मिसळपाव आणी मिपाकरांचे चे आभार कसे व्यक्त करु अस प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता आणी डोक्यात ही कल्पना आली.
रुक्ष वाळवंटात जसा सापडावा अमृताचा झरा
तशी मराठीची तृष्णा शमे मिसळपावच्या घरा
मराठमोळ्या माणसांना फक्त मिपाचाच आधार
मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!!
काव्य, चर्चा, साहित्याचा अनमोल असा ठेवा
संगे कौल,कलादालन आणी पाककृतींचा मेवा
लहानथोरांसाठी हे मराठीचे अक्षय भांडार
मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!!
कोणी न वाटे इथे परके जरी आले कधी प्रतिसाद तिरके
भावाबहिणीचे गोड भांडण, तसे एखाद्या काव्याचे विडंबन
किती आपुलकी, जिव्हाळ्याची इथे बहार
मिपा, तुझे लक्ष लक्ष आभार!!
चुकुन कुठे कंपुबाजीची तक्रार, कधी तंटा संधी न मिळाल्याचा
हीच तर खरी चवदार मिसळ, लुटा आनंद ह्या आस्वादाचा
आपल्याच भावंडांवर कशाला हवा आक्षेप
अरे मिपा तर आपलेच आभाळ, घ्या गरुडाची झेप
मिपाकंटकांसाठी मात्र उसळावी भवानीची तलवार
मिपाकर, तुझे लक्ष लक्ष आभार!!
तात्या, नीलकांत, लिखाळ, प्राजु,राघव, सामंत, केशवसुमार, क्रांती, देव, घाटपांडे, खराटा, चतुरंग, अवलिया आणी परा
मिपाकर बंधुंनो सर्वांची नावे लिहु नाही शकलो, राग आला तर क्षमा करा :)
मराठीच्या बाळगोपाळांचे सुखसमृद्ध असे हे घरदार
मिपा आणी मिपाकरा, तुझे लक्ष लक्ष आभार!!
तात्या अभ्यंकर रचिले पाया,
मिपाकर झालासे कळस...!
(माझ्यातला कवी हा सहा-आठ वर्षांनी कविता लिहायचा प्रयत्न करतोय त्यामुळे कवितेतल्या चुकांना क्षमा करा)
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
प्रतिक्रिया
13 Mar 2009 - 10:27 pm | मराठमोळा
कविता आवडली नाही तर जरुर कळवा, म्हणजे अशी चुक पुन्हा होणार नाही..
"कोणत्याही नवख्या/अपरिचीत व्यक्तीच्या लेखाला/काव्याला काही मिपाकर मंडळी दुसरा कोणी पहिले प्रतिसाद देतो का हे पाहतात आणी त्या प्रतिसादावर मग आपला प्रतिसाद नोंदवतात"
हा आक्षेप नाही, माझे एक निरिक्षण आहे.
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
13 Mar 2009 - 10:32 pm | प्रमोद देव
कविता आवडली.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
13 Mar 2009 - 10:39 pm | मराठमोळा
लेख लिहायचा विचार करत होतो सुरुवातीला पण म्हंटल कविता जमते क पाहुया..
अशी आभार प्रदर्शन कविता पहिल्यांदाच केली..हे विचार कवितेत बसवणे जमले नाही हे खरे.. पण भावना पोहोचवणे जास्त महत्वाचे वाटत होते.. :)
असो. देवसाहेब तुम्हाला कविता आवडली हे पहुन थोडे बरे वाटले.
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
13 Mar 2009 - 10:44 pm | समिधा
कविता खुप मस्त लिहीली आहेत. खुप आवडली. :)
14 Mar 2009 - 12:23 am | सौरव जोशी
कविता छान जमुन आली आहे, अभिनंदन!
"कोणत्याही नवख्या/अपरिचीत व्यक्तीच्या लेखाला/काव्याला काही मिपाकर मंडळी दुसरा कोणी पहिले प्रतिसाद देतो का हे पाहतात आणी त्या प्रतिसादावर मग आपला प्रतिसाद नोंदवतात"
हा आक्षेप नाही, माझे एक निरिक्षण आहे.
हे काय बुवा आपल्याला पटल नाही. मी मिपाचा सदस्य होऊन फक्त २ दिवस झालेत, एक लेख लिहीला फक्त आणि खर सांगायच तर इतकासा चांगला नाही. पण २ दिवसात ८००+ लोकांनी तो वाचला आणि भरभरुन कौतुक केल. मला माहित आहे कि त्या कौतुकामागे उद्देश मला प्रोत्साहन देण्याचाच होता कारण मला माहित आहे कि माझ लिखाण बेताचच आहे.
पहा माझा लेख वाचून वेळ मिळाला तर.... आणि हो प्रतिसाद नक्की द्या!!
सौरव जोशी...!
14 Mar 2009 - 9:51 am | मराठमोळा
पहा माझा लेख वाचून वेळ मिळाला तर.... आणि हो प्रतिसाद नक्की द्या!!
जोशी साहेब तुमचा लेख पहिल्या दिवशीच वाचला, पण मला जे म्हणायचे होते ते बाकिच्यानी आधीच प्रतिसादामधे लिहिले असल्याने मे प्रतिसाद देण्याचा आळस केला हे खरे. तुमची ओपनिंग खुप चांगली झाली आहे. ऑल द बेस्ट.
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
14 Mar 2009 - 1:04 am | विसोबा खेचर
मराठमोळे काका,
आपल्या कौतुकभरल्या काव्याकरता आपला तसेच समस्त मिपाकरांचा मी ऋणी आहे. मिपाकर आहेत, केवळ म्हणून आणि म्हणूनच मिपाला शोभा आहे!
या बाबतीत मला नेहमी एखाद्या शाळेचे उदाहरण आठवते. एखादी शाळा, मग ती कुठलीही असो, संध्याकाळी त्यातील पिल्लं आपापल्या घरी निघून गेल्यावर त्या शाळेची इमारत लगेच अत्यंत भकास व अवकळा आल्यासारखी दिसू लागते! तीच गत मिपाची आहे. मिपाच्या शाळेतले हे अत्यंत द्वाड विद्यार्थी-विद्यार्थीनी आहेत म्हणूनच केवळ मिपा वाजते-गाजते आहे. मिपाकरांमुळेच मिपाचे गोकूळ भरलेले आहे! :)
मिपाकरांशिवाय मिपा हे त्या शाळेच्या भकास इमारतीइतकेच भकास आहे!
आहेत! काही तृटी, दोष जरूर आहेत. त्यात नाकारण्यासारखे काहीच नाही. परंतु तरीही इथे भरभरून लिहिणार्यांचा, वाचकांचा, मिपावर त्याच्या गुणदोषांसकट भरभरून प्रेम करणार्या सर्वांसर्वांचाच मी ऋणी आहे. मिपाचा रात्रंदिवस द्वेष करणार्यांचाही मी ऋणी आहे. शेवटी त्यांना तरी मिपाशिवाय दुसरं कोण आहे? :)
असो..
पुनश्च एकदा आपले व समस्त मायबाप मिपाकरांचे आभार..
आपला,
(कृतज्ञ आणि कृतार्थ!) तात्या.
14 Mar 2009 - 9:45 am | मराठमोळा
धन्यवाद तात्या,
परंतु तरीही इथे भरभरून लिहिणार्यांचा, वाचकांचा, मिपावर त्याच्या गुणदोषांसकट भरभरून प्रेम करणार्या सर्वांसर्वांचाच मी ऋणी आहे. मिपाचा रात्रंदिवस द्वेष करणार्यांचाही मी ऋणी आहे. शेवटी त्यांना तरी मिपाशिवाय दुसरं कोण आहे?
फार मोठ्या मनाचे आहात तुम्ही.
मिपा साठी काही करु शकलो तर आनंदच होईल.
मराठमोळे काका ??
अहो तात्या मी वयान खुप लहान आहे तुमच्या पेक्षा त्यामुळे काका वाचुन हसु आले मला!!! :)
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
14 Mar 2009 - 6:33 am | लवंगी
कारण मनापासुन लिहीलय.
14 Mar 2009 - 7:18 am | सहज
अजुन येउ दे.
14 Mar 2009 - 8:29 am | अवलिया
सहमत
--अवलिया
14 Mar 2009 - 9:02 am | दशानन
सहमत.
अजून येऊ द्या... !
या रणांगणावर ;)
14 Mar 2009 - 9:19 am | नरेश_
छान. आवडली कविता .
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
14 Mar 2009 - 9:28 am | प्राची
मराठमोळे काका,
कविता खूपच छान आहे. =D> =D> =D>
>>या बाबतीत मला नेहमी एखाद्या शाळेचे उदाहरण आठवते. एखादी शाळा, मग ती कुठलीही असो, संध्याकाळी त्यातील पिल्लं आपापल्या घरी निघून गेल्यावर त्या शाळेची इमारत लगेच अत्यंत भकास व अवकळा आल्यासारखी दिसू लागते! तीच गत मिपाची आहे. मिपाच्या शाळेतले हे अत्यंत द्वाड विद्यार्थी-विद्यार्थीनी आहेत म्हणूनच केवळ मिपा वाजते-गाजते आहे. मिपाकरांमुळेच मिपाचे गोकूळ भरलेले आहे! Smile
तात्या मास्तर,तुम्ही मिपाला आणि मिपाकरांना जी उपमा दिलीत,ती वाचून खूप आनंद झाला(भाऊक वाटलं).त्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. =D> =D> =D>
आम्ही द्वाड विद्यार्थी-विद्यार्थीनी (मिपाकर) मिपाचे नाव असेच उज्ज्वल ठेऊ,आपला आशीर्वाद तर सदैव पाठीशी आहेच. :)
14 Mar 2009 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेत डोळे भरुन याव्यात अशाच भावना व्यक्त झाल्या आहेत. ( देवा शप्पथ इमानदारीनं लिहिलंय )
रुक्ष वाळवंटात जसा सापडावा अमृताचा झरा
तशी मराठीची तृष्णा शमे मिसळपावच्या घरा
उच्च ओळी..मात्र पुढे पद्याचे गद्य कधी झाले ते कळले नाही.
>>भावाबहिणीचे गोड भांडण,
छ्या ! वरील ओळ काही आवडली नाही. :(
-दिलीप बिरुटे
(कवितेचा चावट वाचक )
14 Mar 2009 - 10:57 am | परिकथेतील राजकुमार
वा छान उत्तम काव्य ! आवडले.
अवांतर :- हा प्रतिसाद परतफेडिच्या बोलीवर दिला आहे हे लक्षात ठेवावे ;)
द्वाड विद्यार्थी
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 Mar 2009 - 11:16 am | प्रकाश घाटपांडे
वा छानच!
आम्ही बी माळ्यावर्ची धुळ झटकावी काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
14 Mar 2009 - 6:39 pm | क्रान्ति
मस्त कविता! खरच मराठी रसिक, वाचक, लेखक, कवि सगळ्यांसाठी मिपान खूप मोठ व्यासपीठ उपलब्ध करून दिलय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
14 Mar 2009 - 7:26 pm | शक्तिमान
भारी आहे....
16 Mar 2009 - 10:06 am | अनिल हटेला
अरे मिपा तर आपलेच आभाळ, घ्या गरुडाची झेप
मिपाकंटकांसाठी मात्र उसळावी भवानीची तलवार
मिपाकर, तुझे लक्ष लक्ष आभार!!
मनापासुन लिहीलस आणी आमस्नी बी आवाडलं !! :-)
(मराठमोळा मिपाकर )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
16 Mar 2009 - 10:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कविता आवडली.
(माझ्यातला कवी हा सहा-आठ वर्षांनी कविता लिहायचा प्रयत्न करतोय ... )
आता फार गॅप घेऊ नका.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.