सध्या एक भुत चढलं आहे युद्धावरील चित्रपट (वॉर मुव्हीज) पाहण्याचे. जे मिळतील चांगले असतिल ते पाहतोय. समिक्षण आणि परिक्षण मधले मला घंटा कळत नाही. तरीसुद्धा जे आवडले ते इथे मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय.
सेव्हींग प्रायव्हेट रायन(Saving Private Ryan) --
स्टीवन स्पीलबर्गचे अप्रतिम दिग्दर्शन ह्या चित्रपटाला टॉप वॉर चित्रपटाच्या पक्तींत बसवते. चित्रपट पाहताना आपणही चित्रपटातील एक आहोत आणि लढाई स्वत: डॊळ्याने पाहतोय असे भासते, चित्रपटातील सुरुवातीचा प्रसंग अगांवर काटा आणतो. एका आईची चारी मुले सैन्यात त्यातील तिघे वेगवेगळ्या ठिकाणी लढाईत मारले जातात. उरलेला एक (प्रायव्हेट रायन) तरी घरी सुखरुप पोहचावा म्हणुन त्याला शोधुन घरी पोहचवण्याची कामगीरी कॅप्टन जॉन मिलर( टॉम हॅंक्स) आणि कपंनीला दिली जाते. त्या शोधकार्याचे आणि ओढवलेल्या प्रसंगाचे यथार्थ चित्रण पाहवयास मिळते.
लेटर्स फ़्रॉम इवो जिमा(Letters from Iwo Jima) -
जपानमधील इवो जिमा एक बेट अमेरीकन सैन्याचा हातात जाऊ नये म्हणुन त्यांना रोखण्यासाठी आपली एक फ़ौज तिकडे पाठ्वते. तादामीची कुरुबायेशी(केन वॉटनेबी)ला त्या सैन्याची कमान दिली जाते. त्यातलाच एक युवा सैनीक सायगो लढाई संपल्यानंतर आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला घरी जाऊन भेटण्याची आशा बाळागुन असतो. चित्रपटाच्या दुसर्या भागात जेव्हा अमेरिकन सैन्य आक्रमण करते. ग्रेनाईड आणि तोफांच्या मारांनी बेट अगदी पिजुन काढते. असल्या भयानक हल्ल्याने मरण आता जवळच आहे असे वाटले असताना सायगो ला जगण्याची जिद्द,साहस मिळु लागते. शेवटपर्यंत हा चित्रपट खीळवुन ठेवतो. तादामीची कुरुबायेशी चा अभिनय तर लाजवाबच. चित्रपट पाहिल्यानंतर बराच वेळ कानात ग्रेनाईडच्या धमाक्यांचा आणि जापनीज भाषेचा आवाज सतत घुमत राह्तो.
द हर्ट लॉकर(The Hurt Lokcer)-
सगळ्यात खतरनाक काम जीवंत बॉंम्ब रिफ्युज करायचे. सार्जंट विल्यम्स जेम्सचे हे आवडते काम. जेरेमी रेनर, एंथोनी मॅकी आणि ब्रायन गेरॅग्थी या सगळ्यांनी आपापली कामे चोख केली आहेत. दिग्दर्शन उत्तम आहे. बॉम्बशोधक पथकाचे काम किती जिकरीचे आणि थरकाप आणणारे आहे ते हा चित्रपट पाहिल्यावर कळते.
टनल्स रॅट(Tunnel Rats)-
भुयारातले उंदीर हाच अर्थ होतो आणि सैनीकांची हालत उदंरासारखीच होते हेच दाखवले आहे चित्रपटात. व्हियेतनाम मधील एका भागात भुयारात लपलेल्या व्हियेतनामी सैनीकांना शोधुन मारण्याचे काम करणारे अमेरिकन पथक. भुयारातले प्रसंग जबरदस्त हादरा देणारे आहेत. अभिनयाच्या बाबतीत ठिकच.
डिफायन्स(Defiance)-
दुसर्या महायुद्धात जर्मनने कब्जा केलेल्या बेलरशीया आणि पोलंडचा भागातील ज्यु लोकांना जीव वाचवण्यासाठी खोल जंगलात पळावे लागते. तीन बिलेस्की भाऊ त्यातला एक डॅनीयल क्रेग(कसिनो रॉयाल फेम). सगळी एकत्र येउन समुह बनवुन हळु हळु एक खेडे तयार होते. हा चित्रपट त्याग, आशा आणि जिद्दीचे उत्तम उदाहरण आहे. डॅनीयलचा अभिनय छान.
ऍपोकॅलॅप्स नाऊ(Apocalypse Now)-
अमेरिकन कॅप्टन विलार्डला एक ऑफीशियली "Does not exist - nor will it ever exist" असे एक मिशन दिले जाते. कर्नल वॉल्टर कर्ल्ट्झ आणि त्याचे सैन्य कंबोडियात सिमा पार करते. अमेरीकन सैन्यअधिकार्यांचा विश्वास की कर्नलची मानसिक स्थिती तिकडे जाऊन ढासळेली आहे तो पुर्णत: वेडा झालेला आहे. त्याला नेस्तनाबुत करण्यासाठी कॅप्टन विलार्डला नवख्या सहकार्यासोबत पाठ्वले जाते. पार्श्वभुमी व्हियेतनाम युद्धातली. तिथे पोहचल्यावर मात्र सगळे अनपेक्षीत आणि भयानक असते.
रॅंबो(Rambo)-
सिलेव्स्टर स्टॅलोन आपला आवडता ऍक्शन हिरो. रॅंबोचे आधिचे तिन्ही भाग आवडलेच पण हा जास्त आवडला. आता तो थायलंड मध्ये साप पकडायचे आणि बोटीने लोकांना नदिच्या पार पोहचवण्याचे आणि आणण्याचे काम करत शांतीने आपले आयुष्य जगत अस्तो. त्यात ख्रिस्ती ह्युमन राईट्स लोकांचा एक समुह बर्मा मधिल लोकांना औषधे आणि अन्न पुरवण्यासाठी तिथे येतो. थायलंड ते बर्मा हा प्रवास त्यांना रॅंबो च्या बोटीनेच आणि त्याच्या मदतीने करायचा असतो कारण रॅंबोशिवाय नदीला चांगला ओळखणारा दुसरा कोणीही नसतो. बर्माचा तो भाग गेल्या कित्येक वर्षापासुन युद्धाची झळ सोसत असतो. मेजर पा टी टींट तिकडची सगळी गावेन गावे उध्वस्त करतो. रॅंबो हा प्रस्ताव सुरुवातीला नाही नंतर हा करत तयार होतो आणि नंतर सुरु होतो रॅंबोपट.
ह्या व्यतिरिक्त "ब्लॅक हॉक डाउन", "३००","ग्लॅडीयेटर","द ग्रेट ऎस्केप","द डियर हंटर","फ़ुल मेटल जॅकेट" अशी भलीमोठी यादी आहे जे अजुन पहायचे आहेत. वेळ मिळेल तसे पाहता येतीलच.
मिपाकरांना सुद्धा युद्धावरील चित्रपट पाहण्याची आवड असेल किंवा काही पाहण्यात आले असतिलच त्यातील आवडलेले उत्तम असे आणि मस्ट वॉच असे काही असतिल तर जरुर सांगावे. :)
प्रतिक्रिया
13 Mar 2009 - 2:06 pm | स्वप्निल..
"एनीमी ऍट द गेट्स"
"सेंट्स & सोल्जर्स"
"द ग्रेट रेड (Raid)"
आठवले तसे इथे देतोच..
स्वप्निल
13 Mar 2009 - 12:58 pm | मॅन्ड्रेक
..आर्वजुन पहा.
at and post : janadu.
13 Mar 2009 - 1:31 pm | सागर
पर्ल हार्बर
व्हॉन रॅन्स एक्स्प्रेस
ब्लॅक हॉक डाऊन
15 Mar 2009 - 12:37 pm | llपुण्याचे पेशवेll
हाही एक नावापरमाणेच बर्यापैकी लांब चित्रपट आहे.
'दास बूट' म्हणजे 'त्यांची बोट' अशा नावाचा पण एक सिनेमा आहे.तोही छान आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
13 Mar 2009 - 1:31 pm | धमाल मुलगा
१.बिहाइन्ड एनिमी लाईन्स पाहिलात का? ज ह ब ह र्या आहे!
नॅटोचं विमान पाड्ण्यासाठी सोडलेलं गायडेड मिसाईलचा तो पाठलाग आणि ओवेन विल्सनला स्नायपर रायफलने गोळी मारण्याचं दृश्य आणि सोबत शॉन हॅकमनचा "माय किड इज बिहाइन्ड एनिमी लाइन्स...आय वोन्ट लेट हिम डाय" हा संवाद ह्यासाठी तर आवर्जुन पहावा असा!!!!!
२.विन्डटॉकर्सः आमचा लाडका निकलस केज ह्याचा अभिनय पाहण्यासाठी :)
3.valkyre: हिटलरबद्दल वावड्या उडवून सत्ता काबिज करण्याच्या राजकाराणावरचा लै भारी शिणुमा.
अवांतरः मला कोणी शीतयुध्दाच्या काळात चालणार्या हेरगिरीवर आधारित असलेल्या चित्रपटांची यादी देऊ शकेल काय? लई उपकार होतील :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
13 Mar 2009 - 2:47 pm | शेखर
>>मला कोणी शीतयुध्दाच्या काळात चालणार्या हेरगिरीवर आधारित असलेल्या चित्रपटांची यादी देऊ शकेल काय?
शीत युद्धावर आधारित काही चित्रपट
१. द बेडफोर्ड इन्सिडेंट
2. कोलोससः द फोर्बिन प्रोजेक्ट
3. द डिफेक्टर
४. द हंट फॉर रेड ऑक्टोबर
५. द रशिया हाऊस
13 Mar 2009 - 3:07 pm | धमाल मुलगा
नेहमी कसे काय हो तुम्हाला माहिती असतं जे मला हवं असतं? :)
लय भारी!
आता हे सगळे शिणुमे गोळा करायला सुरु करतोच.
लय लय घन्यवाद
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
13 Mar 2009 - 3:10 pm | शेखर
मित्राला मदत करायला आवडत.... :)
14 Mar 2009 - 9:14 am | विंजिनेर
हा चित्रपट जॉन ल कॅरे(मुळ नावः डेव्हिड कॉर्नवेल) ह्या दिग्गज हेरकथा लेखकाच्या गाजलेल्या (त्याच नावाच्या) हेर-कादंबरी वर आधारित आहे.
त्याचे इतर काही गाजलेले हेर-चित्रपट
१. द स्पाय हु केम इन फ्रॉम द कोल्ड(ह्यात रिचर्ड बर्टन ने नायकाची भुमिका केली आहे).
२. द लिटिल ड्रमर गर्ल
३. द डेडली अफेअर
४. द लुकिंग ग्लास वॉर.
ह्या शिवाय, बीबीसी ने सुद्धा इतर कादंबर्यावर आधारित टिव्हि मालिका बनविल्या आहेत.
अवांतरः त्याचा अजुन एका कादंबरी वर आधारित आणि नुकताच(२००५) गाजलेला अजुन एक चित्रपट The Constant Gardener.
(जॉन ल कॅरेचा आजन्म फ्यॅन) विंजिनेर
17 Mar 2009 - 12:31 pm | सागर
द स्पाय हु केम इन फ्रॉम द कोल्ड
ह्या कादंबरीचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. खरंच जबर्या आहे...
आवर्जून वाचावी अशी कादंबरी तर आहेच... पण कादंबरी वाचतानाही थरार जाणवतो....
या यादीत एक भर टाकावीशी वाटते...
जेम्स बाँड चा नायक होण्यापूर्वी पिअर्स ब्रॉसनॅन ने हा चित्रपट केला होता... "द फोर्थ प्रोटोकॉल"
एकदम सुंदर चित्रपट आहे...
हेर कसे काम करतात ह्याचे चांगले चित्रण आहे ह्या चित्रपटात... :)
13 Mar 2009 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते
जमल्यास 'डर्टी डझन' बघा.
बिपिन कार्यकर्ते
13 Mar 2009 - 2:09 pm | केशवराव
१९७० च्या सुमारास मी पाहीलेला ' बीच रेड ' अजूनही स्मरणात आहे. तसाच एक ' ग्रॅण्ड प्रिक्स '!
13 Mar 2009 - 2:12 pm | मैत्र
यात अशी रायन सारखी युद्धाची धुमश्चक्री नाही. पण कृष्णधवल काळात काढलेला आणि अभिनयसंपन्न चित्रपट.
आपल्या सैनिकांचा आणि देशाच्या स्वाभिमानासाठी लढणार्या कॅप्टनची कथा.
ऑल टाईम ग्रेट - सेव्हिंग प्रायव्हेट रायन.
13 Mar 2009 - 2:33 pm | धमाल मुलगा
येस्स!
ब्रिज ऑन रिव्हर क्वॉय! क्लास आहे हा सिनेमा. विसरलोच होतो की हे नाव.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
13 Mar 2009 - 2:14 pm | सहज
गन्स ऑफ नेव्हेरॉन
व्हेयर इगल्स डेयर
लाईफ इज ब्युटिफूल
13 Mar 2009 - 2:26 pm | मैत्र
गन्स ऑफ नेव्हेरॉन
व्हेयर इगल्स डेयर
हे अप्रतिम सिनेमा कसे काय विसरलो!! जबरदस्त...
13 Mar 2009 - 2:41 pm | भाग्यश्री
हे दोन्ही मागच्याच आठवड्यात पाहीले.. आवडले..
ब्रिज ऑन द रिव्हर क्वॉय तर प्रश्नच नाही!! अप्रतिम!!!
http://bhagyashreee.blogspot.com/
15 Mar 2009 - 8:20 am | अजय भागवत
गन्स ऑफ नेव्हेरॉन
व्हेयर इगल्स डेयर
हे आणि असे अनेक युद्धपट आमच्या तारुण्यातील गाजलेले सिनेमे. त्याकाळी चांगले पीक आले होते अशा चित्रपटांचे. पाहुन आल्यावर होस्टेलवर त्याच्या चर्चा घडायच्या. अलंकार ला मॉर्निंग शो रु २.२० ला बाल्कनीत पाहुन व्हायचा.
त्याच्या जोडीला अनेक युद्धकथा मराठीत भाषांतर झाल्या होत्या त्याही वाचतांना मन हरपायचे.
13 Mar 2009 - 2:50 pm | ढ
आणि त्याचा पुढचा
फोर्स टेन फ्रॉम नेव्हरॉन.
तसंच युद्धपट नाही पण दुसर्या महायुद्धातील हेरगिरी पट
आय ऑफ द नीडल.
13 Mar 2009 - 3:42 pm | नितीनमहाजन
लाईफ इज ब्युटीफुल
पॅटन
नितीन
13 Mar 2009 - 6:02 pm | शिवापा
शिंडलर्स लिस्ट
द पियानिस्ट
ऍन फ्रँक्स डायरी (क्रुष्णधवल)
गुड मॉर्निंग वियेतनाम
हे प्रत्यक्ष युद्धा वरचे चित्रपट नाहित पण युद्धाच्या पार्श्वभुमीवरचे आहेत. फार काहि शिकवून जाणारे!
(“Despite everything, I believe that people are really good at heart.” )
13 Mar 2009 - 6:10 pm | स्वाती राजेश
The Pianist
Hotel Rwanda
Life Is Beautiful (Vita è bella, La)
Platoon
Braveheart
Gone with the Wind
Schindler's List
Days of Glory
The Great Escape
Das Boot
Enemy at the Gates
The Downfall
Full Metal Jacket
The Thin Red Line
Miracle at St. Anna
Stalingrad
The Longest Day
Where Eagles Dare
Master and commander
यातील काही जुने सुद्धा आहेत.
The Lives Of Others हा चित्रपट जर्मन आहे.पण सबटायटल्स असतील तर कळतो..मस्त आहे..
13 Mar 2009 - 9:23 pm | सागर
The Longest Day खरेच लाँगेस्ट आहे
४ तासांपेक्षा जास्त मोठा चित्रपट आहे हा
पण एकदम सुंदर आहे... आता सगळ्याना एक विनंती.....
इथे उल्लेख केलेल्या सगळ्या युद्ध चित्रपटांच्या डाऊनलोड लिंक्स वा टोरेंट लिन्क्स मिळाल्या तर मोठी धमाल होईल...
सागर
13 Mar 2009 - 6:21 pm | सुचेल तसं
हिंदी:
१. बॉर्डर
२. एलओसी कारगिल
३. दिवार (नवीन. अगदी युद्ध नाही दाखवलं पण पाकिस्तानमधून आपले सैनिक कशी सुटका करुन भारतात परततात ते दाखवलंय..)
४. लक्ष्य
५. उपकार
६. मंगल पांडे: द रायझिंग
७. हिंदुस्तान की कसम
Finally I will be so matured that I will react to nothing.
13 Mar 2009 - 9:27 pm | नाटक्या
आपल्या लेखा मध्ये "लेटर्स फ़्रॉम लो जिमा(Letters from Iwo Jima)" ह्या चित्रपटाचा उल्लेख आला आहे. त्याचे नाव लेटर्स फ़्रॉम इवो जिमा(Letters from Iwo Jima) - असे आहे. कदाचित तुमचा L आणि I मध्ये गोंधळ उडाला असावा.
इवो जिमा हे जपानच्या जवळ एक बेट आहे. याच विषयावर (इवो जिमा) आणखीनही बरेच चित्रपट आहेत:
१. Flags of Our Fathers: ज्या सहा जणांनी इवो जिमा जिंकल्यानंतर अमेरिकेचा झेंडा उचलून परत रोवला त्यांच्या वर एक सुंदर चित्रपट.
२. Sands of Iwo Jima
३. The Outsider
बाकी लेख सुंदर.
अवांतरः यातले सगळे चित्रपट माझ्या कडे आहेत. जवळ जवळ ४० युध्दपट माझ्याकडे आहेत. वेळ मिळाल्यावर निवांतपणे माझ्याकडच्या चित्रपटांची यादी टाकीन..
- नाटक्या
14 Mar 2009 - 11:37 am | हरकाम्या
क्रुपा करुन तुमच्याकडे असलेली यादी प्रसिध्द करा. माझ्यासारख्या शौकिनासाठि ही
चांगलीच संधी ठरेल.
14 Mar 2009 - 11:59 am | दिपक
आपल्या लेखा मध्ये "लेटर्स फ़्रॉम लो जिमा(Letters from Iwo Jima)" ह्या चित्रपटाचा उल्लेख आला आहे. त्याचे नाव लेटर्स फ़्रॉम इवो जिमा(Letters from Iwo Jima) - असे आहे. कदाचित तुमचा L आणि I मध्ये गोंधळ उडाला असावा.
हो I आणि L वरुन गोंधळ झाला. चित्रपटाची नावे दिल्याबद्दल खुप धन्यवाद.. ४० चित्रपटांची यादी द्या बघु वेळात वेळ काढुन! :)
13 Mar 2009 - 9:30 pm | नाटक्या
आणखी एक अप्रतिम युध्दपट. जपानने पर्ल हार्बर वर केलेल्या हल्ल्यावर आधारीत चित्रपट. जरूर पहा.
- नाटक्या
14 Mar 2009 - 10:45 am | मिलि॑द
द हनोव्हर स्ट्रीट
जोय्सुक नोएल (१९१४ ची सत्यघटना)
यू ५७३
--मिलि॑द
14 Mar 2009 - 11:32 am | हरकाम्या
युध्दावरील चित्रपटांची यादीच मिळाली. प्रतिक्रिया देणार्या मंडळींना धन्यवाद
माझ्या यापुधील सुट्ट्या चांगल्या जातील. प्रतिसाद देणार्यांचे पुन्हा एकदा आभार.
14 Mar 2009 - 12:18 pm | दिपक
प्रतिक्रिया देण्यार्यांचे सर्वांचे आभार. मस्त यादी तयार झाली आहे. चित्रपटाचे नाव देताना जर त्या चित्रपटाची www.imdb.com वरची लिंक दिली तर चित्रपट शोधण्यास चांगली मदत होईल.
माझ्याकडे ह्या चित्रपटाचे टोरंट्स आहेत. सगळे हाय डेफिनेशन्स (mkv, avi with 5.1 Surround Sound, Size 400mb to 2 GB) आहेत. हवे असल्यास व्य.नी किंवा ख.व. मध्ये आपला विरोप पत्ता द्यावा. :)
सेव्हींग प्रायव्हेट रायन
लेटर्स फ़्रॉम इवो जिमा
द हर्ट लॉकर
टनल्स रॅट
डिफायन्स
ऍपोकॅलॅप्स नाऊ
रॅंबो
ब्लॅक हॉक डाउन
३००
ग्लॅडीयेटर
द ग्रेट ऎस्केप
बिहाइन्ड एनिमी लाईन्स
दास बुट
क्रॉस ऑफ आयरोन
पॅटन
बटान
शिन्डलेर्स लिस्ट
15 Mar 2009 - 11:46 am | आदम
plz forward me the torrentz on adam.dalwai@gmail.com.
thanx in advance. sorry can't write marathi so good wth d help of keypad.
14 Mar 2009 - 8:17 pm | प्रमेय
या सगळ्या यादींमध्ये एक महत्वाचं नाव राहिले आहे.
१. नो मॅन्स लॅंड या चित्रपट 'सबटायटल' बघा. कारण भाषा ओळखीची नाही. तसेच 'विंग्रजी' आवॄत्तीपण मिळू शकेल.
14 Mar 2009 - 11:19 pm | बुद्ध
लगान ने याच सिनेमा ला टक्कर दिली होती ... .. ओस्कर यानेच पटकावला... खूप वास्तवादी आहे....
बुद्ध
~desire is the root of all suffering
14 Mar 2009 - 11:20 pm | भडकमकर मास्तर
हेच बोल्तो..
एका मित्राकडून डीव्हीडी कॉपी करून घेतली होती..
भन्नाट आहे सिनेमा...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
4 Mar 2018 - 11:59 pm | एकुलता एक डॉन
नो मॅन्स लॅंड
हिंदी आवृत्ती
हम तुम दुश्मन दुश्मन
14 Mar 2009 - 11:13 pm | बुद्ध
लॉअरेन्स ओफ अरेबिया हा मिडल ईस्ट वरील युद्धा वरचा मूवी आहे... अवर्जुन पहा ,
प्लाटून हा विअतनाम युध्दा वरती आहे, गन्स ओफ्फ नावोरेने हा पन छान आहे
बुद्ध
14 Mar 2009 - 11:45 pm | भाग्यश्री
अरे रामायण , महाभारत कसे विसरलात?? =))
15 Mar 2009 - 7:55 am | नाटक्या
दिपकसाहेब,
ही घ्या माझ्या कडची यादी. जर जवळच कुठे रहात असता तर बघायला पण दिल्या असत्या DVD :-)
1. U-571
2. Saving Private Ryan
3. Tora! Tora!! Tora!!!
4. The Eagle has landed
5. Where Eagels Dare
6. The Guns of Navarone
7. The Longest Day
8. The Bridge at Remagen
9. The Bride on the River Kwai
10. Behind Enemy Lines
11. Thin Red Line
12. Tigerland
13. A Walk in the Sun
14. Gung Ho
15. Go for Broke
16. Corregidor
17. Ski Troop Attack
18. Casablanca Express
19. The Steal Claw
20. Desert Commandos
21. Minesweeper
22. Bombs over Burma
23. Commandos (1968)
24. Pacific Inferno
25. Tha Battle of the Eagles
26. Submarine Alert
27. The Dawn Express
28. Five for Hell
29.Black Brigade
30. Heros in the Hell
31. Submarine Base
32. Aerial Gunner
33. Dirty Dozen
34. Platoon
35. Escape from Auschwitz
36. Von Ryan's Express
37. Schindler's List
38. Full Metal Jacket
39. Flags of Our Fathers
39. Sands of Iwo Jima
40. The Outsider
41. Colditz
42. When Trumpets Fade
43. A Bridge Too Far
- नाटक्या
16 Mar 2009 - 2:34 pm | दिपक
धन्यवाद नाटक्याभाऊ,
यादी मधले चित्रपट जमवायचा प्रयत्न करतो. नाही मिळाले तर त्रास देईन तुम्हाला. :)
15 Mar 2009 - 10:30 am | इनोबा म्हणे
दि बिस्ट
रशिया व अफगाणिस्तान युद्धावर आधारीत हा चित्रपट. रशियन सेनेचा एक टँक जो इतर तुकड्यांपासून भरकटत दूर जातो व अफगाणी टोळ्यांशी त्यांचा कसा संघर्ष होतो याची कथा आहे. या चित्रपटात कबीर बेदीने एका अफगाण टोळीप्रमुखाची भूमिका केली आहे.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
15 Mar 2009 - 8:35 pm | मिलि॑द
द बीस्ट.
अजून काही....
द ग्रीन बेरेट्स
डाउनफॉल
द फ्लाईट ऑफ द फिनीक्स (युद्धपट नाही, पण कि॑चीत पार्श्वभूमी आहे)
सि॑क द बिस्मार्क
--मिलि॑द
15 Mar 2009 - 12:06 pm | संग्राम
हा चित्रपट जपान व ब्रिटीश युद्धावर आधारित आहे. खुपच छान आहे . या चित्रपटाला 7 ऑस्कर मिळाले आहेत
15 Mar 2009 - 12:25 pm | मराठी_माणूस
मायभूमीतला "हकीकत"
15 Mar 2009 - 9:15 pm | कालिन्दि मुधोळ्कर
मला अत्यंत आवड्लेले दोन युद्धपटः
१. 5 fingers (http://en.wikipedia.org/wiki/5_Fingers)
2. The Man who Never was (http://en.wikipedia.org/wiki/The_Man_Who_Never_Was)
16 Mar 2009 - 4:13 pm | अ-मोल
पहायला विसरु नका. अप्रतिम.
17 Mar 2009 - 11:10 am | आनंदयात्री
उत्तम कलेक्शन .. आम्ही वाचणखुण साठवली आहे.
18 Mar 2009 - 8:38 pm | संदीप चित्रे
यू - ५७१ नक्की पहा !
5 Mar 2018 - 2:34 pm | सांरा
मी बघितलेले काही....
युध्दपट इंग्रजी
Apocalypse now
Brotherhood(Korean)
दुसऱ्या महायद्धत तीन देशांकडून लढलेल्या कोरियन सैनिकाची कथा (नाव नाही आठवत)
Flowers of.....(काहीतरी)(चिनी)
Full metal jacket
The deer hunter
The Brest fortress
Come and see
Glory
Letters from Iwo Jima
Zero
Tora Tora Tora
Bridge on river kasi
All quiet on western front
Red cliff
Founding of the nation
हिंदी
हकीकत
हम दोनो
Border
Loc
1971
थेट किंवा पूर्ण युद्ध नसलेले
Life is beautiful (la vita a bella)
Schindler's list
Grave of fireflies
Lost innocence
Empire of the sun
How I learned to stop worrying and love the bomb.
Casablanca
Forrest gump
अजून आठवले की टंकतो