"अर्थ अवर"

संताजी धनाजी's picture
संताजी धनाजी in जनातलं, मनातलं
26 Mar 2009 - 10:21 am

नमस्कार मंडळी,

एक आवाहन!

२८ मार्चला जगातील ८५ देशातील नागरीक रात्री ८:३० ते ९:३० ह्या वेळात जागतिक तापमानवाढीविरुद्ध जनजाग्रुतीसाठी दिवे बंद ठेवणार आहेत. अधिक माहीती येथे वाचा...

http://www.earthhour.in

- संताजी धनाजी

धोरणविचारबातमीशिफारस

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

26 Mar 2009 - 10:29 am | चिरोटा

आपल्या सरकारने हे वेळीच ओळखले होते.म्हणुन तर सगळीकडे वीज कपात चालु असते.एक प्रकारे वीज मन्डळ जनजाग्रुतीच करत असते.इकडे गावात वीज केव्हा जाते ह्यापेक्षा वीज केव्हा येते ह्याची चर्चा जास्त.

प्रमोद देव's picture

26 Mar 2009 - 10:53 am | प्रमोद देव

http://www.misalpav.com/node/6824

हे वाचा.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

दशानन's picture

26 Mar 2009 - 11:22 am | दशानन

ह्यांनी विज वाचवण्यासाठी जे संकेतस्थळ चालू केले आहे ते गेली अर्धातास झाले माझ्या टी-२ च्या लाईनवर देखील उघडत नाही आहे... :(

आज पासूनच विज वाचवायला चालू केली वाटतं त्यांनी ;)

टी-२ = २ एमबी / सेकंद ची नेट स्पीड !

विंजिनेर's picture

26 Mar 2009 - 12:14 pm | विंजिनेर

रोज तुपाशी खाणार्‍याला उपासाचे कौतुक आम्हाला काय त्याचे?
भारतातले सक्तीच्या भारनियमनांचे तास मोजले तर असे दररोज एक ह्या हिशेबाने ३६५ अर्थ अवर सुद्धा पुरणार नाहीत :)
हे परदेशी गोरे काहीतरी खुळ काढतात आणि आपण त्याचे अंधानुकरण करायला मोकळे.. छ्या ...

आम्हा काय त्याचे...

काही नसेल तर ते असले पाहिजे. ग्रामीण भागात अनेक तास वीज नसते हे मान्य.
शहरांचे काय? मल्टिप्लेक्सेस, मॉल्स, डिस्कोथेक्स, किती ठिकाणं सांगू?

भारतात जिथे वीज असते त्यांनी एक तास बंद ठेवली तर खारीचा वाटा उचलल्यासारखे होणार नाही का?

का आम्हाला काही घेणे नाही असंच म्हणायचं आणि आपल्या पुढच्या पिढीनं त्यांचं काय
ते पहावं असं म्हणायचं?

विंजिनेर's picture

26 Mar 2009 - 5:45 pm | विंजिनेर

भारतात जिथे वीज असते त्यांनी एक तास बंद ठेवली तर खारीचा वाटा उचलल्यासारखे होणार नाही का?

होईल की! जरूर. पण त्यासाठी परदेशातल्या लोकांनी सांगायची वाट कशाला पाहायची?
हे म्हणजे चातुर्मासात दारुला शिवायचं नाही. आपण संत असा आव आणायचा आणि गटारी अमावस्येला विमान आकाशात :)

दुसरं म्हणजे हे अनुकरण एकतर्फी कशाला? आम्हाला प्यायचे पाणी मिळत नाही मुंबईसारख्या "शहरात" (सकाळी ४:३० ला मोजून १० मि. येणारी करंगळीएव्हढी धार सोडली तर..) म्हणून परदेशात राबवतात का जलपान तास ;)

मुळात अर्थ अवर वगैरे थेरं श्रीमंत देशांनी गेली शेकडो वर्षे नैसर्गिक साठ्यांची मनसोक्त उधळमाधळ केल्यानंतर आणलेले सोयिस्कर वैराग्य आहे.
भारतासारख्या विकसनशील देशाला त्याच फूटपट्टीने मोजमाप हास्यास्पद आहे.

आणि आपल्या पुढच्या पिढीनं त्यांचं काय ते पहावं असं म्हणायचं?

ह्यात पुढची पिढी कुठनं आली ते काही कळाली नाही बुवा ...

चिरोटा's picture

26 Mar 2009 - 5:05 pm | चिरोटा

मला तर ह्यावेळेत चोर्या/मार्या जास्त होतिल असे वाटतय.तेव्हा घरी कडी कोयन्डे लावुन गप्प पडुन राहिलेले बरे तासभर.