बाळू (भाग १) http://www.misalpav.com/node/6882
पण बाळूच्या आईने मनात पक्के ठरवले होते की काही झाल तरी आपला मुलगा स्वावलंबी झालाच पाहीजे. त्याला त्याच आयुष्य जगता आल पाहीजे. आई तिच्या भावाला म्हणाली "दादा, मला माफ कर, पन मला माज्या पोराच नशिब घडवाया संदि दिली पाह्यज्ये. तुजे लय उपकार झाले आमच्यावर आम्ही कधीबी इसरनाह न्हाय. शेजारचा नाम्या दावनार हाय तेला काम. माझ पोराच नशिब सुधारल तर तुला वेळ पडल तवा मदत करील त्यो. आम्ही आज रातच्याला मुंबैला निघतोया." आणि ठाम निर्णयाने तिने भावाला निरोप दिला.
बाळू, बाळूची आई आणि बाळूच्या ५ मित्रांचा परिवार असे सगळे मुंबईत उतरले. मुंबईतली ती गडबड, गोंधळ गर्दी पाहून सगळेच बावचळून गेले. बायका गावच्या आठवण येऊन रडू लागल्या. परत आपल्या गावी जाऊन मिळत त्यात खाउ म्हणाल्या. पण नाम्या आधी मुंबईत राहीलेला होता त्याच्या आत्याकडे मजूरीसाठी. त्याने सगळ्यांना धिर दिला. "मला हाय माह्यती मुंबैची तुमी कशाला घाबरतासा?" आणि नाम्या सगळ्यांना घेऊन नवी मुंबईच्या एका झोपडपट्टीच्या विभात गेला. नाम्याला राहण्याची सोय कुठे होईल ह्याची कल्पना होती. नाम्याच्या जुन्या मित्राच्या भाड्याच्या खोल्या होत्या. त्यातील ३ खोल्या भाड्याने घेऊन प्रत्येक खोलीत २ कुटुंबे पार्टीशन घालून राहीली.
दुसर्या दिवशी नाम्या बाळू आणि त्याच्या इतर मित्रांना घेऊन बंदराच्या एका ओळखिच्या युनियन लिडर कडे घेउन गेला आणि आपल्याला कामाची गरज आहे सांगुन त्याने आपल्या मित्रांना गोदी कामगार म्हणुन पोस्ट कॉनट्रॅक्ट बेसिस वर मिळवून दिल्या. सगळ्यांना खुप आनंद झाला. बाळूच्या आईचे डोळे आनंदाने डबडबले. सगळ्यांनी नाम्याचे आभार मानले. आणि बाळु आणि त्याचे सगळे मित्र दुसर्या दिवसा पासुन कामावर रुजू झाले.
एक महिना पुर्ण होताच बाळूला पगार मिळाला चक्क ३००० रू. बाळूने एवढे पैसे एकत्र कधिच बघितले नव्हते. तो खुप खुष झाला. त्याला शिकलेला नसल्याने मोजताही येत नव्हते. केवळ मॅनेजर म्हणाला की हे ३००० रु. आहेत म्हणून त्याला कळले. तो घाईतच आईकडे गेला आणि आनंदाने आईला सांगितले " आय हे बघ मला कामाच पैस मिलाल. मॅनिजर म्हनला तिन हजार हाईत. हे तुज्याकड ठेव मला काय त्यातल समजत न्हाय." आई पण अडाणीच होती. पण बाळू सारखी भोळी नव्हती. व्यवहारज्ञान तिला माहीत होते. बाळूच्या वडीलांनंतर तिच मोडक्या तोडक्या पैशाचे व्यवहार बघत होती.
बाळुच थोड्या वेळाने विचार करून म्हणाला "आय मामाला बी त्यातल थोड पैस पाठीव. त्यान येळेला आपली गरज भागवलीया". आई म्हणाली "माझ्या तोंडच बोललास लेका, परवा शिवा जानार हाय गावाला त्याच्या भनीकड तवा त्याच्याजवल धाडते पैस." आणि आईने मामाला १००० रु. पाठवून दिले.
इकडे मामा पण खुप खुष झाला एवढे पैसे बघून. त्याला आपल्या बहीणीला तोडुन बोलल्या बद्दल खेद वाटु लागला आणि त्याच्या मनात बाळू आणि त्याच्या आईबद्दल आश्रिताची भावना जाऊन आदराची भावना निर्माण झाली. तो सगळीकडे सांगू लागला की माझा भाचा मुंबैला नोकरी करून मोठा पगार मिळवतो.
प्रतिक्रिया
26 Mar 2009 - 1:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जागु, यावेळचा भाग थोडा लहानच आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
26 Mar 2009 - 1:13 pm | घाशीराम कोतवाल १.२
अदितीताईशी सहमत जागु खरच भाग खुप्च लहान आहे
बाकि वाचायला मजा येते आहे आणखी येउ दे लवकर
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
26 Mar 2009 - 3:39 pm | दशानन
हेच म्हणतो,
सुंदर लिहीत आहात, जरा भाग मोठा करा प्लीज.
26 Mar 2009 - 6:24 pm | मराठमोळा
पण हे काव्य विभागात का लिहिले आहे ते समजले नाही...
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!