिखट हवे असेल तर १:३ असे प्रमाण घ्यावे
मी सहसा बेडगी आणि संकेश्वरी यांचे मिश्रण वापरतो. आता तुमच्या प्रतिसादाप्रमाणे काश्मिरी + गुंटूर वापरून बघेन.
(लवंगी मिरची आवडणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Feb 2008 - 11:39 pm | स्वाती दिनेश
असे वर्णन वाचूनच आता परत एकदा मिसळ करावीशी आणि खावीशी वाटावी असे तोंडाला पाणी सुटले आहे, पण केशवसुमार म्हणतात त्याप्रमाणे जर्मनीच्याही भरपूर फुल्या फुल्या...चांगले फरसाण,पापडी,शेव मिळेल तर शपथ!
स्वाती
1 Feb 2008 - 5:51 pm | मनिष
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
वाचुनच तोंडाला पाणी सुटले. :)
1 Feb 2008 - 5:59 pm | वरदा
मस्तंच्.... थॅन्क्यू स्वाती..आता ही पण करुन पाहीन...
1 Feb 2008 - 7:55 pm | ऋषिकेश
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
काय पण झ्याक लिवलय राव!! तोंडाला पाणी सुटलं.. बाकी स्वतीताई रेसिपि बी झ्याक :)
-(झ्याकप्याक)ऋषिकेश
1 Feb 2008 - 8:31 pm | प्राजु
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
प्रभाकररव, वेळ जात नाहिये का? कशाला असं झक्क्क्क्कास वर्णन लिहायचं.. आणि आम्हांला जळवायचं?
असो.. वर्णन बाकी एक्दमच.. भन्नाट..!
- प्राजु
1 Feb 2008 - 8:42 pm | चतुरंग
खाताना मात्र फरसाणपेक्षा 'सँपल-पाव'च जास्त आवडतो. तेजतर्राट गरमाग्रम रश्शात बुडवून बाहेर काढलेला पावाचा लालबुंद तुकडा मिसळीच्या चवीची आठवण म्हणून म्युझियममध्येच ठेवावा असा दिसतो पण हात तोंडापर्यंत जातोच आणि नाही गेला तर तोंड स्वत्व विसरुन खाली हातापर्यंत वाकते आणि पावाचा लालबुंद रमणिय तुकडा आमच्या तोंडात देहभान विसरून सामावून जातो. उरते ती फक्त त्याची आठवण आणि अवर्णनिय उन्मुक्त अवस्था........ हाय्!
असं उन्मनी अवस्थेत नेणारं लिहू नका हो आणि ते ही सकाळी, सकाळी!
अहो हे वाचून मी आज माझ्या प्रेझेंटेशनला गेलो आणि इंट्रोडक्शन मधे 'सँपल्-पाव' असं काहीतरी बरळलो!
माझा मॅनेजर मराठी नसला तरी भारतीय आहे, काय "सँपल" माणूस आहे असा चेहरा करुन तो बघायलाच लागला!!
अवांतर - हलकेच घ्या, हे सगळं उन्मनी अवस्थेत वाटून गेलं असावं - खरं खोटं "सॅंपल्-पाव"च जाणे!!
चतुरंग
1 Feb 2008 - 10:55 pm | प्रभाकर पेठकर
श्री. केशवसुमार,
ही डिश माझ्या (सिंबॉयसिस) कॅन्टीनच्या मेन्यू मध्ये डिसेंबर २००७ पासूनच ऍड केली आहे. भारतात आलात की जरूर भेट द्या.
श्री. सुनील,
गुंटूरचा 'दणका' काही औरच आहे. प्रेमातच पडाल.
श्री. मनिष,
खवैय्या त्यालाच म्हणतात.
श्री. ऋषिकेश,
ह्यात माझं श्रेय काही नाही. हा सर्व त्या प्रतिभा चेतविणार्या तेजतर्राट लालबुंद उकळत्या सँपलचा महिमा आहे.
हा: हा: प्राजु,
तुमच्या 'जळण्यात' मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो आहे.
श्री. चतुरंग,
सँपल-पावचेच प्रेझेंटेशन द्या.......सर्वांचे मन जिंकून घ्याल.
माझ्या प्रतिसादावरील सर्वांच्या प्रतिक्रियांचे मनःपूर्वक आभार.
1 Feb 2008 - 11:48 pm | प्राजु
मि.पा वरील.. मिसळप्रेमींना माझे आमंत्रण..
रविवार दि. ३ फेब्रु. २००८ रोजी मी घरी मिसळपाव करणार आहे. अस्सल कोल्हापूरी..! तेव्हा इथे मँचेस्टर मध्ये मिसळ कट्टा (बर्फात) करू. आपण सर्वांनी जरूर यावे. आपापल्या भाडे खर्चाने यावे ही विनंती...
आपली स्नेहांकित,
प्राजु.
2 Feb 2008 - 12:47 pm | प्रभाकर पेठकर
प्राजु,
तुमचे निमंत्रण म्हणजे माझ्या सारख्या गरीब भारतियाला 'न खात्या देवाला नैवेद्य' असे आहे. तरी पण आपल्या निमंत्रणात आपल्या मनाचा मोठेपणा दिसतो. मनापासून धन्यवाद.
4 Feb 2008 - 9:17 pm | केशवसुमार
पोगरॅम झाला की नाय? कशी झालती मिसळ.. नीदान फुटु तरी दावा समद्यासनी..
(अधाशी)केशवसुमार
5 Feb 2008 - 12:22 am | प्राजु
झाला रे.. एकदम फुल्टूच झाला..
लविन फोटोही इथे..
वरदा,
वाट पाहीली बाई तुझी येशील म्हणून.. पण मग नाहिस ना आली मग हा घास तुझा अस समजून मी च खाल्ली मिसळ तुझ्या वाटणीची...:)))
- प्राजु
2 Feb 2008 - 12:29 am | विसोबा खेचर
स्वाती,
मामिची पाककृती येथे दिल्याबद्दल तुझे आभार मानून परके करत नाही!
इथे केव्हा येते आहेस? तू इथे आल्यावर आपली मामिची एक डेट नक्की! :)
तुझा,
(शाळूसोबती) तात्या.
प्रभाकरशेठ,
आपण मिपाचे सभासदत्व घेऊन मिपाच्या टपरीवर नव्या जोमाने कार्यरत झालात याचे बरे वाटले. आपलीही मिसळीची पाककृती झक्कासच आहे! अर्थात, अहो बोलूनचालून पट्टीचे बल्लवाचार्य तुम्ही! त्यामुळे आपली पाककृती झकासच असणार हे ओघानेच आले. आपल्या हातची खाल्लेली बिर्याणी आणि सुकामटण आजही आम्हाला याद आहे. आता आपल्या हातचं सुग्रास भोजन चापायला पुन्हा पुण्याला केव्हा येऊ तेवढं सांगा! :) बाय द वे, आपण, आपल्या सौ, आणि आपले चिरंजीव ठाण्याला एकदा आमच्यासोबत मिपा खायला आला होतात ते आम्हाला अजूनही याद आहे! पुन्हा केव्हा येता तेवढं सांगा! आम्ही वाट पाहात आहोत! अवांतर - बाय द वे, वहिनींना भेटून तेव्हा खूप बरं वाटलं होतं. एवढ्या साध्या, सोज्वळ बायकोला इतका डांबीस नवरा कसा काय मिळाला, देव जाणे! :) असो..!
मंडळी,
इथे दिवसेंदिवस मिपाच्या अधिकाधिक पाककृती येत आहेत हे पाहून संतोष वाटला. प्राजूच्या घरीही मिपा खायला जायची माझी इच्छा आहे, परंतु अमेरिकेचे विमान भाडे आमच्यासारख्या गरीबाला कसे परवडणार? त्यामुळे प्राजूकडे जायचं सध्या रहीत केलं आहे! :)
असो,
सगळ्यांनी मिळून मिपाधर्म वाढवावा हीच सदिच्छा!
आपला,
(मिसळवेडा) तात्या.
--
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे |
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)
2 Feb 2008 - 1:01 pm | प्रभाकर पेठकर
आपण मिपाचे सभासदत्व घेऊन मिपाच्या टपरीवर नव्या जोमाने कार्यरत झालात याचे बरे वाटले.
तात्यांचे कार्य आणि आम्ही येणार नाही? कसे शक्य आहे.....?
आपलीही मिसळीची पाककृती झक्कासच आहे!
ही पाककृती माझी नाही हे नम्रपणे सांगू इच्छितो. स्वाती दिनेश ह्यांच्या कडूनच मनोगतावर शिकलो. मिसळीच्या पाककृतीचे श्रेय १००टक्के त्यांचेच आहे.
आता आपल्या हातचं सुग्रास भोजन चापायला पुन्हा पुण्याला केव्हा येऊ तेवढं सांगा!
कधीही या. मात्र मांसाहारी डोहाळजेवणासाठी आधी फोन करून सर्व 'आलबेल' आहे ह्याची खातरजमा करून घ्यावी.
एवढ्या साध्या, सोज्वळ बायकोला इतका डांबीस नवरा कसा काय मिळाला, देव जाणे!
ह्हा:..ह्हा:...ह्हा:.... दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं.
2 Feb 2008 - 1:31 am | वरदा
प्राजु खरच येईन बरंका....पत्ता दे बरं तुला काय वाटंलं सगळेच भारतातले आहेत? एखादं ट्रेनिंग शोधते तिथे आणि येते तुझ्याकडे....
2 Feb 2008 - 1:38 am | प्राजु
अगदी खरंच ये...
- प्राजु
2 Feb 2008 - 1:45 am | वरदा
आता बाकी सगळ्यांना टुकटुक.....
2 Feb 2008 - 6:02 am | पिवळा डांबिस
या वीकएंडला मी मिसळ करून पाहीन. जर चव बराब्बर जमली तर माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायांत घालीन!!
अहो, गेली एकवीस वर्षे मी या मिसळीसाठी तळमळतोय हो! :(((
कॉलेजात असतांना ती आमचे मुख्य अन्न होती!!
..
..
आधी प्रत्येक ट्रीपला ठाण्याला जायचं जमायचंच असं नाही, आणि नंतरनंतर बाधण्याची (मिसळ नाही हो, तिथलं पाणी)भिती वाटे.
आजवर हताश असलेला,:(
पण आता हुरूप आलेला,:)
पिवळा डांबिस
2 Feb 2008 - 11:48 pm | संजय अभ्यंकर
स्वातीजी धन्यवाद!
आता पर्यंत हजारदा ठाण्यास गेलो असेन.
मा.मि.ची किर्ती लहानपणा पासुन ऐकतोय.
परंतु, त्याचा पत्ता नेमका सापडत नाही.
जेव्हां वेळ असतो तेव्हा हातात भलि मोठी टूलबॅग असते, ती घेउन पत्ताही शोधता येत नाही.
त्यामुळे मा.मि.ची तल्लफ त्या कुंजविहारीचा वडा खाउन भागवतो.
आता मात्र ठरलं. शेंडी तुटो वा पारंबी! मा.मि.चा पत्ता शोधणारच.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
3 Feb 2008 - 2:03 pm | बापु देवकर
सजय, कुंजविहारीच्या समोरचा मार्ग आपल्याला मिसळकडे घेऊन जाईल...
3 Feb 2008 - 3:51 pm | स्वाती राजेश
साला इथे ..च्या मारी. ह्या युकेच्या फुल्या फुल्य फुल्या फुल्या..चांगले फरसाण, पापडी मिळतील तर शप्पथ
केशवकुमार तुम्ही यु,के. मधे कुठे राहता माहीत नाही. पण इथे "साया" मधे फरसाण मिळतात( चांगल्या प्रकारचे).शिवाय हलदीरामचे सर्व प्रॉडक्ट मिळतात.
साया ची दुकाने खूप ठिकाणी आहेत.
माझ्या घरी जवळजवळ आठवड्याला मिसळ बनतेच. अगदी "कोल्हापूरी".
आता जेव्हा कधी यु.के. मधे याल तेव्हा साया ला भेट द्या.
माझ्याघरी मिसळ खायलासुध्दा....
4 Feb 2008 - 9:29 pm | केशवसुमार
नावच एक खेड आहे मॅन्चेस्टर नावाच्या शहराजवळ .. तिथे राहतात आस्मादिक.. काय म्हन्जे काय बी मिळत नाय स्वातीताई इथे( दारू आणि प्राण्यांची प्रेते सोडून) बाजार हटिला एतवारी मॅन्चेस्टरला २० मैलावर जाव लागतया..
(युके मधला खेडूत) केशवसुमार
बाय द वे.. बर्मिंगहाम मधून काल झकास फरसाण आणि पापडी आलेली आहे ( २ पाउंडाचा फरसाण आणि २५ पाउंड्चा प्रवास, काय करणास साला जिभेचे चोचले ) त्यामुळे ह्या शनिवारी हुर्रे.. ढाकू माकूम ढाकू माकूम ढा.....मिसळ पाव
(आनंदित)केशवसुमार
(सगळ्यांच्या मिपाच्या नावाने दोन घास काढून ठेवतो अस हवर्या सारख बघू नका.. नाहीतर साला आमचंच जुने एक विडंबन म्हणायची वेळा यायची
मिसळीवर मज राग भयंकर
दुसर्या दिवशी आग भयंकर)
4 Feb 2008 - 10:12 pm | ब्रिटिश टिंग्या
कुठे आहे? मला पत्ता द्याल का त्याचा.......
अवांतर - आम्हीही यु.के. मध्ये आहोत.....आम्हालापण मिसळ खायला बोलवा की......
आपला,
(मिसळीचा भिकारी) छोटी टिंगी
5 Feb 2008 - 3:03 pm | केशवसुमार
च्या आधी कधी बोलवता सांगा.. का तुम्हीच येता ह्या शनिवारी मॅकल्सफिल्डला..
केशवसुमार
3 Feb 2008 - 4:08 pm | स्वाती राजेश
http://www.misalpav.com/node/526
इथे भेट द्या. कोल्हापुरी मिसळी ला.
4 Feb 2008 - 9:12 pm | सख्याहरि
साला इथे ..च्या मारी. ह्या युकेच्या फुल्या फुल्य फुल्या फुल्या..चांगले फरसाण, पापडी मिळतील तर शप्पथ
केशवसुमार, अगदी सहमत!
फक्त युके ऐवजी जर्मनी वाचा...
स्वाती
अवांतरः येता का युकेतून जर्मनीला एखाद्या विकेंडला,मिसळ कट्टा करू,:)
आम्हालाही मिसळ खायला बोलवा...
4 Feb 2008 - 10:04 pm | स्वाती दिनेश
आम्हीही जर्मनीत आहोत,आम्हालाही मिसळ खायला बोलवा...
कधी येता बोला?
4 Feb 2008 - 11:26 pm | स्वाती राजेश
यु.के. मधील आणि यु.के.बाहेरील सर्व लोकांना मी मिसळ पाव खाण्यासाठी आमंत्रण देते.
मी ग्रेटर लंडन मधे राहते. मला इथून खूप इंडियन दुकाने जवळ आहेत.
तसेच वेम्बली , साऊथ हॉल (छोटे इंडिया) ३० मिनिटावर (कारने) आहेत.
साया वरील २ ठिकाणी, तसेच अल्पटन,वुड्फर्ड ही मला माहीत असलेली ठिकाणे.
4 Feb 2008 - 11:32 pm | सर्किट (not verified)
दोन आठवड्यांनी अस्मादिक सहकुटुंब लंडनला येणार आहेत चार दिवसांसाठी.
रॅडिसन माउंटबॅटन हाटेलात मुक्काम आहे. तेथून जवळपास काही भारतीय जेवणाची ठिकाणे आहेत का, ते कृपया कळवा.
पत्ता: 20 Monmouth St. Covent Gard London WC2H 9HD GB
- सर्किट
5 Feb 2008 - 2:56 pm | स्वाती राजेश
काही पत्ते पाठवले आहेत.
पत्रपेटी पाहा.
काही मदत लागली तर आवश्य विचारा.
5 Feb 2008 - 3:08 pm | स्वाती राजेश
तुम्ही लंडनला कधी येणार ते कळले तर बरे होईल आपण सहकुटुंब आमच्या घरी येऊ शकता.
5 Feb 2008 - 12:28 am | वरदा
म्हणजे आता आपले यु.के. आणि यु. एस. मधे दोन नविन मि. पा. कट्टे तयार झाले म्हणायचे....आता आपल्याला ठाणे आणि कोल्हापुरच्या मिसळीच्या ठिकाणांची नुसती नावं ऐकून गप्पं बसायला नको...स्वाती ती रेसिपि करून पाहिली ह्या विकएन्ड्ला...एकदम झकास...थँक्यू गं...
5 Feb 2008 - 6:58 am | विसोबा खेचर
म्हणजे आता आपले यु.के. आणि यु. एस. मधे दोन नविन मि. पा. कट्टे तयार झाले म्हणायचे....
वा वा! वरील वाक्य नुसतं वाचूनच सार्थक झाल्यासारखं वाटलं!
मिपाधर्म वाढवा, महाराष्ट्र धर्म वाढवा!
मिसळपाव मस्तकी धरा, अवघा हलकल्लोळ करा...! :)
हे असे जगभर मिपाकट्टे भरलेले पाहावेत हीच इच्छा होती, संत तात्याबांचे हेच जिवीतकार्य होते, आणि याच करता तात्याबांनी अवतार घेतला होता! आता आमचे कार्य पूर्ण होत आले! :)
वरदा, प्राजू, तुमच्यासारख्या प्रामाणिक मिसळधर्मीयांच्या हाती मिपा सोपवून आता मी सुखाने वैकुंठात जाईन! (तुकोबांकरता जसा आला होता तसा एखादा गरूड उडत उडत येण्याची वाट पाहतो आहे! :)
हेचि दान देगा देवा, मिपाचा विसर न व्हावा
विसर न व्हावा, देवा विसर न व्हावा
मिसळ खाईन आवडी,
हेची माझी सर्व जोडी....
माझी सर्व जोडी, हेचि माझी सर्व जोडी..
तात्या म्हणे आता
मिसळ खायाला घालावी
खायाला घालावी, मिसळ खायाला घालावी
न लगे मुक्ति आणि संपदा मिसळसंग देई सदा...!
सर्वांनी आपापले राग लोभ प्रेम माया ममता आदि षड्रिपू मिसळीच्या रश्श्यात बुडवावेत आणि मिसळीशी एकरूप व्हावे हीच संत तात्याबांनी जगाला दिलेली शिकवण सर्वांनी आचरणात आणावी! :)
आता मिसळीकडे पाहून संत तात्याबा इतकंच म्हणतील,
भेटी लागी जीवा, लागलिसे आस!
:)
आपला,
(मिपाधर्मी) तात्या.
6 Feb 2008 - 4:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे असे जगभर मिपाकट्टे भरलेले पाहावेत हीच इच्छा होती, संत तात्याबांचे हेच जिवीतकार्य होते, आणि याच करता तात्याबांनी अवतार घेतला होता! आता आमचे कार्य पूर्ण होत आले! :)वरदा, प्राजू, तुमच्यासारख्या प्रामाणिक मिसळधर्मीयांच्या हाती मिपा सोपवून आता मी सुखाने वैकुंठात जाईन! (तुकोबांकरता जसा आला होता तसा एखादा गरूड उडत उडत येण्याची वाट पाहतो आहे! :)
हाहाहाहा)))))))ह. ह. पु. वा.
संत तात्याबाचा लाडका शिष्य प्रा.डॉ.............
6 Feb 2008 - 2:21 pm | प्रभाकर पेठकर
वरदा, प्राजू, तुमच्यासारख्या प्रामाणिक मिसळधर्मीयांच्या हाती मिपा सोपवून आता मी सुखाने वैकुंठात जाईन!
तात्या चले वैकुंठको, बिनवित मित्र पकडत बाही, इंहा मिसल खाई लो, उंहा तात्या मिसल नाही|
5 Feb 2008 - 11:59 am | धमाल मुलगा
तात्याराम महाराज, नका हो अस॑ निर्वाणीच॑ बोलू...
तुम्ही जर वैकु॑ठाची भाषा करायला लागलात तर आम्हा बालका॑चे कस॑ होणार. हे असल॑ हृदयाला घर॑ पाडणारे बोल सोडा तात्याबा !
अहो, तुम्ही वैकु॑ठाला गेलात तर आम्हाला तर्रीदार लेखन कुठुन नशीबी व्हावे? तिखटजाळ प्रतिक्रिया कुठे वाचायला जायच॑ आम्ही पामरा॑नी? (आयला हे लै म्ह॑जी लैच स्वार्थी होतय काय?)
हा॑...कस॑ होणार त्या मामलेदाराच॑? तुमच्याशिवाय त्याच्या मिसळीची खुमारी काय रहाणार?
----
बाकी हे एकदम झक्कास हा॑... यु.के. आणि यु.एस. मध्ये मिपाकट्टे !!! येकदम ज॑क्शन वाटल॑ बॉ :)
आपला
- (तात्याबा॑चा भक्त, अजाण लेकरु)
ध मा ल.
5 Feb 2008 - 5:49 pm | वरदा
अहो आत्ता कुठे आम्ही तुमच्याकडून शिकायला सुरुवात केलेय्... ही काय निर्वाणिची भाषा....आपला ठाण्याचा कट्टा कोण सांभाळणार मग?
ते काही नाही सगळे मिळून धमाल करूया असं लिहा....हे सोपवून मोकळं होणं काही चालणार नाही.....
5 Feb 2008 - 6:18 pm | धमाल मुलगा
काय? धमाल? वरदाताई...मला हाक मारली का? :))
तात्यानु, वरदाताई॑शी सहमत. अहो, हे यु.के. अन् यु.एस. चे मिपाकट्टे असले तरी त्या॑च॑ "ठाण॑" ठाण्यात आहे त्याच॑ काय?
अवा॑तर :तात्या हल्ली मी ठाण्याच्या जवळपासच घुटमळत असतो, निस्ती येक हाळी द्या, स्लो-लोकल पकडून लगेच धा मि॑टात हजर होतो पघा.
---
वरदाताई, आचरटपणाबद्दल क्षमस्व. (अ॑गभूत गुणच आहे हा, आमच्याबरोबरच जाणार तो बहुधा)
असो,
आपला,
ध मा ल.
5 Feb 2008 - 6:30 pm | विसोबा खेचर
अवा॑तर :तात्या हल्ली मी ठाण्याच्या जवळपासच घुटमळत असतो, निस्ती येक हाळी द्या, स्लो-लोकल पकडून लगेच धा मि॑टात हजर होतो पघा.
पोष्टकार्ड पाठवून तुमचा भ्रमणध्वनी क्र कळवा म्हणजे हाळी देईन.. :)
तात्या.
5 Feb 2008 - 7:26 pm | मनिष
मी येतो आहे ठाण्याला या महिन्यात - नौपाडा भागात. ही मामलेदार मिसळ कुठे आहे जरा पत्ता देता का? हजेरी लावलीच पाहिजे!! :)
5 Feb 2008 - 7:33 pm | वरदा
मामलेदार मिसळ माहित नाही? ठाणे स्टेशन ला कुणाला पण विचारा....
धमाल दादा आचरटपणा नाही काही....माफी कसली मागता..साधा जोक तर केलात....
5 Feb 2008 - 11:26 pm | पिवळा डांबिस
आनी ती झक्कास झाली रं झाली!!!!!
ही रेशेपी वापरून आमी मिसळ केली. आनी तिच्यायला आमच्या जिभेनं येकदम जंक्शन दाद दिली! :)
आता जगाच्या पाठीवर कुठंही रहायला मोकळा झालो. अर्थात, जिथे गुजुभाय फरसाण विकत असेल तिथे...म्हणजे जगात कुठेही!!! :)
मन फार, फार म्हणजे अगदी तुडुंब प्रसन्न झालंय! पोटही तुडुंब भरलंय!!
स्वाती आणि प्रभाकर, माझ्या कातड्याचे जोडे करायला टाकले आहेत, तयार झाले की फेड्-एक्सने पाठवून देईन.
आपला,
(उन्मनी अवस्थेतला) पिवळा डांबिस
6 Feb 2008 - 9:41 pm | प्रभाकर पेठकर
माझा १० नंबर आहे. आणि मला लाल पॉलीश आवडत नाही. काळेच आवडते.
6 Feb 2008 - 10:39 pm | प्रभाकर पेठकर
कालच केली होती. कसली मस्त झाली होती.
थोडावेळ तिच्याकडे विविध कोनातून बघतच राहीलो.
शेवटी राहवेना. फडशाच पाडला. आणि नुकतीच 'शिकार' चट्टामट्टा केलेल्या 'वनराजा'सारखी मस्त ताणून दिली.
6 Feb 2008 - 11:53 pm | केशवसुमार
फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..फुल्या ..
केशवसुमार
7 Feb 2008 - 12:46 am | विसोबा खेचर
केशवाशी सहमत! :)
अरे प्रभाकरा, एकटा एकटा मिसळ खातोस काय? आणि वर पुन्हा फोटो छापतोस काय??
कुठे फेडशील ही पापं?!:)
तात्या.
7 Feb 2008 - 9:52 pm | चतुरंग
आपण 'सिंबायोसिस'ला असता ना?
आपली सुटका नाही - आपल्यावर एक तर्रीदार मि.पा. चे कर्ज.
आमच्या पुढच्या भारतभेटीत ही 'भरतभेट' व्हायलाच हवी!
चतुरंग
7 Feb 2008 - 10:43 pm | प्रभाकर पेठकर
श्री. केशवसुमार,
तुमच्या सर्व फुल्या-फुल्यांना मी 'फुले' समजून स्विकारले आहे. मिसळीच्या तिखट तर्री इतकेच आपले मिसळीवरील प्रेम मनस्वी आहे ह्याची खात्री पटली.
श्री. विसोबा खेचर,
पुण्यात कट्टा जमवाच. सर्व उपस्थितांना स्वखर्चात मिसळ खाऊ घालेन.
श्री. चतुरंग (आणि इतर मिसळप्रेमी)
कधीही या. एकत्र बसून मिसळ चापू.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
8 Feb 2008 - 10:41 am | धमाल मुलगा
श्री.पेठकर,
नियमाप्रमाणे दर "विका॑तास" मी पुण्यातच असतो. सि॑बीच॑ कुठच॑ बाहेरच॑ कॅ॑टीन का? बस-स्टॉपमागच॑?
औ॑दाच्या टायमाला भेटूच. व्य.नि. ने भ्रमणध्वनी कळवता का? तुमच्या सोईच्या वेळेला मारतो चक्कर :)
चालेल का?
आपला
- ध मा ल.
7 Feb 2008 - 11:36 pm | वरदा
जळवायचं लक्षण मी नेमकं लंच च्या वेळि फोटो पाहीले..भूक लागली..आणि खावी लागतेय घासफूस....